विभक्त भाग २८

In this part back both back to office life

विभक्त भाग २८

क्रमश: भाग २७

सायलीला जे मिहीर ला सांगायचं होते ते तिने त्याला आणि मिहीरला जे सायलीला सांगायचे होते ते तिला  दोघांनी एकमेकांना स्पष्टपणे सांगितले आणि रिलॅक्स झाले . हा मिहीर चा फंडा खूप चांगला होता . बऱ्याचदा असे होते कि जे बोलायचंय किंवा एक्सकॅटली मला  काय पाहिजे हे आपल्या मना  व्यतिरिक्त कोणालाच माहित नसते . कारण जे हवंय ते ते आपण कोणालाच सांगत नाही. किंवा जर सांगितले तर अर्धवट सांगतो पूर्ण नाही सांगत . हुकमी एक्का लपवूनच ठेवतो . त्यामुळे नात्यांमध्ये समज गैरसमज होतात . अपेक्षांचे जाळे विणले जाते आणि मग त्याच जाळ्यात आपण फसून जातो.

साधारणतः एका मुलाला जी स्वप्न पडतात किंवा जी गोल्स असतात तशी  गोल्स सायलीची आहेत. हीच मिहीर ची असती कि मला  कंपनीचा ceo बनायचंय . मला माझं करिअर जास्त महत्वाचे आहे तर कोणाला काहीच ऑब्जेक्शन नसते . पण इथे हि स्वप्नं एका मुलीची आहेत कि जिच्याकडून आधी संसार चांगला कर , मुलं बाळांना सांभाळ , जेवण कर , अश्या अपेक्षा जास्त आहेत . या सगळ्या अपेक्षा चुकीच्या आहेत किंवा ह्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या असंख्य मुली आज जगात आहेत त्या चुकीच्या आहेत असे  म्हणूच शकत नाही . पण सायली या विश्वात  रमणारी नाहीये . तिने खूप  अभ्यास करुन अख्या कॉलेज मध्ये टॉपर होऊन अर्धे जग जिकलंय . इंजिनीयरिंग ला टॉपर असणे सोपे नसूच शकते.

जेण्डर इक्व्यलिटी हा शब्द फक्त तोंडावर फेकला जातो . आज सायलीला वाचताना सगळ्यांना मिहीर जास्त आवडतो . सायली जरा जास्तच शहाणी वाटते . सारखे आपले करिअर करिअर करून आयुष्याची वाट लावून घेईल असेच वाटते .

अशा अनेक सोनिया आज जागा मध्ये आहेत कि त्यांनी लायकी असताना देखील आपले काम सोडून दोन पाऊल मागे  टाकावे लागते .

त्या दिवशी मिहीर ला काही त्या स्पेशल हॉटेल चे बुकिंग मिळले नाही . मग तरीही दोघे संध्याकाळी मस्त तयार होऊन बाहेर फिरायला गेला . छान कॅण्डल लाइट डिनर केले .गप्पा तर विचारूच नका . एक मिनिट थांबत नव्हते . मध्येच हसत होते , खिदळत  होते असे . एकमेकांत हरवले होते .

मग जेवल्यावर त्या टेकडीवर गेले . तिकडे शांत मस्त वाऱ्यावर दोघे निवांत आकाशाकडे बघत बसले . ती जागाच एकदम हेवन होती . माणूस स्वतःला विसरुन जाईल  अशीच होती . मस्त लेट नाईट दोघे घरी आले . तरी त्याच्या गप्पा संपत नव्हत्या . आज खूप बोलत होते . मिहीर मधेच त्याच्या कॉलेज च्या गप्पा गोष्टी सांगायचा  , सायली तिच्या कॉलेज च्या गोष्टी सांगायची . मग कशा मज्जा आली होती . वगैरे वगैरे ..

मग मिहीर ने बिअर ची बॉटल घेतली .सायलीला पण दिली .. सायली आधी नको नको च म्हणत होती .. पण घे ग .. असे गप्पा मारता मारता एखादा सिप घे तुला कळणार पण नाही कधी बॉटल संपली ते . सायली बघ हा नंतर म्हणशील हिला उगाच दिली .

बिअर घेत घेत दोघे अर्धी रात्र झाली तरी बोलतच होते . त्याच्या ओपन टेरेस वर मिहीर ने सरळ एक गालीछा टाकला होता आणि त आकाशाकडे बघत , बिअर घेत ते गप्पा मारत होते . सायलीचे हि पहिलीच वेळ असल्याने तिला थोड्याच वेळात बिअर  चढली . मधेच काय मोठयाने हसायची .. मिहीर तीला बघून खूप हसायचा .. मिहीर ने तिचा एक व्हिडीओ पण बनवला कि काय काय बरळतेय ..

