विश्वासाचा दोरा आणि विकृतीची आग भाग १

Trust your love only

अनघा खुप मनमिळावू मुलगी होती,आणि नेहमीच सकारत्मक वृत्ती ठेवणारी होती आणि हसरी..अभ्यासातही हुशार होती,अगदीच परफेक्ट.. तिचे आई बाबा लग्नासाठी स्थळ पाहत होते, आणि तीसुद्धा लग्नाला तयार होती फक्त तिला जोडीदार तिला समजून घेणारा हवा होता इतकीच एक तिची अपेक्षा होती.एके दिवशी तिच्यासाठी  एक स्थळ आले खूप छान होता मुलगा,संकेत नाव होते.संकेतची जॉईंट फॅमिली होती.घरदार व्यवस्थित..मुलगा दिसायलाही छान होता.संकेतलाही अनघा खूप आवडली.. दोघांनी लग्नाला संमती दिली.. अगदी महिन्याभरातच लग्न झाले. तिच्या वडिलांनी धुमधडाक्यात लग्न लावून दिले..
आता अनघाने नवीन आयुष्याला सुरवात केली होती.संकेतही तिला खूप जीव लावत होता..दोघांनी आपला भूतकाळ एकमेकांबरोबर शेअर केला.संकेतनेही त्याला कोणती मुलगी आवडत होती ते सांगितले,अनघाणेही तीला कोणत्या मुलावर प्रेम होते ते सांगितले.. पारदर्शकता आली दोघांमध्ये ..नव्याने दोघांनी संसाराला सुरवात केली होती आता..अनघा  सर्वामध्ये मिसळण्याचा प्रयत्न करत होती..साखर पाण्यात मिळावी तशी ती मिसळली ..सासू सुद्धा अनु करूनच तिला हाक  मारायची ..पहिल्या दिवाळ सणाला सुद्धा तिची फार हौस केली ..त्यांच्या घरात विभावरी म्हणजे संकेतची आते बहीण हिचे सारख येणे जाणे असायचे तिचेही लग्न झाले होते पण ती जवळच राहायची. विभावरी आणि अनघा एकाच वयाच्या दोघीमध्ये छान गट्टी जमली होती, सर्व काही शेअर करायची अनघा तिच्याशी.. विभावरी सुद्धा  खूप गोड बोलायची ,अनघाला बहीण न्हवती पण विभावरी आयुष्यात येण्याने तिची हौस पूर्ण झाली ,अनघा स्वतःच्या साड्या ,ड्रेससुद्धा तिला देई. जिवाभावाच्या मैत्रिणी झाल्या होत्या आणि  अनघाची सासु सासरे सुद्धा फार खुश होते  तिच्यावर .अनघाने स्वतःच्या लाघवी स्वभावाने जिंकून घेतली होती सर्वांची मन .अनघाचे आई बाबा फार खुश होते लेकीचा संसार छान चालला होता..अनघा नेहमी हसत मुखत  असायची.
वर्षभरातच अनघाने गोड बातमी दिली.. आता घरात सर्वेच खुश होते. सासू सासरे आणि संकेत सुद्धा खूप काळजी घेत होता. पण अनघा मध्ये अचानक बदल होत गेला..नेहमी टवटवीत असणारी अनघा आता खूपच निस्तेज झाली होती.. शांत रहायला लागली होती .नक्की काय झाले होते माहीत नाही.घरच्यांना वाटले की पहिली वेळ गरोदर राहिली आहे म्हणून कदाचित तिला दडपण आले असावे. सातव्या महिन्यात ती आईकडे गेली, तरीही तिची तीच गत, सतत विचारांमध्ये असायची, जास्त कोणाशी बोलायची नाही.सतत चिंतीत असायची.आई बाबा पण किती तिला बोलत करायचे तरी पण ती काहीच बोलायची नाही.. आणि नवव्या महिन्यात तिचा बी पी सुद्धा लो झाला..एवढ्या दिवस काही त्रास न्हवता आणि अचानक काय झाले, ती सुद्धा घाबरली.. पण डॉक्टरांनी तिला टेंशन न घेण्याचा सल्ला दिला ..ती बाळासाठी खुश राहण्याचा प्रयत्न करत होती पण तरीही तिला जमत न्हवत.. नक्की काय तिला झाले होते काय माहीत...
थोड्या दिवसाने तिने छान मुलीला जन्म दिला.आता अनघा आईच सुख अनुभवत होती.तिच्या आई बाबांना वाटले की आता अनघाचे नैराश्य आले आहे ते जाईल ब,पण नाही तीच गत. मुलीला सुद्धा जास्त न्हवती घेत ,तिच्याच दुनियेत असायची .मग आई बाबांनी विचारले नक्की काय सासरी  त्रास आहे का तरी ती बोलली नाही..तिच्या अश्या वागण्यामुळे आता आई बाबा चिंतीत राहायला लागले..आईला शंका आली की ती मानसिक त्रास नक्की आहे तिने मग तिची बालपणीची मैत्रीण सुजाता जी मनोवैज्ञानिक होती तिला फोन करून बोलावले.

काय झाले होते अनघाला पाहु पुढच्या भागात.

अश्विनी पाखरे ओगले

लेख आवडल्यास लाईक, कंमेंट,फॉलो करा..

🎭 Series Post

View all