विघ्नहर्ता -2 @राधिका

आभाच्या जीवनातील चढउतारांची भावस्पर्शी कथा.

#विघ्नहर्ता...2
©राधिका कुलकर्णी.

"ममाऽऽ.... ए मॉमऽऽ मॉमुटलेऽऽ कुठे आहेस???"
आनंदाने ओरडतच अथर्व आभाला घरभर शोधत होता.आभा नेहमी प्रमाणे संध्याकाळी ऑफीसहुन घरी येवून कॉफी चे सिप घेता घेता कपड्यांच्या घड्या घालत होती.
सकाळी इतकी घाई व्हायची की उर्वरीत कामे मग अशी घरी आल्यावर करायला लागायची.
मुलांच्या शाळा आणि तिचा वेळ अवेळ होणारा जॉब तिला 24 तास पुरत नव्हते.कामाला बाई ठेवु म्हणले तर त्यांच्या वेळा हिच्या टाईमटेबलला मॅच होत नसत त्यामुळे अशी सर्व बारीक सारीक कामे तिलाच करायला लागायची.
अगऽ मम्माऽऽ कुठे आहेस?
हे बघ ना माझ्या हातात काय आहे?
अथर्व नाचतच आभा जिथे होती त्या खोलीत आला.
त्याचा आनंद ओसंडून वाहत होता.कारणच तसे होते.

त्याच्या एका सायन्स प्रोजक्टमधे त्याने एक डिव्हाईस तयार केले होते.त्याने ह्याबद्दल आभाला आधी काहीच सांगीतले नव्हते.पण आज सगळ्या कॉलेजमधे त्याच्या प्रोजेक्टला पहिले पारितोषिक मिळाले होते.
तिच बातमी घेवुन तो आभाला शोधत होता.आभा आई असली तरी त्याची सगळ्यात जवळची मैत्रिणही होती आताशा.त्यामुळे कुठल्याही चांगल्या वाईट गोष्टी तो सर्वात आधी आभालाच शेअर करायचा.
मम्मुटले बघ ना मी काय बनवलेय!
काय झाले अथर्व, का एवढा ओरडा चालवलाय?नीट सांग काय झाले.
आभा शांतपणे कपडे घडी घालता घालताच बोलत होती.
अग मम्मा माझ्या प्रोजेक्टला फर्स्ट प्राईज मिळालेय.
ही तर बाप्पाची मुर्ती दिसतेय.ह्यात काय विशेष आहे?तिने जरा कुतूहलानेच विचारले.
वाटले नाऽऽ,तुलाही असेच वाटले ना की ह्यात काय विशेष?
शाळेतही सगळ्यांना असेच वाटले होते आणि इकडेच माझ्या प्रोजक्टमधे ट्विस्ट होता.
हे बघ एकतर हा बाप्पा मी प्लॅस्टीक बॉटल्स पासुन बनवलेला आहे.
आणि ह्याला हातात घे.ह्याला जवळुन बघितल्यावर तूला ह्यात एक वेगळेपण जाणवेल.
आभाने मूर्ती हातात धरली.तर बाप्पाचे डोळे जिवंत माणसांसारखे दिसत होते.लुकलुकत होते.
काय रे?ह्यात काय विशेष.सॉफ्ट टॉईज मधे तर असेच डोळे असतात की.
आभा आपला विचार बोलुन मोकळी झाली.
अगऽ मम्माऽ इथेच तर ट्विस्ट आहे ना.बाहुल्यांच्या डोळ्यांसारखे डोळे असुनही ह्यात एक वेगळेपण आहे.
नीट निरखून बघ तर कळेल.
अरे मला नाही दिसत बाबा काही.तू पटकन सांग बरं.आभा आता वैतागली होती.
मुलाचे कौतूक करायचे सोडून त्याच्यावरच चिडली होती.
एकतर ऑफीसमधुन थकुन आलेली त्यात घरातली कामे संपत नव्हती आणि  हा पटकन काही सांगत नव्हता.उगीचच संपेन्स क्रिएट करून ठेवलेला.
