Jan 19, 2022
नारीवादी

विद्रोही मी

Read Later
विद्रोही मी

असं म्हणतात लहानपणा पासून ज्या सवयी मुलांना लागतात त्या जन्म भर पुरतात...
माझ्याही बाबतीत असंच झालं, लहानपणा पासूनच मी फार स्पष्टवक्ता, सडेतोड उत्तर देणारी आणि कोणालाही न घाबरणारी अशी होती, एकंदरीत मुलींसारख्या कोणत्याच सवयी मला नव्हत्या.
बाहुल्यांच लग्न, घर-घर, असे खेळ मला मूर्खपणा वाटायचे आणि मी कधीही त्यात सामील झाले नाही,
त्या ऐवजी सायकल चालवणे, फिरायला जाणे, फिल्म बघणे किवा पुस्तकं वाचणे हेच माझे छंद होते....

क्रिकेट माझा आवडता गेम, मी एकही मैच सोडत नसे, अगदी दुसऱ्या दिवशी पेपर असला तरीही!!!

भारतीय आणि विदेशी दोन्ही खेळाडू मला आवडायचे, सामान्य ज्ञान स्पर्धा, निबंध स्पर्धा किवां वाद-विवाद स्पर्धेत माझा नंबर कायम असायचा.
त्या काळात मुलं-मुली आत्ता सारखे फ्री फिरू शकत नव्हते, मैत्री जरी असली तरी नोट्स द्यायला किवां, अभ्यास करायला भेटता येत होतं, मुलींचे खास मित्र मुलं असा प्रकार नव्हता.
या बाबतीत पण मी बंडखोर....... माझ्या वर्गातल्या ११ मुलांसोबत माझी घट्ट मैत्री होती, ते कधीही माझा घरी यायचे, मस्त गप्पा गोष्टी, जेवण-खावण सगळं करून घरी जायचे, आणि माझही सेम होतं, जेव्हा इच्छा झाली कि सायकल उचलायची आणि जायचं मित्राकडे.....

घरात पण माझं वागणं फार वेगळं होतं, ज्या गोष्टी बऱ्याच काळापासून आपण ऐकत आलेलो आहोत त्या मला अजिबात पटत नसे......

“मुलींनी गायत्री मंत्र किवां हनुमान चालीसा नाही म्हणायचा”
“बायकांनी नारळ फोडायचं नाही किवां तुळस तोडायची नाही”
“तीन दिवस पाळायचे, बाहेर जायचं नाही, सगळीकडे शिवायचं नाही”
अश्या बऱ्याच गोष्टी होत्या ज्या वरून माझा घरी वाद होत असे, मला मुला-मुलीं मध्ये असा भेदभाव आवडत नसे,
मी प्रश्न विचारायची, सगळ्यांना भंडावून सोडायची, जो पर्यंत आई मला प्रत्येक प्रश्नाचं तर्क-संगत उत्तर देत नव्हती मी तिचा मागे लागायची...
अनेकदा ती मला समाधान कारक उत्तर देत पण बऱ्याच प्रश्नाचं उत्तर तिचाकडे पण नसायचं.
मग ती मला ओरडायची कि “आमच्या वेळेला असं तोंड वर करून प्रश्न विचारायची मुभा नव्हती”
मी जर इतकी चुरू-चुरू बोलले असते ना तर माझा आईने मला चटकाच दिला असता......

हे ऐकून मग मी गप्प बसायची......

पुढे माझी ही बंडखोरी वाढतच गेली, कोणत्याही बाबतीत    “असं का करायचं”??????
हा प्रश्न असायचाच......

एक गमतीदार किस्सा सांगते........
एक दिवस आमच्या कडे एक काकू भेटायला आल्या, त्या आपल्या घरा बद्दल आणि नवऱ्या बद्दल सांगू लागल्या, मी ११ वीत असेन तेंव्हा.....मी नुकतीच शाळेतून आलेले आणि पाहिलं कि त्या आई जवळ रडत होत्या,
त्यांचा सासरची मंडळी कशी त्यांचाशी दुष्ट पणाने वागते त्या बोलत होत्या,

त्या वयापर्यंत स्त्री-मुक्ती आणि बायकांवर होणारे अत्याचार हा एक अजून मुद्दा माझ्या लिस्ट मध्ये आलेला होता,
मी जेव्हा-केव्हा अश्या काही गोष्टी ऐकत  मला फार राग येत असे...
बायकांशी ही अशी वागणूक का म्हणून करावी कोणी????

