विरुद्ध तो आणि ती (भाग ७)

Decision change life

गेल्या भागात आपण पाहिले की अमोलची आई निशा  त्याला नेहमीसाठी सोडून आली होती..अमोलला वडील असूनसुद्धा नसल्याची खंत सदोदित त्रास देत होती पण नवऱ्यावर उडालेला विश्वास निशाचं मन  पुन्हा नात जोडण्यास धजावत न्हवते. अमोल आणि त्याची आई एकटं आयुष्य जगत होते. एक दिवस एक पत्र आले ते वाचून निशा स्वतःला कोसू लागली. काय होते पत्रात???


अमोल:"आई  कामाला गेली होती. सकाळची कामं आवरून मला  एकट्याला सोडून कामाला निघायची.. माझ्यासाठी जेवणाचे ताट वाढून जायची...आई निघून गेली की मला फार भीती वाटायची तेव्हा ..असे वाटायचे की कोणीतरी येईल आणि मला घेऊन जाईल.. घाबरत रहायचो.झोपही लागत न्हवती.. एक दिवस एक पोस्टमन काका आले आणि दार ठोठावले.. मी दचकून जागा झालो.बहुदा त्यांना शेजाऱ्यांनी सांगितले असावे मी घरात आहे...मी हळूच दाराच्या फटीतून पाहिले .त्या पोस्टमन  काकांनी मला दाराच्या फटीतून  पत्र दिले..मी ते पत्र घेतले.. नाव पाहिले तर माझ्या बाबांचे नाव होते..मला तेव्हा फक्त बाबांचं आणि आईचे नाव वाचायला यायचे, बाबांनीच मला शिकवले होते.मी खूप खुश झालो.असे वाटले आता बाबांनी पत्र पाठवले आहे तर ते सुद्धा येतील. त्यादिवशी मला अजिबात भीती वाटली नाही ते पत्र उराशी घेऊन मी झोपी गेलो.असं वाटत होते बाबाच माझ्या जवळ बसले आहे...


नेहा :"अमोल मला सर्व ऐकून खूप कसतरी होतंय रे....तू इतक्या लहान वयात एकटाच कसा राहायचा???मी तर कधीच एकटी राहिली नाही..माझे बाबा किंवा आई नेहमी माझ्या सोबतीला असायचे..

अमोल:"परिस्थिती नेहा सर्वच शिकवते आणि खासकरून वाईट परिस्तिथी जेव्हा येते ना तेव्हा माणूस वयाच्या आधी परिपपक्व होतो ,जसा मी झालो..आई संध्याकाळी घरी आली ..मला आईला पाहून भीती वाटली.. कारण आई बाबांवर इतकी रागावली होती की मला भीती वाटत होती जर मी आईला पत्र दिले तर ती फाडून किंवा जाळून टाकेल..मी अस्वस्थ झालो होतो ,खूप आवस्थ... दुसऱ्या दिवशी आई कामाला गेली ..मी ते पत्र पुन्हा कवटाळून घेतले..ते दोन दिवस माझ्या आयुष्यातले सर्वात सोनेरी दिवस होते पण त्यांनतर तेच दोन दिवस माझ्या आणि आईच्या आयुष्यातील काळे दिवस झाले.....

नेहा:"म्हणजे????

अमोल:"खूप मोठा गुन्हा केला होता मी आईला पत्र न देऊन"..

नेहा:"प्लिज अमोल प्लिज काय झाले ते स्पष्ट सांग"....

अमोल:"सांगतो नेहा,दुसऱ्या दिवशी आई घरी आली ... तिने माझ्या कानाखाली वाजवली..आणि म्हणाली "पत्र आले होते ना तुझ्या वडिलांचे ??कुठे आहे ??तू मला दिले का नाहीस??बाजूच्या कमला मावशीने सांगितले होते पत्रा बाबतीत, त्यांनी पाहिले होते पोस्टमन काकांना मला पत्र देताना.....
मी उशीखाली पत्र ठेवले होते.घाबरत मी ते पत्र आईला दिले.... आईने पत्र हिसकावून घेतले.ते पत्र फाडणार तितक्यात पत्रातून एक फोटो बाहेर पडला.. तो आई बाबांच्या लग्नाचा फोटो होता...आईने तो उचलला आणी दूर भिरकावला..आई पत्र फाडणार तेवढ्यात मी आईचे पाय पकडले आणि म्हणालो"आई एकदाच वाच ना बाबाचे पत्र ,फक्त एकदाच... माझ्यासाठी आई ......माझा रडावलेला चेहरा पाहून आई भावुक झाली ....तिने मला स्वतःजवळ बसवलं आणि पत्र वाचू लागली..


प्रिय निशु,


निशु कधी वाटलं न्हवतं की कधी तू माझ्यापासून दूर जाशील..माझ्यावर अविश्वास दाखवशील..मला आशा आहे तू कधी न कधी माल समजून घेशील...निशु तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हांच मी तुला सर्वस्व मानलं..तुझी ती गालावरची खळी.. तुझे ते निरागस डोळे.तुझं ते लाजनं .तुझ्या चेहऱ्यावर येणारी ती केसांची बट अलगद मागे सारतानाचं सौंदर्य सगळं अगदी फिल्मी झालो होतो...मी मित्रांना सांगणारा "प्रेम बीम काही नसतं वेडेपणा, मूर्खपणा .प्रेम म्हणजे  केवळ टाईम पास म्हणणारा मी जेव्हा तुझ्या प्रेमात पडलो तेव्हा माझी बायपास करायची वेळ आली..वेडापिसा केले होते तू मला...तुझ्या पाठी पाठी फिरणं.. तू मला पाहिलं की नजर चोरायचो. खूप भीती वाटायची तू मला पाहिले तर??...तू कधी कॉलेजला आली नाही तर प्रॉक्सी मीच मारायचो..हळू हळू प्रेमात पागल झालो..दिवस रात्र फक्त तूच दिसायची डोळयांसमोर..स्वप्नांत सुद्धा तू यायची....


मी स्वप्न पाहायचो तुझं माझ्याशी लग्न झाले आहे..तू माझी बायको आणि मी तुझा नवरा..आई बाबा तू मी आपण सुखाने राहत आहोत.असो प्रत्यक्षात तसे झाले नाही.तुझ्या मैत्रिणी तुला माझ्या नावावरून चिडवायच्या तेव्हा तुला राग यायचा ना???कारण माझी कीर्तीच अशी होती श्रीमंत बापाचा बिघडलेला मुलगा...मी फक्त मुलींना फिरवायचो आणि सोडून द्यायचो... पण तुला माझ्या प्रेमात पडण्यात एक क्षण पुरेसा झाला..तो अविनाश त्याने तुला प्रपोस केले होते..वर्गातला सगळ्यात हुशार मुलगा अविनाश... माझा जीव खूप जळला होता त्याने तुला प्रपोस केले होते....तुला आवडला होता तो..एक दिवस तो तुझ्याशी नको ते चाळे करू लागला तू घाबरली आणि तेव्हा मी ते पहिले..अविनाश ला बेदम मारले होते..खूप राग आला होता मला त्याचा.??माझ्या प्रेमावर वाकडी नजर होती त्या अविनाशची....तेव्हाच तुझ्या नजरेत माझी प्रतिमा वेगळी झाली...हळूहळू तूसुद्धा  माझ्या प्रेमात पडत गेली.आधी तू मला पाहिले की रस्ता  बदलायची पण नंतर तू माझ्यासोबत हळूहळू चालायची... माझी वाट पहात बसायची..माझे मित्र सांगायचे मला..निशु ते क्षण कधीच विसरू शकत नाही..

