विरुद्ध तो आणि ती भाग ३

Life Depend On Our Decision

नेहा दिवस सारण्याची वाट पहात होती .ओढ लागली होती ती अमोलच्या भेटीची.नेहाचे आई बाबा रागावलेच होते तिचे असे वागणे आई बाबांनाही पटले न्हवते.दिवसभर ती दोघांशी बोलण्याचा प्रयत्न करत होती पण घरात वातावरण खूपच गंभीर होते..

आई किचनमध्ये काम करत होती.आईशी बोलायचे म्हणून ती किचनमध्ये गेली..

नेहा:"आई माझं डोकं दुखतंय गं जरा डोकं चेपून देतेस का???

आईने ऐकून न ऐकल्यासारखे केले...
नेहाला समजलं आई खूपच रागावली म्हणून ती बाबांकडे गेली..

बाबा पेपर वाचत बसले होते...

नेहा:"बाबा तुम्ही तरी बोलणार आहात की नाही माझ्याशी???

बाबांनी तिच्याकडे पाहिले आणि पुन्हा पेपर वाचत बसले...

नेहाला आज घरात उचलून फेकल्यासारखे होत होते.काहीच सुचत न्हवते,..आधीच स्वतःच्या वागणुकीचा पश्चाताप झाला होता आणि त्यात आई बाबासुद्धा बोलत न्हवते. खूपच एकटं एकटं वाटत होते तिला..आई बाबा पहिल्यांदा असे वागत होते.अजिबात लक्ष न्हवते देत.

तेवढ्यात बाजूच्या मेघा काकू आल्या..मेघा काकू अगदी घरच्याच. नेहाच्या घरातली प्रत्येक गोष्ट मेघा काकुला माहिती असायची.. खरं तर मेघा आणि नेहाची आई स्मिता अगदी जिवाभावाच्या मैत्रिणी.. मेघा आलेली पाहून स्मिता खुश झाली..दिवसभरात आता कुठे आई हसली होती.नेहाला बरं वाटलं.. मेघा काकू आणि स्मिता गप्पा मारायला रूममध्ये निघून गेल्या...नेहाला कल्पना आली आता आई मी अमोलशी लग्न तोडलेलंसुद्धा सांगेन.. तासभर दोघींनी गप्पा मारल्या..मेघा काकू जाताजाता नेहाला म्हणाली"बेटा नेहा काळजी करू नकोस,जाऊ दे लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात..तसा अमोल चांगलाच मुलगा आहे पण असो आता तुम्ही दोघे अगदी एकेमकांच्या विरुद्ध स्वभावाचे म्हंटल्यावर लग्न झाल्यावर पटेल नाही पटेल .तसं अमोलचं तू ऐकून घेतले असते तर बरं झालं असते पण जाऊ दे आता कदाचीत तुझा जोडा दुसरीकडे असावा म्हणून की काय असे घडले.. नशिबाच्या गोष्टी .नाशीबापुढे माणसाचे काय पान हलत नाही..जाऊ दे ..मी स्मिताला समजवले आहे ..झालं ते झालं आता तुझ्यावर राग काढून काही उपयोग नाही....

स्मिता:"कशाला आता तिच्यावर रागवू मी??मोठी झाली ना ती .तिचं तिला चांगलं वाईट कळतं..तिला पूर्ण अधिकार आहे तिच्या आयुष्याचा जोडीदार निवडायचा.ह्यापुढे तिच्या लग्नाच्या बाबतीत आम्ही एका शब्दानेही बोलणार नाही..तिची तिला ठरवू दे कोणाशी लग्न करायचे..

नेहा:"आई मला माझी चूक कळली ना??मग का तू आणि बाबा असे माझ्यावर रागावला आहात.. मी माफी मागितली ना अमोलची??आता मला काही कळत नाही काय करू???अपराधीपणाची भावना निर्माण झाली..मला स्वतःवर राग येतोय.तडकाफडकी निर्णय घेऊन मोकळी झाली...

मेघा काकू:"हो हो नेहा शांत हो..स्मिता आता जाऊ दे गं किती तिला टोचून बोलशील??हे वय अल्लड आहे गं..झाली तिच्याकडून चूक मग काय आता तिला धारेवर धरणार का??जाऊ दे ..शांत राहा आता...

नेहा:"बघा ना काकू आई बाबा किती तुटक वागतात?मी कितीवेळा माफी मागितली..तरीसुद्धा...

मेघा:"बरं आता शांत राहा..दोघेही तुझ्याशी बोलतील....नको आता तू मनस्ताप करू...तुझ्या लग्नाची जबाबदारी आता माझी..अगं माझ्या एका मैत्रिणीचा मुलगा आहे..डॉक्टर आहे बरं का??स्वतःच क्लिनिक आहे.शोभेल हो जोडा..

काकूने फोनमधला त्याचा फोटो काढला आणि नेहाला तिच्या आई बाबांना दाखवला..

नेहाला अजिबात इंटरेस्ट न्हवता...त्याचा फोटो बघण्यात..

मनात तर ती अमोलचा विचार करत होती .उद्या त्याला भेटायचे.. त्याची पुन्हा मनापासून माफी मागायची. हेच तिच्या डोक्यात होते.. मनात तर तिला मेघा काकूंचा राग आला.."काय ह्या काकू माझं कालच लग्न मोडले आणि ह्या काय लगेच दुसरा मुलगा दाखवतात..प्रचंड राग आला नेहाला..तिने स्वतःच्या रागावर कंट्रोल केला..शांत बसून राहिली...


तितक्यात स्मिता बोलू लागली..

स्मिता:"नेहा बघ चांगला मुलगा दिसतोय आता कमीत कमी ह्याला तरी भेट.अमोलशी जशी वागली तसं ह्याच्याशी वागू नकोस..

नेहाने मनात नसताना होकारार्थक मान हलवली..डोक्यात तर तिडीक गेली होती..काकू नाही कमीत कमी आईने समजून घ्यावे..माझी मनस्थिती काय ह्या लोकांचं चाललंय काय??मी काय बाहुली आहे का एक झालं की दुसरा मुलगा बघायला..फिलिंग नावाची गोष्ट आहे की नाही.काय विचित्रपणा नुसता..

नेहाच्या चेहऱ्यावरचे सर्व भाव आई बघत होती.पण आईला काही ह्यावेळी ऐकून घ्यायचे न्हवते..काहीही करून तिने त्या मुलाला भेटावं इतकीच इच्छा होती..ह्यावेळी आईला नेहाच्या मनाचा विचार करत बसण्यात इंटरेस्ट न्हवता.तिला नेहाच्या भविष्याची चिंता सतावत होती..आईने साफ दुर्लक्ष केले..आईने मेघा काकुला स्पष्ट सांगितले उद्याच्या उद्या बोलवं घरी ह्या मुलाला आणि त्याच्या आई वडीलांना..

नेहा लगेच म्हणाली उद्या नको...उद्या सकाळी मला बाहेर जायचे आहे..

आई काकूंकडे बघून म्हणाली"बघितलं ह्या पोरीचे असे असते काय करावं म्हंटल तर मध्येच आडकाठी घालते...

आई चिडली हे पाहून नेहा म्हणाली आई तू संध्याकाळी बोलव त्यांना...


नेहा खोलीत निघून गेली..रुमचे दार बंद केले आणि खूप रडू लागली..आता असं वाटत होते की अमोल आता दूर होतोय..ती वेडयासारखी एकटीच बोलू लागली..एकटीच अमोलशी बोलू लागली.."काय अमोल काय केलंस तू???मी लग्नाला नकार दिला तर तू पण नकार दिलास..तू मला थांबवायचे होतेस ना??तुला माहिती आहे आई बाबा नंतर सगळ्यात जास्त जवळचा तूच वाटतोय मला..अमोल एक काम कर ना तू पुन्हा बोल ना आई बाबांना की मला नेहाशी लग्न करायचे.. बोल ना अमोल..आता मला फक्त तू हवा आहेस फक्त तू..माझा mr. perfect.. नाही मी तुझ्यासारखी आणि तू माझ्यासारखा पण तरी तू मला हवा आहेस..खरंच अमोल तू मला हवा आहेस...मी कोणा दुसऱ्या सोबत लग्न करून आता खुश राहू शकत नाही..मला नाही भेटायचे त्या मुलाला..मी निवडला आहे माझा जोडीदार तूच आहे तो ..अमोल तूच हवा आहेस मला....


असे बोलून नेहा खूप रडू लागली...काश मी अमोलशी हे सर्व समोर बोलू शकले असते तर किती बरं झालं असतं.. देवा काय हे केले तू .किती कमजोर झाली मी अमोलच्या प्रेमापोटी.. जेव्हा तो माझ्या आयुष्यात येत होता तेव्हा मी फटकळ स्वभावाने त्याला जणू दूर लोटले.आणि आता मला जाणीव झाली तर माझी प्रचंड इच्छा असून मी त्याच्यासोबत लग्न करू शकत नाही..खूप अस्वस्थ वाटतंय मला..काय करु मी....

