विभक्त भाग २७

In this part mihir and sayali discuss about their family planning

विभक्त भाग २७

क्रमश : भाग २६

सायली आणि मिहीर दोघे आनंदात होते . रिलॅक्स होते . जसा  ट्रेलर सायलीला मिहीर ने दाखवला होता तसेच सिनेमा सुरु झाला  होता . दोघे जॉईन होयच्या आधी एकदा गावी जाऊन आले . वहिनीला पर्स , आई मोबाईल  , तात्यांना छत्री आणि शिशिर ला टि शर्ट मुलांना खेळणी ,आणि चॉकलेट्स घेऊन आले . सर्वांना भेटले आणि  लगेच एक रात्रीत परत  गेले.

एक दिवस सायलीच्या घरी गेले . शोभा शरद ला भेटले त्यान्ना गिफ्ट दिली चॉकलेट्स दिले  ,  मिताली ला विनय ला चॉकलेट्स आणि गिफ्ट दिले . सायलीचे काय जे सामान घ्यायचे होते ते घेतले आणि आले .

सायली बेडरूम मध्ये लॅप टॉप वर मेल्स चेक करत होती आणि हा बाहेर बसून त्याचे मेल्स चेक करत होता . ऑफिस सुरु होयला दोन दिवस राहिलेत तर थोडा मेल्स बघितलेले बरे या होशोबाने दोघे कामाला लागले .

तेवढ्यात रवि चा  फोन  मिहीर ला आला

रवी " हॅलो , अरे मिहीर फ्री आहेस का ?"

मिहीर " हॅलो .. बोल ना .. तुझ्या साठी एनी टाईम फ्री रे .. बोल "

रवी " अरे .. माझी इकडे जाम वाट लागलीय "

मिहीर " काय झाले ?"

रवी " अरे .. काय नाही रे दवाखान्याची किट किट लागली . तिकडे ऑफिस मध्ये तू नाहीस  तर सगळे माझ्यावर प्रेशर टाकतात "

मिहीर " झाले रे आता येतोय २ दिवसात . साल्या रडू नको "

रवी " अरे कामाचे काही नाही रे .. इकडे घरी पण वाट लागलीय "

मिहीर " काय ? वाहिनी ठीक आहे ना ? "

रवी " अरे तेच तर ना .. बिनडोक आहे ती .. "

मिहीर " काय झाले नीट सांगशील का ? "

रवी " अरे ते बाजारात  एक गोळी मिळते ती खाल्ली कि प्रेग्नसी रहात नाही . संगीताने  मला न सांगता त्या गोळ्या दोन वेळा खाल्या . आता तिच्या गर्भाशयाला सूज आलीय .. मग सारखी सोनोग्राफी  , शिवाय प्रेग्नसी रहात नाहीये ते वेगळीच कथा . माझी आई तर तर तुला माहितेय .. आठ महिने झाले अजून कशी प्रेग्नेंट नाही राहिली म्हणून ती डोके खातेय आणि इकडे हा गोधळ हिने घालून  ठेवलाय .अरे माझे पण अरेंज मॅरेज होते ना आता सुरुवातीला या विषयावर आपण बोलतो का ? मी पण नाही बोललो आणि ती पण नाही बोलली .. T.V वर ऍड बघून हिने गोळ्या खाल्ल्या . "

मिहीर " अरे तू चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जा  आधी  वहिनीला .?"

रवी " अरे तेच तर ना .. मला  १ लाख रुपये ट्रान्फर कर ना मला कमी पडतायत . पगार झाला कि देतो तुला .. तिलाच घेऊन आलोय या मोठ्या हॉस्पिटल ला "

मिहीर " ठीक आहे .. लगेच पाठवतो "

रवी " ठीक आहे .. चल बाय बोलू मग निवांत .. तुझे कसे चाललंय ?"

मिहीर " एकदम मस्त .. बोलू मग नंतर "

मिहीर च्या डोक्यात धोक्याची घंटा वाजली . वेळ जायच्या आधी सायलीला याची कल्पना द्यायला हवी असा त्याने विचार करून ठेवला .

इकडे सायली जे ऑफिस च्या कामात घुसली ते बघायलाच नको . ती एक एक मेल इतके डिटेल मध्ये चेक करत होती . प्रत्येक मेल चे नोट्स लिहीन ठवून क्रॉस व्हेरिफाय करत होती .

तिने गीता ला दोन तीन मेल्स पाठवले म्हटल्यावर गीताने सायलीला फोन केला

गीता " हॅलो मॅडम, बॅक टु वर्क का ?"

सायली " एस .. जस्ट मेल्स बघतेय ग “

सायली "  गीता,  आता मी एक महीन्याचे सर्व मेल्स चेक केले . त्यात २० मेल्स असे आहेत कि त्याचे आपल्या कडून प्रॉपर रिप्लाय दिला गेलेला नाहीये . त्यातले ५ राहुल कडून रिप्लाय न आल्यामुळे आहेत २ मीरा कडून अपडेट्स न घेतल्यामुळे राहिलेत आणि..

