विभक्त भाग ५४

In this part mihir alone went to USA

विभक्त भाग ५४

क्रमश : भाग ५३

मिहीर गाडी चालवत होता आणि सायली बाजूला बसली होती . जसा बाहेर रस्ता सामसूम होता दोघेही गाडीत एकदम शांत होते .. सायली च्या डोळ्यातले अश्रू मध्ये मध्ये टपकत होते ..

मिहीर " अग  आता कशाला रडतेस ? आता झालाय सगळं प्रॉब्लेम सॉल्व .. तुझ्यात डोळ्याने तू बघितलेस ना "

सायली " हमम.. कधी कधी आपल्या बरोबर काय होईल याचे काही नेम नाही .... "

मिहीर " अग .. इट्स ऑल अबाऊट फेझेस ऑफ लाईफ .. ह्या सगळ्या परीक्षा असतात .. त्यात आपण कसे तरतो हे महत्वाचे . "

सायली "हमम.. मिहीर आय लव्ह यु .. मला माहितेय हि वेळ कदाचित हे बोलायची नाहीये  .. पण आज ना मला खरंच असे बोलावे वाटतंय .. या सगळ्यातून मला एक नक्कीच कळले कि वेळोवेळी आपण आपले प्रेम व्यक्त केले पाहिजे आणि हि काळाची गरज आहे .. शब्दांनी नाही जमले तर आपल्या कृती मधून  तरी नक्कीच करावे .तसे नाही केले तर  मग गैरसमज होत जातात आणि ते वाढत जातात आणि त्याचे एक्सट्रीम रूपांतर हे अश्या पद्धतीने होते ..  भांडताना मोठे मोठे शब्द मोठया आवजात बोलतो पण हे तीन शब्द कानात सुद्धा बोलत नाही .

मिहीर " गुड.. सायली .. तुझ्यात होणार बदल मला आवडतोय .. आज मी सकाळ पासून बघतोय तू तुझ्यात जे बदल केलेस ना ते खूप छान आहेत ..

सायली " सकाळ पासून ?"

मिहीर " हे बघ .. मी जेव्हा तुला सांगितले कि मला USA ला जायला लागणार आहे .. तेव्हा आधी सांगायच्या आधी मला खूप टेन्शन आले होते कि तू कसे रिऍक्ट करतेस .. कारण मी लग्न झाल्या नंतर पासून बघतोय तू थोडी इमोशनल झाली होतीस . तुझ्या डोळ्यातून क्षणो क्षणी पाणी यायचे आणि माझ्या बाबतीत पण तू जरा  हळवी झाली होतीस ..  सारखी म्हणायचीस कि तू मला सोडून नाही ना जाणार .. आणि रडायचीस .. त्यामुळे खूप विचार केला कि  तुझ्याशी कसे वागावे .. आणि मी ठरवून टाकले कि सारखे माऊ .. माऊ तुला करायचे नाही .. मुद्दामून कधी कधी मी हार्श पण बोलतो .. आणि हा मी माझ्यात बदल केल्यामुळे तुला पण त्याची सवय झाली मग थोडी थोडी टफ झालीस .. आज कशी म्हणालीस "तू इकडचे  टेन्शन नको घेऊस .. आम्ही इकडचे मॅनेज करू ? नंतर काल मी तुला प्रश्न विचारला कि मी माझी गर्लफ्रेंड असली तर .. तर तू बोललीस मी माझी समर्थ आहे .. तुझा मार्ग मोकळा आहे .. आय एम रिअली  इम्प्रेस्ड विथ दयाट अन्सर  "

कसे आहे ना माऊ .. आपले प्रेम हि आपली ताकद असली पाहिजे . स्वतःचा किंवा दुसऱ्याचा विकनेस नसला पाहिजे . उद्या जर मला काही झाले आणि मी तुझ्या बरोबर नसलो तर .. सायली ने त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि त्याच्या दंडावर मारू लागली ..

