विरुद्ध तो आणि ती भाग ६

Experience Change Everything
अमोल आज परी विषयी सत्य सांगणार होता..


अमोल बोलू लागला "नेहा परी माझ्या आयुष्यातलं असं पान होतं ज्यामुळे माझं आयुष्य बदलून गेलं. सर्वच बदललं.. माझं बालपण हरवलं.

अमोल मी माझे कुटुंब समाधानाने जगत होतो ..
दुःखाचा लवलेशही न्हवता...
एक प्रसंग घडला ..वाईट प्रसंग परिच्या बाबतीत..एक दिवस मंजिरी काकू रडत घरी आल्या... आईला म्हणाल्या निशा यांना बघ ना कसं तरी होतंय ...घाम आला आहे... म्हणतात छातीत दुखतंय. आम्ही परीच्या घरी गेलो.. परी रडत होती.. मला आणि परीला घरी ठेवले होते.. आई बाबांनी त्यांना दवाखान्यात नेहले....

परी मला विचारू लागली अमोल माझे बाबा बले तल होतील ना??
मी सुधा रडत होतो पण तरीही मी तिला सांगितले" होबाबा बरे होतील लवकरच घरी येतील."

थोड्यावेळाने आई-बाबा मंजिरी काकू सगळे घरी आले पण परीचे बाबा घरी आले नाही... परीने मंजिरी काकूंना विचारले "आई बाबा कुठे आहेत ???मंजिरी काकूने तिला कवटाळले आणि म्हणाली तुझे बाबा आपल्याला नेहमी साठी सोडून गेले ..हे ऐकून ती खूप रडू लागली.
ती माझ्याकडे आली आणि मला म्हणाली अमोल तू खोतालदा आहेस..तू बोलला होतास ना माझे बाबा पलत येतील पण माझे बाबा आलेच नाही तू खोतालदा आहेस तू..देव बाप्पाला सांगणार मी तुझे ताण तापायला.... मी रडतच उभा होतो..

एकदा देवाघरी गेलेला माणूस कधीच येत नाही हे मला आईने सांगितलं होतं मी निशब्द झालो मी सुद्धा परी सोबत रडू लागलो मला काहीच कळत नव्हतं पण इतकं मात्र कळत होतं की परी ला खूप त्रास होतो आहे...तिचा त्रास पाहून मलाही त्रास होत होता...


दुसऱ्या दिवशी तिच्या बाबांना आणण्यात आले .. परी त्या मृत शरीराला पाहून खुश झाली..तिला काय माहीत होतं तिच्या बाबांच्या शरीरातून प्राण निघून गेले आहेत..ती बोलू लागली "बाबा उठाना मला उचलून घ्या ना, पण ते बाबा उठणार थोडीच होते .. मला तेच दृश्य फार वाईट वाटत होते ..पण मी काहीच करू शकत नव्हतो परी साठी.


परी तिच्या आईला बोलत होती" आई बाबांना सांग मला उचलून घ्यायला मला त्यांच्याशी बोलायचे, मला ना त्यांच्या बरोबर फिरायला जायचंय.. आई निशब्द झाली होती.. ती फक्त रडत होती.. परी सुद्धा खूप रडत होती. थोड्या वेळाने तिच्या बाबांना उचलले आणि घेऊन जायला लागले परी तिच्या बाबांच्यापाठी वेड्यासारखी पळत होती ते दृश्य आजही जसेच्या तसे उभे राहते डोळ्यासमोर .आजही अंगावर काटा येतो..


नेहा :"खरंच खूप वाईट झालं इतक्या लहान वयात वडिलांचे छत्र हरपले.. फारच भयानक.. कसं सहन केले असेल।तिने????

अमोल:" बरोबर बोलत आहेस तू नेहा .. मीसुद्धा अनुभवले आहे हे सर्व... आयुष्य उध्वस्त होण्यास सारखं असते..

नेहा:" काय तू सुद्धा अनुभवला आहे??? म्हणजे तुझे वडील सुद्धा??

अमोल :" माझे वडील सुद्धा मी लहान असतानाच वारले..

नेहा:"अमोल तुझ्या वडिलांना काय झालं???

अमोल:"निशा खरं तर माझे वडील मी माझी आई एक छान कुटुंब होतं.. पण आमचा संसार उद्ध्वस्त होण्यासाठी फक्त एक फोन पुरेसा ठरला ...

नेहा :"काय एक फोन ???


अमोल:"हो एक फोनच ...माझ्या आईला फोन आला. ती व्यक्ती म्हणाली तुमच्या नवऱ्याचे एका बाईशी अनैतिक संबंध चालू आहेत हे ऐकून आईला विश्वासच बसला नाही खरं तर तिला बाबांवर पूर्ण विश्वास होता.

