विभक्त भाग ३७

In this part sayli and mihir enjoying their trip

विभक्त भाग ३७

क्रमश: भाग ३६

बोल बोलता शुक्रवार येऊन पोहचला . मिहीर ने तर आजची पूर्ण दिवसाची च सुट्टी टाकली होती . सायली ने काल रात्री जागून तिची बॅग भरून ठेवली होती आणि सकाळी उठून ऑफिस ला गेली होती . तोपर्यंत मिहीर ने गाडीत पेट्रोल , हवा , थोडी कॅश  तयारी झाली . सायली पण ठरल्या प्रमाणे वेळेत आली आणि दोघे जेवून दुपार घरातून बाहेर पडू  लागले.

सायली " मिहीर , हि माझी बॅग घे ना .. मला उचलत नाहीये "

मिहीर "  आलो आलो .. करत तिच्या रूम  मध्ये गेला  . बघतो तर सायली एकदम खटखट तयार . शॉर्ट जीन्स त्यावर मस्त व्हाईट त शर्ट हाय पोनी आणि त्यावर शूज ..

मिहीर ने तिला बघून एक शिटी वाजवली ..

सायली " गप रे .. बॅग उचल "

मिहीर ने बघितले सायली मॅडम ने २० kg  ची मोठी बॅग भरली होती .. तो उचलायला गेला तर त्याला पण उचलेना

मिहीर " सायली .. आपण फक्त दोन रात्री साठी जातोय ग .. हे एवढे सामान काय घेतलेस ?"

सायली "अरे .. लागते मला ते सर्व घेतलय .". चल मी पण हात लावते . दोघांनी मिळून ती बॅग जसा शाहरुख  खान बाजीगर मध्ये खुनाची बॅग कशी घसपटवत नेत असतो तशी घसपटवत कशी बशी गाडीत टाकली .

घर बंद करून दोघे मस्त ट्रिप साठी निघाली .गाडीत बसल्यावर सायलीने तिचा गॉगल लावला .. एकदम कातिल दिसत होती

मिहीर " आज काही खरं नाही बुवा .. आणि जे गाडीचा अक्सिलेटर दाबला ते गाडी भूम.. एकदम फास्ट महाबळेश्वर ला निघाली . जाता  जाता   मस्त गाडीत गाणी ऐकत , एन्जॉय करत .. ब्रेक घेत त्याच्या रिसॉर्ट पर्यंत पोहचले .

मिहीर ने एकदम भारी रिसॉर्ट बुक केले होते .. आत मध्ये राहायला रो  हाऊस सारखेच घर होते ..

सायली " अरे ..काय रे आपण दोघे च तर आहोत एवढे मोठे रूम्स का बुक केलेस "

मिहीर " तू बघ तर  .. त्यांची हीच सिस्टम आहे .. अग मोठे मोठे स्टार्स शूटिंग ला आले ना कि इकडे राहतात . त्यामुळे ते त्याच्या घर सारखेच आलिशान आहे . किचन सहित .शिवाय बाजूला च पब , डान्स , रेस्टोरंट , गेमिंग झोन , स्विमिंग , प्ले झोन आणि पार्टी लॉन सगळेच आहे . जे काय करायचंय ते करा .. नाहीतर इकडच्या जवळच्या स्पॉट ला पण जाऊ शकतो . सो इट्स लाइक डेस्टिनेशन होम .

सायली " सही  यार मस्तच आहे .. "

त्यांचे सामान एक माणसाने एक रुम मध्ये नेऊन दिले . मिहीर चे रूमच्या कीज वगैरे घेतल्या .

दोघे फ्रेश झाले आणि आधी बेड वर आडवे पडले .. चार तास ड्राईव्ह करून आल्यामुळे जरा प्रवासाचा शिणवटा जायला पाहिजे होता  तो  आडवा पडला होता . सायलीला जे रेंज मध्ये आल्यावर गीताचे कॉल चालू झाले ते अर्धतास  चालू होते .

सायली " गीता .. आय होप नाऊ एव्हरी थिंग इझ क्लिअर .. आणि फोन कट केला

सायली मिहीर कडे बघून " सॉरी .. ते जरा तिला मेल काय टाकू ते कळत  नव्हतं ना  म्हणून ..सॉरी  आणि ती पण आडवी झाली "

मिहीर " चल . एक राऊंड मारून येऊ आणि येताना रेस्टोरंट ला जेवून येऊ .. "

सायली पण ठीक आहे .. आणि तिचे ती आवरायला गेली .. फ्रेश होऊन मस्त ड्रेस शॉर्ट ड्रेस घालून तयार

दोघे मस्त  आधी रिसॉर्ट्स मध्ये फिरले .. गेमिंग झोन  ला  खुप सारे गेम्स खेळले .  मग एक अर्धा तास पब मध्ये जाऊन आले .. थोडा वेळ मस्त डान्स करून आले ..मग रिलॅक्स मध्ये कॅण्डल लाईट डिनर  करून आले त्यांच्या रूम यामध्ये .. आज त्यांनी खूप सारी मज्जा केली होती .. खूप हसले , खूप खिदळले होते . सायली चे फोटो काढून काढून थकला नाही आणि ती पोझ देऊन थकली नाही ..