तितक्यात आई आली.…
नेहा बघ मेघा काकूने दुपारी चार वाजता त्या मुलाला आणि त्याच्या आई वडिलांना बोलावले आहे .उद्या तुला बाहेर जायचे आहे तर जा पण तीन वाजण्याच्या आधी घरी ये...म्हणजे तुझी तयारी करायला वेळ मिळेल..हो आणि तो लाल रंगाचा ड्रेस घाल ..छान दिसतो तुझ्यावर.. उद्या त्या लोकांशी नीट बोल..चांगलं स्थळ आहे उगाच हातातून जायला नको..


आई निघून गेली...

नेहाला अजून रडू आले असे वाटले जाऊन सांगावे आई बाबांना नाही भेटायचे मला कोणत्याही मुलाला...मला अमोललाच भेटायचे आहे...पण काहीच म्हणाली नाही...

रडून घेतल्यावर तिने तिच्या खास मैत्रिणीला प्रियाला फोन केला....झालेला सर्व प्रकार सांगितला...

प्रिया:"अगं ए वेडाबाई काय तू रडत बसली आहेस....तुला अमोलशी लग्न करायचे आहे ना मग तू आई बाबांना साग ना....

नेहा:",मला करायचे आहे लग्न पण आता अमोल तो तयार होईल लग्नाला???.....

प्रिया:"अगं मग बोल अमोलशी..तसाही ज्या पद्धतीने तो तुझ्याशी वागला त्याच्यावरून कळून येते की तो समजूतदार आहे ..मग वाट कसली पाहते.. पुन्हा बोल मला माझी चूक कळली मला तुझ्याशी लग्न करायचे आहे.....

नेहा:"मी भेटणार आहे उद्या त्याला मी माफी तर मागेल त्याला पण लग्न कर माझ्याशी हे मी कोणत्या तोंडाने बोलू..अगं मी खूप घालूनपाडून बोलले त्याला...माझं धाडस होईल की नाही माहीत नाही...

प्रिया:"बघ आता बोलल्याशिवाय काही तुझ्या मनातलं त्याला कळणे अशक्य आहे...तुला बोलावच लागेल..तुला पश्चाताप झाला आहे हे तुझ्या आवाजावरून मलाही कळतंय..तो समजून घेईल मला तर वाटतंय बघ...

नेहा:"खरंच समजून घेईल ना??

प्रिया:"शंभर टक्के"....उद्या तू जा आणि तुझ्या भावना त्याला सांग..


नेहा:"बरं ते ठीक आहे.. पण आता हा उद्या मुलगा येतोय मला बघायला त्याचं काय???

प्रिया:"अगं वेडा बाई एकदा अमोलने तुला होकार कळवला की आई बाबांना सांग.मग ह्या मुलाचा प्रश्नच नाही.".तसंही आई बाबांना अमोल आवडतो आहे तर ते सुद्धा तयार होतील हसत हसत......

नेहा:"मला ना अपराधीपनाची भावना येते गं..

प्रिया:"आता काय झालं??

नेहा:"अगं मी आई बाबांसाठी त्यांची मर्जी सांभाळण्यासाठी उद्या मुलगा येणार आहे त्याला भेटायला बोलवले खरं तर मला त्यात इंटरेस्ट नाही.आणि त्या मुलालाही मी फसवते गं..म्हणून कसं तरीच वाटतंय ....

प्रिया:"ए बाई इतका विचार करू नको आणि असंही युद्धात आणि प्रेमात सर्व माफ असतं.. आता अमोल हवा आहे तर तुला धीट रहावं लागेल आणि हा गुन्हा करावाच लागेल.....नाही तर एक काम कर..
"तू अमोलचा विषय सोड आणी हा उद्या मुलगा येतोय ना त्याला हा बोल..

नेहा:\"ए काहीही बोलू नको हा .मला अमोलच हवा आहे...त्याच्याशिवाय मी नाही राहू शकत...


प्रिया:"ओहोहोहोहोहो नाही राहू शकत ना ..अब आया उंट पहाड के नीचे. मग उद्या जाऊन त्याच्याशी बोलायची हिम्मत करच....

नेहा:"हो मॅडम प्रयत्न करते"

प्रिया:"प्रयत्न नाही हा बोलायचचं आहे ..हे प्रेमाचं युद्ध तुला जिंकायचेच आहे राणी....

नेहा:"थँक्स प्रिया"..

प्रिया:"मला शिवी नको देऊ हा...

