विनोदी कथा - चिंगी (भाग २)

It is a story of the youngest sibling, who is naive yet wise. She listens to everything that her elder sisters say, just so she could hang around and play with them. Anyone could feel pity looking at her poor face...Such is our Chingi. But, chingi

अरे आज तर कमालच झाली !

कुठे,,,? कुठे काय ! चिंगीच्या जीवनात धमाल झाली,,,

जे करु शकत नाही प्रत्यक्षात ,,,ते,,,,,वाचाच,,,!

हे ss हे ss कुठे आले मी ,,, हे तर जंगल !

बापरे किररररर्र घनदाट झाडी ,,,,

झाडी इतक्या वाढल्यात की अंधारलेलं वाटतय,,,

अरे ! ही पायवाट , या वाटेने जाऊन बघू,,,,!

ह्या जंगलाला काही अंत आहे की नाही,,, 

माझे पाय थकायच्या आत मी इथून बाहेर पडायला पाहीजे,,,

अरे हा रस्ता तर वर जातं आहे,,,

मग मी जंगलाबाहेर कशी पडणार ?

पण गत्यंतर नाही ,,,,

चला मॅडम शिला ssss

ओ ss हो ss शिला ss तुझे कपडे तर फारच भारी बाबा ss

शाॅर्ट मिड्डी ,,,, छोटसं टाॅप,,, टिपटाॅप दिसतेस शिले sss

आणि पायात ,, अरे बापरे ! 

एवढा मोठ्ठा बुट sss बाबारे ss बाबा ss

चाल शिले करुन घे तुया जीवाची मुंबई sss

माय नेम इज शिलाss शिला की जवानी ss

आँ,, अरे बापरे,,,, कुठं पोहोचले मी,,,

चालत चालत मी टेकडीवर पोहोचले ,,, 

समोर एक छोटसं मंदीर होतं,,,

मंदीरात एक साधूबाबा पाठमोरे बसलेले होते,,,,

आजूबाजूला मोकळी जागा,,, 

जिथून मी आले तिकडे जंगल होतं ,,, आणि मंदीराच्या दुसर्‍याबाजूने ,,, ऊतरण होती आणि खाली , 

दूरवर गाव दिसत होते,,, 

हुश्श बाबा ss एकदाची वस्ती तरी दिसली,,, 

माझी चाहूल लागताच साधू नी वळून बघीतले,,,

आणि ते मला बघतच राहीले,,,, 

शिले sss तुय कायी खरं नायी वं माय sss

साधू तिच्या दिशेने यायला लागले,,, 

माय बाई हे तं माह्या कडेच येत हायतं,,, आता कुटं जाऊ वं sss बापा भगवाना वाचवं मले,,,

काय पडली होती काय मायीत,,, 

हे इतलुसे कपडे घालाची,,,

माय शिले मॅटच हायेस बाई तू ,,, 

जंगलात कोनी असं छोटाले कपडे घालुन जातं असते का बाई ,,,?

पायन तो ,,, कसां तरंतरं चालतं येतं हाये ना बाई sss

चल संन्यासी मंदीर में ss तेरा चिमटा मेरी ss

माय शिले गाणं काय म्हणतं,, पळ नं वं बाई sss चाल ना वं sss धाव ss भो,,पळाली,,,,,,भो,,,

हाँ ,,, आता कुठं जीवात जीव आला माझ्या,,, 

ह्यां,,, हे कुठं पोहोचले मी,,, शेतात,,, ही संत्र्याची बाग,,,

हे काय,, मिरची ,, वांगी,,, टमाटर,,, इथे तर पेरु पण आहेत,,,

अरे वा झोपडी पण,,,ओ ss हो ssss मळ्याच्या मळ्यामंदी कोण गं ऊभी sss राखणं करते मी भाऊजी sss

अरे ,, रंजना अशी काय गाणं म्हणतेस,,, तो बघ की भाऊजी पुढं ऊभा आहे,,, तुझ्याकडचं बघत आहे,,, 

अरे बाबा हे कोण आणिक,,,?