गीता " हो मॅडम तुम्ही ते मेल्स मला सगळे फॉरवर्ड केलेत ते मी आज बघून घेते . मॅडम तुम्हला एक सांगायचं होते . सोनिया लेफ्ट द  जॉब"

सायली " व्हॉट ? का? काय झाले ? अरे शी वॉज  डॅम गुड . काय झाले ग . सडनली का सोडला . ती तर HOD होती ना .. "

गीता " काय डिटेल्स मला  नाही कळले . एवढच कळले कि शी  इझ  प्रेग्नेंट सो शी लेफ्ट ."

सायली " हाऊ पथेटिक यार .. गेल्याच वर्षी लग्न झालेय तर लगेच काय नंबर लावला ..स्वतःचे नुकसान करून घेतात यार या मुली .. आता ती या वर्षी बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये गेली असती जर प्रोमोशन मिळाले असते तर आणि ती मोस्ट डिझर्विंग कॅन्डिडेड होती . मला  खूप वाईट वाटतंय तिच्यासाठी .. "

गीता  " मॅम , तुम्ही कधी २ दिवसांनी येताय ना कन्फर्म ,डायरेक्टर सर विचारत होते तुम्ही कधी  जॉईन होणार आहात "

सायली " येस .. कन्फर्म आफ्टर २ डेझ "

सोनिया ची   बातमी ऐकून  सायली जरा मनातून हादरलीच . कमीत कमी दोन वर्षे तरी आपण प्रेग्नेंट राहिलो नाही पाहिजे अशी घंटा हिच्या डोक्यात वाजली . आणि हि गोष्ट आता तिला मिहीर ला सांगायची होती .

दोघांना आपला लॅपटॉप बाजूला ठेवला आणि विचार करत होते .

सायली बाहेर आली " मिहीर , कॉफी घेणार आहेस का ?"

मिहीर " चालेल "

सायली मस्त कॉफी करून दोघांना घेऊन आली .

सायली " मिहीर , दोन दिवसांनी आपले जॉइनिंग आहे .. एकदा का कामात घुसलो कि आता सारखा वेळ नाही मिळणार . तुझे काही महत्वाचे नसेल तर जाऊ कुठेतरी मस्त चिल मारू"

मिहीर " अरे वाह .. चिल मारू म्हणजे काय माहिते का ? "

सायली " हा .. म्हणजे घुमेंगे , फिरेंगे , मस्ती में  नाचेंगे और क्या "

मिहीर " अरे वाह .. आज मूड सातव्या अस्मान मध्ये दिसतोय "

सायली " नाही .. कंटाळा आला .. सकाळ पासून मेल्स बघत होते .. ४ तास उठलेच नाही ... "

मिहीर " हो .. मी मगाशी डोकावून बघितले .. तर तू खूप बिझी होतीस मग आलो बाहेर परत "

सायली" अरे आवाज द्यायचास ना मग "

मिहीर " आमंच  चिल मारणे म्हणजे काय माहिते य का ?

सायली " माहितेय .. बिअर .. "

मिहीर " आयला तुझा चांगलाच अभ्यास झालाय ग माझ्यावर "

सायली " मग माझे पूर्ण लक्ष आहे तुझ्यावर ? तुला काय  वाटले "

मिहीर " थँक गॉड .. माझ्यावर लक्ष आहे "

मिहीर "आणि एक ना तुझ्या शी महत्वाचे बोलायचं मला "

सायली " ओके.. गो अहेड "

मिहीर " अरे तू काही गोळ्या  तर नाही घेत आहेस ना ? "

सायली " नाही .. आय आम परफेक्टली ऑल राईट . माझी कोणतीच ट्रीटमेंट चालू नाहीये "

मिहीर " अग , वेडा  बाई प्रेग्नसी राहायला नको म्हणून ज्या तुम्ही मुली घेता तसल्या गोळ्याचे म्हणतोय मी "

सायली " ओह , अच्छा .. "

मिहीर " काय अच्छा , घेतेस का ?"

सायली " नाही ..

मिहीर " अरे माझ्या एक मित्राचा फोन आला होता मला .. त्याच्या बायकोने कसल्या तरी गोळ्या घेतल्या आता त्याला खूप प्रॉब्लेम होतोय . म्हणून तुला सांगतोय . कळले का ? आणि हो मी म्हटल्या प्रमाणे तुला आत्ताही सांगतो तू नको ते टेन्शन घेऊ नको . जरी आपल्याला बाळ  झाले ना तरी तुझ्या करिअर वर परिणाम मी होऊ नाही देणार "

सायली  उठली आणि आत मध्ये जायला निघाली .

मिहीर " अरे थांब ना .. हा विषय महत्वाचं आहे "

सायली " हो पण आता मला नाही बोलायचं या विषयावर “आणि बेडरूम  मध्ये गेली

हिला काय बोलायचं आणि त्याला काय बोलायचं दोघांचा विषय परस्पर विरोधी  होते  पण टॉपिक सेम होता.

