Jan 29, 2022
कथामालिका

विजयी भवं #४.०

Read Later
विजयी भवं #४.०


" बाबा तो माणिक तर मेलाय पण बाकीचे जिवंत आहेत आणि सगळ्यांना माहीत होत ... तर त्या लोकांनी उगाचच विजय ला त्रास दिला माझ्यामुळे तर... किंवा त्याच्या मरणाला ह्याला जबाबदार ठरवलं तर... उगाच त्याला त्रास." शर्वरी बाबांना समजावत म्हणाली.

" हो बरोबर आहे..." बाबा पण विचारात पडले. अर्थात तिच्या बोलण्यात तथ्य होत.

विजय बाहेर पडताच भडंग चे लोक त्यावर टप्लेलेच होते. त्यांचं संशय होता की शर्वरी ने बोलवलं तेव्हाच माणिक गेला. त्यासोबत काही साथीदार पण संपले... इक्बाल वर तर संशय होता च पण हो ना हो शर्वरी वर सुद्धा डाऊट होता.

त्यांनी चौघांनी ही विजय वर अटॅक केला.
पण विजय सुद्धा सावध होता त्याने सगळ्यांना चाकमा देऊन तिथून पळ काढला आणि दिसेनासा झाला.

काही वेळाने ते चौघे ही गन च्या निषाण्याने टिपले... आणि संपले.

शहरात हे वेगळच वादळ सुरु झाल होत. एकीकडे मोठे असामी... मेहता... अनमोल .. ह्यासारखे सुप्रसिद्ध लोकांचा खून झाला होता.

तर एकीकडे रंगा भडंग आणि इक्बाल चे गँगचा फडशा पडत होता. सगळ्या शहराला उत्सुकता निर्माण झाली होती. हे सगळ कोण करतंय..

पोलिस स्टेशन मध्ये पुन्हा खबर मिळाली  की प्रसिद्ध व्यावसायिक घाडगे ना धमकीचे फोन येताय...खंडणी साठी... पण ते कर्जबाजारी असल्याने खंडणी साठी इतके पैसे नव्हते म्हणून त्यांनी कमिश्नर साहेबांची भेट घेतली. आणि त्यांची सुरक्षेची जबाबदारी पी एस आय जाधव याना देण्यात आली. त्यांना पोलीस प्रोटेक्शन देण्यात आले.

घडगेंचा फोन टॅप करण्यात आला मोबाईल लोकेशन ट्रेस केलं आणि  मिळालं सुद्धा... आणि फुल फोर्स ने पोलिसांनी वेळ न दवडता त्या ठिकाणी हल्ला केला. अर्थात यासाठी कुणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांना मदत केली. आणि भडंग... आणि त्याची मानस पकडली गेली.
त्यांना कुणीतरी कॉल केला आणि सांगितल की सानप सारखी चूक करू नको. एन्काऊंटर करून टाक... त्यांनी कुठलाही विचार न करता पी एस आय जाधव यांनी सानप यांनी केलेली चूक पुन्हा केली नाही.

त्यांनी सगळ्यांचं एन्काऊंटर केला. मरते वेळी भडंग ला काहीतरी सांगायचं होत पण जाधवांना वाटलं तो याचना करतोय त्यांनी त्याच्या खोपडीत गोळी घालून शांत केला.

पी एस आय जाधव याचं पोलीस स्टाफ मध्ये खूप कौतुक केलं गेलं. त्यांना प्रमोशन मिळाले. आणि इन्स्पेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती त्याच चौकीत झाली. आता शहरातलं सगळेच चांगले वाईट प्रस्थ त्यांना घाबरत होते..

पण शहराला लागलेली दुःख कळा अजून संपली नव्हती. दुसऱ्याच दिवशी सकाळी घडगेंचं प्रेत सापडलं. जिथे मेहता आणि अनमोल कुमार च सापडलेलं. इतकं पोलीस प्रोटेक्शन असताना खून कसा झाला. विचार करून डोकं गणल होत त्यांचं..

हा महिन्यातला तिसरा बळी होता. इन्स्पेक्टर जाधव संभ्रमात पडले. सगळे क्लू चाळून ही काहीच मिळत नव्हत. म्हणजे रंगा भडंग फक्त मोहरा होता शेवटी त्यांना आठवल की मरते वेळी रंगा ला काहीतरी सांगायचं होत. त्यांना स्वतःचाच राग आला की त्यांनी त्याच आवेगात ऐकुन का घेतल नाही.

शहरात प्रत्येक धनाढ्य व्यक्तीला हे धमकीचे... खंडणी साठी फोन येत होते. पण ते गुपचूप असतील तितके पैसे खंडणी देऊन आपला जीव वाचवत होते. अनमोल... घाडगे... यांनी पोलिसांची मदत घेतली त्यामुळे ते जिवानिशी गेले. सगळेच घाबरले होते.. ते मागेल ती किंमत देऊन आपला जीव वाचवू पाहत होते.

दिवसेंदिवस शहरातील गुंडांची संख्या कमी होत होती पण तरीही जी खुनाची साखळी होती. ती मात्र अजून ही सुरू होती.

एक दिवस सहजच रस्त्याने जाताना विजय च्या बाजूने एक कार जाता जाता थांबली. विजय ने ही  बाइक स्लो केली. आणि एक अगदी शुभ्र चकचकीत कपड्यात ला तरुण तडफदार व्यक्ती समोर येऊन उभा राहिला.
विजय ने लगेच बाईक थांबवली. आणि बाईक वरून खाली उतरला.

" अरे आकाश..." विजय.
दोघं नी ही गळाभेट घेतली.

" विजू...कधी आलास इकडे... " आकाश

" इकडे कामासाठी आलो होतो पण अजून नोकरीच काही झालं नाही... मग बघतोय... सर्च करतोय. " विजय

" अरे इथे राहतोस... आणि एकदा ही तुला माझी आठवण झाली नाही." आकाश.

" अरे अस काही नाही... काम शोधण्याच्या भानगडीत लक्षातच आलं नाही."

" आता लगेच तू माझ्या सोबत चल..."

" बर बाबा... येतो..."

" कुठ राहतोस सध्या..."

" इथेच रूम घेतलीय... अर्धा किलो मिटर अंतरावर आहे."

" रूम च लोकेशन सेंड कर आणि गाडीत बस...लगेच..." 

त्याने लोकेशन सेंड केल... आणि आकाश ने गाडीत बसण्यासाठी पुढचा दरवाजा उघडला.
ड्रायव्हर ला आकाश ने इशारा केला.
तो लगेच गाडीतून उतरून त्याने विजय चा बाईक चा ताबा घेतला.
आकाश ने ड्रायव्हिंग सीट ला बसला.
आणि गप्पा मारत दोघे ही त्याच्या बंगल्यावर पोहोचले.

ड्रायव्हर ने ही विजय च सगळ समान गेस्ट हाऊस मध्ये शिफ्ट केलं. विजय आता त्याच्या मित्राकडे राहु लागला.त्याला अगदी घरगुती ट्रीटमेंट मिळू लागली. एका कंपनीत चांगल्या पगारची नोकरी सुद्धा आकाश ने मिळवून दिली.

खरतर त्याचा मित्र आकाश... शाळेपासून चा मित्र... एक खूप चांगला ... मन मिळाऊ... शेती करणारा सोशल वर्कर होता... त्याच्या वडवडीलांच लोकांत खूप नाव होत... हीच ओळख वापरून त्याने राजकारणात प्रवेश केला पण त्याचा प्रवेश काही सक्सेस फुल झाला नव्हता... पण घरी शेती पोती वगेरे... चार लोकांत चांगल नाव होत.

रोजच सकाळचा नाश्ता... रात्रीच जेवण सोबतच होई...
आकाश चा संपूर्ण दिवस पूर्ण बिझी होता. त्याच फुलांचा एक्सपोर्ट चा बिझिनेस होता. भाजीपाला... फळे एक्सपोर्ट मध्ये शहरात त्याचा चांगला हातखंडा होता.

सगळच अगदी आलबेल सुरू होत.
पुन्हा एकदा एक प्रसिद्ध व्यावसायिक चा खून होऊ नये म्हणून सायबर सेक्युरीटी टईट केली. जे जे प्रसिध्द व्यावसायिक आहेत. त्यांच्यावर नजर ठेवण्यात आली.

आणि ती वेळ लवकरच आली... पुन्हा एका नामवंत व्यापाऱ्यास धमकी मिळाली. मिस्टर निर्मल हिर्याचे व्यापारी होते. आणि तो ही आपला जीव वाचवण्यासाठी मागेल ती किंमत द्यायला तयार झाला. आणि शेवटी जिथे खंडणी द्यायची होती त्या लोकेशन ला जायला निघाला.

जाधवांचा प्लॅनिंग ह्यावेळी थोड वेगळं होत. त्यांना एक गुरू भेटला होता. खर तर त्यांनी कधी त्याला बघितलं नव्हत पण एकदम दशिंग असणार खात्री होती. त्याच्या सांगण्यावरून जाधवांनी जागोजागी आपली माणस पेरून ठेवले होते. सगळे नेटवर्क मध्ये असल्याने मी. निर्मल हे कोणत्या लोकेशन वरून जात आहेत. त्याची इत्यंभूत खबर त्यांना मिळत होती..

आणि ते काही अंतर राखून मिस्टर निर्मल चा पाठलाग करू लागले आणि त्याची भणक ना मिस्टर निर्मल ला होती ना खंडणी वसूल करणाऱ्याला...

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Sandhya

Housewife

I am nothing