आणि मी काय घातलय हे,,, नऊवारी,,, लुगडं,,,,

अरे देवा,,, हो की ,,,भारीचं दिसतेस रंजे ssss

रंजे पण तो भाऊजी पाय बाई , कसा पाहून राहीला तुझ्याकडे,,,

ओ रंजे sss कधी आलीस ,,, किती वाट बघत होतो तुझी ,,,

आणली का शिदोरी,,, चलं दे , खुप भुक लागली,,,

अरे ! ह्याला आता कोणती शिदोरी देऊं,,, शिदोरी तर आणलीच नाही,,, !

रिकाम्या हाती आली sss थांब तू आता,,, रंजे ssss

अवं पयं ना वं रंजे ss हा काय करनं कायी सांगता येत नायी बाई sss

चाल ऊसां कडे लपता येईल,,, चाल ,, धाव ,,, 

अरे बाबा तुझ्या ऊसाले लागणं कोल्हा ssss भुर्रर्र,,,,,भुर्रर्र,,,,,

अरे,,, हे ,, कुठे,,, इतके प्रखर लाईट्स,,, आहे कुठे मी,,,?

अरेच्चा सर्कस sss ओ,,, हो,,, मस्तचं,,, 

माय , मै कहाँ खड़ी हुँ बाई ,,, 

इतनी ऊपर ,,, झुले पे ssss

बाबा ,, रे,, गिर जाऊँगी मैं तो ssss 

ये कौन आया ?,,, हॅ,,,

ऐ,, हात देना,,, वापस गया,,,

फिर से आया,,, ऐ हात देना ssss

नायी रे बाबा sss मैं नाही दुँगी मेरा हाथ sss

लेकीन ये तो मस्त झुल रहा है ,,, 

एक झुले से दुसरे झुले पर,,, 

हवा में अच्छा करतब दिखा रहा,,,, ये तो !

ऐ भामटी हात देना ssss

हे ,, मुझे भामटी बोला ,,,

अब तो बिलकुल भी मै झुला नही झुलूँगी,,,, समझे,,, 

ऐ चित्रा sss ये भामटी को धक्का देना तो जरा sss

प्रॅक्टीस नही कर रही ये,,, ज्यादा भाव खा रहीं हैं ,,, 

जीना यहाँ , मरना यहाँ ss इसके सिवाँ जाना कहाँ sss

समझी भामटी sss ये ss धक्का,,,,धडाम,,,,

ए,, ए,,, अरे,, रे sss बच गयी भाई,,,,

और कहाँ आ गयी मैं,,,, हें,,,एवढी हवा का लागतेय मला,,,

माझ्या कानात हवा शिरत आहे,,,

अरे अरे अरे ,,हा तर ,, मोर ssss ये,,, बापरे ,,, 

अरे,,, थांब ना बाबा,,,

आणि कपडे जीन्स , कुडता ,,, 

हो,, हो,,,अरे काट्या टोचतात ना मला,,, ए बाबा ,, एकतर आकाशात एकसारखा ऊडं नाहीतर जमीनीवर ऊतरं सरळ सरळ,,, 

खरचटतं हाय ना,, बाप्पा sss

पण काही म्हणं बुवा ,,, मैं नाचू ऐसे , बन की मोरनी हूँ जैसे sss

आ,,हा ss हा sss थांब तुझे मोरपिसच ऊपटते,,,, 

चांगला ऊडं ना बे,,,धप्पं,,, 

पाडलं बाप्पा जमिनीवर,,, 

तुये दोन मोरपीस आले माह्या हातात,,, 

जाय तिकडं,,,

नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच sss

माय वं हा कावुन धावत येत आहे,,, 

अरेरे ,, टोचतं का काय ???

घे बाप्पा तुये पिसंsss चाल्ली मी ssss

धाव व मीने,,, पळं ना वं,,,,,

झुयी ssssss

झप,,,,,

वाचली बुवा,,, बुडूक,,,बुडूक,,, 

माह्या नाका तोंडात कावून पानी चाल्ल वं माय,,, 

हात पाय मारं वं पोट्टे !

बुडशील ना मंगले,,,, 

हां,, जमल बुवा,,, 

वजन जास्त असल्याचा परिणाम,,,

जरा हातपाय मारले आणि मी तरंगत आहे पाण्यावर,,,

अस्सं होय ,,, I am in the swimming pool,,,and मंगले ,,,अगर swimming not आती ,, तो ,, बुडशील गं बाई,,,ड्रेस पण मस्त भारीच बाॅ !

आवडला मले,,, 

I am happy गं happy माय बाई ssss

अरे,,, ये पुलातं ,,, व्हेल कशी आली sss

चाल ,, चाल,, लवकर ,, लवकर,, 

अव भयताडं,,, पोहणं वं,,,

चल नाहीतर गिळणार ती तुला,,, 

झुप,, झुपपपपप,,,वाचलो बुवा एकदाचे,,,, हुश्शशश,,,

आँ ,, हे काय,,, ऐ,,, किती कळकट कपडे माझे,,, शी ss शी ss किती घाण वास,,, शी,, बुवा,,,

दे दाता के नाम तुझको अल्ला रख्खे ssss

आई च्या ऊपकाराचे ओझे फेड बाबा,,, 

बाबाच्या नावानं दान कर बाबा sss

तुम एक पैसा दोगे , वो दसं लाख देगा sss

ओ अमीर काका,,,

गरीबों की सुनोssवो तुम्हारी सुनेगा sss

अल्ला के नाम पे दे दो मायी sss

बाप्पा के नाम पे दे दो मायी ss

ऐ मायी sss देना sss

धपाक,,,! जोरदार धपाटा,,,! 

चिंगे sss चिंगे sss कुठं भीक मागतं आहेस गं sss

ऊठं लवकर,,, नऊ वाजलेत ,,, 

शाळेला सुट्टी असली की फिरतं राहते गावभरं sss

आणि शाळेचा असाच कंटाळा करशीलं तर भीकचं मागावी लागेलं एखाद्या वेळेस,,, !

पुन्हा एक धपाटा,, ऊठं आता,,,

अगं बाई ! काय म्हणावं ह्या पोरीला sss

चिंगे sss गादी कित्ती ओली झाली गं sss

जसे काही घडाभर पाणीचं टाकलय sss

कधी सुकणार ही आता sss,,, 

आई अगं ते मी स्विमींग पुल मधे पोहत होती नां ! 

म्हणून पाणी ऊडालं असेल,,!

तुझ्या तर,,, 

ए धपाक,,, धपाक,,, चिंगे sssssssss

आमची चिंगी ना अशीच आहे,,, मारं खाल्यानंतर न रडता ती बनली जशी ससा ,,, मिचकणारे , अर्धोनमिलीत डोळे , सपाट निर्विकार चेहरा ,, एकदम बालीश ,,, अल्लडं , चेहर्‍यावरचे भाव,,, केविलवाणे ,,,तिच्याकडे बघुन आईलाचं वाईट वाटले,,, ये रे माझ्या पिलां ,,, म्हणतं आईने तिला जवळ घेतले ! 

इकडे चिंगी आईच्या पाठीमागे तुम्हाला ठेंगा दाखवत होती,,,,! जे प्रत्यक्षात करु शकतं नाही ,,, तर काय स्वप्नात पण बघायचे नाही का मी,,,,,!

मी चिंगी sssssssss

! वयावर जाऊ नका ,,,! स्वप्नं सगळेच बघतात ,,,!

गेली कुठं जंगलात

भेटले तिला साधू बाबा

आणि घाबरली की !

अहो घाबरली की !

नाजुक चिंगी माझीss

धावत गेली शेतात

सापडली तावडीत

चकमा देऊन भाऊजींना

अहो चिंगी माझी !

नाजुक चिंगी माझी sss

बसली जाऊन मोरावर

दाऊन तिचा तोरा मोठा

खरचटूनं घाबरली की

अहो ! घाबरली की !

नाजुक चिंगी माझीsss

बुडली होती पाण्यात

आली तरुनं काठावर

अन घाबरली की !

व्हेलं ला घाबरली की 

नाजुक चिंगी माझीsss

देवळासमोर बसली बघा

आना , आना मागीतले बघा

आणि , बसला पाठी धपाटा

अन घाबरली की !

नाजुक चिंगी माझीsss

समाप्त

०००००००

🎭 Series Post

View all