Jan 29, 2022
कथामालिका

विजयी भवं #१.०

Read Later
विजयी भवं #१.०
विजयी भव # १.०

" जय हिंद सर..." कडक सल्युट करत पी एस आय जाधव म्हणाले.

" जाधव... धाडीवाल ची चार्ज शीट सादर केली का...?" इन्स्पेक्टर सानप ने विचारलं.

" हो सर... " तितक्यात फोन वाजला.

इन्स्पेक्टर सानप नी रिसिव्ह केला... " ओके " बोलून त्यांनी फोन ठेवला. ते थोडे गंभीर झाले.

ते हावभाव ओळखून जाधव ने विचारल.        "अनीथिंग सीरियस सर...?"

" हो... कंट्रोल रूम मधून कॉल होता की कराड हायवे च्या पुलाखाली एक डेड बॉडी सापडली आहे... चला जाधव... कॉन्स्टेबल शिंदे... मेढे आणि पवार मॅडम ना सोबत घ्या." इन्स्पेक्टर सानप खुर्चीतून उठले आणि आपली पी कॅप डोक्यावर ठेवली.

" येस सर..." जाधव टाचा उंचावून केबिन च्या बाहेर पडले..
आणि काही वेळातच ते क्राईम स्पॉट ला पोहोचले.

तिथे तिघे चौघे जण कुजबुज करत उभे होते.
"चला बाजूला व्हा... साहेब आलेत." कॉन्स्टेबल शिंदे घाईने पुढे येत त्यांना बाजूला उभ राहायला सांगितलं.

" कुणी कॉल केला होता... ?" इन्स्पेक्टर सानप म्हणाले.

" साहेब मी केलता... मी रांजणे महादेव... सकाळी बारे द्यायला जायचं होतं गव्हाला." महादेव उत्तरला.

" रोज ह्याच रस्त्याने जाता का...?" इन्स्पेक्टर सानपनी विचारलं.

" नाही साहेब... तस मी वरतील्या रोड नी गाडीने जातो पण आज गाडी पंचर झालती." महादेव उत्तरला.

"उशीर झालता म्हणून कच्या रस्त्यानं चाललो होतो."पुढे तोच म्हणाला.

" कुणी ह्या बॅग ला हात लावला होता का..." इन्स्पेक्टर सानप यांनी विचारलं.

" नाही साहेब..." ते चौघे ही बोलले.

पॉली बॅग मध्ये गुंडाळलेले प्रेत शिंदे आणि पवार आणि जाधव ने ग्लोज घालून बॅग छोट्या सूरी ने उभी चिरली.

" सर... हे तर फेमस बिझिनेसमेन मेहता आहेत." पी एस आय जाधव.

" ओके... आस पास काही मिळतेय का बघा... बॉडी ताब्यात घ्या... आणि ही बॅग तशीच फॉरेन्सिक ला पाठवा... आणि फिंगर प्रिंट घ्या आसपास चे आणि त्यांच्या फॅमिली ला कळवा... पोलिस स्टेशन ला चौकशी साठी बोलवून घ्या." इन्स्पेक्टर सानप यांनी कारवाईस सुरुवात केली.

" येस सर..." पी एस आय जाधव म्हणाले.

ते आसपास चे सगळा भाग चेक केला. कुठे काहीच मिळालं नाही.

" मॅडम ह्या चौघांचे ही डिटेल्स घ्या..." पी एस आय जाधव पवार मॅडम ना उद्देशून बोलले.

" आणि जेव्हा बोलवू तेव्हा पोलीस स्टेशन मध्ये हजर राहायचं..  शहराबाहेर जाण्याच्या प्रयत्न सुद्धा करायचं नाही."
सानपांनी कॉल करून कमिश्नर साहेबांना कळवल.

मीडिया मध्ये खळबळ माजली होती...
मेहता मोठे प्रस्थ असल्याने वरून खूप प्रेशर होत केस सोल्व करण्यासाठी पोलिसांनी सर्वतोपरी चौकशी केली.त्यांच्या फॅमिली मध्ये फक्त आई... आणि त्यांचा एकुलता एक मुलगा होता... कॉल रेकॉर्ड मागवले. फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये धडधडीत खुनाचा प्रकार घडला आहे दिसत होत... पण मर्डर वेपेन... आणि कुणाच्याही फिंगेर प्रिंट नव्हता त्यावर...

" सर कॉल रेकॉर्ड मिळालेत आणि हे शेवटचे दोन नंबर फक्त मागील तीन दिवसातच कॉल केला होता पण ते आता बंद आहेत आणि ते धिल्ले झोपडपट्टी मधल्या एका म्हातारीच्या नावावर आहे तीच मागे पुढे कुणीही नाही." पी एस आय जाधव कॉल रेकॉर्ड सानपांच्या समोर ठेवत म्हणाले.

" जाधव..  हाय प्रोफाईल केस आहे... कमिश्नर साहेबांचे फोन वर फोन चालू आहेत... लवकर काहीतरी करावं लागेल. " इन्स्पेक्टर सानप म्हणाले.

" सर घरच्यांची चौकशी केली... ते म्हणाले की तीन चार दिवसात खूप अपसेट होते मेहता..." पी एस आय जाधव म्हणाले.

" जाधव काहीच क्लू नाही आहे... आणि आता हे दोन नंबरच आपल्याला काही तरी क्लू देऊ शकतील... चौकशी करा शेवटचं लोकेशन कूठल होत ह्या नंबरच." इन्स्पेक्टर सानप यांनी विचारलं.

" सर मेहतांची बॉडी जिथे डंप केली ते एकच लोकेशन आहे सर... बाकी कुठे ही ते सिम अॅक्टिवेट झालं नाही." पी एस आय जाधव म्हणाले.

" जाधव मोठा पेच आहे हा... तीन दिवस झालेत आणि अजून केस पुढे सरकत नाहीये." इन्स्पेक्टर सानप म्हणाले.

तितक्यात त्यांचा मोबाईल खणाणला.
" जय हिंद सर..."
" येस सर तपास सुरू आहे..."
" बट..."
" मी... "
"नाही.."
" नो.."
"हो.."
" हो सर..."
" येस सर..."
" येस सर..."
" जय हिंद सर.." थोड्या नरम आवाजात सानप म्हणाले.

" कमिश्नर साहेब..."पी एस आय जाधवने प्रश्नार्थी विचारलं.

" हो... " पुन्हा हताश होऊन खाली बसले. "इथ काय रिकामे बसलोय का... रात्री २-३ वाजता घरी जाऊन ... सकाळी पुन्हा सात पासून परेड सुरू." इंस्पेक्टर सानप उत्तरले.

" सर काम डाऊन... प्लीज टेक रेस्ट... आय विल हॅण्डल इट." पी एस आय जाधव म्हणाले.

" नाही जाधव... नॉर्मली कुठल्या केस साठी कमिश्नर साहेब इतके फैलावर घेत नाहीत पण ह्यावेळी ते सुद्धा खूप टेंशन मधे आहे." इन्स्पेक्टर सानप म्हणाले.

तितक्यात एक कॉल आला. सानपांनी कॉल घेतला. आणि बोलून ठेवला.

" जाधव... मी एका ठिकाणी जातोय... लक्ष ठेवा खबऱ्याच कॉल वेगेरे आला तर. " इन्स्पेक्टर सानप म्हणाले.

"ओके सर... पण काही सीरियस...?" पी एस आय जाधव ने विचारलं.

" नाही... गेल्यावर कळेल काय मॅटर आहे ते..." इन्स्पेक्टर सानप सांगितलं.

" ओके सर तोपर्यंत मी पुन्हा एकदा मेहता च्या घरी आणि ऑफिस मध्ये चौकशी करतो..." पी एस आय जाधव उतरले.

तास दोन तासात सानप पुन्हा पोलीस स्टेशन मध्ये आले. त्यांनी त्यांचा लॅपटॉप ऑन केला... काही आकडे त्यांच्या सॉफ्टवेअर मध्ये एंटर केले आणि लोकेशन बघितल... हॉटेल व्हिनस... त्यांनी एक खबरी ला कॉल केला... आणि काही वेळ रिप्लाय चा वेट केला.
तितक्यात त्यांचा खबरी चा कॉल आला.

" ओके... "
"पक्की ना पण खबर...?"
" जर खबर चुकीची असली तर तू आहे ना मी आहे."

ते केबिन मधून बाहेर आले.

" चला जाधव... हॉटेल व्हिनस. " इन्स्पेक्टर सानप अगदी स्फूर्तीने म्हणाले

" सर कुणाला ट्रॅप करतोय आपण.." आय पी एस जाधव ने विचारलं.

" रंगा भडंग..." इन्स्पेक्टर सानप उतरले.

" सर पण आपल्याकडे काहीही पुरावा नाही आहे त्याच्या विरुद्ध."  आय पी एस जाधव चिंतेत म्हणाले.

" असू देत... पण त्या आधी शिंदे ना घेऊन  माझ्यासोबत चल." इन्स्पेक्टर सानप.
इन्स्पेक्टर सानप आवेगाने ड्राईव्ह करत निघाले.

" सर पण कुठे जातोय आपण."
ते काहीही न बोलता ड्राईव्ह करत होते.

एक मोठ्या हॉटेल समोर त्यांची गाडी थांबली.
" सर ... नो सर.. आपल्याकडे काहीही पुरावा नाहीये सध्या..." पी एस आय जाधव त्यांना समजावत म्हणाले.

" बरोबर विचार केलात जाधव अगदी मी हेच करणार आहे... कारण मला एकशे एक टक्के खात्री आहे की हे काम ह्यानेच केलंय."

" सर पण..."

" पण काय जाधव.."

"आपण परमिशन पण नाही घेतली."

"कमीत कमी ह्या केस च तपास सुरू असेपर्यंत अटलीस्ट हा तरी बंद असेल..." इन्स्पेक्टर सानप उतरले.

" तरीही सर एकदा विचार करावा..." आय पी एस जाधव काळजीने म्हणाले.

" माझा विचार झालंय..." इंस्पेक्टर सानप उत्तरले.

ते आपला पोलिसी खाक्या दाखवत आत गेले आणि रिसेप्शन वरच विचारल. त्यांनी रूम नंबर सांगितला. ते घाईने दोन्ही बाजूंनी पोझिशन घेत जाधव ने जोरात तीन चार वेळा दरवाजा धडकला आणि दरवाजा उघडला.
बेडवर एक तरुण मुलगी आणि साधारण पन्नाशी चा माणूस होता.

पोलिसांना बघून ती मुलगी तिचे कपडे सावरत आत गेली.
" एय सानप... भरले का दिवस तुझे...?" रंगा उद्धट पणे म्हणाला.

" माझे नाही तुझे भरल .. निर्दोष लोकांना मारून स्वतः मजा मारतो. " आणि खाडकन हातातली गन त्याच्या तोंडावर जबरदस्त मारली की तोंडातून रक्त वाहत होत.

तो रागाने लालबुंद झाला होता.
" उलटे दिवस मोज सानप..." आणि कुत्सित पणे हसत रांगा बोलला.

" शिंदे ताब्यात घ्या ह्याला उद्या रविवार.. बेल डायरेक्ट परवा... दोन दिवस चांगला पाहुणचार करू."इन्स्पेक्टर सानप यांनी ऑर्डर दिली.

शिंदे नी हतकड्या घालून त्याला घेऊन निघाले.
गाडीत बसवून पोलीस स्टेशन ला आणले.
वाऱ्यासारखी बातमी पसरली की रंगराव ला अरेस्ट केलं पण त्याच्या लोकांनी धुमाकूळ मात्र घातला नाही.

पण ही वादळापूर्वीची शांतता होती.

रविवारी सायंकाळी सानप त्यांच्या पत्नी सोबत दवाखान्यातून परत येताना त्यांच्यावर काही गुंडांनी हल्ला केला. भरपूर प्रतिकार केला पण सोबत गर्भवती पत्नी असल्याने त्यांना माघार घ्यावी लागली आणि हाच फायदा घेऊन गुंडांनी दोघांना हि संपवल.


क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Sandhya

Housewife

I am nothing