Nov 30, 2021
प्रेम

विस्मृती भाग - 2

Read Later
विस्मृती भाग - 2

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

   भाग - १ 

https://www.irablogging.com/blog/vismruti_9211

 

              विस्मृती

भाग-२ 

     सकाळचे ५.३० वाजता घड्याळाची बेल वाजली. तसं आईने विधीताला उठवलं. काल सगळ्या गोष्टी आवरून झाल्या होत्या. आता फक्त निघायचं  होत. विधीताच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी ओसंडून वाहत होता. आई - बाबा तिला खूप काही सूचना देत होते. खासकरून आई. मुल कितीही मोठी झालीत तरी आई - बाबांसाठी ती लहानच असतात हेच खर. फॅशन डिझायनिंगच्या क्लासला जोडून सुट्टी होती म्हणून अवनी आणि स्वातीने कुठेतरी फिरायचा प्लॅन केला होता आणि विधीतालाही तयार केल होत. अवनी आणि स्वाती विधीताच्या फॅशन डिझायनिंग क्लासच्या मैत्रिणी. अगदी कमी वेळातच त्यांची खूप घट्ट मैत्री झाली होती. अवनी तिच्या गाडीने स्वातीला पिक-अप करुन विधीताला न्यायला आली. तशी विधीता घाई- घाईत निघाली. आई - बाबा अगदी खालपर्यंत तिला सोडायला आले होते. आईचे डोळे पाणावले होते. ते बघून अवनी विधीताच्या आईला म्हणाली, "काकू तुम्ही काळजी करु नका. मी जशी तिला आता नेतेय. त्यापेक्षा ही अजून आनंदात असलेली विधीता तुमच्या समोर घेवून येईल." विधीताच्या आईला हे ऐकून तेवढा दिलासा वाटला. विधीताच्या आई-बाबंचा निरोप घेत प्रवासाला सुरुवात झाली. मजा, मस्ती, गप्पा, गाणी, एकमेकांना चिडवण  सगळ काही प्रवासात त्या तिघींच सुरु होत. त्यामुळे प्रवासाचा वेळ कसा निघून गेला हे कळलचं नाही. अवनी गाडी एका वळणाला वळवत म्हणाली, "फायनली हम अपने मंजिल के करिब पोहचने वाले है…" "अग पण हे ते गाव नाहीयेय?? तुझ्या मामाच गाव तर ह्या रस्त्याच्या बरोबर विरूध्द दिशेला आहे ना? ते काय लिहिलय फलकावर" ,विधीता फलकाकडे बोट दाखवत म्हणाली. "अवनी तु सांगितलं नाहीस का हिला आपला प्लॅन बदलला ते?" ,स्वातीने अवनीला विचारलं. "अरे हो ग. तुला सांगितलं आणि हिला सांगायचचं विसरले मी."  "काय प्लॅन बदललायं अवनी??" ,विधीताने विचारलं. "अग एवढ काही नाही. आपण मामाच्या ज्या घरी जाणार होतो ना तिथे घराचा मागच्या बाजूवर काल रात्री अचानक मोठ आंब्याच झाड पडलं. फार काही झालं नाही पण आता तिथे डागडूजीच काम सुरु आहे म्हणून मामाने आपल्याला त्याच्या फार्महाऊसवर बोलवलय. आणि म्हणून आपण ह्या रस्त्याने चाललोय." ,अवनी म्हणाली. "अगं मला आईला हे सांगायला हवं" ,विधीता आपला फोन हातात घेत म्हणाली. "अगं नको तुझी आई घरी परत ये म्हणाली तर काय करशील?? एकतर आधीच तुझ्या आई कशीबशी तयार झालीय. आपण हिच्या मामाकडेच तर जातोय ना? फक्त गावचं तर बदललय. मला एक समजत नाही आता तु बरी झालीस ना म तुझी आई इतक का टेंशन घेते?" ,स्वातीने तिला विचारलं. "अग असं नाहीयेय. तुला माहितेय ना आम्ही आजोळवरुन फोर व्हिलरने येत असताना आमचा ॲक्सिडेंट झाला होता. माझ्या डोक्याला मार लागला होता. पण मला ते ॲक्सिडेंटच आठवत नाहीयेय. मधले १५ दिवस मी शुध्दीतच नव्हते. जेव्हा शुध्दीवर आले तेव्हा घरी होते. पण मला आजोळला कधी गेलो? आमचा ॲक्सिडेंटकधी झाला?? काहीच आठवतच नाहियेय. मी ही हादरलेच होते तेव्हा बाबांनी सावरल मला पण आईने फार टेंशन घेतल. तेव्हापासून ती माझी फारच काळजी घेते. पण आता डॉक्टरांनी सांगितलय कि ट्रिटमेंटकरून मला ते सर्व हळूहळू आठवेल. म्हणून आईला सांगायला हवं मला. तिच्याशी खोट बोलण मला नाही जमणार अगं" ,विधीता म्हणाली. "ठिक आहे सांग. तुझी आई परत ये म्हणाली तर आम्ही पण येणार. आम्ही तुला ड्रायव्हरसोबत एकटीने जावू देणार नाही. होय ना अवनी?",स्वाती नाराजीत म्हणाली. "अगं माझ्यामुळे तुम्ही कशाला परत येणार?",विधीता दु:खी स्वरात म्हणाली. "ठिक आहे म आमच्यासाठी आईला ही एक गोष्ट नको सांगुस. हव असेल तर ट्रीपवरुन आल्यावर मी तुझ्या आईला सगळ सांगेन. मग तर झाल." ,अवनी तिच मन वळवत म्हणाली. विधीताला दोघींच तस पटत नव्हतं पण आपल्यामुळे ट्रिपवर विरजण नको म्हणून ती तयार झाली.

     थोड्या वेळानी त्या गावाच्या वेशीवर असलेल्या मामाच्या फार्महाऊस पोचल्या. विधीताला गावाला पोचताच फार वेगळच वाटत होत. जणू काही आपण इथे आधी आलोय. पण तिने ह्या तिच्या विचारांकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं. अवनीच्या मामाने पोरी येणार म्हणून अगदी सगळ्या सोयीसुविधाकडे लक्ष दिले होते. मामी आणि प्रतिक (त्यांचा मुलगा) मामीच्या माहेरी गेले होते. त्यामुळे मामा अगदी सगळ्या गोष्टीत आवर्जून लक्ष घालत होते व तश्या नोकरांना सूचनाही देत होते. मामाने मुलींची चौकशीही केली. छान गप्पाही झाल्या. जेवण व्हायला वेळ होता म्हणून मामानी मुलींना गावात असलेल्या कृष्णाच्या देवळात जावून यायला सांगितलं.

क्रमशः

 

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now