विघ्नहर्ता गजानन

मुलीची तब्येत बिघडली यामुळे आईच्या मनाची घालमेल सुरू झाली


विघ्नहर्ता... गजानन 

‌" क्या खाला नास्ता हुआ क्या नहीं अभी ? "
आत येताच जयाने विचारले.पण तिला उत्तर मिळाले नाही. त्या अगदीच शुन्य नजरेने पाहत बसल्या होत्या.तशीच जया आत किचनमध्ये गेली.वहीनी स्वैपाक करत होती.
" काय झालं वहीनी.मावशी अशा चुप का आहेत.मला बघून ना हसल्या न बोलल्या मी विचारले तरी उत्तर नाही.तब्येत तर बरी आहे न?"
‌‌यावर वहिनीने अगदी हळू आवाजात म्हटले" दिदींचीं तब्येत बरी नाही.दवाखान्यात अॅडमीट केले आहे".
" अरे देवा....
काय झालं."
......
‌‌" त्या पॉझिटिव्ह निघाल्या"....
.....
आणि एकच स्मशान शांतता...
.....
खान कुटुंब
आई बाबा..
...दोन मुले,एक मुलगी..
...मोठ्या मुलाचे आणि मुलगीचे लग्न झाले.छोट्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी चांगल्या कंपनीत लागली होती.
खान ..त्यांचा स्वत:चा बिझनेस होता.
त्यांचा दोन वर्षांचा नातू होता.मुलगीही चांगल्या सधन कुटुंबात दिली होती.तिला दोन मुले होती.
एकंदरीत हे एकदम दृष्ट लागावी असे हसता खेळता परिवार होता.
मुलगी वर्षातून दोनवेळा माहेरपणाला येत असे.तेव्हा घर म्हणजे ईदच जणू.
बाहेर पिकनिकसाठी सगळे मिळून जायचे.मुलांना हवे नको ते सगळे खान आणि त्यांच्या पत्नी लाड पुरवणारे.
जेव्हा मुलगी परत सासरी जायची तेव्हा " काही काळजी करू नका अम्मी अब्बु.मला तिथेही असेच सुख आहे.जशी इथे मी आनंदी असते तशीच तिथेही ते मला आनंदात ठेवतात." असे ती म्हणतं.
जया...
...जया यांच्या घरी अगदी म्हणजे ही मुले लहान होती तेव्हा पासून धुणे भांडी करायला येणारी बाई.
...बाई म्हणन्या पेक्षा ती या घरची सदस्याच होती.प्रत्येक सण मग तो दिवाळी असो किंवा ईद ..तिला नव्या साड्या परत जे हवे ते घेऊन देत असत.
ती खानच्या पत्नीला खालाजान म्हणायची.
खाला जेव्हा नमाज पठण करायच्या तेव्हा जया त्यांच्या बरोबर बसून त्यांच्या सारखे सज्दाह करायची.
हे बघून सून बाई म्हणायची जया ताई तुम्ही हे काय आणि का करता.
" अहो वहिनी आता हे बघा सगळे धर्म,जात पात हे एकच .आता तुम्ही नमाज पठण करतात तेव्हा सज्दाह करता आणि आम्ही आमच्या देवाला साष्टांग नमस्कार करतो.तुम्ही रोजा राहता आम्ही उपवास करतो.तसे मी सज्दाह करते खालाजान बरोबर तुम्ही काय म्हणता हे मला येत नाही पण मी मात्र देवाकडे प्रार्थना करते देवा सगळ्यांना सुखी ठेव"
‌यावर खानची पत्नी कौतुकाने जया कडे बघून हसायची.गुणाची ग पोर माझी.
चल आता भुक लागली दे गं आम्हा माय लेकींना जेवायला"
तर असे हे कुटुंब..
... सर्व धर्म समभाव मानणारे.
...आणि म्हणतात ना कि सगळेच चांगले असले तरी काही न काही विपरीत होतेच.आणि झाले ही तसेच.
....त्या दिवशी सकाळी जावयाचा फोन आला" अस्सलाम वालेकुम...
....चार दिवस झाले हिचा ताप कमी होत नाही.खोकला पण आहे.किती औषध घेतली पण कमीच नाही."
‌हे ऐकून खान आणि त्यांच्या पत्नी स्तब्धच झाले.या महामारी मुळे त्यांच्यां डोक्यात न जाणे शंकेची पाल चुकचुकली.
आता तिच्याकडे जायचे किंवा तिला इथे बोलावून घ्यायचे हे दोन्ही अशक्य गोष्टी.
आई शेवटी आईचं तिचा तर एकदम भितीने घसाच कोरडा पडला.ती एकदम अस्वस्थ झाली.
सुनेने त्यांना खुर्चीवर बसवले आणि पाणी आणून प्यायला दिले." काही काळजी करू नका.ताप येईल कमी.व्हायरल असेल आई.आता कसे हवामान बदलामुळे येतो ताप"
पण त्यांच्या जीवाला चैनच पडत नव्हती.
दिवसभर फोनवर चौकशी कशी आहेस बाळ,ताप कमी आला कि नाही. डॉ.काय म्हणतात.....
