विरघळणारी मिठी

प्रेम

विरघळणारी मिठी


का कुणास ठाऊक त्या मिठीमध्ये एक अनपेक्षित ओढ होती.. 

तन गुरफटले तरी मनाच्या कोडयाची सोड होती.. 

ती अलगद मिठीत येता कस्तुरीचे सुगंध दरवळले होते.. 

मनाच्या शिदोरीचे ओझे प्रेमाच्या सागरात विरघळले होते.. 

अस्तित्व ठाव देह विचाराचा थांगपत्ता राहिला नव्हता.. 

पहिल्यांदाच चंद्रच्या टपोर चांदण्यात सुर्यास्त मी पहिला होता 

भावनाचे बांध फुटुन अनबंध वाहत होते.. 

या गदारोळात तिचे कान मात्र हृदयाचे ठोके मोजत होते.. 

स्वेटरला मत्सर व्हावा अशी ऊब त्यात समावली होती.. 

कापर्या हाताने कुरवाळता एका शिरशिरी तनात दणाणली होती.. 

भानावर येता सारे अगतिक पुन्हा जाहले.. 

निरोपाची चाहुल लागताच सारे सुन्न होऊन गेले..

मन जड डोके जड निरोपाचे पाऊल देखील जड विचारांच्या 

प्रश्न पुन्हा मिळेल का ही सवड..??? 

पुन्हा मात्र मिठीत येत मी... स्वतचे डोळे मिटले 

हरवत जाता चंद्र माझा दुजेपणाचे भान सुटले.. 


पुन्हा एकदा मिठीत येत मन मनात विरुन गेले... 

आयुष्याचे सोनेरी युग दोन क्षणात जगुन गेले.... 



???