विनोद? की अत्याचार

विनोद करू नका स्त्रियांवर
स्त्री जी केवळ एका भ्रूण म्हणून अस्तित्व असलेल्या नर जातीची पूर्ण वाढ झालेल्या बालकात  परिवर्तन करते.त्याच नर जातीने तिची विनोद करून हेटाळणी करावी ही खूप मोठी व्यथा आहे स्त्री जीवनाची.
एखाद्या स्त्री वर विनोद करताना तो आपली मर्यादा विसरतो.परस्त्री मातेसमान समजणाऱ्या राम भूमीत स्त्री चा पदोपदी विनोदाने उपहास केला जातो. आपली आई बहीण पत्नी मुलगी ह्या सुद्धा स्त्रियाच आहेत हे तो विसरतो परक्या स्त्री ची विनोदाने नाचक्की करताना.
त्या ठिकाणी स्वतःची जवळची व्यक्ती असती तर तिला किती त्रास झाला असता हेच तो विसरतो.
जी स्त्री लहानपणी गोंडस लोभस असते.तिच्या बाळ लीलानी पैजनानी घरे नादमयी होतात.यौवनात पदार्पण केली की ती सौष्ठव  प्राप्त करते तिच्या शरीराची गोलाई च फक्त या पुरुषांना भुरळ घालतात .निसर्ग दृष्ट्या ती निर्मिती साठी परिपूर्ण होत असते.त्या तिच्या नाजूक मनोवस्थेत तिच्यावर घाणेरडे विनोद स्पर्श तिला दुबळे करून जातात. शाब्दिक बाण तिला घायाळ करून तिच्या फुलणाऱ्या शरीराला शिसारी जाणवून देतात  किळसवाण्या नजरा , शरीर चाचडपणारे ओंगळ स्पर्श. तेंव्हा यांच्या घाणेरड्या विनोद बुद्धीची किव करावीशी वाटते.पण ती तक्रार कुणाकडे करणार कारण कुंपणच शेत खाट असते.तिला ह्या नर जाती ला जन्म दिल्याचा पश्र्चाताप होत असेल पदोपदी.


मग विनोदाने मर्यादा ओलांडली की ते अत्याचाराचे स्वरूप घेतात.हजारो निर्भया  मग त्यात बळी जातात.त्यांच्या पौरुषत्व संकल्पनेला खत पाणी घालते आपली पुरुषप्रधान समाज व्यवस्था.अंग चोरुन चालले तरी विनोद केला जातो.आणि धडाडीने कुटुंबाची जबाबदारी घेवून स्वयंसिद्धा झाले तरी विनोद हे केले जातातच.
मग करावे काय स्त्रियांनी तारुण्यात शरीराच्या आकर्षक पणावर विनोद.तर नंतर संसारात बाळंतपणात शरीराची परिमाणे बदलली म्हणूनही विनोद.अगदी त्याला कारणीभूत असलेला पतीही तिची अवस्था समजून न घेता.तिच्या बेढब पनावर विनोद करतो.सीरियल चित्रपटात तर सर्रास स्त्री वेष घालून स्त्री चा विनोद निर्मिती साठी वापर केला जातो.
हे असे कुठवर चालणार दुर्दैवाने कधी कधी ह्यात आपल्याच जवळच्या स्त्रिया सामील असतात.काय हे दुर्दैव.कुठे दाद मागायची मग....
ह्यावर आता एकच उपाय पुढच्या पिढीला आपल्या मुलींना जसे आपण सर्वांचा आदर करायला शिकवतो.तसेच प्रत्येक स्त्री चा आदर करायला आपल्या मुलांच्याच मनावरही लहानपणापासूनच बिंबवले पाहिजे.प्रसंगी विरोध पत्करून कठोर होऊन या विनोदाचा विरोध करणे मुलींना शिकवले पाहिजे.त्यांना प्रत्युटर द्यायला सक्षम बनविले पाहिजे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या खंबीर बनवले पाहिजे. तरच विनोद हा अत्याचाराचे स्वरूप घेणार नाही.
माझ्या मैत्रिणीचा किस्सा सांगते इथे दररोज कॉलेज का जाताना एक मुलगा कमेंट्स पास करून तिला त्रास द्यायचा एकदा त्याचे धारिष्ट्य वाढले आणि तो तिचा एकटीला पाहून पाठलाग करू लागला  त्याने पहिला विनोद केला " वाह क्या चाल है !... " तिने दुर्लक्ष करून वेग वाढवला .त्याने दुसरा कमेंट पास केला" हाय क्या माल है !....." तिला राग आला रोज  ह्याचे  घाणेरडे विनोद काय सगण करायचे.ती गरकन फिरली.त्याला कल्पना यायच्या आधी तिची जोरदार थप्पड त्याच्या गालावर पडली.तो गाल चोळीत होता तेंव्हा तिने विनोद केला. " वाह क्या  गाल हैं!...." तो बाही सरसावित तिच्यावर झेप घ्यायला पुढे झाला.तोवर स्वसंरक्षणासाठी आत्मसात केलेली कराटे प्रशिक्षण मदतीला आली.तिने पुढच्या दोन मिनिटात त्याला जायबंदी केले.आणि परत माझ्या वाटेला जायचे नाही म्हणून ताकीद दिली.पुन्हा ते टोळके त्या रस्त्यावर दिसले नाही.आम्ही सर्व मैत्रिणींनी तिचे आभार मानले तेंव्हा ती म्हणाली.स्त्री ने आत्म निर्भर होण्याची गरज आहे विनोदाचा विषय व्हायची  नाही मला  नाही आवडत स्त्रीवर विनोद केलेला., पहिल्यांदाच विरोध करा विनोदाचा विषय बनू नका....विरोध करा म्हणा मला नाही आवडत स्त्रियांवर विनोद केलेले...,