मिहीर " असे नाही करायचे माऊ .. तू नेहमी वेगळा विषय आला ना कि त्याला फेस न करता अव्हॉइड करतेस .. असे करून कसे चालेल . "

सायली " अरे मला भीती वाटते .. आपली वादावादी होईल या विषय वरून म्हणून त्यापेक्षा न बोललेले बरे असेच मला  वाटते "

मिहीर " वादावादी कशी होईल ? आपण एक टीम असली  तर वादावादि कशी  होईल ?"

सायली " तुला कसे सांगू मिहीर .. "

मिहीर " कस पण सांग पण सांग "

सायली काहीच बोलत  नाही .

मिहीर " बरं एक .. मी आधी बोलतो मग तू बोल .. किंवा तू आधी बोल मग मी बोलतो .. आणि मग कनकलूजन वर येऊ . बोलायला तर लागेल ना "

सायली " पण आत्ताच का ? "अरे अजून एक महिना पण नाही झालाय लग्नाला "

मिहीर " हो पण मी कुठे म्हणतोय कि लगेच बाळ पाहिजे . मी काय सांगतोय ते ऐकून तर घे "

सायली " मिहीर , आता तू काय बोललास ?"

मिहीर " माझा मुद्दा तू पूर्ण ऐकून घेतलासच नाही . त्या कधीच उठलीस बाळा "

सायली " ठीक आहे , तू तुझा मुद्दा बोल मी ऐकते मग मी बोलेन .. ठीक आहे "

मिहीर " ऐक मी काय म्हणतोय .पॉईंट वाईज बोलतोय . मुद्दा एक तू कोणतीही गोळी वगैरे खाऊ नकोस . इन फ्युचर जेव्हा पण आपण बाळाचा निर्णय घेऊ तेव्हा च सांगतोय कि तू असा विचार करू  नकोस कि बाळ झाले तर माझे करिअर वेस्ट जाईल किंवा दुर्लक्ष होईल . मी आणि माझ्या घरातले तुला पूर्ण सपोर्ट करू . हेच सांगायचंय मला मॅडम "

सायली "ओके .. कळलंय मला तुझा  मुद्दा.   माझा मुद्दा हा आहे कि इथून पुढे कमीत कमी २ वर्षे तरी मला आई बनायचे नाहीये . त्यानंतर मी स्वतः एक स्त्री आहे आणि आई बनणे माझा अधिकार तो मी नक्कीच घेणार आहे आणि व्यवस्थित पार पडणार आहे . त्याआधी मला काहीतरी  बनायचंय .आणि हि च ती वेळ आहे कि मी आता करिअर वर कॉन्सनट्रेशन करायची  .. नाकी आई होण्याची    .

मिहीर " ठीक आहे . मी कुठे काय म्हणतोय .. आणि हे मला माहितीच आहे . फक्त अजून एक ऍड करतो कि तुला एकदा नाही दोनदा आई बनावे लागेल .

झाली  का वादावादी ..  "

सायली " दोनदा .. ?"

मिहीर " हो .. दोनदा " आणि मिहीर ने तिला जवळ घेतले . " नुसती लगेच हायपर होते . अग जसे  प्रोफेशनल गोल्स असतात ना तसे फॅमिली गोल्स पण असतात आणि ते हि  फॉलो करावी लागतात . आता तुम्ही ऑफिस मध्ये आधी प्लॅनिंग करता , मग ऍक्शन प्लॅन करता आणि मग त्यावर काम करता ना तसेच आहे हे पण ."

सायली " यार .. मला खूप टेन्शन येते असे वाटते कि माझ्या  ऑफिस मुळे  तुझी नाराजी नको यायला ."

मिहीर " अरे पण .. मी उलट तुला समजून घेतोय तर तू मलाच झापतेस "

सायली " सॉरी .. मी चिडलेली नसते मी घाबरलेली असते , मला काही सुधरत नाही मग . तुला माहितेय आज माझ्या ऑफिस मधली सोनिया नावाची एक मुलगी आह . तिने जॉब चक्क सोडला . तू जर तिला भेटलास ना तर तुला कळेल कि किती हुशार आणि स्ट्रॉंग आहे ती . आणि तिने जॉब का सोडला माहिते कारण ती प्रेग्नंट आहे . आता तिचे जर प्रमोशन झाले ना तर ती बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये सहज गेली असती . करिअर च्या इतक्या पीक वर असताना आई होण्याचा निर्णय घेऊन घरी बसने योग्य आहे का ? तूच सांग "

जाऊदे , मी कशाला सोनिया कडे बघू . माझी सोनी आहे तीलाच बघतो ना त्या पेक्षा " आणि तिला मिठीत घेऊन तिच्या कपाळावर किस केले .

सायली चा राग म्हणा नाहीतर भीती म्हणा मिहीर च्या मिठीत गायब  झाला . हीच तर ताकद आहे प्रेमाची . इथे एकमेकांबरोबर असताना शांती मिळाली पाहिजे  सुकून मिळाला पाहिजे.

🎭 Series Post

View all