मग त्यांच्या रूम  मध्ये आले .. आणि खाली स्विमिंग पूल मध्ये पाय टाकून चिल मारत बसले . मिहीर ने त्याची बाटल्यांची  सोय केली होती. सायली म्हणाली नको मला .. मला दुसऱ्या दिवशी डोकं दुखलं होते मागच्या वेळी सो मला नको

दोघे मस्त गप्पा मारत  होते.

मिहीर " मग मॅडम , उद्या  बर्थ डे आहे ना ... उद्या ची काय स्पेशल फर्माईश ? बंदा आपली खिदमत मी हाजीर है "

सायली " तू एवढी मस्त ट्रिप अरेन्ज केलीस .. अजून काय स्पेशल .. हेच मस्त आहे .. किती तरी दिवसांनी आपण इतके रिलॅक्स झालो आणि मज्जा केली . तुला आठवतंय का सिंगापूर ला पण रिसॉर्ट होते ना मला त्याचीच आठवण आली .. .. तिकडे पण असेच होते सगळे "

मिहीर " हो मला आठवतेय .. आपण तिकडे  धमाल केली होतीस .. म्हणूचच तर मी हे बुक केले . "

सायली " सही .. आधी मला असे वाटले होते कि दोघेच आहोत तर इकडे कशाला .. "

मिहीर " उद्या आपण तिकडे बॅडमिंटन , टेनिस खेळायला जाऊ सकाळी आणि मग थोडे आलोच आहो तर बाहेरचे स्पॉट्स वर पण जाऊ "

सायली " ओकेज .. चल आता आत मध्ये जाऊ .. "

घड्याळात १२ वाजायला आले होते . मिहीरने तिच्या बर्थ डे केक ऑलरेडी फ्रीझ मध्ये आणून  ठेवला . दोघे स्विमिंग पूल जवळ पायांत पाय टाकून आरामात गप्पा मारत बसले होते .

सायली " खूप छान आहे हे रिसॉर्ट .. आणि स्पेशली आपले रो हाऊस तर खत्री आहे . असे वाटतंय आपण स्टार्स लोक आहोत .."

मिहीर  बोलता बोलता वाईन ची बॉटल घेऊन आला .

मिहीर " चल पूल मध्ये उतरू "

सायली " नको .. आत्ता  कुठे? "

मिहीर " काय होतंय ? उद्या आपण बाहेर जाणार आहोत .. एवढा पूल आहे त्याचा आस्वाद न घेताच जावे लागेल .. "

सायली " नको .. नको.. मी नाही उतारणार .. "

मिहीर ने बोलता बोलता सायली ला ग्लास मध्ये वाईन दिली आणि स्वतःला बिअर घेतली . आणि स्वतः पाण्यात उतरला पण

मिहीर " सायली ये ना .. मज्जा येईल .. "

सायली " नको .. हि वाईन पण नको आणि पूल पण नको "

मिहीर " मग काय उपयोग ? काय झालय तुला ? घाबरतेस कि काय ?"

सायली " अरे .. घाबरत नाही .. "

मिहीर " आता ये नाहीतर मी बाहेर आलो तर तर तुला पाण्यात फेकून देईन "

सायली " तू ना .. ऐकत नाहीस "

मिहीर " अग , हा पूल आणि इतका एकांत परत मिळणार नाही .. इकडे येऊन पाण्यात नाही उ तरलीस तर काय उपयोग या बुकिंग चा .. "आणि एक सूर मारू लागला पाण्यात .

सायली " मला स्विमिंग नाही येत पण "

मिहीर " तू ये .. मला येतंय .. तुला सांगितले ना.. वेळ आली तर मी मरेन पण तुला वाचवेल टायटॅनिक मधल्या जॅक सारखे. "

सायली " झाले तुझं सुरु .. आणि सायली बाई मिहीर च्या आग्रहास्तव पाण्यात उतरायची तयारी करू लागल्या "

मिहीर " किती मन्वयाला लावतेस ग "

सायली " अरे शहाण्या हि वेळ आहे का ? "

मिहीर" एन्जॉय करायला आलोय तर वेळ कसली बघतेस .. जे वाटेल ते वाटेल तेव्हा करायचे हाच तर एन्जॉय असतो ..   

सायली " हम .. आणि सायली पाण्यात उतरली .. काय तिला ऑकवर्ड वाटत होते काय माहित .

मिहीर " तू अशी आज जरा भेदरली आहेस का वाटते ? तुला काही होतय का ?"

सायली " आय डोन्ट नो मला ऑकवर्ड होतंय "

पाण्यात उतरताना तसे होतच .. आणि मिहीर तिला हात देतो .. किती घाबरते . घाबरट "

आणि मिहीर तिचे डोके पाण्यात बुडवले .. आणि वर काढले .. २० सेकण्ड पाण्याखाली जाऊन आल्यावर नख शिखांत पाण्यात भिजली ..

मिहीर " आता बघ , भीती जाईल तुझी "

सायली आधी नुसतीच ओरडत होती पण मिहीर म्हणाला तसे दोघे बराच वेळ पाण्यात होते . मध्ये मध्ये वाईन चा एक सिप घ्यायचा आणि पुन्हा पाण्यात .. नुसता गोधळ घातला त्यांनी . मग मिहीर त्याची पाण्यातली वेगवेगळी स्विमिंग दाखवले .. हीच त्याच्यावर ट्राय असे बरच वेळ पाण्यात डुंबले . मग फ्लोटर वर मिहीर  ने केक आणला आणि पाण्यात केक कापला  . पाण्यात सेल्फी घेतले ..चिंब भिजून  केक कापला आणि खाल्ला .

सायली " मिहीर .. आधी मला खरंच नको वाटत होते .. खूप मज्जा आली .. "

मिहीर " मग .. तुला माहित नाही .. मेरे साथ राहो गे तो ऐसे हि ऐश करोगे "

मग त्यांना जे जे काय करायचे होते ते करून आले बाहेर . . आणि अंघोळ करून रात्री थंडी नको भरायला म्हणून कॉफी करून प्यायले ..

रात्र जागवणे या कामात दोघे हि एक्स्पर्ट होते .

मग पुन्हा कॉफी पिता पिता गप्पा चालूच होत्या .

मिहीर ने सायलीला एक हॅन्ड ब्रेसलेट मंगळसूत्र गिफ्ट म्हणून आणले ते तिच्या हातात घातले .

सायली " वॉव , सही .. काय मस्त डिझाईन आहे .. मस्त आहे रे तुझी चॉईस "

मिहीर " माझी मुख्य चॉईस तर माझ्या समोर बसलीय "

सायली बोलता बोलता लोशन लावत होती स्वतःला .. सायली " मज्जा अली रे .. थँक यु .. पूल मध्ये चिंब भिजून असा केक मी पहिल्यादाच कापला .. आणि हसायला लागली .. आणि ठेव्ढ्यात आली शिंक

मिहीर " डोकं पूस बाई आधी .. अजून उद्याचा दिवस घालवायचाय इकडे "

दोघेही झोपले .. सकाळी जरा आरामातच उठले ..

मिहीर " गुड मॉर्निंग , प्रिन्सेस .. हैप्पी बर्थ डे .. "

सायली " गुड मॉर्निंग .. .. थँक यु

मिहीर " ठीक आहे उठ आता तू आवर , मी  नाश्ता  इकडेच ऑर्डर करतो  मग आपण बॅडमिंटन आणि टेनिस कोर्ट ला जाऊ "

दोघे नाश्ता आणि यावरून टेनिस आणि बॅडमिंटन खेळायला गेले . सायलीने मिहीर ला सपाटून हरवला बॅडमिंटन मध्ये .

मिहीर " अरे .. तू तर चांगली खेळतेस "

सायली " अरे .. तू विसरलास का ? मी शाळेतली स्टेट लेव्हल ची बॅडमिंटन ची चॅम्पियन होते "

मिहीर " सही .. यार .. अजून काय काय हिडन टेलेन्ट आहे  तुमच्या कडे .. " घाम पुसत बोलू लागला ..च्यायला मी समजतोय मी तुला नाचवून नाचवेन हरवेन तर तूच माझा घामट्या  काढलास"

सायली पण पाणी पाणी पिता हसू लागली .. याच अर्थ तू माझे लहानपणीचे फोटो नीट पहिले नाहीस .. कळले का ?

मिहीर " अरे .. आहे माझ्या लक्षात तो व्हाईट ड्रेस वरचा मोठे शील्ड घेतलेला फोटो ना "

सायली " हो तोच .. मग तुझ्या लक्षात कसे नाही राहिले "

मिहीर " अरे मी शिल्ड थोडीच बघत होतो .. लहानपणीची तुला बघत होतो ना .. "

दोघे पुन्हा रूम वर आले .. छान फ्रेश होऊन .. जेवून मग बाहेर एखादा तरी स्पॉट करू म्हणून बाहेर पडले ..

एक दोन स्पॉट , खूप सारे फोटोस , सेल्फि, सिंगल आणि मग आले रूम वर ..

🎭 Series Post

View all