आज प्रकरण सोनिया वर जाम तापले होते . तिला काही कळत नाही .. मूर्ख मुलगी एवढी हुशार पण नोकरी सोडून दिलीन .. मधेच तिला तिच्या आई ची आठवण झाली . मधेच तिला मिताली ची आठवण झाली . मिताली प्रॉब्लेम मध्ये आहे .. विनय कसा वागतोय तिच्याशी हे पण मिहीर ला आज कळले ..

मिहीर ने तिला मुद्दामून विचारले " सायली , तुला मी आवडतो का ग ?"

हे फार चुकीचे करत होता मिहीर तिचे सगळे सिक्रेट्स काढून घेत होता .

सायली " तू ना .. तू तर माझी जान आहेस जान . तुला ना जेव्हा मी पहिल्यांदा पहिले ना तेव्हाच मला तू लै भारी आवडला होतास .. पण तुम्ही मुले ना जर तुम्हला भाव दिला तर लै भाव खाता .. तो विनय नाही का मिताली ला छळतो .. बिचारी .. पण मी बिचारी नाहीये काय ... सांगून ठेवते काय ? तू जर असा दुसऱ्या मुली बरोबर मला  दिसलास ना .. तर तू गेलास ... आणि ती मुलगी तर ढगात पाठवीन तिला .. . तू मला सोडणार नाहीस ना ... आणि त्या नशेत पण तिच्या डोळ्यातून घळघळ पाणी यायला लागले . "

मिहीर " नाही ग राणी , तुला सोडून मी कुठे  जाणार .. "

सायली " गुड बॉय आहेस तू .. यु आर माय स्ट्रेंग्थ . ताकद "

शेवटी मिहीर ने तिला उचलून मधे  बेड वर ठेवले  थोपटून थोपटून झोपवले .. निरागस होती सायली .. कुणा  बद्दल राग नाही द्वेष नाही .. एक निष्पाप जीव  दुसऱ्या निष्पाप जीवाला मिळाला होता .

दोघे शांत झोपले .. सकाळी उशिरा उठले .. सायली तर १२ वाजता उठली . म्हणजे डायरेक्ट दुपारीच . ह्याने पण तिला उठवले नाही .

विमल ताई पण जेवण करून जायच्या .. मिहीर ने त्यांना सांगितले कि उद्या पासून आमचे दोघांचे ऑफिस आहे तर आम्ही सकाळी ९ वाजता  बाहेर पडायचय  त्याच्या आधी दोघांचे डबे आणि नाश्ता झाला पाहिजे त्या हिशोबाने या लवकर ..

मिहीर उठून त्याच्या ऑफिस तयारी करून ठेवत होता . उद्याचा ड्रेस, शूज, टाय , सॉक्स वगैरे .. १२ वाजता सायली मॅडम उठल्या  आणि बाहेर आली

सायली " गुड मॉर्निंग "

मिहीर " गुड आफ्टरनून "

सायली " हो .. ना .. तू मला उठवले का नाहीस "

मिहीर " अरे त्यात काय .. ठीक आहे ना आता उद्या पासून कुठे तुला असे आरामात उठायला मिळणार आहे . आणि काल  आपण रात्र पण जागवली ना "

सायली " किती वाजता झोपलो रे .. मला काही आठवतच नाहीये ..

मिहीर " मी पण कधी  झोपलो मला काहीच कळले नाही .. पण बराच वेळ जागे होतो इतके नक्की "

सायली फ्रेश होऊन आली मग मिहीर ने कॉफी केली ..

मिहीर " आज काय तो आराम करून घे आणि उद्या  ऑफिस आहे तर तयारी  करून ठेव .. ड्रेस वगैरे .. माझी तर झाली .. बॅग्स भरून ठेव . मी विमल ताईंना लवकर बोलावलंय डबा आणि नाश्ता बनवायला . उद्या मी तुला ऑफिस ला सोडेन आणि संध्याकाळी घ्यायाला पण येईन . मग पर्वा पासून पाहिजे तर तू तुझ्या कार ने जा .. पहिला दिवस आहे तर मी सोडेन .

ठरल्या प्रमाणे दुसऱ्या दिवशी दोघे लवकर उठले. दोघे ऑफिस ला जायला छान तयार झाले . सायली पण बॅक टू प्रोफेशनल ड्रेस मध्ये तयार झाली . फक्त एक ऍडिशनल छोटासा  लाल टीका तिने कपाळावर भांगात लावला . त्यात पण ती इतकी सुदर दिसत होती .

