विरुद्ध तो आणि ती (भाग ४)

Some Decision Change Entire Life
अमोल काय सांगणार आहे हे ऐकण्यासाठी नेहा आतुर झाली होती..
तितक्यात वेटर आला आणि एक कप चहा आणि एक कप कॉफी आणली...
ते पाहून नेहाने अमोलला विचारले "अमोल आधीच ऑर्डर केली होती?

अमोल:"हो नेहा तू येताना दिसली तेव्हाच मी वेटरला सांगितले तुझ्यासाठी कॉफी आणि मला चहा...

नेहा:"तुला कसं कळलं मला कॉफी आवडते???

अमोल:"नेहा ज्या दिवशी मी तुला घरी पहायला आलो तेव्हाच मी पाहिले होते.. तुझ्या कपात कॉफी आणि बाकीच्या सर्वांच्या कपात चहा होता..म्हणून मी तुझ्यासाठी कॉफी ऑर्डर केली...

नेहा:"निरीक्षणशक्ती भारी आहे हा अमोल तुझी"..

नेहा विचार करू लागली"हा जास्त बोलत नसला तरी डोळ्यामध्ये खूप काही साठवतो.आपल्याला काही बाबा जमणार नाही अमोलसारखं... खरंच विरुद्धच आहे हा माझ्या...त्याला चहा आवडतो मला कॉफी.. त्याला नजरेची भाषा कळते आणि मला फक्त शब्दाची.. खरंच हा वेगळा आहे माझ्यापेक्षा.. माझ्या मनासारखा नसला तरी हवाहवासा ..लव यू अमोल.. खरंच लव यू....

नेहा गप्पच बसली होती ..तिच्याच विश्वात मग्न रमली होती..

अमोल:"नेहा काय विचार करते आहेस इतका??"

नेहा:"नाही अमोल काही नाही. बोल ना तू काही तरी सांगणार होतास....

अमोल:"हो, खरं तर नेहा मी सहसा व्यक्त होत नाही..पण का कोणास ठाऊक असं वाटतंय कोणाबरोबर तरी भावना व्यक्त कराव्यात ...त्यासाठी मला तू योग्य वाटलीस..म्हणून तर मी आधी शर्त ठेवली एक छान मैत्रीण तुझ्या रूपाने भेटली....


मनातल्या मनात बोलत होती"अमोल फक्त मैत्रीण नाही रे मला तुझी बायको व्हायचे आहे..

अमोल बोलू लागला...

बरं तुला हा प्रश्न पडला असेल ना की परवाच आपलं लग्न मोडलं आणि मी आता मैत्री करून तुझ्यासमोर व्यक्त होण्याचा प्रयत्न करतो आहे???

नेहा:"हो प्रश्न तर पडला आहे मला अमोल"मी इतक्या रागात तुला मूर्खासारखं बोलले आणि तू तरी तू मला जो रिस्पॉन्स दिला तो अनपेक्षित आहे.आणि आता तू माझ्याकडे व्यक्तही होतो आहेस....

अमोल:हो आणि मी आधीच तुला सांगतो हा माझा काही तुझ्याशी पुन्हा लग्न करण्याचा विचार नाही .फक्त निखळ मैत्री हवी आहे मला तुझी नी माझी..दोन विरुद्ध टोकाच्या व्यक्ती लग्न बंधनात अडकणे म्हणजे मूर्खपणा..मला खरंच आवडलं हा तू इतक्या स्पष्टपणे नकार सांगितला ते सुद्धा स्वतःहून..नाही तर तुझ्या ठिकाणी दुसरी कोणी मुलगी असती तर तिने स्वताच्या आई वडिलांना सांगितले असते मुलाला नकार द्यायला..

नेहाला हे ऐकून डोळ्यात पाणी आले पण पटकन तिने डोळ्यातले पाणी पुसले..स्वतःला सावरलं....नेहाची पूर्ण निराशा झाली होती..असं वाटत होतं आताच्या आता सांगावं अमोलला"मला लग्न करायचे आहे तुझ्याशी"..तिची हिम्मतच झाली नाही..

अमोल पुन्हा बोलू लागला..नेहा मी अबोल जरी असलो तरी नजरेने माणसं ओळखण्याची कला थोडीफार अवगत आहे इतकंच.तुला आठवतंय जेव्हा मी घरी आलो होतो.. तेव्हा तुझी एक गोष्ट फार मला आवडली..

नेहा:चेहऱ्यावर गोड हास्य देत "काय आवडलं अमोल???

अमोल:"नेहा तुझ्या हाताला लाल मुंगी चावली होती तर तू त्या मुंगीला न मारता अलगद उचलून खाली जमिनीवर ठेवले होते"तेव्हाच मला जाणवलं तुझ मन खूप सुंदर आहे.स्वभाव तर माहीत न्हवता पण हो त्याक्षणी मी मनोमन ठरवलं आयुष्याचा जोडीदार होवो अथवा ना होवो पण तुझ्याशी मी मैत्री करणारच..तू म्हणशील काय विचित्री मुलगा आहे ना कोणत्याही गोष्टीवरून अंदाज बांधतो..मी असाच आहे ..ह्या छोट्या गोष्टी माझ्या मनाला भावतात.खरं तर मला लहान लहान गोष्टीत आंनद शोधण्याची सवय आहे नेहा..मला माझ्या जवळची माणसं खूप प्रिय आहे आहे..
जेव्हा तुझ्या बाबांचा मला फोन आला की नेहा लग्नासाठी तयार आहे तेव्हा मला विश्वासच बसला नाही..एक गोड मनाची मुलगी माझ्या आयुष्यात येणार ह्या विचाराने सुखावलो..अनेक स्वप्नसुद्धा पाहीली..कोणीतरी हक्काच आपल्या आयुष्यात येणार .नेहमी आपल्यासोबत राहणार ही भावना खरंच सुखावून गेली..असं वाटत होते की मी स्वप्न बघतो आहे..आणि शेवटी काय ते स्वप्न सत्यात उतरले नाही. असंही खूप आघात पचवले आहे..आपलं जवळचं कोणी लांब निघून जातो तेव्हा होणारा त्रास आधीच पचवला आहे म्हणून कदाचीत मी स्वतःला लवकर सावरलं..मला फक्त एक मैत्रीण गमवायची न्हवती म्हणून त्यादिवशी मी तुझ्यापाठी आलो..जे घडलं ते प्रामाणिकपणे सांगितले.जेव्हा तू मला भेटायला बोलावलं तेव्हा मी लगेच तयारही झालो..

नेहा:"अमोल मला फार पश्चाताप झाला रे..असे मी वागायला नको होते..

अमोल:"मला माहित आहे तुला पाश्चताप झाला म्हणून तर तू लगेच माफी मागितली आणि भेटायला आली...पण नेहा आता प्रॉमिस कर सतत आता तो विषय काढायचा नाही हा ..पुरे आता .आता सगळं विसरून जा .आपलं लग्न होणार होतं.. मी तुला बघायला आलो होतो..आता फक्त आपली निखळ मैत्री आहे हे लक्षात ठेवू आपण दोघेही..

नेहा काकुळतीला आली..हा सतत मैत्री मैत्रीचं करतो आहे काही बोलू देत नाही.तिने विचार केला आता बोलतेच ह्याला आता " तुझ्याशी मला लग्न करायचे आहे"...

नेहा:"अमोल मला ना तुझ्याशी बोलायचे आहे"..

अमोल:"बोल नेहा"

नेहा:"अमोल मला ना.....ती जरा शांत बसली.हृदयाची धडधड वाढू लागली.... तितक्यात वेटर आला बिल घेऊन..अमोलने पैसे दिले आणि टिपही दिली स्वतःच्या खिशातील केडबरी दिली....


