विहीरीचे रहस्य (भाग/४)

कथामालिका


भाग४

अष्टपैलू महासंग्राम स्पर्धा

विराज बेशुद्ध पडलेला असतो. पुढे काय झाले. पाहुया....

विराज उठ ना रे! काय झालं तुला? तिघेही जण आवाज देऊ लागले. पण, विराजचा श्वास थांबला होता. त्याचा निपचित पडलेला देह पाहून तिघांनाही कापरे भरले होते. रडून रडून डोळे सुचले होते. विराज आपल्याला सोडून गेला असेच त्यांना वाटत होते..

कोणालाच काही सुचत नव्हते. घामाने डबडबले चेहरे, होते ,त्यांचे हात थरथरत करत होते. विराज पासून ते दूर झालेत.

"प्रेम..प्रेम आपण आता इथे एकही क्षण थांबायला नको." माधव

"हो जाऊ यात चला." प्रेम

"अरे, विराजला सोडून कसे जाणार आपण?" सार्थक

"तू चल येथून. विराज बहुतेक"...


"काय बोलतो आहे प्रेम?"सार्थक

"हे बघ आपण बाहेर जाऊ मग कोणाला तरी मदत मागू."प्रेम

ते तिघेही बाहेर पडणार तर वरचे दरवाजे आपोआप बंद झाल्याचा आवाज आला. सार्थक तर जोरजोराने रडायला लागला. तिथे असलेले प्राण्यांचे मुखवटे आणखीनच अक्राळविक्राळ वाटू लागले. घशाला कोरड पडली. पण, जवळ पाण्याचा एक थेंब सुध्दा नव्हता.

"प्रेम ,आता काय करायचं? येथून बाहेर कसं पडायचं?" सार्थक विचारत होता.

"मी बघतो काहीतरी!" प्रेम

पण, आता कोणाचंच डोकं चालत नव्हतं.

तेवढ्यात सार्थक उठला आणि अचानक धावत सुटला. जागोजागी धावू लागला. बाहेर पडायची जागा शोधू लागला. प्रत्येक भिंत चाचपडून पाहू लागला. कुठेतरी दरवाजा दिसेल आणि येथून बाहेर पडू. अशी आशा वाटत होती.

माधव आणि प्रेम त्याला पकडून लागले. पण काही केल्या तो थांबेना.

"मला घरी जायचंय,मला घरी जायचंय" एकच रट लावत होता.

अचानकपणे वाऱ्याचा एक झोत आला आणि दरवाजाचा करकर आवाज आल्यासारखं वाटलं. कोणीतरी आत आल्याचा भास होत होता.‌

प्रेम, माधव मला वाचवा. कोणीतरी आत येत आहे असे वाटते.

"थांब सार्थक घाबरू नको. ही मायावी शक्तीही असू शकते " प्रेम

"सार्थक तू माझा हात धर ,माधव तू तिकडून याचा हात धर. आपण आधी वर जाऊ या. येथून बाहेर पडू यात. मग बघू."

सार्थकचा हात धरून तिघेही निघाले. एक क्षण त्यांनी विराजला बघीतले आणि निघाले.

तिघेही अंधारात चाचपडत चालत होते. पायऱ्या चढून वर येत होते.‌ अजून किती वर जायचे होते कळत नव्हते. जणू एका भुलभुल्यैयात अडकले होते.

एक एक पाऊल सावधतेने टाकत होते. पण, तेवढ्यात त्यांच्या पायाला काही तरी जाणवले. त्यांनी टाॅर्च मारला तर एक भयानक चेहरा समोर दिसला.

परत किंकाळ्या फुटल्या. कोणाचे मुंडके तिथे पडलेले होते.

ते पाहून तिचेही धावत सुटले. पायऱ्या चढून ते कसेबसे वर पोहोचले.

वर येताच त्यांना हायसे वाटले. तोपर्यंत सकाळचे सहा वाजत आले होते. संपूर्ण रात्र कशी गेली हे कळले सुद्धा नाही.

पण, या सगळ्या धावपळीत काही कळायच्या आच सार्थकचे शरीर थंड पडू लागले.

"सार्थक तू घाबरू नकोस. येथपर्यंत आलो आहोत. आता फक्त आपण येथून नक्की बाहेर पडणारच." प्रेम

"माधव याला शांत करू या आधी. नाही तर... "

हो प्रेम. दोघे मिळून त्याला धीर देऊ लागले.

पण, तेवढ्यात त्यांच्या मागून कोणीतरी धावत येतांना दिसते. कोण असेल ते पाहुया पुढच्या भागात ‌...

©®आश्विनी मिश्रीकोटकर


🎭 Series Post

View all