विस्मृती भाग - 10

विस्मृती...........भावनांची गुंतागुंत....

भाग - 9 https://www.irablogging.com/blog/vismrutibhag-9_10176

                    विस्मृती

भाग - १० अंतिम

प्रिय विधीता,

     मला माहितेय लग्नानंतर मी तुझ नाव माझ्या आईच्या नावावरून ठेवलं. आणि तु ते आनंदाने स्वीकारसही. पण आता तुझ्या जुन्या नावाने तुला पत्र लिहीतोय. कारण तु जेव्हा मला पहिली भेटली होतीस तेव्हा विधीता म्हणून भेटली होतीस…….

     तुला त्यावेळी ही मी असच पत्र लिहिल होत. माझ्या प्रेमाची कबुली देण्यासाठी. ते माझ पहिल पत्र. त्यानंतर कधी गरजच पडली नाही तुला पत्र लिहिण्याची. कारण तु न बोलताच माझ्या मनातलं ओळखायचीस. आताही ओळखल असतसं ह्या भीतीने हे माझ शेवटच पत्र लिहितोय. माहितेय शेवटच हा शब्द वाचून तुझ्या मनात धस् झाल असेल. होय शेवटच अगं. कारण मला कॅंसर झालाय अगं! तोही लास्ट स्टेजमधला.....हो माहितेय मला कि मी हे तुझ्यापासून लपवलय. तुला राग येत असेल माझा खूप. पण लपवाव लागल मला ते फक्त तुझ्यासाठी. माझ्या प्रेमासाठी… मला माहितेय मी आता फारतर ४-५  वर्ष जगेन. तुला हे सत्य कळल्यावर तु तरीही मला वाचवण्यासाठी तुझ्या जीवाच रान करशील. मी गेल्यावरही पुढे एकटीनेच आयुष्य काढशील. तु जिवंत तर असशील पण शरीरानेच. हे नकोय मला. म्हणूनच मला वाटत तु नवीन ठिकाणी नव्याने आयुष्याला सुरुवात करावीस.  नव्याने संसार थाटावास आणि हे मी असताना तर शक्यच नव्हत.. म्हणून मी हा टोकाचा निर्णय घेतला. 'आत्महत्या'…….मान्य आहे मी चुकतोय. मला स्वार्थी म्हण हव असलं तर...माझ्या प्रेमाला सुखी बघण्याचा स्वार्थ...हव असल तर हीच माझी शेवटची ईच्छा समज. पूर्ण करशील का तुझ्या विक्रांतची ही ईच्छा…….?

                                                

                                                  तुझाच विक्रांत

     

     पत्र वाचल्यावर विधीता ओक्साबोक्षी रडायला लागली. ती विक्रांत ला आवाज देत बोलू लागली," विक्रांत तु असं नको करायला हव होतसं. माझ्यासाठी तु स्वतःचा जीव संपवलास हिच माझ्यासाठी मोठी आयुष्याभराची शिक्षा आहे. मी फक्त तुझीच आहे. मग पुढे तुझी विधवा म्हणून आयुष्य जगायला लागल असतं तरी जगली असते. अरे तुझ्याशिवाय मी कोणाचाच मी विचार करु शकत नाही हे तुला चांगलच माहितेय. पण तरीही तु……." तिच्या तोंडातून शब्द फुटेनासे झाले. ती सुन्न झाली. तिला अवनी स्वाती ने सावरलं.  तिची समजूत काढली. खुप समजून काढल्यावर ती थोडी सावरली. मग थोडा वेळ तलावाच्या पायऱ्यांवर ती एकटी बसली. अवनी तिच्या जवळ जात होती तेवढ्यात मिहीरने  तिला हाताने थांबवलं. तो तिच्या इथे गेला. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवता ठेवता मागे नेला. थोड अंतर ठेवून तिच्या बाजूला बसला.  ती कुठेतरी हरवलेली होती. तो बोलायला सुरुवात करतो तशी ती भानावर येते.. " मला माहितेय विधीता तुझ्या आयुष्यातली इतकी मोठी गोष्ट तुला अचानक इतक्या वर्षानी कळतेय. ज्याला तु आयुष्य मानलस तो तुझ्यापासून कायमचा दूर गेलाय. कदाचित तुझा अजूनही विश्वास बसत नसेलं. ही गोष्ट तुला पचायला जड जाईल माहितेय मला. प्रेम हा शब्द ऐकल्यावर समोर फक्त ती आणि तीच व्यक्ती दिसते. उलट प्रेमाला दुसरा समानार्थी शब्दच म्हणजे ती व्यक्ती असते आपल्यासाठी. तिला सोडून दुसऱ्या कुणाचा विचार करणं म्हणजे कसं शक्य आहे…?" त्याचा कंठ दाटून आला होता. तो नकळत स्व:ताच्या मनातलचं बोलून गेला होता. विधीता शांतपणे मान खाली घालून ऐकत होती. "पण तरीही तु तुझ्या नवऱ्याची शेवटची ईच्छा पूर्ण करशील अगदी हृदयावर दगड ठेवून करशील मला महितेय. माणूस म्हणून फक्त तु शरीरानेच जिवंत असशील. पण मी तुला असं नाही बघू शकत. तुझ आता प्रेम नाहीयेय पण त्याचा आठवणींची कास धरून मला तुला पुन्हा आयुष्यात उभ राहताना बघायचयं. त्याची आठवण येताच तुझ्या चेहऱ्यावर आलेल हसू बघायचयं. मला यापुढे तुझ्या प्रत्येक  सुख:दुखात तुला साथ द्यायचीय. एक प्रियकर म्हणून नाही तर एक सखा म्हणून. तुझ्या परवानगीशिवाय माझ्यातला प्रियकर कधीच बाहेर येणार नाही अगदी आयुष्याच्या शेवटपर्यंत म्हटलसं तरीही…(सुस्कारा सोडत म्हणतो) बस एवढच बोलायचं होत मला यापुढे तुझा जो काही निर्णय असेल तो मला मान्य असेल." असं म्हणून तो निघूनही जातो. विधीता त्याला पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच बसते. ती नियतीने रचलेल्या ह्या खेळात पुरती अडकून जाते. तेवढ्यात अवनी आणि स्वाती तिच्याजवळ येतात. अवनी तिच्या खांद्यावर हात ठेवते," विधीता तु ठीक आहेस ना?"

विधीता उभी राहत आकाशात वर बघत बोलते, " हो. पण नेमक त्याने माझ्या आयुष्याच काय विधीलीखित लिहून ठेवलयं याचा विचार करतेय…....."

  समाप्त.

🎭 Series Post

View all