विसावा

आईला कधी विसावा नसतो
विसवा न मिळाला कधी मला
जेव्हा पासुन बनले मी माता

सतत वाटे सर्वा त्यागाची मी देवता
अरे मजही फक्त आई न जाणता

माणुस म्हणुन कोणी उमजा
नको मजा वंदना कींवा साजरा दिन कोणता

हवा आहे श्वास मजसाठी थोडा
तिथपर्यंत लेकुरे माझी पंखाखाली तुम्ही घ्या

काही काळ मिळावा तो विसावा 
शोधाया माझे मी परत मला