Jan 26, 2022
कथामालिका

विजयी भवं #३.०

Read Later
विजयी भवं #३.०
विजयी भव... #३.०

विजय सहज रस्त्याने जात असताना त्याला शर्वरी दिसली. खूपच खुश होती ती... तो दुसऱ्या रस्त्याने जाऊन एकदम तिच्यासमोर येऊन चालू लागला. अस दाखवत जस काही त्याच लक्षच नाही. तिने त्याला पाठमोरा असताना ही बरोबर ओळखलं.
ती घाईने चालू लागली आणि आवाज दिला.
" विजय... विजय.. थांब.."

त्याने मागे वळून पाहिलं आणि तिथेच थांबला.
" ओह्... हाय..तुम्ही... इकडे..?" विजय ने विचारले.

" किती आवाज दिले... " शर्वरी उत्तरली.
" सॉरी ते ऐकायला नाही आल ना." विजय म्हणाला.

" आणि तुम्ही काय... आपण फ्रेंड आहोत तर फक्त शर्वरी म्हणलं तरी चालेल." शर्वरी हसतच म्हणाली.

ते दोघे ही सोबत चालत निघाले.दोघं ही शांतच होते.
" शर्वरी..." विजय ने आवाज दिला.

" हां...काय.." शर्वरी ने साद दिली.

" तुम्ही म्हणालात ना आता शर्वरी म्हणलं तरी चालेल..." विजय मस्करी करत म्हणाला.

" ओह ते... " आणि ती हसू लागली.

" काय विशेष... फार मोकळं हसताना दिसताय."  विजय ने विचारलं.

" माझं टेंशन गेलं एकदाच. " शर्वरी मोकळा श्वास घेत म्हणाली.

" कसल..." विजय ने विचारले.

" तुम्हाला माहीत नाही... "शर्वरी ने प्रतिप्रश्न केला.

" काय.." विजय न समजून विचारलं.

" तो गुंड.... माणिक... माझ्या मागे होता... तो संपला एकदाचा..." शर्वरी उत्तरली.

" ओह माय गॉड... तो जिवानिशी गेला आणि तुम्ही हसताय." विजय ने अवाक होऊन विचारलं.

" मग .. मी काय दुखी राहण्याचा ठेका घेतला आहे का..." शर्वरी बिनधास्त पाने म्हणाली.

" तुम्हीच नाही ना संपवला त्याला." विजय ने विचारलं.

" ओ.. काही काय... त्याच्या कर्माने गेला तो... मी फक्त भेटायला बोलवलं होत तुम्ही सांगितल म्हणून..." शर्वरी जरा खड्या आवाजात म्हणाली.

" पण मी कधी भेटायला आलेलो तुम्हाला आणि तो खरंच तुम्हाला भेटायला आलेला का... आणि त्यादिवशी च गेला तो...? बिचारा" विजय उत्तरला.

" हो... आला होता... खूप वेळ तुमची वाट बघितली मी पण तुम्ही काही आला नाहीत... मग मी निघून गेली... आणि दुसऱ्या दिवशी न्यूज चॅनल वर तेच तेच दाखवत होते..."शर्वरीने सांगितलं.

" काय.. ? " विजय आश्चर्यचकित झाला.

" तुम्हाला माहीत नाही... सगळ्या शहराला माहिती आहे...." शर्वरी ने विचारलं.

" काय सांगताय... नाही म्हणजे तुम्ही भेटलेला त्यादिवशी पहाटेच घरून फोन आला... आईने गावी बोलवलं म्हणून तिकडे गेलेलो... तिकडे साधं मोबाईल ला रेंज नसते... न्यूज काय खाक बघणार... "विजय उत्तरला.

" अच्छा.." शर्वरी शंकेने बघत विचारलं.

" पण तुमचं टेंशन गेलं ना... " विजय नेच तिला प्रतिप्रश्न केला.

" हो... अगदी कसं मोकळं मोकळं वाटतंय..." शर्वरी म्हणाली.

" नक्की तुम्ही नाही मारलं ना...?" विजय मुद्दामच चिडवत बोलला.

" ओ मिस्टर... ते माझे संस्कार नाहीत... दोन वर्षांपासून टॉर्चेर सहन केलं पण असा विचार पण आला नाही मनात माझ्या... तस बघता... मला तुमच्यावरच संशय येतोय..." शर्वरी जरा रागातच म्हणाली.

" काही काय... मी इथे होतो का तरी... आणि तुमचं  आणि माझा काय संबंध...? आज दुसऱ्यांदा रस्त्यात भेटतोय..." विजय उत्तरला.

" हे ही बरोबर आहे... चला माझं घर आल..." शर्वरी म्हणाली.

" आज बाबा वाट बघत नाहीये बाहेर तुमचे..."विजय ने तिच्या घराच्या दिशेने बघत सांगितले.

" त्यांना आता कसलीच भीती नाहीय... आधी पण नव्हती... पण त्यांना माझी आणि भावाची काळजी लागलेली असायची..." शर्वरी उत्तरली.

" ह्म््म... बापाचं काळीज असच असत... मुलींना मोकळीक मनापासून द्यायची असते पण काळजी पण लागलेली असते...घ्या आल तुमचं घर..." विजय म्हणाला.

तेव्हड्यात ती घराच्या गेट कडे वळते...
" तुम्हाला वेळ असेल तर चला... चहा घेऊन जा... तुम्ही एकटेच राहत असाल ना..." शर्वरी म्हणाली.

" नाही नको... तुम्ही एकट्या घरी... आणि मी ...नको नको... तुमचे घरचे असतील तेव्हा येईन."  विजय संकोचून म्हणाला.

" माझे बाबा घरीच असतात... रिटायर आहेत... आणि भाऊ तर पाच वाजताच येतो शाळेतून... दोघे ही घरीच असतील. " शर्वरी उत्तरली.

" बर..." विजय तिच्या सोबत घराकडे वळला.

दरवाजा उघडाच असतो... ती आत जाते... तिचे बाबा समोरच सोफ्यावर बसून टीव्ही पाहत होते.

" आलीस बाळा... तू फ्रेश हो.. तोपर्यंत चहा आणतो तुझ्यासाठी..." बाबांनी अगदी प्रेमाने विचारले.

" बाबा... हे विजय... नोकरीसाठी नवीनच शहरात आलेत... " ती विजय ची ओळख करून देत म्हणाली.

" ओह... अच्छा... या... बसा..." बाबा.
तो सोफ्यावर बसतो... इकडे तिकडे न्याहाळत होता.

तिचे बाबा दोघांसाठी चहा घेऊन आले...
एक कप विजय ला आणि एक स्वतःला घेतला.

" बर वाटल तुम्हाला बघून... नाहीतर गेल्या दोन तीन वर्षात माझ्या मुलीला ना कुणी मैत्रीण ना कुणी मित्र मिळाले होत..." बाबा म्हणाले.

" का... " विजय ने आश्चर्याने विचारले.

" त्या गुंडा ची भीतीमुळे तिच्याशी कुणीच मैत्री करत नव्हत... आणि जे अगदी लहानपणा पासूनच मित्र मैत्रिणी... ते सुद्धा तुटले..." बाबा उत्तरले.

" कसे लोक असतात.." विजय म्हणाला.

" त्यांची काही चूक नाही... जो तो जीवाला घाबरतो... आणि स्वतःचा जीव जपत असतो... पण तुम्ही बोलताना बघितल तरी स्वतःहून बोलायला गेलात... आणि घर पर्यंत सोडले... " बाबा विजयची तारीफ करत म्हणाले.

" अच्छा... त्यांनी सांगितलं का तुम्हाला...?" विजय ने विचारलं.

"हो.. त्यादिवशी तिने सांगितलेलं तुम्ही भेटलात तेव्हा... पहिल्यांदा ती नॉर्मल वाटत होती मग मीच स्वतःहून विचारल... तर सांगितल सगळं तिने... " बाबा उत्तरले.

" काय सांगितलं..." तो चाचरत च बोलला.

" हेच की तिला तुमच्या सोबत खूप सेफ वाटत होत..." बाबा उत्तरले.

तितक्यात शर्वरी बाहेर आली.
" काही काय बाबा... सगळ्यांना डिटेल सांगायचं का लगेच..." शर्वरी त्यांना डोळे मोठे करत म्हणाली.

" मी चहा आणतो बाळा तुझ्यासाठी ... " आणि ते तिथून सटकले.

" बाबांचं काही ऐकु नका... ते मला रोजच घडामोडी सांगायची सवय आहे... ते एकमेव बेस्ट फ्रेंड आहेत ना माझे... मग त्यांना फक्त तुम्ही भेटलेले ते सांगितल... आणि त्यांनी ही बघितल होत बाहेर उभे असताना..." शर्वरी स्पष्टीकरण देत म्हणाली.

" अच्छा... त्यांनी सांगितल म्हणून तुम्ही चहासाठी बोलवलं तर मला..." विजय विचारले.

" हो... म्हणजे तस काही नाही... मी विचार केला... तुम्ही घरी जाणार... स्वतःसाठी चहा बनवणार... मग पिणार... मग इकडेच घ्या... या उद्देशाने म्हणाली..." शर्वरी म्हणाली.

" समजलं... आय मीन.. समजलं उद्देश..." विजय गालातल्या गालात हसत म्हणाला.
तिच्या बाबांनी तिला चहा दिला.

" चला काका... निघतो मी... भेटू या पुन्हा..." विजय निरोप घेत म्हणाला.

" अहो ... अस कस... पाहुणे आहात... जेवल्याशिवय कसं जाऊन देईन तुम्हाला..." बाबा आग्रहाने म्हणाले.

" बाबा... जाऊ द्यात ना... उशीर होईल त्यांना..." शर्वरी बाबांना द टवत म्हणाली.

" मी निघतो काका... उगाच तुम्हाला सासुरवास..." विजय तिच्याकडे एक कटाक्ष टाकला.

" हो.. पण पुढच्यावेळी नक्की या... मस्त बेत करतो जेवणाचा..." बाबानि निमंत्रण दिले.

" हो नक्की...चला बाय..." विजय म्हणाला.

तो निघून आला... आणि काही अंतर गेल्यावर शर्वरी ने मोर्चा तिच्या बाबांकडे वळवला.

" बाबा तो माणिक तर मेलाय पण बाकीचे जिवंत आहेत आणि सगळ्यांना माहीत होत ... तर त्या लोकांनी उगाचच विजय ला त्रास दिला माझ्यामुळे तर... किंवा त्याच्या मरणाला ह्याला जबाबदार ठरवलं तर... उगाच त्याला त्रास." शर्वरी बाबांना समजावत म्हणाली.

" हो बरोबर आहे..." बाबा पण विचारात पडले. अर्थात तिच्या बोलण्यात तथ्य होत.


क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Sandhya

Housewife

I am nothing