विरुद्ध तो आणि ती भाग ५

Past That Decide Future.
अमोल आणि नेहा त्या अथांग समुद्राचे रूप डोळ्यात साठवत होते.. येणाऱ्या त्या प्रचंड लाटा जणू काही तरी सांगण्याच्या मार्गावर होत्या.. नेहा बोलती झाली." अमोल सांग ना का तू शांत बसलास ????हॉटेलमध्ये तुझ्या डोळ्यात पाणी आलं"

अमोल:"नेहा हा समुद्र माझ्या अनेक सुखदुःखाच्या आठवणीचा साक्षीदार आहे "

नेहा:" साक्षीदार आणि हा समुद्र कसं काय अमोल ????

अमोल:"खरतरं ह्या समुद्राच्या अनेक अशा गोड कटू आठवणी आहेत ज्या मी विसरू शकत नाही... खरंतर हा समुद्र माझ्यासाठी एक मित्र आणि शत्रूही आहे... ईथे मी नेहमीच येतो ... या समुद्राशी नेहमीच गप्पा मारतो . खूप काही दिल आहे या समुद्राने खरंतर हा निर्जीव आहे ह्याला काहीच बोलता येत नाही पण तरीही त्याच्या सानिध्यात आल्यावर हरवलेला भूतकाळ आहे तो जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहतो....नेहा तू खरं तर खुप लकी आहेस तुझा भुतकाळ खरं तर सुंदर आहे आई वडिलांच्या सानिध्यात वाढली आहेस ..सर्व सुख तुझ्या पायाशी आहे...काश देवाने तुझ्यासारख आयुष्य सर्वांनाच दिलं असतं तर किती बरं झालं असतं ना नेहा?? असे बोलून अमोल शांत बसला ...

नेहा:" अमोल खरंच माझं बालपण आताचा काळ ही सुखद आहे .. आई बाबा यांनी मला कधी कोणत्या गोष्टीची कमी होऊ दिली नाही.मला जे हवं ते जेव्हा तेव्हा दिलं ..माझंही त्यांच्यावर खूप प्रेम आहे. सगळ्यात नशीबवान मुलगी आहे मी... मला इतके छान आई-बाबा मिळाले आहे.... आई माझी खूप माया करते बाबासुद्धा नेहमी पाठीशी खंबीरपणे उभे राहतात ..दुःखाचा लवलेशही नाही असं माझं आयुष्य.. खरं तर सर्व बाजूंनी सुख हे मला मिळतच गेलं आणि आत्ताही मिळतं . त्यांनी मला फुलासारखं जपलं... कधीच मला कोणत्याही गोष्टीची कमी भासू दिली नाही जे हवं ते त्यांनी मला दिलं.आई मला आजही सांगते जेव्हा मी रात्री रडायची ना तेव्हा आईच्या आधी बाबा उठून बसायचा आणि अगदी रात्रभर जागून माझी काळजी घ्यायचा... खरतर ना अमोल मी माझ्या बाबांची परीच आहे... तुला माहितीये बाबा कामावरून आल्यावर कितीही थकलेला असू दे जर मी बाहेर फिरायचा हट्ट केला की मला घेऊन जायचे. मला आवडणारी आईस्क्रीम, मला आवडणारे कपडे, माझ्या सगळ्या आवडत्या वस्तू मला न बोलता माझ्या पुढे ठेवायचे. म्हणजे कसं अगदी जे हवं ते फक्त मला मिळत गेलं

लहानपणी जेव्हा आई माझ्या हाताला मेहंदी लावायची ना तेव्हा बाबा मला जेवण भरवायचा... माझ्या डोळ्यात कधी पाणी आलं ना तर आई-बाबाही रडायचे.. कधी मी आजारी पडली ना आई बाबा माझ्या उशापाशी जागरण करत राहायचे म्हणजे खरंच रे खुप खुप खुप नशीबवान आहे.माझी आई सुद्धा ती पण खूप जीव लावते मी तिच्या डोळ्यासमोरून कधी बाजूला झाले ना की तिचा जीव कासावीस होतो. मला उशीर झाला की दहा वेळा मला फोन करते म्हणजे कसं ना मी खरंच फॅमिलीच्या बाबतीत खूप लकी आहे मला देवाने खूप गोड आई-बाबा दिले आहेत...

आई बाबा माझ्यावर कधीच रागवले नाही कधी त्यांनी माझ्यावर हात उचलला नाही पण आता......असे बोलून नेहा जरा शांत बसली


अमोल बोलू लागला काय प्रॉब्लेम आहे का नेहा???

नेहा:" दोन-तीन दिवस झाले मला ना वाईट वाटतंय रे इतक्या प्रेमाने आई-बाबा माझ्याशी वागायचे, पण जेव्हा पासून मी लग्नाला नकार दिला तेव्हापासून दोघेही नाराजच आहेत माझ्यावर .. मला असं वाटलं होतं की ते नेहमीप्रमाणे माझ्या बाजूने उभे राहतील पण या वेळी झालं भलतंच माझ्यावर खूप रागावले आहेत ..माझ्याशी बोलत सुद्धा नाही. मनाला खूप खूप वाईट वाटते आणि मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे खरं तर ना अमोल लहानपणापासून अशीच आहे रे मला राग खूप येतो आणि तो जातो ही.. रागाच्या भरात नेहेमी निर्णय घेते आणि मग ...आपलं लग्न जमलं ना तेव्हा मी आईला तुझ्याविषयी सांगितले होते.. जसा मला नवरा हवा आहे तसा तू नाहीस.. म्हणजे मला जसं अपेक्षित आहे असं वागणं तसं नाही ...ती मला म्हणाली अगं थोडा वेळ जाऊ दे तुला कळेल अमोल चांगला मुलगा आहे ..ती मला सतत हेच बोलत राहायची वेळ जाऊ दे, कारण की लगेच माणसं ओळखता येत नाही माणसं वाचायला वेळ लागतो.

लहानपणापासून आई बाबा मला प्रत्येक वेळी सपोर्ट करत आले अगदी माझी चूक असताना सुद्धा मला पाठीशी घातले . त्यामुळे ह्या वेळी मला असं वाटलं होतं की आई-बाबा मला साथ देतील पण तसं झालं नाही.. आई-बाबा इतके रागावले आहेत की ,ते माझ्याशी नीट बोलत सुद्धा नाही मला घरात खुप एकट-एकट वाटतं.. ते असं वागत आहेत म्हणजे मला असं वाटते की ते माझे आई-बाबा आहेत की नाही इतकं माझ्या मनाला वाईट वाटतं आहे आणि नेहमी बडबड करणारी मी जे आहे ते पटकन बोलणारी मी ह्यावेळी मात्र माझी हिम्मतच होत नाही त्यांचा रुसवा कसा काढू मला समजतच नाही... आणि मला कल्पना आहे रे हा त्यांचा रुसवा लवकर नाही निघणार कारण की मी जे केलं आहे ना ते खरच खूप खूप चुकीचे केले आहे... मी त्यांना खूप दुखावला आहे.. मला त्यांना दुखवायचं नव्हतं.. पण काय करू???? मला ना तुझा इतका राग आला होता ना की मला सुचतच नव्हतं आणि माझी एकच अपेक्षा होती.. माझ्या मैत्रिणींसारखं रोमँटिक लाईफ असावी त्या सांगायच्या की त्यांच्या होणार्‍या नवऱ्याने त्यांना हे गिफ्ट दिले . रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत गप्पा मारायच्या.. मग मला कुठेतरी असं वाटलं की तू सुद्धा माझ्याशी असं वागायला पाहिजे होतं,... अगदी मी फोन केला तरीपण तू जास्त बोलायचा नाही मला असं वाटायला लागलं तुला माझ्यात इंटरेस्ट आहे की नाही????? आणि मग मला खूप वाईट वाटायला लागलं लहानपणापासून मला जसं हवं तसं मला माझ्या मनाप्रमाणे घडत गेलं आणि तू अगदी माझ्या मनाच्या विरुद्ध खरं तर मी लग्नसाठी हो म्हणाले होते त्याचे कारण आई बाबांना तू खूप आवडला होतास आणि मला आई बाबां वरती खूप विश्वास कारण की त्यांनी माझ्यासाठी नेहमी बेस्टच केल आहे आणि मला विश्वास होता की माझ्या आयुष्याचा जोडीदार निवडला आहे तो सुद्धा चांगलाच निवडला असणार म्हणून मी सुद्धा लग्नाला लगेच होकार कळवला आणि आपलं लग्न ठरल्यापासून आई-बाबा खरच खुप खुश होते. त्यांना खूष पाऊन मलाही आनंद होत होता पण कुठे तरी मला तुझं वागणं पटतच नव्हतं म्हणजे बघ ना हिंदी पिक्चर मध्ये दाखवतात की हीरो हिरोईन ला प्रपोज करतो वेगवेगळे गिफ्ट तो खूप सारे सरप्राईज देतो असं काहीतरी मला पाहिजे होतं..