मिहीर " आज काही खरं नाही बाबा .. कोणाच्या तरी ऑफिस मध्ये बऱ्याच जणांचा हार्ट फेल होणार आहे "

सायली " हो.. का .. असे काही नाहीये . "

मिहीर " ते कुंकू नाही लवलेस  तरी चालेल तुझ्या ऑफिशिअल अटायर ला सूट नसेल होत तर .. "

सायली " मस्त दिसतंय ..मला  तर खूप आवडलय ."

 दोघे खटाखट तयार झाले डबा  घेतला , नाश्ता घेतला आणि मिहीर ने सायलीला ऑफिस  ला सोडले .

मिहीर पण एकदम नेहमी प्रमाणे छान तयर होऊन ऑफिस ला गेला .

सायली ला ऑफिस मध्ये ग्रँड वेलकम मिळाला . स्टाफ कडून एक मोठा बुके मिळाला . डायरेक्टर सर पण दयायला होतेच . सायली ने फोटोस लगेच मिहीर ला शेअर केले . मिहीर पण व ग्रेट असे रिप्लाय देत होता . त्याला काही नाही .. मित्र फक्त पार्टी दे म्हणून मागे लागले ..

डायरेक्टर सरांनी सायलीला केबिन मध्ये बोलावले आणि एक टास्क समजवून तिला त्यावर प्रेझेंटेशन तयार करून ते प्रेसेंट करायला सांगितले . प्रेसेंटशन वर सायलीचे तर मास्टरी होती . तिच्या इतके बेस्ट प्रेझेन्टेशन कोणालाच येत नव्हते .

गीता " मॅम . एकदम सहि प्रेसेंटेशन झाले . मॅम तुम्ही आल्यावर आपली सगळी टीम एकदम चार्ज झालीय पुन्हा काम करायला . "

सायली " गीता .. ते या मेल च काय झाले .. गीता तीची तारीफ करतेय  ह्याकडे तिचे लक्षच नव्हते . तिला आज काम आणि काम करायचे होते . "

मधेच सायली ला व्हिजन ब्लर झाल्या सारखे झाले . कदाचित बऱ्याच दिवसन्नी ती  काम करत होती ना म्हणून असावे .

मग मधेच उठली . एक ब्रेक घेतला अर्धा काप कॉफी घेतली मग बरं वाटले तिला आणि मग पुन्हा काम करू लागली

दुपार नंतर डायरेक्टर सरांनी तिला मीटिंग ला पुन्हा बोलावले दोघी गीता नि ती गेली . डायरेक्टर सरांनी तिला सांगितले कि सोनिया ची जागा घेण्यासाठी तूच डीझर्विंग कॅन्डिडेड आहेस . उद्या पासून तू सोनियाच्या कामाचा  ताबा घे . मी तुला प्रमोशन चे लेटर तुला नेक्स्ट वीक मध्ये देतो .

सायली खूप खुश झाली ..   एक्ससिटेड .. लग्न करून आल्या आल्या खुश खबर तिला प्रमोशन मिळाले होते आणि एक आठवड्यात ऑफिशिअली डिक्लेअर होणार होते .

सायलीला लगेच मिहीर ला हे सांगायचे  होते पण तिने विचार केला हातात लेटर आले कि मगच सांगावे .

मिहीर चे आपले रुटीन जसे बीफोर मॅरेज होते तसेच आफ्टर मॅरेज पण होते आणि तो पण मॅनेजर तर होता पण असे काही नव्हते कि मला एक वर्षात अमुक एक बनायचंय .. असे काही नव्हते त्याचे . हा पण त्याचे पण कामामुळे प्रमोशन होतच होते जसे नॉर्मली बाकीच्यांचे होते तसेच .

रवी  त्याचा जिगरी दोस्त तो त्याला बऱ्याच  दिवसांनी भेटला . दोघे बराच वेळ काम करता करता गप्पा मारत  बसले होते . रवी पण सायलीची तारीफ करत होता . अरे ते लग्नात वहिनींनी कसली भारी एंट्री घेतली ना .. बघायला जाम भारी वाटले .. वगैरे वगैरे ...

मिहीर पण त्याच्या बायकोच्या तब्बेतीची चौकशी करत होता .

संध्याकाळी मिहीर सायलीला आणायला ऑफिस ला गेला . आणि दोघे दमून घरी आले . विमल ताई संध्याकाळ चे जेवण बनवून , घर आवरून , कपडे मशीन ला लावून निघून गेल्या होत्या . त्यामुळे संध्याकाळी आल्यावर पण फार काही काम नसायचे . फक्त जेव आणि झोपा . मिहीर ने सायलीला सांगितल्या प्रमाणे सायलीला इतर बायकां सारखे काम करावे लागत नव्हते , त्याचे झंझटच त्याने ठेवले नव्हते .

🎭 Series Post

View all