आभाला वैतागलेले पाहुन अथर्वने जास्त न ताणता तिला एका खुर्चीत बसवले.
मम्मा हलु नकोस हं इकडून.मी आत्ता आलो.तो आपल्या रूम मधे गेला आणि लॅपटॅप घेवुन धावतच परत आला.
काहीतरी खुडबूड करतच त्याने लॅपटॉप आॅन केला आणि काय आश्चर्य आत्तापर्यंतचा सगळा संवाद रेकॉर्ड होऊन व्हिडीओ रूपात दिसत होता.
अगोबाईऽऽऽ!!! हे कधी रेकॉर्ड केलेस रे.आणि कसे केलेस?
तेच तर सांगतोय नाऽ.
अग हे डोळे साधेसुधे नसुन त्यात मी टाईनी कॅमेरा फिट केलाय.
आजकाल अनेकदा चोऱ्या,अतिप्रसंग अशा घटना समाजात घडताना दिसतात.लहान मुलींवर स्कुल व्हॅन टॅक्सीमधे अतिप्रसंग होतात.जर असे कॅमेरा ऑपरेटेड बाप्पा वाहनांमधे फिट केले गेले तर लोकांना संशय येणार नाही आणि असे एकांतात होणारे गुन्हे सहज रकॉर्ड करता येतील. ह्या कल्पनेला मनात धरून मी प्लॅस्टीक वेस्ट पासुन हा बाप्पा बनवला.
वॉव्हऽऽ!!!
व्हॉट अॅन युनिक आयडीया!
मेरा बच्चा..!
गोड गं माझ कोकरू ते...!
पण बाप्पा हिच थीम करावी असे कसे सुचले तूला.?
अगऽ तूच म्हणतेस ना मी बाप्पाचा प्रसाद आहे मग मी विचार केला.मी पण बाप्पालाच माझ्या प्रोजेक्टची थीम बनवेल.आणि बघ बाप्पानेच मला पहिला नंबर मिळवून दिला.
मम्मा यू आर राईट.तूझा बाप्पा खरच जिनिअस आहे.मला काहीच सुचत नव्हते काय वेगळे करू.आणि सहज बाप्पावर नजर गेली.आणि ट्युब पेटली.आपल्याकडे नविन घर गाडी लग्न कार्य काहीही असुदे बाप्पालाच पहिल्यांदा पुजतात ना.मग त्याच्यापासुनच काहीतरी बनवावे हे ठरवले अँड रेस्ट ईज द हिस्टरी मॉम...
आभाला घट्ट बिलगुन लहान मुलागत अथर्व सगळे एक्सप्लेन करत होता.किती आणि काय काय सांगू असे झाले होते अथर्वला.
आभाही खूप खुष होती.सिंगल पेरेंटींग त्यात अॅडोलसंट एजमधील मुलाचे ज्याला वयाच्या ह्या टप्प्यावर सतत आपल्या वडिलांची गरज पडते त्या वयात तीच त्याची आई आणि बाप बनली होता.
सतत टांगती तलवार. मुलांकडे दुर्लक्ष तर नाही ना होत आपले.नौकरीच्या वाढत्या जवाबदारीतुन हवा तसा वेळ ती मुलांना देऊ शकत नव्हती.हिच खंत सतत खायची तिला.की मी एक चांगली मुलगी ,पत्नी ,आई तर झाले पण मुलांचा बाबा होऊ शकेल का?
पण आज तिला लेकराचे यश बघुन अभिमान वाटत होता.तिचा आनंद नकळत डोळ्यांवाटे स्रवत होता..
मम्मा रडतेस काय? हा आनंद सेलिब्रेट करायचा क्षण आहे.Lets celebrate मॉम!!.. Yeah!!!
अथर्व, आभा आणि सई तिघेही हातात हात घेऊन नाचत आनंद व्यक्त करत होते..