त्यात एक गोष्ट अशी झाली होती कि माझ्या घरात मी फार स्वतंत्र आणि मोकळं वातावरण पाहिलं होतं, त्या मुळे ज्या घरांमधून स्त्रियांसोबत वाईट वर्तन होत त्यांचा माला प्रचंड राग येई......

तर सांगायचं असं कि मी त्याचं बोलणं ऐकत होती, आता त्या काकूंची चर्या सांगते थोडक्यात....
त्या चांगल्याच उंच आणि धिप्पाड अश्या होत्या, अंगकाठी बळकट होती, त्या रडून-रडून आईला सांगत होत्या कि माझा नवरा आणि सासू माझ्या सोबत मारहाण करतात.....
मी लक्ष्य देऊन त्यांचाच कडे बघत होते.....अन आता न मला त्यांचाच राग येत होता....
मी गप्प होते आत्ता पर्यंत कारण मला माहित होतं कि मोठ्यांच्या मध्ये बोललं तर आई रागवेल पण आता माझ्यातली ती बंडखोर काही शांत बसे ना......

त्या बोलत होत्या.....”काय सांगू वहिनी, परवा नं यांनी आणि सासुबाईनी मला विहरीत ढकलायचा प्रयत्न केला.......


आता मात्र मला राहवलं नाही गेलं, मी समोर गेले आणि बोलू लागले.....त्या वेळेला माझा चेहरा लाल-लाल झालेला होता.... मी ओरडलेच त्यांना.....काय हो काकू गाराणे सांगताय??
इतक्या धड-धाकट तुम्ही असं कसं कोणी मारू शकतं तुम्हाला???
नवरा मारायला आला कि जोरदार धक्का द्यायचा त्याला आणि सासू ला तर जेवणात जमालगोटा द्या खायला......जर एकदा अद्दल घडवली ना कि मग दुसऱ्यांदा कोणी हात लावणार नाही.....

आई माझ्याकडे नुसती बघत होती...... माझं अंग तापलं होतं मी लाल झाले होते.
त्या काकू थोड्या वेळात घरी निघून गेल्या.....अर्थातच त्यांना माझं बोललेलं काही पटलं नाही....

कसं पटणार??? नवऱ्याला देव माननारी ही पिढी या सगळ्या गोष्टी पचवू शकत नाही.....
नंतर आई माझ्या खोलीत आली, तेंव्हा मी किरण बेदीचं पुस्तक वाचत होती,

आईला वाटत होतं कि असले पुस्तकं वाचून मी हे सगळं बोलते पण तसं नव्हतं......
अन्याय सहन नं करणं हा माझा स्वभाव अगदी लहान पणापासूनच होता,
ती आल्यावर काही बोलण्याचा आतच मी तिला म्हणलं.....
पती हा तेव्हाच परमेश्वर असतो जेव्हा त्याची वागणूक परमेश्वरा सारखी असते....
कोणी दारू पिऊन बायको ला मारझोड करत असेल तर तो कसला परमेश्वर??????

आईला माझं म्हणणं पटत होतं.....ती फक्त एक सांगत असे कि मुद्दा जरी बरोबर असला तरी प्रत्येक वेळेला ओरडून सांगायची किवां संताप करायची गरज नसते......

पण माझ्यातली ती बंडखोर मुलगी सतत आंदोलन करायला हातात झेंडा घेऊन तयारच असायची.....
अनेक ठिकाणी त्या रागाचा, ओरडण्याचा फायदा पण झाला, पुढे कॉलेज मध्ये किवां लग्नानंतर नौकरीत असतांना या बंडखोर स्वभावाचा जितका फायदा झाला तितकाच तोटा ही झाला........
असो.......तर अशी होती बंडखोर मी........

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now