बसं आता तुला एकदाचा कधी प्रपोस करतोय असे झाले ..प्रेमाचा दिवस वेलेनटाइन डे..लाल रंगाचा शर्ट घालून वाट बघत होतो ..तू आली आणि मी सर्वांसमोर प्रपोस केले..मला वाटलं तू मला हो म्हणशील पण तू नाही म्हणालीस.ढसाढसा रडत होतो मी त्यादिवशी...निराशा केलीस तू माझी ...मला खूप वाटलं.. असे वाटलं ना जीव द्यावा.काही तरी करावं.. वयच ते विचित्र. तू दुसऱ्या दिवशी मला फोन केला आणि तेव्हा म्हणाली"मी मस्करी करत होते, अर्धा जीव निघून गेला होता माझा....तो दिवस माझ्यासाठी खास होता...वेड्यासारखा पळत आलो होतो मी कॉलेजला आणि तू न्हवती....मला वाटलं तू थट्टा करते आहे..पण तुझ्या मैत्रिणीकडून कळाले की कोणी तरी मुलगा तुला बघायला येतोय....किती अशा होती तुझ्याकडून ..सर्वच घाईघाईत होत होते.त्यादिवशी दिवसभर मी कॉलेजमध्ये रडत बसलो....आई बाबा आले आणि मला घेऊन गेले..त्यांना तुझं आणि माझं प्रकरण कळल्यावर मला फार ओरडले.आपल्या स्टेटसला शोभेल अशी मुलगी बघ म्हणाले.. मी मनातून ठरवलं होता जगायचे ते तुझ्याबरोबर आणि मरायचेही..मी नडलो होतो स्वतःच्या जन्मदात्याशी तुझ्यासाठी फक्त तुझ्यासाठी..प्रेमात खूप ताकद असते हे प्रेम झाल्यावर समजले..

दुसऱ्या दिवशी तुझा फोन आला की तुला त्या मुलासोबत लग्न नाही करायचे.... तुलाही माझ्यासोबतच लग्न करायचे आहे ..वाऱ्याच्या वेगाने कॉलेजला आलो सर्व लग्नाची तयारी केली.तुला तर कल्पनाही नव्हती  तू कॉलेजचा दाखला घेण्यासाठी आली होती ...मन इतकंच मला म्हणत होत"आज नही तो कभी नही"....अगदी तुला किडनेप केले आणि कोर्टात उभे केले..तुला पाहिले आणि जीव भांड्यात पडला..किती घट्ट मिठी मारली होतीस निशु तू मला पाहून..शेवटी लग्न बंधनात अडकलो मित्रांच्या साक्षीने....तो माझ्या आयुष्यातला सर्वात सोनेरी दिवस.माझं प्रेम मला मिळाले होते.निशु तु माझ्या आयुष्यात आली होतीस बायको म्हणून फक्त तुझे आणि माझे आई बाबा सोबतीला नव्हते ते हवे होते.अमोल झाला तेव्हा वाटलं आई बाबा माफ करतील पण त्यांनी माफ नव्हते केले..योग्यच होते ते आई वडिलांचं मन जाणून घ्यायला त्यांच्या ठिकाणी असायला हवं....निशु एक गोष्ट कधीच बोलून नाही दाखवली ती म्हणजे जेव्ह तू माझ्या छातीवर तुझ्या आई बाबांसाठी रडायची ना तेव्हा मलाही माझ्या आई बाबांची खूप आठवण यायची पण तुला सावरण्यासाठी माझे अश्रू मी डोळ्यातच साठवून डोळे बंद करायचो आणि तुला वाटायचे मी झोपलो आहे.मी सुद्धा हळवा झालो होतो..डेरिंग तर केली होती पण नंतर येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाताना मनातच संघर्षं करत होतो ..कधीच दाखवला नाही...मी डगमगलो असतो तर तुही कमजोर झाली असती म्हणून मी नेहमीच खंबीर राहिलो..त्यांनतर अमोलचं आपल्या आयुष्यात येणे.स्वतः आई बाबा अनुभवायचं सुख खूप आंनद देऊन गेलं...बाबा म्हणून माझी खूप कर्तव्य आहे ..माझ्या बायकोसाठी,मुलासाठी छान भविष्य द्यायचे आहे ह्याच्यासाठी झटत राहिलो..स्वतःच हक्काचं घर घ्यायचे होते.तुला राणीसारखे आणि अमोलला राजकुमारसारखे ठेवायचं होतं....

सर्वच सुरळीत होत असताना तो फोन आला..तू पहिल्यांदा विश्वास ठेवला नाही..मला खूप आंनद झाला .शेवटी खरं प्रेम केले होते आपण...पण दुसऱ्यांदा फोन आला काय आणि तू मंजिरी आणि मला एकत्र पाहिले काय आणि वेगळा अर्थ काढला..मंजिरीच्या नवऱ्याच्या ठिकाणी तिला कामाला लावायचे होते म्हणून त्याच्या ऑफिसची कागदपत्र मी आणायला गेलो होतो तिला द्यायची होती म्हणून ती ऑफिसच्या समोर आली होती...तुला माहीत आहे तो फोन करणारा आपल्या संसारात विष कालवणारा फोन कुणाचा होता.....????तो फोन त्या कपटी अविनाशचा होता...त्याला माझ्यावर सूड उगवायचा होता .म्हणून तो फक्त पाठलाग करत होता.माझ्या प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवून होता.मी कोणाशी बोलतोय?? ..कोणाला भेटतोय??सर्व त्याला माहित होते..त्या दिवशी मी मंजिरीला चार वाजता  भेटणार  हे सुद्धा त्याला माहित होते.म्हणून तुला त्याने फोन केला..तुझे कान भरले.. त्याला आपला सुखी संसार बघवत न्हवता.म्हणून त्याने हे दुष्कृत्य केले..त्याने आपला संसार मोडला आणि देवाने त्यालाही शिक्षा दिली..त्यालाही कँसर झाला.मृत्यूशी दोन हात करतोय आता..खूप वाटलं त्याला जाऊन खूप मारावे पण आधीच मेला आहे त्याला काय मारणार.???....


निशु मी तुझी आज वाट पहात आहे त्या समुद्रापाशी जिथे आपण संसाराचे स्वप्न पाहिले होते...तू येशील मला विश्वास आहे .जर तू नाही आलीस तर समज ह्या पत्राद्वारे ही आपली शेवटची भेट....मला आता सहन नाही होत आहे तुझा विरह.. मी काय करेल माझी मला माहित नाही...वाट बघतोय तुझी लवकर ये...लव यु निशु


                                                                                                                                   तुझाच,
                                                                                                                                   फक्त तुझाच नवरा...

नेहा:"मग पुढे काय झाले आई गेली"...

अमोल:"आईने स्वतःच्या तोंडात झोडून घेतले..रागाच्या भरात काय करून बसली...किती मूर्खपणा केला....तिने मला घेतले आणि ह्याच समुद्रापाशी आली..इथे आलो पाहतो तर बाबा नव्हते..खूप वेळ आम्ही दोघांनी वाट पाहिली पण बाबा काही आले नाही..थोड्या वेळाने दोन बायकांची कुजबुज कानी आली..


पहिली बाई  :"अगं तो माणूस बुडाला ना तो वारला  गं.....

दुसरी बाई:"काय सांगतेस काय??

पहिली बाई:"हो ना ,पोलिसांचा जमाव होता ते लोक बोलत होते...

निशाचे ह्रदय धडधडायला लागले...जड पावलांनी निशा त्या बायकांकडे गेली आणि विचारले काय झाले.....

पहिली बाई:"अहो एक माणूस सकाळ पासून बसला होता इथे आणि काय झाले काय माहीत नाही .थोड्यावेळाने त्याने स्वतःला समुद्राच्या पाण्यात वाहून दिले.....

निशा:",नाव काय माहीत आहे का त्याचे??

पहिली बाई:"नाही नाव माहीत नाही"....


