भाग/१
थंडीचे दिवस होते. सलग दोन तीन दिवसांच्या अंतराने सुट्ट्या आल्या आणि मित्रांचा एक प्लॅन तयार झाली.
कसे जायचे, कोठून जायचे, किती अंतर आणि किती वेळ लागणार याची सगळं नियोजन केले गेले. सामानाची यादी केली आणि होस्टेलमधील सरांना सांगितले की आम्ही विराजच्या गावी चार दिवसांसाठी जात आहे. होस्टेलमधील अशोक सरांनी घरी फोन करून विराजच्या वडीलांना विचारून चौकशी केली. जेव्हा त्यांना खात्री पटली की ते चौघेही घरी जात आहे. तेव्हाच त्यांना सुट्टी दिली गेली.

विराज, माधव ,प्रेम आणि सार्थक हे चौघेही जिवलग मित्र. जेव्हा पासून या वसतिगृहात प्रवेश घेतला तेव्हापासून ते आजतागायत जिवश्च कंठश्च मित्र होते.
चौघेही चौकस बुद्धीचे होते. निरनिराळ्या गावातून जरी ते असले तरीही त्यांची एकजूट झाली होती. घट्ट मैत्री झाली होती. जिज्ञासू वृत्तीमुळे पुरातत्त्व विभागाचा अभ्यासक्रम घेऊन अनेक संशोधन त्यांना करायचे होते.

हाच विचार मनाशी करून ते चौघेही फिरायला निघाले होते. सगळ्यांनी कोल्हापूरला विराजच्या घरी जात असल्याचे कळवले होते. कोल्हापूरला घरी पोहोचले. कोल्हापूरवरून ते कोकणात जाणार होते समुद्रावर फिरायला. विराजच्या घरून जेवण करून ते पुढे निघाले.
त्यांनी आधीच हाॅटेलचे बुकिंग केले होते. त्यामुळे तिथे पोहोचताच ते फ्रेश झाले. मनसोक्तपणे समुद्रात खेळून झाल्यावर भरपूर मजा केली. रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर परत फेरफटका मारायला बाहेर आले.
त्यांनी आधीच हाॅटेलचे बुकिंग केले होते. त्यामुळे तिथे पोहोचताच ते फ्रेश झाले. मनसोक्तपणे समुद्रात खेळून झाल्यावर भरपूर मजा केली. रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर परत फेरफटका मारायला बाहेर आले.
"अरे यार, इथे काही तरी ट्विस्ट पाहिजे. नवीन काही तरी. जे आपल्यासाठी खास असेल."माधव
तेवढ्यात विराजला एक गोष्ट आठवते. "मित्रांनो इथे जवळच माझ्या मामाचे गाव आहे. तिथे जायचे का? त्यांचा खूप सुंदर जुना वाडा आहे. आता तिथे कोणीच रहात नाही. पण, आपण जाऊन बघायचे का? मला तर नीट आठवत सुध्दा नाही. कधी गेलो होतो ते आणि आई बाबा सुद्धा कधीच गेले नाही तिथे." विराज
"हो पण, किती दूर आहे." प्रेम
तसं फार जवळ नाही. पण, लांब देखील नाही. येथून दोन तीन किलोमीटर अंतरावर एक वाडा आहे.
"आपल्याला पायीच जावे लागणार?" सार्थक
हो रे आता यावेळेला काही वाहन नाही मिळणार.
"नको त्यापेक्षा चला आता परत जाऊ या. मला झोप येत आहे. सार्थक बोलला."
तसे सगळेच थकले होते.
"हो चला जाऊया परत. तसेही रात्रीचे साडेनऊ वाजत आले आहे." माधव
"ए चला ना थोडा वेळ. जवळच आहे ना! गप्पा मारत गेलो तर कळणार सुद्धा नाही." विराज
*"अरे, पण काका काकूंनी काय सांगितले . इतरत्र कोठेही जायचे नाही. कारण, उद्या सकाळी आपल्याला फिरायला जायचे आहे." सार्थक
"अरे, काही होत नाही. आपण एका दोन तासात निघू या."प्रेम
त्यानंतर सगळे मजा करत निघाले. वीस पंचवीस मिनिटांच्या आतच ते येऊन पोहोचले.
"अरे, ते बघा काय आहे? तोच माझ्या मामाचा जुना वाडा आहे वाटत. आईने एकदा सांगितले होते की त्या
वाड्या समोरच हनुमानाचे मंदिर आहे म्हणून. ए आपण आत जाऊन बघायचे का?"
वाड्या समोरच हनुमानाचे मंदिर आहे म्हणून. ए आपण आत जाऊन बघायचे का?"
"नको नको , आपण फिरायला आलो आहोत. विनाकारण कोणत्याही भानगडीत पडायला नको. सकाळी बघू या आता नको." सार्थक
"प्रेम ,माधव तुमचे काय म्हणणे आहे यावर."
"विराज मला असे वाटते आपण जायला काही हरकत नाही. आत एक चक्कर मारून येऊ." प्रेम
"कारण, विराजच्या मनात खूप उत्सुकता होती. आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने नवीन काही शिकायला मिळेल. त्यामुळे तो म्हणाला, सार्थक तू जा रुमवर. आम्ही जाऊन येतो."
पण, सार्थक एकटा रुमवरही जायला तयार नव्हता. त्यामुळे नाईलाजास्तव तो तयार झाला.
वाड्यात गेल्यानंतर आत मुलांसोबत काय घडते पाहुया पुढच्या भागात....
©® आश्विनी मिश्रीकोटकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा