विधवा ( भाग १)

विधवा होणं न होणं हे स्त्रीच्या हातात मुळीचं नसते मग तरीही तिला ह्याची शिक्षा का भोगावी लागते?


रागिणी आणि राघव याच लव्ह मॅरेज. गेली पाच वर्षे झाली एकाच कंपनीत कामाला होते. सुरुवातीला अगदी हिंदी सिनेमात घडावं तसचं घडलं. आधी छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं मग हळूहळू मैत्री मग जिवलग मित्र आणि शेवटी ते कधी एकमेकांच्या प्रेमात पडले कळलंच नाही.

खरं तर दोघांच्या घरून लग्नाला परमिशन नव्हती. रागिनीच्या घरच्यांना राघव पसंत नव्हता तर राघवच्या घरच्या लोकांना रागिणी.

पण दोघांनी प्रेमाच्या पुढची पायरी ओलांडली होती. रागिनीची बदनामी होऊ नये म्हणून दोघांनी घरच्यांचा विचार न करता कोर्टात जाऊन लग्न उरकले.

दोघांचा संसार सुरू झाला.

" राघव...अरे, मला असं वाटते की आपण लग्न करून चूक तर नाही केली ना?"


" चूक! आता लग्नाला सहा महिने होत आहेत आणि तुला असं वाटते."

रागिणी पोटावरून हात फिरवत म्हणाली,

" अरे आपलं काही नाही पण हा जीव जगात आल्यानंतर  त्याचं जग म्हणजे फक्त  आपण दोघेच ना. आपल्या घरचे कुणीच तयार होणार नाही पुन्हा एकत्र यायला."


" ते माहीत आहे मला, पण जर का हे लग्न नसत केलं तर तुला उत्तर द्यावी लागली असती जगाची, तुला त्रास झाला असता. मग आपण जे काही केलं ते अजिबात चुकीचं केलं नाही मी यावर ठाम आहे."

राघव गेला आणि मस्त गरमा गरम चहा करुन घेऊन आला.


" हे घे चहा..."

" अरे मला कॉफी हवी होती."

" नो... तू नाही घेऊन शकत कॉफी."


" अरे वा!!! हे खाऊ नको...ते खाऊ नको बरीच माहिती गोळा केली वाटतं."


" मग तुला काळजी नाही पण मला आहे म्हणून गरोदर पणाची माहिती घेत असतो मी. चल उठ आता जरा फ्रेश हो. असा मरगळलेला चेहरा मला नाही आवडत माणसाने कितीही त्रास असला, दुःख असलं तरीही हसत राहीलं पाहिजे. जा जरा मेकअप करून ये. "

" अरे!!!! मी एवढी दमली आणि तुला काय रेडी हो."


" ऊठ गं..."

रागिणी रेडी झाली मग डॉक्टर कडे गेले. बाळाचं वजन थोडं कमी होतं म्हणून डॉक्टरांनी तिला जरा आराम करायला सांगितले.

घरी येताना...

" रागिणी तुला राग येणार नसेल तर प्लिज तू घरी थांब ....सोड ती नोकरी."


" रागाचं नाही रे पण आपण जे घर घेतलं त्याचा हप्ता ,परत दवाखाण्याचा खर्च हे सगळं होईल का मॅनेज?"


" होईल ना.... का नाही होणार? खर्च करण आपल्या हातात आहे आणि आता बाळ येणार आहे तर आपल्याला बचत ही करावीच लागेल. मला तर सुंदर अशी तुझ्यासारखी परी पाहिजे म्हणजे नटुन थटु हमन माझ्या मांडीवर बसून हक्काने रागावणारी, मस्त्या करणारी."


"हा बस झाला ..हवेत उडू  नका..खाली उतरा.. गाडी चालवत आहे याचे ध्यान ठेवा."


"हो गं...मी काय लहान आहे का आता?"

" नाही तर काय सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात. बाळ झालं की कोण लहान आणि कोण मोठं काहीच कळणार नाही."

एवढं बोलून रागिणी हसायला लागली.


" बस झालं रागीनी हसणं, थांब तीन महिने  एकटी पडणार बघ आता तू."


" शक्यचं नाही, तू वाट बघ."


आणि अचानक एक भरभाव गाडी यांच्या गाडीच्या दिशेने आली.तिचा स्पीड खूप जास्त होता आणि तिचा लाईट डायरेक्ट डोळ्यावर आल्याने राघवला  पुढचं काहीच दिसलं नाही.

मागे बसलेली रागिणी ओरडली,

" राघव... राघव.... थांब राघव....अरे ब्रेक लाव...थांब राघव..."


" आईsss...."

आणि क्षणात दोघांचे आवाज बंद झाले. रागिणी साइडला पडली तर राघव खूप पुढे जाऊन पडला. रागिणी बेशूद्ध पडली. राघवच्या डोक्यातून, कानातून, नाकातून रक्त वाहत होतं.

ती गाडी चक्क  पुढे जाऊन एका गाडीवर आदळली. अपघात एवढा भीषण होता की बघण्यार्याचा हृदयाचा ठोका चुकला.

वाचतील का दोघे या अपघातात का नाही?  बघूया पुढच्या भागांत. तुम्हाला काय वाटतं ते ही नक्की कळवा. धन्यवाद!
क्रमशः
©®कल्पना सावळे

🎭 Series Post

View all