विहीरीचे रहस्य (भाग/५)

कथामालिका
भाग/५

अष्टपैलू महासंग्राम स्पर्धा
रहस्य कथा

विराजला तेथेच सोडून तिघेही बाहेर पडण्यासाठी धडपडू लागले. तेवढ्यात मागून कोणीतरी आवाज देत असल्याचे. दिसले. आता पाहूया पुढे....

"अरे, थांबा, मला एकट्याला सोडून कुठे चालले तुम्ही?"

विराजला असे मागे येताना बघून तिघेही थरथर कापू लागले. भूत ,भूत करून सैरावैरा पळत सुटले. कोण कुठे धावत आहे काहीच कळत नव्हते.

"अरे, पळू नका. मी खरोखरच विराज आहे. तुमचा मित्र. मला काहीही झालेले नाही."

"सार्थक तू तरी विश्वास ठेव माझ्यावर.आपल्या जीवलग मित्राला असं एकटं सोडून जातं का कोणी?"

आता तर प्रेम ,माधव आणि सार्थक तिघेही जोरात पळू लागले. पळता पळता सार्थक पडला आणि तोपर्यंत विराज त्याच्या जवळ येऊन उभा राहिला.

सार्थक उठ पळ, प्रेम आणि माधव जोरजोरात ओरडू लागले. पण, सार्थक उठूच शकला नाही. उलट विराजला जवळ आलेला बघून त्याची शुद्ध हरपली.

आता विराज प्रेम आणि माधव कडे जाऊ लागला. ते दोघेही घाबरले आणि एकामागून एक दालन ओलांडत मुख्य दाराजवळ पोहोचणार की, कोणीतरी दार उघडले.

तर बाहेरून पोलिस आले होते. ते पाहून माधव आणि प्रेम यांना हायस वाटले. म्हणून ते मागे वळले. तेवढ्यात सार्थक पळत येताना दिसला आणि विराज हळुहळु मागे येत होता.

"ए, थांबा सगळेजण. काय चालले आहे तुमचे? तुम्ही इथे का आले? आणि कशासाठी?"

"सर, आम्हांला वाचवा. प्लीज प्लीज. तो भूत आहे आणि तो इकडेच येत आहे." सार्थक

"ए, गप काही भूत वगैरे नाही. मला हे सांगा तुम्हांला इथे यायला कोणी सांगितले."

सर, ते आम्ही...

"काय ते नीट सांगा."

पोलिसांच्या कडक आवाजाने भानावर आले.

आम्ही विराज सोबत आलो. त्याच्या मामाचे घर आहे हे.

"अरे, पण कोणालाही न सांगता का आले इथे. माहिती आहे ना अनेक वर्षांपासून हे घर बंद आहे म्हणून. इथे चोर दरोडेखोर देखील लपलेले असू शकते ना!"

"साॅरी सर, चुकलो आम्ही. पण, सर विराज.."

"काय झाले विराजला?"

"सर तो तिथे मरून पडला आहे पण, आता तो भूत होउन आमच्या मागे मागे येत आहे.‌ ते बघा त्याच भूत तिथे उभे आहे." सार्थक

पोलिस विराज जवळ येऊ लागले.

"बरं, झाले सर तुम्ही आले ते. मी जिवंत आहे आणि मला काहीही झालेले नाही."

पोलिसांनी त्याला निरखून पाहिले. तर तो एकदम ठीक होता.

"अरे, पोरांनो घाबरू नका. विराजला काहीच झालेले नाही. तो एकदम ठीक आहे."

तेव्हा कुठे प्रेम, माधव आणि सार्थक त्याच्या जवळ आले. त्याला बघीतले हात लावून पाहिला. तेव्हा कुठे जीवात जीव आला.

तेवढ्यात विराज चे आई वडील सुद्धा आले.

"आई,बाबा तुम्ही येथे कसे?"

चौघेही त्यांच्या जवळ आले.

"अरे, तुमचे चौघांचे ही फोन लागत नव्हते. म्हणून आम्ही हाॅटेलवर फोन केला. तर कळले कि तुम्ही रात्री फिरायला गेले ते परत आलेच नाही म्हणून. मग आम्ही इकडे यायला निघालो तोपर्यंत पोलिसांना कळवले. पोलिस लगेच शोधायला निघाले. तेव्हा त्यांना कोणीतरी सांगितले की तुम्ही इथे आला आहात म्हणून."

"आई, आजपर्यंत तू मला इथे का येऊ दिले नाही? खूप छान वाडा आहे"

विराजची बाबा बोलले."आधी येथून बाहेर पडू. मग बोलू."

"धन्यवाद इन्स्पेक्टर साहेब. तुमची आम्हांला खूप मदत झाली."

चला जा पोरांनो , इथे कोणीही थांबू नका आता.

हो इन्स्पेक्टर साहेब. आम्ही निघतोच.

पोलिस निघून गेले.

त्यानंतर सगळेजण जायला निघणारच की विराजने‌ त्यांना थांबवले.

आई ,बाबा मला तुम्हांला काही तरी दाखवायचे आहे चला.\"

"विराज आता परत नको जायला." सार्थक

"आपण जे काही पाहिले ते यांना माहिती नको का?"

"आम्हांला माहिती आहे. त्या सात वहिरींबद्दल. त्यामुळे आता परत तिथे नको जायला."

पण, परत जोराचा वारा सुटला. पालापाचोळा उडू लागला. जणु कोणीतरी सोबत असल्याचे आभास होत होते.

"आई, अचानक काय होतं आहे?" विराज


"ए चला मला भिती वाटत आहे."सार्थक

"घाबरू नको सार्थक. आम्ही आहोत आता काहीही होणार नाही."

"आई तुला जे माहिती आहे ते सांग ना पटकन ."

बाबा: "विराज किती घाई तुला."

"कविता सांग बाई स्टोरी आता. ही पोरं काही ऐकायची नाही."

बसा..

"नको नको आता इथे नको."

"अरे काही नाही होतं रे." विराज

"काकू तुम्ही सांगा स्टोरी. आम्ही नाही घाबरणार आता. " सार्थक

विराजची आई कविता नक्की काय सांगते . पाहुया पुढच्या भागात....

©®अश्विनी मिश्रीकोटकर



🎭 Series Post

View all