Login

विहीरीचे रहस्य (अंतिम भाग)

कथामालिका


भाग७

अष्टपैलू महासंग्राम स्पर्धा
रहस्य कथा

"दामोदर पंतांनी कांताबाईना खूप समजावले. पण, पैशांच्या लालचीने त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधली होती. त्यामुळे त्या ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हत्या.
कांताबाई सावरा स्वतः ला. एवढा मोह चांगला नव्हे. आधीच आपण कुटुंबाला गमावून बसलो आहोत. आता तू असं करून आम्हांला गमावून बसशील."

"नाही, नाही. आता मी या घराची जशी एकटी मालकीन झाली आहे. तशीच त्या संपत्तीची देखील.
तिला संपत्ती समोर सगळ्यांचा विसर पडला. त्यांच्या मुलाने सुध्दा समजावून सांगितले.

"आई, नको ना असे करू. आपल्याला नको ते पैसे. आम्हांला फक्त तू हवी आहेस. फक्त तू."

पण, कांताबाई मात्र दोन माणसांना घेऊन विहीरीत गेल्या. अगदी व्यवस्थितपणे त्या विहीरीत उतरल्या. त्यांनी किल्ली घेतली. साखळी बाजुला केल्याबरोबर आतील पाणी आजुबाजुला गेले. मग त्यांना एक साखळी दिसली. "

"एका कपारीतून किल्ली सापडली आणि त्यांनी संदुक उघडली. संदुकीत असलेले सोने बघताच तिघांचेही डोळे दिपले. कांताबाई हातात सोनं घेणारच की एका भल्या मोठ्या सापाने फणा वर काढला. काही कळायच्या आतच त्यांच्या हाताला सापाने चावा घेतला. सोबत असलेले दोन्ही माणसे खूप घाबरले. त्यांनी कांताबाईना कसेबसे वर आणले. वैद्यांना बोलावले. पण, काहीही फायदा झाला नाही. कांताबाईचा जीव निघून गेला होता.

"दामोदर पंत आणि त्यांचा मुलगा उघड्यावर पडला. त्यांचा संसार उद्धवस्त झाला. सगळं गाव शोकसागरात बुडाले. त्या वाड्याची आधीच रया गेली होती. आता तर दोघांनाही भकास वाटू लागले. हळुहळु तिथे लोकांचा वावर कमी झाला."

"दामोदरपंताचे सगळ्या कामातून लक्ष उडाले. त्यांचा मुलगा तर ठार वेडा झाला आणि मी आईला शोधतो असे म्हणत त्या विहीरीत उतरला. पण, अंधारी वाट बघताच तो घाबरला. आधीच मानसिक संतुलन बिघडले असल्याने त्याचाही जीव गेला."

"आतातर दामोदरपंत खचले आणि त्यांनी स्वतः ची शेती ,पैसा दाग दागिने, कपडे, दुफत्या गायी- म्हशी
गावातील लोकांना दान देऊन टाकायचा विचार केला. पण, लोकांनी समजावले तेव्हा त्यांनी हा विचार बदलला. काही लोकांनी मित्र मंडळींनी त्यांना लग्न करण्याचा सल्ला दिला. हो नाही करता ते कसेबसे लग्नाला तयार झाले. त्या मुलीच्या येण्यामुळे परत वाड्यात चिवचिवाट झाला."

"मग परत नवीन पिढी निर्माण झाली. माझ्या वडीलांचा जन्म झाला आणि मग आमचा. आम्ही सावत्र जरी असलो तरीही आम्ही या वाड्याशी एकरूप झालोत. पण, काही काळानंतर दामोदरपंत यांचा प्रवास संपला आणि जाता जाता त्यांनी बाबांकडून एक वचन घेतले. की , या वाड्यातल्या विहीरीत कोणीही कधीही उतरणार नाही.
कारण, तिकडे कोणीतरी असल्याचा भास त्यांना सतत होत होता. त्यामुळे बाबांनी आम्हांला लहानपणीच शहरात शिक्षण घेण्यासाठी पाठविले. कालांतराने आईसुद्धा गेली. हळुहळु गावाशी आमचा संबंध संपला तेही कायमचाच."

"त्यामुळे जवळपास हा वाडा गेली चाळीस पन्नास वर्षे झाली बंद आहे. कारण, त्या आजीचा आत्मा अजुनही वाड्यात आहे. कारण, ती संपत्ती अजूनही तिथेच आहे."


"बापरे! "

"किती भयानक आहे सर्व. पण, काकू तुम्ही ती संपत्ती काढत का नाही."सार्थक

विराजचे बाबा बोलले, "अरे मुलांनो जे आपलं आहे, आपल्या कष्टाचं आहे. त्यावरच आपला अधिकार असतो. उगाचच मेहनत न करता पैशांच्या लालचीने ती आपली म्हणणे चुकीचे आहे आणि हे तुम्ही कायम लक्षात ठेवा."

"म्हणजे या वाड्यात कांताबाईंचा अजुनही वावर आहे. त्यांना अजुनही मुक्ती मिळालेली नाही." विराज

"हो, कारण मोहापायी त्यांनी अनेक जणांचे जीव घेतले. नाही म्हटलं तरी त्यांना पश्चात्ताप होतंच असेल ना. बरं चला आता बराच वेळ झाला आहे. आपल्याला निघायला हवे आता. इथे अजून थांबायला नको."विराजचे बाबा बोलले.


सगळेजण वाड्याच्या बाहेर पडत असतांना परत वाऱ्याचा एक झोत आला आणि वाड्याची दारे आपोआप बंद होत गेल्याचा आवाज येऊ लागला. वाड्याचे शेवटचे दार परत बंद करण्यात आले. ते कायमचेच.