सायली  " गप रे .. मान्य आहे कि स्पष्ट बोलावे पण इतके स्पष्ट बोलायची गरज नाहीये . "

मिहीर " आता बघ विनय अजिबात मागे वळून बघणार नाही .. त्याचे दिवस पालटतील . "

सायली " तसेच होऊ दे रे .. आज मला खूप रिलॅक्स वाटतंय  .. बॅक ऑफ द  माईंड माझ्या डोक्यात नेहमी ताईचा विचार चालू असायचा .. तिला आंनदी पाहण्यासाठी काय करू असेच वाटत राहायचे .. "

मिहीर " हमम.. चला झाले ते बरे झाले .. एन्ड इज  वेल देन ऑल इज वेल "

सायली " एस.. इट्स टाईम टू सेलीब्रेट "

मिहीर " च्यायला आपला काय लोचा आहे ते माहित नाही आपण प्लॅन काय करतो आणि होते काय ?"

सायली पण हसायला लागते .

मिहीर " अरे .. बघ आता यात मी काय केले का ? मागच्या वेळी पण असेच झाले ?तुला वाटले कि मुद्दामून केले "

सायली " हमम.. आय थिंक दयाट राईट टाईम यट नॉट कम "

मिहीर " तशी अजूनही वेळ गेलेली नाही .. "

सायली " नको आज नको आता .. आपण खूप दमलोय .. "

मिहीर काहीच बोलला नाही .. बोलता बोलता ते दोघे घरी आले .. दोघेही गप्प होते ..पण घरात आल्यावर एकदम ऍक्टिव्ह झाले .. दारा जवळच दोघे एकमेकांच्या बाहूपाशात गेले .. मिहीर म्हणाला तसा आज कोणाला कोणाची परमिशन घायवी लागली नाही .. का वाट बघावी लागली नाही .. दोघांनी एकमेकांकडे स्वताला झोकून दिले ..

' खरं तर हे दोघे होते इंजिनिअर पण पुढील दोन दिवस ते इकॉनॉमिक्स चा अभ्यास करत होते . लॉ ऑफ डिमांड , लॉ ऑफ सप्लाय .. फायडींग ब्रेक इव्हन पॉईंट , मार्जिनल युटिलिटी , लॉ ऑफ डिमीनीशींग डिमांड वगैरे वगैरे .. या शिवाय  टू एन्हान्स क्वालिटी ऑफ प्रॉडक्ट त्यांनी प्लेस चेंज करून चेक केल्या कधी बेड , कधी सोफा , कधी किचन ,कधी टेरेस ..असो .'.

 मिहीर ने विमल मावशींना दोन दिवस सुट्टी देऊन टाकली. दोघे मिळून जेवण बनवायचे .. दोघे मिळून खायचे .. वाटले तर बाहेरन  आणायचे. सायली जेवढे शिस्तीचे जीवन गावी जगून आली होती याच्या विरुद्ध जीवन आता ती इकडे जगत होती ..

मिहीर " सायली .. तू मला एकदा मूर्ख म्हण ना "

सायली हसायला लागली .. " हे काय नवीन आता .. उगाच .. मी  का बोलू तुला मूर्ख "

मिहीर " बोलतर मग सांगतो कारण "

सायली त्याच्या कानाजवळ गेली आणि हळूच म्हणाली .. माझा मूर्ख शहाणा नवरा .. लव यु .... आता कारण सांग "

मिहीर " मी जास्तीचा शहाणपण करून माझ्याकडे असलेला खजिना वापरला नाही म्हणून "

सायली  " काय रे .. पण आता पुरेपूर बदला  घेतला आहेच च कि "

असो फायनली दोघांना त्यांचे विभक्तपण संपवायचा मुहूर्त मिळाला होता .