....करत करत आणखीन चार दिवस गेले.पण तिचा ताप काही केल्या कमी होत नव्हता.एकसारखे अंग दुखणं,घसा दुखणे सुरू.शेवटी डॉ.नीं रक्त तपासणी करायची म्हटले आणि त्या नंतर सीटी स्कॅन करून घेणेचे सांगितले.
....इकडे आई बाबा,भाऊ,..
तिकडे तिचे सासु सासरे सगळे प्रार्थना करत बसले हिचा रिपोर्ट नॉर्मल येऊ दे.
....पण....
....पण..
...तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह निघाला.
...आई तर रडूच लागली.
जेवण तिला कडू वाटायला लागले.ती सरळ जेवेनाच.
सुन म्हणायची जेवा आई तुम्ही न जेवता राहीला तर तुमची प्रकृती बिघडेल.
....पण ती शेवटी आईचं ना...
तिने तिचे हात दुआ साठी उचलले.
" या अल्लाह मेरे बच्ची कि तबियत अच्छी कर।जल्दी उसे सेहतमंद बना ।"
दुसऱ्या दिवशी जया रोजच्या प्रमाणे आली.तिला जेव्हा वहीनीनें सांगितले तेव्हा ती पण आतून एकदम घाबरली पण वर वर तसे न दाखवता बाहेर आली.
..." हे बघा खालाजान..
दिदीला काही होणार नाही.माझे अंतर्मन म्हणतंय .त्या चांगल्या होणार.बघा
आणि आता तर बाप्पा पण आले आहेत.बघा तो विघ्नहर्ता असल्याने सगळ्यांचे विघ्न कसे दुर होणार.
बघाच तुम्ही जेंव्हा बाप्पाचे विसर्जन होईल तेव्हा दिदीचा रिपोर्ट नॉर्मल येतो कि नाही तो
आज तर गौरीची पूजा आरती आहे.आणि मी तिच्या कडे पदर पसरून दिदी साठी प्रार्थना करणार आहे.आजची रात्र गौरी साठी जागरण आहे मी रात्र भर दिदीच्या तब्येतीचे गाऱ्हाणे मांडणार आहे.
आणि बघा कसे उद्या तुम्हाला खुश खबर येते की नाही.
माझा विश्वास आहे गणपती बाप्पा वर.तो विघ्नहर्ता आहे तो हे विघ्न दूर करणार." बोलता बोलता तिला एकदम हुंदका फुटला.
सगळे जण रडू लागले.
खालाजान पण रडत रडत आपल्या ओढणीचा पदर पसरवला हे गणराया माझ्या लेकीला बरे कर माझी लेक माझ्या पदरात दे"
....
.....आज रात्री पुन्हा स्वॅब चेक करणार .मग सकाळी रिपोर्ट येणार.
...मग या माऊलीला झोप कशी लागणार.
.... रात्रभर ती फक्त प्रार्थना करत होती.जरा पहाटे पहाटे तिचा डोळा लागला.आणि तिला स्वप्न पडले...
.....अधुंक..अधुंक..
जरा जरा धुसर....
.....काही तरी समोर दिसत आहे.काय आहे हे कळत नव्हते.मग जरा जरा स्पष्ट होत होतं एकदम समोर गणपती बाप्पा आले.आणि त्यांनी हात उंचावून मानवंदना दिली.सोंड हलवून गुलाबाचे फूल यांच्या हातावर दिले.
यांनी फुल घेऊन त्यांना वाकून नमस्कार केला तर बाप्पांने सोंड त्यांच्या डोक्यावर ठेवून आशिर्वाद दिला आणि ते एकदम अदृश्य झाले.
या एकदम हडबडीने जाग्या झाल्या.पहातात तर यांच्यां अंगावर शहारा आला होता.
.... लवकर त्यांनी फोन बघितला तर पहाटेचे पाच वाजले होते.
.... लवकर त्यांनी वजू केले आणि नमाज पठण केले.
.......
.....तोच त्यांचा फोन वाजला." हैलो....
...अम्मी ...
.... आपकी बेटी का रिपोर्ट नॉर्मल आया है.
आताच रिपोर्ट मिळाला.निगेटिव्ह आला आहे."
......
.....फोन ऐकताच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
....आणि त्या म्हटल्या खरंच तु विघ्नहर्ता आहे तु गणराया तु बाप्पा तु माझे संकट दूर केले.हे गणराया तुझा दृष्टांत देऊन मला तु पुन्हा माझी मुलगी मला परत केलीस.आज तुझे विसर्जन आहे.आज जसे माझी मुलगी बरी झाली तसेच ही महामारी मुळासकट नष्ट कर देवा...
.....
लगेच त्यांनी जयाला फोन केला." जया लवकर ये.आज मोदक आणि पेढे करायचे आहेत.गणपती विसर्जनाच्या आरतीसाठी प्रसाद आपल्या घरातून जाणार याच नाही तर प्रत्येक वर्षी.......
........
©® परवीन कौसर....
....