निशा तडक जुन्या घरी गेली ..पाहते तर रमेश बेडवर झोपला होता....तिच्या जीवात जीव आला ....ती गेली तिने त्याला हाक मारली..त्याने प्रतिसाद दिला नाही...जवळ गेली पाहते तर काय रमेशचे शरीर प्रतिसाद देत न्हवते..बाजूलाच झोपेच्या गोळ्या होत्या.त्याच्या हातात निशाचा आणि अमोलचा फोटो होता....निशाने डॉक्टरांना फोन लावला....डॉक्टर आले ...त्याला मृत घोषित केले होते...निशा जोरजोरात रडायला लागली...छातीवर डोकं आपटत होती.अमोलही रडू लागला..अमोलला कळून चुकले आपले बाबाही परिच्या बाबाप्रमाणे नेहमीसाठी आपल्याला सोडून गेले...सर्वच संपले होते...


नेहा:"किती भयानक आहे सर्व अमोल....नेहा रडू लागली...

अमोल:" नेहा माझे बाबा नेहमीसाठी दूरदेशी .. संशयाच्या किड्याने माझे बाबा हिरावले होते..
मी पोरका झालो होतो..आईवर प्रचंड चीड येत होती कारण तिने बाबाला एकदा तरी ऐकून घ्यायचे होते फक्त एकदा....तर बाबा माझ्यासोबत असते..!आईवर दयाही यायची कारण तिला माझ्याशिवाय कोणीही नव्हते.. मीच होतो तिला सहारा देणारा....आई वेड्यासारखी वागू लागली..,जोरजोरात हसायची .डोकं भिंतीला आपटायची... मला बोलायची मी जीव घेतला तुझ्या वडिलांचा..देव मला कधीच माफ करणार नाही ,कधीच माफ करणार नाही..मी खुनी आहे ..खून केला मी माझ्या प्रेमाचा..खऱ्या प्रेमाचा.. नेहा आजही अंग थरथरतं माझं ते आठवलं तरी..प्रत्येक नात्याला एकदा तरी संधी द्यायची असते..नाती एकदाच  तुटतात पण आयुष्यावर  क्षणोक्षणी आघात करतात....


तितक्यात नेहाच्या आईचा फोन आला..

आई:"अगं नेहा कुठे आहे ,तो मुलगा बघायला येणार आहे तुला माहीत आहे ना??लवकर ये घरी...

नेहा:"हो आई येते मी निघाले..

अमोल:"नेहा तुला घरी जायचे आहे"..

नेहा:"हो ते..मला ना मुलगा बघायला येणार आहे....
ती बोलून गेली ...

अमोल:"ओहह ..बरं बरं जा ..मलाही घरी जायचे आहे थोडे काम आहे....भेटू आपण पुन्हा केव्हा तरी...काळजी घे....

नेहाचा पाय निघत न्हवता.....जड पावलांनी दोघांनी निरोप दिला....

नेहा इतकी भावनाविवश झाली होती की ती अमोलशी काहीच बोलली नाही....

तिला असं वाटत होते असंच अमोलसोबत बसून राहावे ,गप्पा माराव्या.....
नेहा घरी आली तिने आईला सांगितले "आई मला जरा आराम करू दे,मग तयारी करते...
ती बेडरूममध्ये गेली आणि खूप रडली....फक्त रडत होती मन हलकं करत होती....अमोलच्या भूतकाळाने तिला अस्थिर केले होते.खूप अस्थिर केले  होते.....

क्रमश:...


मी कोणी मोठी लेखिका नाही ,जे सुचेल ते सोप्प्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न करते ...पण आजचा भाग लिहिताना मलाही रडू आले खरंच जेव्हा आपली माणसे आपल्याला समजून घेत नाही तेव्हा खूप दुःख होते...शेवटी संवाद घडलाच पाहिजे नाही तर कितीतरी चांगली नाती नष्ट होतात आणि दुःखाचे ओरखडे कायम राहतात..नाही का...लवकरच पुढचा भाग लिहिलं.....आशा करते हा भाग तुम्हाला आवडेल...
अश्विनी पाखरे ओगले
लेख आवडल्यास मला फॉलो करायला विसरू नका..भरभरून लाईक आणि कंमेंट लिखाणाचा उत्साह वाढवतो...धन्यवाद.. खुश राहा. आंनदी राहा..


                                                                            

🎭 Series Post

View all