विज्ञान केंद्राच्या मदतीसाठी आवाहन.

आर्थिक मदतीचे आवाहन
*विज्ञान केंद्रांच्या आर्थिक मदतीसाठी आवाहन*

नमस्कार
मी चंद्रकात बुध्या घाटाळ मु .पो .कासा ता .डहाणू जिल्हा पालघर शिक्षण बी .ए .बीएड.
मी आदिवासी समाजाचा तरुण असुन दिनांक ५/९/२०१५ रोजी पालघर जिल्ह्यातील पहिले अवकाश निरिक्षण केंद्र स्थापन केले.असे अवकाश निरिक्षण केंद्र सुरू करणारा मी *भारतातील पहिला आदिवासी तरुण आहे*

या केंद्रात ग्रामीण भागांतील मुलांना मोठ- मोठ्या टेलिस्कोप व इतर विज्ञानाच्या साहित्या द्वारे अवकाश निरिक्षण माहिती व प्रशिक्षण अगदी *विनामूल्य दिले जाते.माझ्या या निस्वार्थी सेवे बद्दल इतर अनेक स्थानिक पुरस्कारासह *पालघर भूषण* हा जिल्ह्यातील सर्वश्रेष्ठ मानाचा पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे .या केंद्रांत अनेक शाळा व महाविद्यालये यांनी अभ्यास सहली आयोजित केल्या आहेत.

आता पर्यन्त अनेक जि. प. शाळा व माध्यमिक शाळा मिळून सुमारे दहा हजार वर मुलांनी या केंद्राला भेट देऊन माहितीचा लाभ घेतला आहे.

*नासाच्या* स्पेस एजुकेटर अपूर्वा जाखडी मॅडम यांनी देखील या केंद्राला भेट देऊन कामांची प्रशंसा केली .

या केंद्रामार्फत विज्ञान प्रदर्शन , ग्रहण गैरसमज , अंधश्रद्धा निर्मूलन , शैक्षणिक सहली ई. अनेक विज्ञान विषयक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते .

या केंद्राचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागांतील जास्तीत -जास्त मुलांनी खगोलशास्त्र विषयाचा अभ्यास करुन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचे नाव मोठे करावे हा आहे.

या केंद्राचे काम देणगी व विज्ञान कार्यक्रचे मानधन यांवर चालते. पण करोनाच्या पार्श्वभूमी मुळे सध्या हे केंद्र आर्थिक संकटात सापडले आहे. त्यामुळे
आपल्याला मनःपूर्वक विनंती आहे की, या केंद्रासाठी आपल्या कडून थोडीफार आर्थिक किंव्हा वस्तुस्वरूप मदत मिळावी.जेणेकरून ग्रामीण भागांतील मुलांना याचा उपयोग होईल.

*आर्थिक मदतीसाठी* -

CHANDRAKANT BUDHYA GHATAL
Account no: 20178830213
BANK OF MAHARASHTRA
IFSC Code: MAHB0000477


*वस्तुस्वरुप मदतीसाठी* पत्ता-
चंद्रकात घाटाळ (संचालक- अनुजा अवकाश निरिक्षण केंद्र कासा) ता. डहाणू जि. पालघर पिन. 401607

मोबाईल क्रमांक : 7350131480

*ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करावी ही विनंती. जेणेकरून ग्रामीण भागातील मुलांना याचा फायदा होईल.*