विभक्त भाग २४

In this part sayali and mihir first time goes out on his bike

विभक्त भाग २४

क्रमश : भाग २३

सायलीने कसा बसा पण प्रामाणिक प्रयन्त करून तिला सांगितलेले सर्व काही मनापासून केले होते . एक प्रकारे  तीने  तिच्या स्वतःच्या अपेक्षे पेक्षा जास्त करून दाखवले होते . मिहीर च्या मनात प्रेम तर आहेच पण आदर पण वाढत चालला होता . सायली नुसतीच दिसायला गोरी गोमटी आणि वागायला उद्धट किंवा  आपण घेतलेल्या शिक्षणाचा उगाचच गर्व बाळगून नव्हती . गावातल्या लोकांच्या भावनेचा  आदर करून तिने सगळे रीती  रिवाज व्यवस्थित पार पाडले होते .

मिहीर ला याची थोडी फार आधीच कल्पना होती कि लग्नांनंतर कोण कोणत्या दिव्या मधून त्या दोघांना जायचेय . आणि हे सगळे जण एवढे स्वतःचे काम टाकून झटत होते ते त्यांचा संसार सुखाचा व्हावा  म्हणूनच ना .

दुपारी जेवण झाल्यावर मिहीर च्या आई ने दोघांना बोलावले

मिहीर "हा आई बोल "

लीला बाई "मिहीर , आज पासून तुमच्या गृहस्था श्रमाला सुरुवात होणार आहे ."

सायली ला काय बोलतायत ते काहीच कळे ना .. तिला वाटले अजून काहीतरी रीती रिवाज असेल .

लीला बाई "आज पासून सायलीची  सगळी जवाबदारी तुझी असणार आहे . दोघांनी एक मेकांना समजून , एक मेकांच्या साथीने संसार करायचा . थोडे तुझे थोडे माझे असे करून पुढे चालत राहायचं . मिहीर , तुझ्या साठी सायली तिचे जग सोडून आपल्याकडे आलीय तर तिला तिच्या घराची कधीच आठवण आली नाही पाहिजे . तिला सर्व सुख देण्याची जवाबदारी आता तुझी आहे .

सायली फार गुणांची मुलगी आहे , गेले १५ दिवस मी बघतेय कधी त्या पोरीने कुठल्याच गोष्टीला नाराजी नाही दाखवली . आमच्या सारख्या अडाणी बायकांना पण तिने आदरानेच वागवले . "

मिहीर ला पण आपल्या आई चा अभिमान वाटलं ,लिटरली ४ थी  शिकलेली बाई पण आज किती अगाध ज्ञान आहे .  मिहीर आई च्या पाया  पडला . "आई काही चुकलं तर तू आहेसच कि आम्हाला सांभाळायला आणि आई ला मिठी मारली .

सायलीने पण सासू बाईंना मिठी मारली . आयुष्यातला एखादा क्षण असा असतो कि जो नाती खूप घट्ट करून जाणारा असतो ना तसाच हा तिघांच्या आयुष्यातला खास क्षण होता .

लीला बाई "चला तर मग आज पासून सूनबाईंचे सामान तुझ्या रूम मध्ये हलवून  टाका. सायली आज पासून तू मिहीर च्या खोलीत झोपायचं काय ?

सायली ला ह्या काय बोलत  आहेत हे आत्ता कळले आणि हे ऐकून एकदम धडकीच भरली .

सायली "नको , मी आणि सावनी इकडे झोपतो ते ओके आहे .. "

लीला बाई  हसायला लागल्या ..

सगळ्यात जास्त मनात उकळ्या मिहीर च्या मनात फुटत होत्या . पण दाखवत नव्हता . लीला बाईंनी मिहीर ला सांगितले कि तिने आज खीर केली तू जेवलास तू काही दिले नाहीस तिला .

मिहीर "मी पण द्यायचे का ?

लीलाबाई "हो मग , ती तुझे पोट भरवणार आहे रोज . तिचा मान तू तर पहिला ठेवला पाहिजेस ."

मिहीर "ठीक आहे , मग देतो ५०० रुपये .. दादाने पण दिले ना "

लीलाबाई "उगाच नाही हे तुला गधड्या म्हणत .. जा बाहेर हिला फिरायला घेऊन जा .. मस्त आपला गाव दाखव आणि येताना सोनाराच्या दुकानातून काही तरी तिला आवडेल ते घेऊन दे  "

मिहीर "हो .. ठीक आहे "

लीला बाई "सायली .. जा छान तयार होऊन जा .. आणि हो अजून थोडे दिवस नेस साडी .. "

सायली "हो आई ..." आई हा शब्द आपोआप आला तिच्या तोंडून. तिला सांगावे लागले नाही कि सासूबाई नको आई म्हण म्हणून . आई च्या मायेतील ती ताकदच आहे . प्रतेय्क सासू ने जर आपल्या सुने ला पहिल्या  सहा महिन्यात आईचे प्रेम दिले ना तर पुढील पूर्ण आयुष्यात सुना कधीच मुली ची कमतरता त्यांना जाणवू देणार नाहीत .