अमोल मला असं वाटत होतं की तू स्वतःहून काहीतरी बोलशील .. मला भेटायला बोलवशील पण तसं काहीच काहीच काहीच झालं नाही असा कसा रे आणि माझ्या मनात असं काही घडलं तर मला खूप राग येतो रे आणि म्हणून मी त्या दिवशी ला फोन सुद्धा केला मला तुला भेटायचं होतं..


मला तुझ्याशी खूप बोलायचं होतं. मला व्यक्त व्हायचं होतं पण मी रागाच्या भरात तुला खूप बोलून बसले .अगदी लग्न सुद्धा मोडलं .

अमोल चेहऱ्यावर ते स्मित हास्य आणून म्हणाला नेहा मॅडम तुम्ही किती बोलता हो ...
पण जे पण बोलता तुम्ही खूप छान बोलता..... तुझं बोलनं हे फक्त ऐकतच राहावंस वाटतं..खूप नितळ हृदय आहे तुझे .

नेहा शांत झाली भानावर आली..जीभ दाताखाली घेतली . कान पकडून अमोलला म्हणाली अमोल सॉरी बघ ना अशीच आहे रे मी...खरंच खरच सॉरी रे ही अशीच आहे मी एकदा बडबड करायला लागले की अजिबात मी गप्प बसत नाही मला भानच राहत नाही की मला काय बोलायचं आहे म्हणजे असं होतं रे मी मुद्दामून नाही केलं....


अमोल बोलू लागला अगं शांत राहा सॉरी वगैरे बोलायची काही गरज नाहीये ..असंही आपण फ्रेंड्स आहो.. व्यक्त तर व्हायलाच हवं तेव्हाच कुठे मन हलकं होईल ना...होतील आई बाबा शांत.. काळजी करू नकोस...आल इज वेल....

नेहा हसू लागली.अमोल माझी खास मैत्रीण आहे ना तीसुद्धा अशीच बोलते आल इज वेल..तुम्ही दोघेही सारखेच आहात...माझ्या नाकावरच्या रागामुळे माझी फ्रेंड लिस्ट खूप छोटी आहे...त्यात सर्वात खास माझी मैत्रीण प्रिया. जी मला समजून घेते....

बरं ..आता माझं पुराण पुरे आता.. माझं जाऊदे अमोल आता तूच सांग ना मला खूप उत्सुकता आहे तुझं बालपण तुझं सगळं ऐकून घेण्याची

अमोल बोलू लागला

नेहा माझे बालपण तुझ्यासारखं हॅप्पी,पूर्ण असं काहीच नाही अगदी तुझ्याविरुद्ध आहे जसं तुझं बालपण होतं ना तसं माझं काहीच नाही.. अगदी एक टक्केसुद्धा नाही... तुझ्या बालपणासारखे सुंदर बालपण जगलोच नाही...


नेहा:"अमोल बालपण किती सुखाचा काळ असतो सगळ्यांसाठी... बालपण हा काळ हवा हवा असाच असतो मग तू असा का बोलतो????
तू बरोबर बोलते आहेस बालपण हा सर्वांसाठी हवाहवासा असा काळ पण माझं बालपण वेगळेच आहे आज जरी मी आठवला ना तो काळ तरी पण नको वाटतो.... ते कसं सांगतो.....


अमोल आज स्वतःच्या भूतकाळातील कोडं.उलगडणार होता...
अमोलचा ती प्रत्येक शब्द नी शब्द मन लावून ऐकत होती..