दोन दिवसन्नी त्यांचे ऑफिस सुरु झाले .. दोघे नेहमी प्रमाणे खटाखट टायर होऊन ऑफिस ला गेले . सायलीने तिच्या डायरेक्टर सरांशी डिस्कस केले कि असा माझा नवरा एक वर्षांसाठी USA ला जातोय .. त्याचे  जिकडे पोस्टिंग आहे तिकडे आपल्या कंपनीचे ऑफिस आहे .. तर मला पण एक वर्ष साठी जायला मिळेल का ? डायरेक्टर सर म्हणाले कि मी चेक करून सांगतो पण त्याचा परिणाम अस होईल कि तुझे त्या वर्षाचे प्रोमोशन होल्ड केले जाईल . कारण दोन पैकी एकच मिळू शकेल एक तर पोस्ट मध्ये प्रोमोशन किंवा मग ऑनसाईट बेनिफिट .

सायली " हो .. चालेल सर .. मला फक्त हि वेळ मॅच करायाचिय .. प्लिज लुक इंटू धिस "

डायरेक्टर सर " ओके इ विल चेक अँड रिव्हर्ट "

सायली खूप खुश होती .. हे काम जर झाले तर किती मज्जा येईल .. दोघे एकदम तिकडे ऑनसाईट .. म्हणजे एकमेकां पासून लांब पण राहायला नको आणि मिहीर ची ला एकट्याला पण जायला नको .. हे गणित जमायला पाहिजे .. या साठी ती मनोमन प्रार्थना करत होती . तसा सायलीचा परफॉर्मन्स वर कंपनी एकदम खुश होते आणि अशा एम्प्लॉयी ला रिटेन करण्यासाठी त्यांना ऑनसाईट चे लालूच दाखवत असतेच .

तरी पण मिहीर ने घरी शिशिर दादाला आयडिया देऊन ठेवली कि असे असे मला कदाचित USA या जावे लागेल .. सायलीचे आई बाबा आहेतच पण पूर्ण वर्षभर आई कडे राहण्यापेक्षा तुम्ही लोक थोडे थोडे दिवस आलात तर टाईम छान निघून जाईल . शिशिर ने पण त्याला सांगितले तू बिनधास्त जा .. मी लता ला पाठवीन .. थोडे दिवस आई जाईल .. मिहीर ची प्लॅन तयार होता

मिहीर ची जायची वेळ जवळ येत होती .. तशी अस्वस्थता वाढत चालली होती .. सायली बोलली होती मोट्या थोंडाने आम्ही एकदाचे मॅनेज करू पण दोघांनाही हे एक वर्ष काढणे म्हणजे एक परीक्षच होती .

सायली ला अजून तिच्या सरांनी काहीच कॉन्फर्मेशन दिले नव्हते .. ती अप्लाय रोज जाऊन विचारून यायची . मिहीर पण आतुरतेने रोज विचारायचा .. काही कळले का ? शेवटी त्याचे फ्लाईट बुकिंग पण झाले .. हिचे काही फिक्स झाले नाही . आता दोघांनाही कळून चुकले होते कि हे सक्तीचे विभक्तपण स्वीकारावेच लागणार आहे .. सायलीला जॉब सोडून द्यावा असे रोज वाटू लागले .. पण मिहीर तिला थोपवून धरत होता .. तसे बघितले तर एक वर्ष म्हणजे फार मोठा काळ नव्हता . तरी पण  एका घरात राहून विभक्त राहणे वेगळे आणि असे विभक्त राहणे वेगळे .

मिहीर चा जायचा दिवस आला . त्याला बाय करायला गावावरून सगळे आले .. जेवढा आनंद होता तेवढाच मिहीर आता एक वर्षभर भेटणार नाही याचे सर्वांना दुःख होते . शरद ने सर्वांना सांगून टाकले " सायलीची काळजी करू नका .. ती लग्ना आधी जशी तिकडून काम वर जायची तशी ती आता पण जाईल आणि तुम्ही पण तिला भेटायला येत जा तिकडे .."

