अलक.. अंधळा विश्वास

Vishwas


अलक

त्याने सांगितलेली प्रत्येक गोष्ट ती अगदी त्याच्या वर आंधळा विश्वास ठेवून तर करत होतीच पण त्याच्या वर असलेल्या प्रेमापोटी ही ती आवडीने निःशंक होऊन पाळत होती...
आणि म्हणूनच तर तीने त्याने दिलेल्या divorce पेपर वर त्याच्या वर विश्वास ठेवून तो जिथे म्हणेल तिथे सह्या केल्या, आणि सोबत तिच्या नावावर असलेल्या प्रॉपर्टी च्या पेपर वर ही सह्या करून मोकळी झाली होती..

त्यात ही ती म्हणाली ,बोल अजून कुठे करायच्या आहेत का सह्या.. म्हणजे मी मुक्त होईल..तुझ्या बंधनातून..

तू जर म्हणाला असता तर मी जीव ही दिला असता हसत असत मग हा divorce आणि प्रॉपर्टी चे काय तुझ्या प्रेमापुढे..

Divorce वर फक्त सही घ्यायची तसदी घ्यायची होतीस, बाकी प्रॉपर्टी तर कधीच तुझ्या नावावर केलीच होती..

तो चपापला त्याला स्वतःची लाज वाटली..
तिचा इतका गाढ विश्वास होता आपल्यावर हे कळल्यावर त्याने ते सगळे पेपर फाडून टाकले होते.
तिच्या अंधल्या विश्वासाचा आज विजय झाला होता ...

Anuradha andhale palve