नेहा आज मी तुला एक कथा सांगणार आहे सत्यकथा माझ्या भूतकाळाची कथा...
ह्या कथेमध्ये तीन पात्र होते.. मी ,माझे वडील आणि माझी आई माझ्या वडिलांचे नाव होतं रमेश आणि माझ्या आईचे निशा ..या दोघांचं लव मॅरेज अगदी एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे.. कॉलेजमध्ये बेस्ट कपल म्हणून यांची कीर्ती होती..एक दुजे के लिये बनले होते....
माझ्या आईने घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न केलं.. आईच्या कुटुंबाने म्हणजे माझ्या आजी-आजोबांनी सर्वच संबंध तोडून टाकले ..आईला फार वाईट वाटत होते स्वतःच्या कुटुंबाशी ती दूर झाली.तेव्हा माझ्या बाबांनी तिला खूप आधार दिला.. बाबा तिच्यावर जीवापाड प्रेम करत होते त्यांचे अफाट प्रेम होते. दोघे एकमेकांना सावरू लागले ...माझ्या बाबांच्या आई वाडीलांनीसुद्धा त्यांचा स्वीकार केला नाही...दोघे भाड्याच्या घरामध्ये राहू लागले आणि स्वतःचा छोटासा संसार सुरू केला..दोघेही कामाला जायचे त्याच्यानंतर थोड्या दिवसाने मी झालो आणि त्यांच्या आयुष्यामध्ये मी पुन्हा आनंद घेऊन आलो....

नेहा:"मग पुढे काय झाले??


आई वडिलांना असं वाटत होतं की मी झाल्यावर घरचे त्यांना स्वीकारतील पण तसं झालं नाही.. दुरावा तसाच कायम राहिला... आई-बाबांना ह्या गोष्टीची खंत होती... असेच दिवस सरत होते बाबा आई एकमेकांना सांभाळून घेत होते.. नेहा माझं छोटंसं विश्व होतं.. आई बाबा मी आणि हा समुद्र सुद्धा आमच्या विश्वातला भाग... आम्ही तिघेही ह्या समुद्रकिनारी फिरायला यायचो... खूप सुंदर वेळ या समुद्रापाशी घालवायचो ..आम्ही इथे घोड्यावर बसून छान फेरफटका मारत असू..समुद्रकिना-यावर रोज संध्याकाळी पाणीपुरी खायचा नित्यक्रम झाला होता..कितीतरी सुंदर छान क्षण या समुद्रकिनाऱ्याने टिपले आहे..माझ्या बालपणाचा सुरुवातीचा काळ खूपच सुखद होता... ह्या समुद्रकिनार्‍याने खूपच सुंदर केला आणि गोड आठवणी दिल्या..माझ्या नजरे मध्ये माझे आई बाबा जगातील बेस्ट आई बाबा होते . रोजच वाळूमध्ये मी माझं ,आई-बाबांचं नाव लिहायचो,... छान छान खेळ खेळायचो ...शिंपले गोळा करायचो...ह्या खाऱ्यासमुद्राच्या वाऱ्याशी पैज लावायचो...., कधी कधी बाबासुद्धा माझ्याशी पैज लावायचे आणि मला जिंकवण्यासाठी स्वतः हार पत्करायचे....माझी आई बाबांच्या खांद्यावर ती निश्चिंतपणे डोकं ठेवून झोपून जायची तेव्हा असं वाटायचं की माझे आई-बाबा जगातील बेस्ट बाबा आहेत..तेव्हा माझं बालमन विचार करायचे मी सुद्धा माझ्या बाबासारखा होणार.. माझ्या बायकोला खूप खुश ठेवणार.. आमच्या घरी एक छोटी मुलगी यायची परी बोलायचो मी तिला.मी तिला तर मनोमन बायकोच मानू लागलो... कसं असतं ना बालपण ..कल्पकतेचे सोनेरी जग.कल्पनेच्या जोरावर आनंद वेचण्याचे ते अल्लड वय...माझ्या घरी परी आली की मी लाजायचो...
नेहा :"भारीच होतास अमोल तू"....


अमोल:"नेहा माझं वय काय फक्त पाच वर्षांचा होतो...वेडा होतो मी..परीची आई आणि माझी आई खूप छान मैत्रिणी होत्या.. मी आईला बोलायचो आई मी ना परिशी लग्न करणार.... आई तेव्हा हसायची...