बाबा घरी आल्यावर आईने झालेला प्रकार बाबांना सांगितला बाबा हसले आणि म्हणाले "अगं कुणीतरी थट्टा केली असावी जाऊदे लक्ष देऊ नको "

आईलाही ते पटलं.. तिने डोक्यातून तो विचार काढून टाकला..असेच दिवस जात होते.. आम्ही खूप खुश होतो.. आमच्या आयुष्यामध्ये आनंद होता ..मला फक्त परिसाठी वाईट वाटायचं की देवाने असं का केलं??? तिच्या वडिलांना इतक्या लवकर का घेऊन गेले ??देवाला हाच प्रश्न विचारायचो.. एक दिवस आईच्या फोनवर पुन्हा कॉल आला आणि तो व्यक्ती आईला म्हणाला की जर तुम्हाला तुमच्या पतीला रंगेहात पकडायचा असेल तर तुम्ही ह्या वेळेस येथे त्यांच्या ऑफिस समोर उभ्या राहा .आईने ह्यावेळी विचार केला यावेळी सोक्षमोक्ष लावण्याचा नक्की हा माणूस असा का बोलतो आहे???सतत मला फोन का करतो आहे ??ऑफिसच्या समोर उभी राहिली आणि बघते तर काय बाबा एका बाईशी बोलत होते समोर जाऊन पाहिले तर ती बाई मंजिरी काकू होती.. आईला फार राग आला तिला काही सुचत नव्हतं .संशयाचे भूत त्यांच्या मानगुटीवर बसलं होतं...

आईने -बाबांच्या कानाखाली मारली आणि निघून गेली...तिच्या पाठी पाठी मंजिरी काकू आणि बाबा दोघेही आले.. मंजिरी काकू बोलू लागली "तू समजते असं काहीच नाही आमच्यामध्ये.. मी फक्त रमेश भाऊची मदत घेत होती.. आईला भरपूर राग आला

आई:"माझ्या नवर्‍याला स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात फसवलं किती विचित्र आहेस तू मैत्रीण म्हणून घेण्याच्या लायकीचे नाही.. मी तुझ्यावर किती विश्वास ठेवला आणि हे तू असं सगळं करतेस... बाबा आईला समजावत होते "असं काहीच नाहीये मी फक्त तिला मदत करत होतो बाकी काहीच नाही...

आई चिडली होती तिने पुन्हा बाबांच्या कानाखाली वाजवली तिला काही सुचत नव्हते काय करते आहे तिची तिलाच कळत न्हवते..ऐकण्याच्या परिस्थितीत न्हवती.ती घरी आली तिने माझे, स्वतःचे कपडे भरले आणि मला घेऊन घर सोडलं ते नेहमीसाठीच..बाबा रोज आमच्या दारात येत तिला खूप समजवण्याचा प्रयत्न करायचे पण आईच्या डोक्यात संशय इतका खोलवर बसला होता की ती बाबांच्या तोंडाकडेसुद्धा बसत न्हवती..

तिचा प्रेमावरून, मैत्रीवरून विश्वास उडाला होता की ती अजिबात एकही शब्द बाबांच्या तोंडुन ऐकण्यास तयार नव्हती..

मला बाबांची खूप आठवण यायची असं वाटायचं आईने सगळे विसरून जावं..पुन्हा एकत्र राहावं.. असं खूप वाटायचं ..ते अशक्य झालं होतं .बाबा रोज यायचे पण बाबांना पाहिलं की आई दरवाजे खिडक्या बंद करायची आणि मला सांगून ठेवले होते अजिबात बाबांना भेटायचं नाही .. हा माणूस विश्वास करण्याच्या लायकीचा नाही माझ्याशी विश्वासघात केला ह्याने..
मी खूप दुःखी होतो परीचे बाबा देवाघरी गेले होते म्हणून ती त्यांना भेटू शकत नव्हती पण माझे बाबा असताना देखील मी त्यांना भेटू शकत नव्हतो ही खंत मला सतत वाटत होती...



शेवटी खरं काय एक दिवस समोर येणारच होतं .एक दिवस सत्य समोर आले ....सर्वच संपलं होतं.. उशीर झाला होता....
एक दिवस आईकडे एक पत्र आले..माझ्या बाबांचे पत्र होते....बाबांनी स्वतः लिहिलेले पत्र होते.. आईने ते पत्र वाचले आणि जोरजोरात रडायला लागली... स्वतःच्या तोंडात झोडून घेतले.. काय लिहिले होते पत्रात नक्की वाचा पुढील भागात.....

अश्विनी पाखरे ओगले...

लेख आवडल्यास नक्की लाईक, शेअर कंमेंट करा..

तुमच्या प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद....