विहीरीचे रहस्य (भाग/६)

कथामालिका


भाग ६

अष्टपैलू महासंग्राम स्पर्धा
रहस्य कथा

आई, सांग ना!

"हो काकू सांगा ना ! आम्हांलाही उत्सुकता आहे."प्रेम

तर ऐका...

माझी आई सांगायची की ,

"हे इथे जे चित्र आहे ना ते माझ्या वडीलांच्या आजीचे चित्र आहे. त्याकाळी ते अतिशय श्रीमंत, सधन कुटुंबातील. आमच्या घरातील प्रत्येक स्त्री दागदागिन्यांनी मढलेली. दिमतीला नोकर चाकर, दाराशी घोडा गाडी. पैसा असूनही कसलाही गर्व नाही. दामोदरराव एकमेव दमदार व्यक्ती महत्व. लोकांच्या सुखदुःखात आजोबा समरस होऊन जातं. दुष्काळ असो किंवा सुकाळ , लग्नकार्य असो सुख दुःख आजोबा मुक्त हस्ताने पैशाची उधळण करीत असायचे. त्यांच्या दाराशी आलेला पाहुणा असो किंवा याचक कधीच रिकाम्या हाताने परतत नसे. पण, त्यांची पत्नी कांताबाई हिला हे सगळं सहन होत नसे. त्यांचा खूप जळफळाट व्हायचा."

"दामोदर रावांचे दोन भाऊ आणि त्यांचा परिवार सगळे एकत्र नांदत होते. एक विधवा बहीण आणि तिचा मुलगा ती सुद्धा यांच्या सोबतच रहात. पण, दामोदर रावांची पत्नी कांताबाईना काहीच सहन होत नव्हते. त्यांच्या तोंडाचा पट्टा सतत सुरू रहायचा. त्यामुळे त्यांच्या जावा आणि पोरं सगळे दचकून राहत होते. त्यांना स्वतः या संपत्तीवर राज्य करायचे होते. कारण, त्यांना माहिती होते की तळघरातील शेवटच्या विहीरीत खूप मोठे सोनं आहे. पण, त्यावर एक भला मोठा नाग त्याचं रक्षण करीत बसला आहे. म्हणून एका मांत्रिकाच्या सांगण्यावरून त्यांनी ती संपत्ती मिळवण्यासाठी सात बळी देण्याची तयारी सुरू केली. त्यामुळे ते सोनं , नाणं मिळवण्यासाठी एक एक नवा डाव त्या रचू लागल्या. त्यामुळे त्यांनी घरातील एकेका लोकांना धडा शिकवण्याचे ठरवले. त्यांनी ही संपत्ती बळकावण्यासाठी पुजा तंत्र मंत्र विद्या सुरू केली आणि धार्मीकतेचा आव आणून घरातील प्रत्येकाला वश करून त्यांना मृत्यूचे जवळून दर्शन घडवून लागल्या."

"सुरूवातीला त्यांनी दामोदर रावांच्या लहान भावाला आपले सावज केले. त्यांना एक पुजा करायची असे सांगून एका खोलीत घेऊन जायच्या. त्यांना वश करून हळूहळू तब्येत खराब केली. वैद्याकडून काढे आणायचे निमित्ताने त्या वेगळीच औषध द्यायच्या आणि अखेर त्यानंतर अतिशय खराब तब्येतीचे निमित्त होऊन त्यांनी प्राण सोडले. दोन वर्षांत अशा वाईट घडलेल्या घटनेमुळे घरातील लोक मुले नोकर चाकर घाबरून गेले."

"त्यानंतर त्यांच्या पत्नीने नवऱ्याच्या जाण्याने दुःख, एकटेपणा , असहाय्यता यामुळे खचून जाऊ लागली. नवरा गेल्यानंतरचे जे दुःख ‌होते. दुर्बलता होती. ती सहन न झाल्याने सहा महिन्यांतच स्वतः आत्महत्या केली. साहाजिकच आई बाबांचा मृत्यू मुलांच्या डोळ्यासमोर झाला त्यामुळे त्यांनीही वेडेवाकडे पाऊल उचलले. वर्षभराच्या आतच एकाच कुटुंबातील चारजण हे जग सोडून गेले होते. दामोदरराव खचून गेले. आपला परिवार आपल्या डोळ्यासमोर संपत असुनही काहीच करू‌ शकत नव्हते."

"आता राहिले होते सहाजण. सगळेजण एवढ्या मोठ्या दुःखातून सावरत होतेच की कांताबाईंनी परत नवीन कांड रचायला सुरूवात केली. त्यांच्या वर्षं श्राद्धाच्या दिवशी स्वयंपाकासाठी दुसऱ्या जावेला विहीरीचे पाणी आणायला पाठविले. पाणी शेंदतांना रहाटाची दोरी अचानक उलटी फिरली आणि त्या विहीरीत ओढल्या गेल्या. काही कळायच्या आतच त्या विहीरीत पडल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हा
शोक अनावर झाल्याने त्यांच्या मुलानेही "माझी आई पाण्यात पडली "तिला मी वाचवतो असे सांगून त्यानेही पाण्यात उडी मारली. त्यांच्या दुःखात बुडालेला त्यांचा नवरा अतिशय खचला. बायको आणि मुलगा गेल्याचा धक्का सहन न झाल्याने त्यांचा नवरा स्वतः च्या मुलीला घेऊन घरातून निघून गेले ते कायमचेच. काही दिवसांतच त्यांनीही स्वतः च्या जीवाचे बरेवाईट करून घेतले. अशी दामोदर रावांच्या कानावर वाईट बातमी आली."

"कांताबाईच्या मार्गातील एक एक अडसर आपोआपच दूर होऊ लागले. मात्र वाडा भकास वाटू लागला. दामोदर रावांचे कुंटुब उध्वस्त झाले होते. दामोदरराव सतत खचत चालले होते. पण, कांताबाई मात्र आनंदी होत्या. संपत्तीचा वारस आता त्यांचा मुलगा होता. तरीही त्यांच्या मार्गात विधवा नणंद आणि तिचा मुलगा होता आणि त्यांनी शेवटचा डाव रचला. दोन तीन वर्षांतच एका मागोमाग एक त्यांचे कुटुंब संपले होते. घर सावरायला , दुःखातून बाहेर काढायला भावांचे मजबूत खांदे उरलेच नव्हते.
कांताबाईंचे मात्र फावत चालले होते."

"आता कांताबाईनी नणंदेचा काटा दूर करायचे ठरवले. कमी वयातच विधवा झालेल्या नणंदेला कांताबाईनी एका मोठ्या संकटात अडकवले. एका परपुरुषासोबत संबंध आहे. असे घरात खोटेनाटे पसरवले आणि तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला जगणे नकोसे केले होते. त्यामुळे तिने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. तिने स्वतःच्या पोटच्या मुलाचा आधी जीव घेतला आणि मग तिने स्वतः ला संपवले. दामोदर रावांचे संतुलन बिघडत चालले होते. मृत्यूचे तांडव सुरूच होते."

"घरात आता तिघेच उरले होते. दामोदरराव , कांताबाई आणि त्यांचा मुलगा विवेक. आता त्यांचंच राज्य होते. त्यामुळे त्यांनी तळघराच्या विहीरीत स्वतः जाण्याचा निर्णय घेतला."

दामोदर पंतांनी त्यांना खूप समजावले.

"अगं, हे योग्य नाही. आपल्याजवळ भरपूर संपत्ती आहे. तू त्या भानगडीत पडू नये असे मला वाटते. ते आपले पिढीजात सोनं आहे. ते आपलं असुनही त्यावर आपला अधिकार नाही."

"मला ते काही माहिती नाही. मी ते सोनं मिळवणारच."

पण, कांताबाईनी त्यांचे काही एक ऐकले नाही. त्याकाळी विहीरीत भरपूर पाणी होते. त्यात उतरने एकट्या दुकट्याचे काम नव्हते. त्यामुळे त्यांनी चांगले पोहणारे लोक शोधून आणले.‌

कांताबाईंना खजिना मिळतो की नाही. पाहुया पुढच्या भागात....

©®आश्विनी मिश्रीकोटकर

🎭 Series Post

View all