नेहा:"मी कधी शिवी दिली??

प्रिया:"मग हे थँक्स काय होतं???

नेहा:"तू पण ना. लव यू माय बेस्टी ....खूप टेंशन आलं होतं गं मला..तुझ्याशी बोलून खूप हलकं वाटतंय....

प्रिया:"लव यू टू स्वीट हार्ट".चल उद्यासाठी ऑल दि बेस्ट... हो आणि तो डायलॉग विसरू नको हा...

नेहा:"कोणता गं??

प्रिया:"आपल्या अम्याचा गं "आल इज वेल"...

नेहा:"येस येस आल इज वेल.....

प्रिया:"चल आता आज झोप लवकर उद्या भेटायचे आहे ना अमोल जिजूना??उगाच डार्क सर्कल नको डोळ्याखाली...हो आणि मस्त तयार होऊन जा अमोल जीजू तुला पाहताच क्लिनबोल्ड झालेच पाहिजे...

नेहा:"प्रिया तू पण ना नमुना आहेस..काही तरीच तुझं.....

प्रिया:"हो हो तुझ्यासारख्या मुलीला माझ्यासारखी नमुना मैत्रीणच हँडल करू शकते.....

नेहा:"हो गं तूच मला समजून घेऊ शकते.....

प्रिया:"बरं चल फायनल bye.... काळजी घे......

नेहा:"bye, take care.. sweet dream......



प्रियाशी बोलल्यावर नेहाला खूप बरं वाटलं...उद्या अमोलला मी बोलणारच आहे मनातलं...सकाळ कधी होते ह्या विचाराने ह्या कुशिवरून त्या कुशीवर लोळत राहिली तिला झोपच आली नाही...सकाळ झाली...

नेहाला ही सकाळ फार वेगळी वाटत होती कारण अमोलला भेटणार होती..तिने छानसा ब्लु रंगाचा ड्रेस घातला मॅचिंग ज्वेलरी ..हातात छानसा कडा.आरशात स्वतःला पाहिले आणि स्वतःलाच धीर देत होती ..तू अमोलशी बोलणार आहे...काहीही झालं तरी तुला व्यक्त वाहायचे आहे..काळीज जोरजोरात धडधडू लागले....


ज्या केफेमध्ये भेटायचे होते होते त्या केफेमध्ये गेली..अमोलला शोधू लागली,एका कोपऱ्यात अमोल तिला दिसला..व्हाईट टी शर्ट ..ब्लु जीन्स.. काय भारी दिसत होता अमोल..नेहा लगबगीने त्याच्याकडे गेली.. अमोलने नेहासाठी खुर्ची पुढे केली..


अमोल:"हाय नेहा.how are you???

नेहा:"i am good.. what about you??

अमोल:"i am fine....

नेहा:"अमोल त्या दिवशी मी तुला इतकं तोडून बोलायला न्हवते पाहिजे.".
नेहाने कान पकडून माफी मागितली...

अमोल:"नेहा अगं खरंच मी सर्व विसरलो आहे .म्हणून तर मी तुला भेटायला आलो आहे...पण आता माझी एक शर्त आहे ती तुला मान्य करायची आहे"करशील???

नेहा:"कोणती शर्त"???

अमोल:"सांगतो पण तू आधी बोल मान्य करशील की नाही ते??


नेहा:"हो नक्की मला जे सांगशील ते मी मान्य करेल.....
नेहा विचार करू लागली काय असेल त्याची शर्त....


अमोल:"शर्त अशी आहे की तुला माझी एक मैत्रीण व्हावी लागेल...मला ती नेहा नको जिच्याशी लग्न करणार होतो मला अशी नेहा हवी जी माझ्याशी निखळ मैत्री करेल....

नेहा:",इतकंच ना done.. आजपासून तुझी मी मैत्रीण....

अमोल:"नेहा मला तुझ्याशी काही बोलायचे आहे बोलू???

नेहाचे ह्रदय जोरजोरात धडधडू लागलं.. तिला वाटलं प्रपोस करतो की काय.....

मनातले भाव चेहऱ्यावर न आणता ती म्हणाली बोल ना....


अमोल बोलू लागला....काय बोलायचे होते अमोलला नेहाशी नक्की सांगा??तो प्रपोस करणार होता की आणखी काही???त्यासाठी पुढील भाग नक्की वाचा....

क्रमश:

कसा वाटला भाग नक्की सांगा..आवडल्यास लाईक ,शेअर ,कमेंट करा..

अश्विनी पाखरे ओगले....