अमोल केडबरी देतोय वेटरला हे पाहून नेहाला आश्चर्य वाटले..तिचा प्रश्नार्थक चेहरा अमोलला खूप काही सांगून गेला..

अमोल:"तूला हा प्रश्न पडला असेल ना मी त्याला केडबरी का दिली??4,,...हा जो वेटर आहे ना त्याचा एक लहान दोन वर्षांचा मुलगा आहे आणि त्या मुलाला ही केडबरी फार आवडते..

नेहा:"तुला कसं माहीत???

अमोल:"इथे मी रोज चहा प्यायला येतो मग तो वेटर त्या मुलाला कधी तरी आणतो.अशीच आपली ओळख झाली..गोड आहे हा तो मुलगा ..वडिलांना सुद्धा कधी तरी मदत करतो..एकदा माझ्या बाजूला बसला त्याच्या
वडीलाला घाम आला म्हणून त्याच्या छोट्याश्या शर्टाने घाम पुसत होता..मलाही आता चांगला ओळखतो मी आलो की माझ्या गळ्यात पडतो...

नेहा:"अमोल तू तर कमाल आहेस रे ..तुझ्या सारखा विचार करणारे विरळच...

अमोल:"मी हळवा होतो गं मुलाचे वडिलांचे प्रेम बघून..माझ्या नशिबी ते प्रेम कुठे..??मग दुसऱ्याचे सुख बघून ते आपलं मानायचे आणि सुखी व्हायचे..ते जाऊ दे तू काही तरी सांगणार होतीस बोल ना..काय सांगायचे होते तुला??


अमोलचे डोळे भरून आले ....


नेहा:"अमोल मी सांगते पण आधी सांग हे तुझ्या डोळ्यात पाणी का???

अमोलने स्वतःचे ओठ दाबले... शांत बसला..

नेहा:"अमोल एकीकडे मैत्रीण म्हणतोस आणि असा शांत बसतो..मला सांगायचे नाही का ???


अमोल:"नेहा तसं नाही गं काही भूतकाळाच्या आठवणी इतका त्रास देतात की आपण कितीही पुढे आलो तरी त्या गोष्टी आठवल्या तरी असे वाटतं की ती जखम अशीच राहणार निरंतर.. अशीच ओली जखम आहे समज....

नेहा:"मैत्रीण म्हणतोस ना?मग बोल ना प्लिज..सांग ना ....


अमोल:"सांगतो नेहा,आपण इथे समुद्र आहे तिथे जाऊया का?


नेहा:"हो जाऊयात"...


नेहा अमोल दोघेही हॉटेल मधून बाहेर पडले आणि समुद्र किनारी पोहोचले...

समुद्र किनारा जणू वाट पाहात होता .अमोलचा भूतकाळ ऐकण्यासाठी नेहा आतुर झाली होती....


काय वाचकांनो तुम्ही आतुर झाला असाल ना काय होता अमोलचा भूतकाळ???
वाचकहो भाग चार कसा आला असा विचार करत असाल बरोबर ना?..पण भाग चार वेब साईट वरून डिलिट झाला म्हणून आज पोस्ट करावा लागला.

नेहाने पटकन सांगावे ना की तिला अमोलशी लग्न करायचे आहे..बरोबर ना??थोडीशी उत्सुकता ताणून धरते हा...कथेत मस्त मस्त twist आणण्याचा प्रयत्न करते ..जेणेकरून तुम्हालाही कथा आवडेल...थोडंस जे समाजात घडतं ते मांडण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे....पुढील भाग नक्की वाचा.....पुढील भाग लवकरच तुमच्या भेटीला येईल...,वाचकहो खूप खूप धन्यवाद सुंदर प्रतिसाद दिला कथेला.., पुढेही असाच प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा करते....


अश्विनी पाखरे ओगले.
लेख आवडल्यास लाईक, शेअर, कंमेंट जरूर करा....पुढील भाग भाग वाचण्यासाठी मला नक्की फॉलो करा...धन्यवाद....