सायली ने एक मस्त साडी नेसली . मंगळसूत्र आणि हिरव्या बांगड्या तर होत्याच हातात . मेहंदी मात्र गेली होती . थोडी पुसट राहिली होती . पण नवीन नवरीचे तेज होते तिच्या चेहऱयावर आणि मिहीर वर नवरोबाचे तेज होते . दोघे आजू बाजूला उभे राहिले ना कि मस्त जोड दिसायचे .

मिहीर जीन्स आणि टीशर्ट घालून तयार

सायली ला तयार होयला नाहीं म्हटले  तरी अर्धा तास गेला . आणि दोघे घरातून बाहेर पडले .

मिहीर "सायली , बाईक ने जायचे का कार ने "

सायली "ऍज यु विश "

मिहीर "बाईक घेतो . कारण सगळीकडे पार्किंग मिळेल का नाही माहित नाही "

सायली "ठीक आहे "

सायली मिहीर च सपोर्ट  घेऊन बसली आणि दोघे निघाले. सायली काहीच बोलत नव्हती . मिहीर ने एक दोन फॉर्मल प्रश्न विचारले पण तेवढंच उत्तर देऊन गप्प बसायची .

मग मिहीर ने एका टेकडीवरच्या देवळात नेले . तिकडे च दोघे आधी देवाला नमस्कार केला आणि मग एका बाकावर बसले .

टेकडी वर असल्याने एवढी काय गर्दी नव्हती तिकडे एखाद दुसरा माणूस दिसायचा .

तिथे बसून  दोघे बराच वेळ लग्नच्या ,बुलेट च्या , लग्ना नंतर च्या अशा अनेक विषयावर खूप गप्पा मारत बसले , खूप हसले , खिदळले . रिलॅक्स झाले . बऱ्याच दिवसांनी दोघांना एकमेकांचा सहवास मिळाला होता . 

मिहीर "मग काय मॅडम ? कसे वाटतंय आफ्टर मॅरेज लाईफ "

सायली "छान आहे .. "

मिहीर "पण सिरिअसली तुला मानलं पाहिजे . सगळे रीती रिवाज नीट पूर्ण केलेस . आई बघितलिस ना किती खुश होती "

सायली "हो .. घरातली  सर्वजण खूप मायाळू आहेत . मला खूप लवकर मिक्स करून घेतले ""आणि सायली एकदम शांत झाली

मिहीर " हूमम.... आता काय ? काय विचार करतेयस ? एकदम शांत वाटतेस ? आई ची आठवण आली का ?

सायली "अरे , ऐक ना .. तू राग नको मानू पण ते आज पासून मी तुझ्या खोलीत वगैरे नको .. मला  ऑकवर्ड वाटतंय  .तात्यांना काय वाटेल आणि सगळे

आपल्याच बाबतीत विचार करत बसणार .. नकोच ते .. प्लिज तू काहीतरी कर ना .. "

मिहीर "ए नाही रे .. आता आज आई ने सांगितले तर तुला काय प्रॉब्लेम आहे . अरे तुला नीट पहिले पण नाहीये मी लग्न झाल्या पासून "

सायली " अरे हो.. मला थोडे समजून घे ना .. मला खूप ऑकवर्ड होतंय "

मिहीर "अरे .. नवर्याच्या खोलीत यायला काय ऑकवर्ड वाटायचे त्यात ?"

सायली "नाही .. म्हणजे नाही "

मिहीर "सायली यार , तू जास्तीच विचार करतेस .. नवर्याच्या खोलीत जायचा हा पण एक रीती रिवाज आहे माहिते का तुला ?"

सायली "गप रे, यात कसला आलाय रिवाज 

मिहीर "तरी मी म्हटले मॅडम एकदम गप्प का झालीय . तू अशी गप्प झालीस ना कि मला टेन्शन येत . नक्कीच काहीतरी डोक्यात शिजत असते तुझ्या . "

सायली "अरे , सावनी इतके दिवस माझ्या शेजारी झोपतेय आणि आज अचानक मी तुझ्या रूम मध्ये आली कि ती विचारणारच कि काकी आज तू तिकडे का जातेस "

मिहीर "ठीक आहे मी बघतो कसे जमतेय ते ? मी ट्राय  करतो  पण  प्रॉमिस नाही करत .

सायली "ठीक आहे . "

मिहीर जरा नाराज झाला पण नाराज होऊन सांगतो कुणाला .

मिहीर "ठीक आहे चल जाऊ. तुला काय पर्टिक्युलर घ्यायचेय का ?

सायली "नाही काही नाही "

मिहीर " सोनाराकडे जाऊ , काहीतरी एक घेऊन टाक , मग शहरात गेल्यावर मस्त ऑफिस ला जायला तुला एक छोटे मंगळसूत्र घेऊ. "

सायली "अरे .. काही गरज नाहीये आता . एक तर मी दागिने जास्त घालत पण नाही "

मिहीर "मग काहीतरी घ्यावे तर लागेलच .. जाऊन बघू काही आवडले तर घे "

दोघे सोनाराकडे गेले . सोनारा ने तात्यांची सूनबाई आणि मुलगा म्हणून त्यानं कोल्ड ड्रिंक पाजले . नाही नाही करता शेवटी सायलीने एक गळ्यातला  हार घेऊन टाकला . आणि मग आले घरी .

घरी आले तर सायली चे सामान सगळे आधीच मिहीर च्या  रूम मध्ये शिफ्ट करून झालेले .

मिहीर च्या लक्षात आले कि आता उलट विषय काढला कि जास्त चर्चा होणार .

सायली त्याला डोळ्याने सांगत होती तू बोल .. तू बोल .. " आणि ती आत मध्ये निघून गेली

मिहीर ने  आईला त्याच्या रूम मध्ये बोलावले "आई , ते सायली ला माझ्या रूम मध्ये यायला थोडे ऑकवर्ड होतंय . तर तिला तिकडेच राहू दे .. तसेही आम्ही तिकडे दोघेच असणार आहोत तर इथे घरात लहान मुले पण आहेत तर हा विषयच नको .. "

लीला बाई पण विचारता पडल्या .. हे काय नवीनच . दोघेही या गोष्टीला तयार कसे काय झाले ?

मिहीर  त्याचे काम करून मोकळा झाला ..

लीला बाई "ठीक आहे मी बघते . काय करायचं ते "

लीला बाईंनी सायलीला थोडे फ्रेश होऊ दिले आणि मग त्यांच्या खोलीत तिला बोलावले

सायलीने त्यांना मिहीर ने घेतलेला हार दाखवला .. त्या पण .. वाह ,, छानच आहे .

लीला बाई "सायली , काय म्हणतेस ? कसे वाटतंय तुला इकडे ? "

सायली "खूपच छान "

लीला बाई "जर समजा , तुझी आणि मिहीर ची नोकरी नसतीच आणि तुम्ही दोघे शिशिर आणि लता सारखे इकडेच कायमचे राहणारे असता तर तुला आवडले असते का ?"

सायली "हो.. कदाचित आवडलंच असते . "

लीला बाई "म्हणजे मला विचारायचं कि हे घर तुला आपले स्वतःचे घर आहे असे वाटते का ग ? का असे वाटते कि तिकडे शहरात आहे ते तुझं घर आणि हे आपल्या सासू सासर्यांचे घर आहे आणि आपण इकडे पाहुणे आहोत . थोडे दिवसांनी मी माझ्या घरी म्हणजे शहरातल्या मिहीरच्या फ्लॅट वर जाईन "

सायली "नाही असे काही नाही .. म्हणजे हे हि आणि ह्या घरातील माणसे पण माझीच आहेत हे पण मला माहितेय . तुम्ही असे का विचारलेत ? माझे काही चुकले का ?

लीला बाई "नाही . चुकले नाही ..मला आता मिहीर म्हणला कि ते तुला इकडे असताना त्याच्या खोलीत जायला कसंतरी होतंय . "

सायली "हा .. ते .. म्हणजे .. काय बोलावे तिला कळे ना "

लीलाबाई "बरं , मी काय सांगते ते ऐक , आपला असा रिवाज आहे कि जोपर्यंत सर्व देवा धर्माच्या  गोष्टी व्यवस्थित होत नाहीत तोपर्यंत नवरा बायको ला एकत्र ठेवत नाहीत . आता तोपर्यंत तुला आम्ही पाहुण्यांच्या  खोली मध्ये ठेवली होती . आता तू किती दिवस पाहुण्यांच्या  खोलीत राहणार . तुला कधी तरी तुझ्या खोली मध्ये जायलाच पाहिजे ना . होय कि नाही ?. म्हणून तर मी मगाशी म्हटले कि गृहस्थाश्रम सुरु होणार आहे म्हणजे खरी अर्थाने तुमचा दोघांचा संसार सुरु होणार आहे .

सायली "हो .. पण मला ऑकवर्ड होतंय ना तेच तर मी म्हणत होते मिहीर ला "

लीला बाई "अग पोरी तुला  ते ऑकवर्ड होतंय ना त्याला मराठीत आम्ही लाज वाटणे असे म्हणतो . प्रत्येक  नवी नवरीला  सुरुवातीला असे ऑकवर्ड वाटतच असते . तेव्हा काही विचार करू नकोस ती खोली आता अर्धी मिहीर ची आहे आणि पूर्ण तुझी आहे कळले का ? "

सासू बाईंनी सायलीला एकदम साध्या आणि सोप्प्या भाषेत समजावले आणि तिला मिहीर च्या खोलीत जायला तयार केले .

🎭 Series Post

View all