विधवा ( अंतिम भाग)

विधवा होणं न होणं हे स्त्रीच्या हातात मुळीचं नसते मग तरीही तिला ह्याची शिक्षा का भोगावी लागते?


घरात रागिणी, नताशा, मालिनी आणि तिची आई यांची कुजबुज म्हातारीच्या कानावर पडली.

" पोरी, दोन मिनिट थांब हं! मी आणते सगळ्यांना बोलावून."

" आजी तुम्ही थांबा मी आणते."


" अगं नाही, मी सगळ्यांना ओळखते इथे, लगेच आणते बोलावून."

म्हातारी गेली आणि सगळ्यांना बोलावून आणलं.


साधारण अर्ध्या तासात आठ-दहा जनी गोळा झाल्या. आता आरतीचं ताट आणलं आणि रागिणी ओवायला घेईल तोच एक बाई म्हणाली,

"अगं शुभ कार्याला तू का अशुभ बनवते..तू नको ओवाळू."


रागिणी हिरमुसली झाली आणि मागे सरकली


तेवढ्यात आजी म्हणाली,


"पोरी ओवाळ गं.. तुझी मुलगी आहे ती. तू कसा वाईट विचार करशील तिच्या बद्दल, लोकांकडे लक्ष नको देऊ."


"पण आजी...अहो ती विधवा आहे."


"मान्य आहे विधवा आहे पण त्याच्यात तिची काय चूक आहे का? सांगा कुणी तरी?"


\"चूक तिची नाही पण हे जुन्या काळापासून सुरू आहे मग आपणही पाळलं पाहिजे ना.बायका आहे ना बाकीच्या ओवळायला."

"मग हे बदलायचं कुणी?  ती तिची आई आहे. विधवेने हळदी कुंकू लावू नये, कपाळ पांढर ठेवायचं. पण हळदी कुंकू हे तर आपण कुमारी असल्यापासून लावतो. मान्य आहे सिंन्दुर नाही लावत, पण नवरा गेला म्हणून आपण आपलं आयुष्य का नाही जगायचं, तिलाही अधिकार आहे जगण्याचा, चार चौघी सारखं नटण्याचा. तिची इच्छा का मारावी तिने. सगळे सण ,पूजा, कार्यक्रम करू द्या ना तिला आनंदाने साजरे."


नताशा त्यावर म्हणाली,
"नवरा मेला म्हणून त्याग करायचा सर्व गोष्टीचा हा कुठला न्याय आहे. ती विधवा झाली आहे पण ती अजून जिवंत आहे, तिलाही मन आहे, भावना आहेत, त्या का म्हणून तिने मारायच्या?"


सगळीकडे शांतता पसरली. आजीने तिला ओवाळायला  सांगितलं आणि हळदी कुंकू पण द्यायला सांगितले.


कार्यक्रम आनंदात पार पडला सगळ्या जनी आपापल्या घरी निघून गेल्या.


"आजी अहो तुमच्यामुळे मी आज..."


"बस पोरी बस.. अगं बोलायला शिक जरा. नाहीतर ही लोक तुला जगू नाही देणार."

आजी खूप काही बोलत होती आणि रागिणी ते शांतपणे ऐकत होती.

"आजी.. खरचं रागिणी अशी नव्हती पण आता काय झालं काय माहीत तिला जगण्यात, आयुष्यात रस वाटत नाही."


" आई .... तसं नाही गं....पण आजीच्या बोलण्यातून मला खूप काही शिकता आले. तुमच्या बोलण्यातून हिंमत मिळाली. मी आता पर्यंत फक्त माझ्या दुःखाला कवटाळून बसले होते. पण मला आता माझ्या मुलीसाठी जगायचं आहे. लोक काय काहीही केलं तर नावचं ठेवणार हे खरं आहे."


" बघ...बाळा तू नेहमी सकारात्मक विचार कर, अगं दुःखाने कोसळणारी स्त्री मुळात नसते ,जी   खंबीर होऊन लढेल ती स्त्री असते. अगं जेव्हा आपण एक इच्छा, जिद्द मनात ठेवतो ना तेव्हा एक नाही असे हजारो दरवाजे ती खूप मार्ग  करून देतील."


" आई अगदी बरोबर...आयुष्यात कितीही अडचणी आल्या, असं वाटलं की आता जगण्याचे पूर्ण मार्ग बंद झाले, जिकडे बघावे तिकडे केवळ काळोख दिसला तरीही  आपण हिमंत न हरता आयुष्याशी लढले पाहिजे कारण जीवन जगण्यासाठी एक आशेचा किरण पुरेसा असतो."


आणि त्यानंतर रागिणी ने मागे वळून बघितले नाही. तिने स्वतःच्या हिंमतीवर लेकीला स्वतःच्या पायावर उभं केलं. खरचं अडचणी,संकट  आयुष्यात राहतात पण आपण त्याला न जुमानता आयुष्यातील आनंद हा वेचून घेतला पाहिजे कारण प्रत्येकाच्या आयुष्यात आशेचा किरण हा हमखास येतोच. 

समाप्त....
माझी ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे. कुणाचे मन दुखवण्याचा काहीही हेतू नाही. कथा कशी वाटली? नक्की अभिप्राय द्यावा ही विनंती. धन्यवाद!
©®कल्पना सावळे



🎭 Series Post

View all