घरात सगळे आलेले .. या दोघांना एकमेकांकडे बघायला पण वेळ आणि एकांत मिळत नव्हता . सायलीने आणि मिहीर ने मिळूनच त्याचे पॅकिंग केले होते ..

मिहीर " तू येशील ना .. मी वाट बघतोय तिकडे .. हे बघ .. मी तिकडे गेलो कि मला घर आणि गाडी मिळेल .. मी थोडा सेट झालो कि तू सरळ ३ मन्थस ची सुट्टी घे .. तुझी सुट्टी फिक्स झाली कि मला सांग मी टिकेट्स बुक करून पाठवीन .. आणि मग ऍटलीस्ट ३ महिने तरी आपण तिकडे काढू .. "

सायली " हो .. नक्की .. मी सांगते तुला .. मी तुला तिकडे भेटायला येणार हे नक्की .. प्रॉमिस "

सध्या तूर्तास कमीत कमी 3 महिन्यांचा तरी प्लॅन करून ठेवला होता दोघांनी . सगळे जण मिहीर ला सोडायला एअरपोर्ट ला गेले .... सावकाश जा .. नीट राहा .. काळजी घे .. अशा सूचना चालूच होत्या .. मिहीर सगळ्यांचे ऐकत होता पण त्याचे सगळे लक्ष सायलीच्या डोळ्यांकडे होते .. सायलीने पण मन घट्ट करून तिचे अश्रू दाबून ठेवले आणि त्याला हसत हसत पाठवले .. जसा मिहीर एअर पोर्ट च्या आत गेला  तसा मात्र तिचा तोल गेला .. आणि मग जी शोभा च्या गळ्यात पडून ती रडलीय ... ते विचारूच नका .. तिच्या कडे बघून सर्वांचेच डोळे पाणावले ..

मग काय थोडे दिवस सर्वच जण थांबले .. सायलीला कंपनी द्यायला ..मग सायली म्हणाली मी आई कडे  कडे जाते .. तिकडूनच ऑफिस करेन.

विमल ताईंना सांगून घर स्वच्छ करून . प्रॉपर बंद करून सायली तिला जे पाहिजे ते सामन घेऊन  आई कडे राहायला आली .. मिहीर चे कॉल्स चालू होते .. मी पोहचलो .. आज गाडी मिळाली .. आज ऑफिस चा  पहिला दिवस आहे .. दोघे तासन तास व्हिडिओ कॉल वर बोलत  बसायचे. मिहीर रोज विचारायचा .. सुटी टाकलीस का ? लवकर ना माऊ ? काहीतरी फिक्स कर ना .. म्हणजे मला प्लॅन करता येईल "

सायली " हो .. सांगते .. मी पण रोज डायरेक्टर सरांना रोज विचारते .. "

शेवटी एक दिवस सायलीने डायरेक्टर सरांना सांगितले

सायली " सर .. एक तर माझी सुट्टी सॅंक्शन करा .. किंवा मला USA ला ऑनसाईट पाठवा नाहीतर माझं रिझाईन घ्या .. मला USA ला जायचच आहे

डायरेक्टर " आय थिक डोन्ट मेक एनी डिसिजन इन हरी .. रिझाईन विल डिस्ट्रॉय युअर करिअर "

सायली " नो सर यु आर नॉट अंडरस्टॅण्डिंग मी .. धिस इस अफेक्टइंग माय पर्सनल लाईफ "

शेवटी सायलीने रिझाईन हा शब्द काढल्यावर डायरेक्टर सरांनी सायलीला USA  internal tranning च्या नावाखाली ऑनसाईट ला पाठवायची तयारी केली ..

सायलीने लगेच मिहीर ला सांगितले .. “आय एम कॉमिन्ग .. वेट फॉर मी”

🎭 Series Post

View all