बाबा खांद्यावर बसवून समुद्रकिनारी फिरवायचे.. तेव्हा राजकुमार असल्याची भावना यायची.. मनसोक्त समुद्र्याच्या पाण्यात भिजायचो... कधी कधी झोपून जायचो ..सूर्याचा प्रकाश अंगावर घ्यायचो.एकटक सूर्याला पाहायचो.. सूर्य मावळताना त्याचे रूप डोळ्यात साठवायचो. .त्या समुद्राचा खळखळणारा आवाज.. अंगाला स्पर्श करणारी हवा..माझ्या इवलुश्या पायाचे ठसे. सगळं काही जगलो तेव्हा..मनमुराद आनंद घेतला....


घरी आलो की मग परीशी खेळायचो.. परी माझी पहिली वहिली मैत्रीण... एकदा आई बाबा घरात नसताना मी वेडेपणा केला होता..

नेहा:"सांग ना काय केले होते???

अमोल:"अगं मला परी इतकी आवडायची ना मी चक्क एकदा तिच्या केसात कुंकू लावले ..आणि गणपती बाप्पा कडे हात जोडले...

नेहा:"खरं की काय अमोल????..

अमोल:"हो गं असाच वेडेपणा केला होता ..ते मी चित्रपटात पाहिले होते.. म्हणून तसंच आपलं करण्याचा प्रयत्न...

नेहा:"आणि मग???


अमोल:"मी परीला बोललो आजपासून तू माझी बायको..मग परी जोरजोरात रडायला लागली...तिला रडताना पाहून मला घाम आला..ती मला बोबड्या भाषेत बोलली "तुझं नाव मी आईला सांगणार ,तू माझ्याची लदन तेले ना...असे बोलून ती तिच्या घरी पळाली.... मला घाम सुटला.आता तिची आई ओरडणार मला...मी रडायला लागलो...

थोड्या वेळाने माझी आई आली..घाबरतच मी सर्व प्रकार आईला सांगितला..

आई मग मुद्दामून ओरडली

मला म्हणाली"आता तू परिशी लग्न केले ना आता तिची आई ओरडणार तुला".....

मग तर मी अजून मोठमोठ्याने भोंगा वासला...

तितक्यात परीची आई म्हणजे मंजिरी काकू आली....

मला रडताना पाहून मंजिरी काकूने मला जवळ घेतले आणि आईला म्हणाली

"गप्प बस गं निशा ..कशाला पोराला रडवते..काकूने माझे डोळे पुसले आणि म्हणाली"अमोल बाळा तुझं काही परिशी लग्न नाही झालं ..पण परत असे करू नकोस ....आता आई आणि काकू दोघी हसू लागल्या.. दोघी हसू लागल्या तेव्हा माझा जीव भांड्यात पडला..तेव्हा कळलं की आपण काही गुन्हा केला नाही...

परी आली आणि मला म्हणाली"अमोल मला न तुझ्याची लदन नाही तलायचे,तू माझा तांदला मितल आहे ना....

परी अशी बोलली आणि मी आतून पूर्ण तुटून गेलो..माझा प्रेमभंग झाला होता..त्यादिवशी मग मी बाबांनी मला आणि परीला आणलेलं चॉकलेट परीला दिलंच नाही..मला राग आला होता परिचा... तिच्या वाटणीचे चॉकलेट मीच खाल्ले....


नेहा:"चांगला बदला घेतलास हा अमोल तू"......मग राहिली का कायम तुझी आणि परीची मैत्री......


अमोल:"मैत्री राहायला परी माझ्या आयुष्यात कुठे राहिली...??


नेहा :"म्हणजे कुठे गेली परी काय झाले तिचे???"




क्रमश:


वाचकहो परी खरं तर बालपणीचे अमोलचं पाहिलं प्रेम..परी गेली आणि एक वळण अमोलच्या आयुष्यात आले ..नक्की काय घडले असेल ??अमोलचा भूतकाळात परिचा संबंध काय ?ते कळेल पुढच्या भागात...त्यासाठी वाचत राहा विरुद्ध तो आणि ती...

तुम्ही सर्व खूप सुंदर प्रतिसाद देत आहात...असाच प्रतिसाद राहू द्या ...


अश्विनी पाखरे ओगले.
लेख आवडल्यास नक्की लाईक, कंमेंट करा..तुमचे कंमेंट माझ्यासाठी खूप मोलाचे आहे..धन्यवाद..