अथर्व जा देवघरात नमस्कार कर बाप्पाला.साखर ठेव देवापुढे..मी गोड बनवते जेवणात काहीतरी..मस्त एनजॉय करू..
मम्मा काय गं.घरीच का.?बाहेर जावुयात ना कुठेतरी.
जाऊया. नक्की जाऊ,पण आज नको राजा..मला ऊद्या ऑफीस आहे.तुम्हालाही शाळा आहे की नाही?आता बाहेर गेलो तर खूप लेट होईल यायला.मला उद्या एक इम्पॉर्टंट मिटींग आहे.थोडं प्रिपरेशन करायचेय त्याचे.सकाळी पण लवकर जायचेय ऑफीसला.सो प्लिज बाळांनो..नेक्स्ट सॅट पक्का डिनर बाहेर...
कशीबशी मुलांची समजूत घातली आभाने.पण अथर्व हिरमुसला होता.तोंड बारीक करतच रूममधे गेला.
तिलाही खूप वाईट वाटत होते त्याचा मूड तिच्यामुळे खराब झाला होता.पण तिचा नाईलाज होता.आणि अशाचवेळी तिला प्रकर्षाने पार्थची आठवण यायची.तो असता तर आत्ता नक्कीच काहीतरी जुगाड करून मुलांना खूष केले असते.
तिने स्वत:ला सावरले.मस्त बदाम घालून गोड शिरा केला.अथर्वला गोड बदामाचा शिरा खूप आवडायचा.त्याचा मूड ठिक करायला सध्या तिला एवढाच एक मार्ग सुचला होता.
जेवायची तयारी करत तिने मुलांना बोलावले.पण अथर्व आलाच नाही.रूसुन बसला होता आपल्या खोलीतच.
तिला एक गंम्मत सुचली.
सईला खुणावतच तिच्या मदतीने अथर्वच्या प्रोजेक्ट बाप्पाला हातात धरून एक नाटक केले.लॅपटॉप ओपन करून अथर्व समोर धऱला.
आभाने सईला बाप्पाचा रोल करायला सांगितले.आता ती सईच्या रूपातील बाप्पाला म्हणत होती,"बाप्पा आज मी बदामाचा शिरा केला आहे तुझ्या आणि माझ्या राजाच्या आवडीचा.पण माझा राजा रूसलाय.जेवत नाही म्हणतोय. मग कसे करायचे?हा शिरा तू खाशील का?मी खूप प्रेमाने बनवलाय.
सईने सोंड हलवतच मी खाणार मी खाणार म्हणत आभाच्या मागे धावते.
तो लाईव्ह व्हिडीओ बघुन अथर्वलाही खूप हसायला आले.
खूप फनी स्किट होते.राग विसरून तोही हत्ती सारखी सोंड हलवत मी पण खाणार म्हणत सईच्या मागोमाग धावायला लागला.
पुन्हा एकदा वातावरण हसरे झाले..तिचे दोन्ही बछडे कौतुकाने मटामटा शिऱ्यावर ताव मारत होते.
आभा साश्रु नयनांनी पोरांकडे तृप्त नजरेने बघत होती......
~~~~~~~~~(क्रमश:)~~~~~~~~~~~~
(#विघ्नहर्ता..2)
©राधिका कुलकर्णी.


नमस्कार मंडळी....!
आई मुलाचे सुंदर नाते ह्या भागात उलगडताना दिसेल.एकाचवेळी तरूण वयात येणाऱ्या मुलांची आई आणि बाप ह्या दोन्ही जवाबदाऱ्या संभाळण्याची कसरत जेव्हा स्त्रीला करावी लागते तेव्हा काय होते.ती कशी निभावते त्या जवाबदारीला हेच तुम्हाला पुढेही पहायला मिळेल.
कसा वाटला हा भाग? जरूर कळवा.
लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन. माझ्या नावासहीत ही कथा नक्की शेअर करू शकता.
धन्यवाद..
@राधिका.

🎭 Series Post

View all