Jan 29, 2022
कथामालिका

विजयी भवं #५.०

Read Later
विजयी भवं #५.०


मी. निर्मल एका निर्जन स्थळी पोचल्यावर गाडी थांबवली... ते उतरून आजूबाजूला बघून बॅग गाडीतून काढून ठेवली... घाबरून ते सतत चेहऱ्यावरचा घाम पुसत होते...निर्जन रान होत... आजबजुळा काळ कुत्र सुद्धा नव्हतं... एक घळी पार करून.... ते एका नारळाच्या झाडा जवळ ती अवजड बॅग घेऊन पोहोचले... आणि तिथे आजूबाजूला बघून ठेऊन दिली... घामाने डबडबले ... आणि हार्ट बीट तर सतत वाढत होती... शेवटी घाम पुसत घाईने... धावत पळत येऊन आणि पुन्हा गाडीत येऊन बसले...
आणि काही वेळ दीर्घ श्वास घेत... गाडी स्टार्ट केली ... आणि परत फास्ट मध्ये निघून गेले...
जरा वेळाने तिथे एक कार आली...
आणि त्यातून दोघे जण उतरून... एक नजर इकडे तिकडे टाकली... आणि निवांत तिकडे जाऊ लागले...
आणि मागून गाड्यांचा प्रकाश पडला... आणि आता मात्र त्यांची तांतरली... आणि रस्ता मिळेल तिकडे धावू लागले...पोलिसांनी त्यांना बघून गोळीबार सुरू केला.. त्या दोघांनी ही पलटवार सुरू केला... आणि रस्ता मिळेल तिकडे धावू लागले ...
मात्र ह्यावेळी जाधवांना दोघांपैकी एक जण जिवंत हवा होता... किंवा दोघे ही... त्यामुळे फक्त पायाला शूट करायचे..  ही स्त्रिक्ट ऑर्डर त्यांनी सगळ्यांना दिली होती...एकाने गाडी ताब्यात घेतली... दोघे जण त्या दोघांच्या मागे पळाले... आणि बाकीचे आठ ही जन वेगवेगळ्या दिशेला पांगले ... आणि त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत सरते शेवटी दोघे ही पकडले पण दोघे ही मृत सापडले....
" सर इकडे एक डेड बॉडी सापडली... तोच व्यक्ती दिसतोय... जो पळत होता..." एक कॉन्स्टेबल.
" सर इथे ही अजून एक सापडली..." दुसरा कॉन्स्टेबल.
" म्हणजे ते आपल्या हाती येऊ नये म्हणून त्यांना शूट केलं गेलं...खूपच हुशार आहे हा हैवान..." इन्स्पेक्टर जाधव.
" सर... इथे झाडाखाली एक बॅग आहे... मी आणि महेश घेऊन येतोय जीप जवळ..." तिसरा कॉन्स्टेबल.
" पण शूट चा आवाज पण आला नाही... आणि इट्स होरिबल..." इन्स्पेक्टर जाधव यांच्या डोक्यात मात्र फक्त खुनी ... किडणापर... इतकंच सुरू होत...

दोन डेड बॉडी त्याच्या समोर ठेवलेल्या होत्या... एक बॅग...
" त्यांचे खिषे बिषे चेक करा... मोबाईल ताब्यात घ्या..."
" सर मोबाईल नाहीत त्यांच्याकडे... आणि ओळख करण्यासाठी काहीच नाही खिशात..." एक कॉन्स्टेबल.

" म्हणजे ओळख करून घेण्यासाठी एक दिवस फुकट जाणार आपला... दोघांच्या डेड बॉडी पोस्ट मॉर्टम साठी पाठवा ताबडतोब.. " इन्स्पेक्टर जाधव.
" सर ह्या बॅग च काय करू...?" एक कॉन्स्टेबल.
" रजिस्टर मध्ये नोंद करा... मी. निर्मल कडून नोटांचे नंबर घ्या... आणि मॅच होत असेल तर कायदेशीर तरतूद करून बॅग परत करा... आणि ही कॅश लीगल की इल्लिगल हे पण चेक झालं पाहिजे...इतके पैसे कुठून आले लगेच चौकशी करा... कामात एक पण चूक महागात पडू शकते... त्यामुळं जरा विचार करून काम करा... कामात उशीर झाला तर चालेल पण चुका नकोत ह्यावेळी..."
" येस सर... " सगळे एकाच वेळी.
ते जीप मध्ये बसून निघून गेले...
इन्स्पेक्टर जाधव सतत काळजीत बसून एक एक पेपर चेक करत होते...
आणि ते सतत मधून मधून फोन कडे बघत होते... त्यांचा मोबाईल किणकिणला ज्या फोन चा वेट करत होते तो नंबर मोबाईल वर झळकला...
त्यासोबत जुजबी बोलून झालं... त्यांनी खून प्रकरण सुरू झाल्यापासून काही सिक्रेट सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते... ज्या ठिकाणी डेड बॉडी सापडल्या... त्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज चेक करायला घेतले...
पण फुटे ज मध्ये मात्र एक कार सोडून काहीच सापडल नाही... कारण त्या कारच्या ग्लास ब्लॅक असल्याने आत कोण बसले हे मात्र कळत नव्हतं... गाडीला नंबर प्लेट पण नव्हती...
त्यांच्या नजरेतून काहीतरी सुटल्यासारख वाटत होत... त्यांनी पुन्हा पुन्हा दोन तीन वेळा तो प्ले केला... तितक्यात त्यांचा फोन किणकिण ला...
त्या कार वर बोनेट च्या बाजूने उजव्या टायर च्या वर पिंक आणि ग्रे शेड मध्ये... एक युनिकोर्न चा साईन आहे...
आणि त्यांनी बघितल तर खरंच वेगळा लूक होता... त्यांनी झपाट्याने त्यांची लोक कामाला लावली... आणि त्या गाडीचा शोध सुरू केला... प्रत्येक टोल ... आणि प्रत्येक फुटे ज ते चेक करत होते... पण ती गाडी संगमी टोल क्रॉस करून दोन वेळा जाताना दिसली पण पुढील टोल कधीच क्रॉस केलेला दिसत नाही... म्हणजे मध्येच कुठे तरी गायब होते असा इन्स्पेक्टर जाधव यांना दाट संशय येतो...
सगळी फौज घेऊन ते छान बिन सुरू करतात...


( सगळे इतके आवडीने वाचतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद... पण  जरा उशीर झाला ... पार्ट पोस्ट करण्यासाठी... त्याबद्दल क्षमस्व...???)

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Sandhya

Housewife

I am nothing