विभक्त भाग ३०

IN THIS PART SAYALI VISIT ALONE IN THE HOSPITAL

विभक्त भाग ३०

क्रमश: भाग २९

मिहीर  आता थोडा  वैतागला " अरे बोल ना .. काय झालय ? कसले टेन्शन आलय ?

सायली " काही नाही रे .. जरा एका कलीग ला झापले मी .. आणि आता मला वाईट वाटतंय .. "

मिहीर " काय सायली .. मला किती टेन्शन येते यार ? हे काय कारण आहे का रडायचे ? तू रडत नको जाऊस यार ..तू आता वॉशरूम मधून बाहेर आलीस तर आत मध्ये रडून आलीस कि नाही . "

सायली " पुन्हा रडायला लागली .. हो .. आता येतंय रडायला तर काय करू ?"

मिहीर " अरे कोण कुठचा तो कलीग त्याच्या साठी आपण रडायचे ? हे काय ? गेला उडत तो ?"

मिहीर ने इतक्या वेळेला तिला विचारले सायली त्याला सत्य सांगूच शकली नाही . ती चक्क त्याच्याशी खोटं बोलत होती .

मिहीर " ते ठीक आहे पण बर नाहीये म्हणजे काय होतंय. "

सायली " काही नाही डोकं दुखतंय "

मिहीर " ठीक आहे मी गोळी घेऊन येतो .. मग तू झोपून जा .. रोज रात्री २ वाजे पर्यंत काम करत बसतेस मग कसे नाही दुखणार डोके "

सायली " हो .. ना .. बहुदा त्या मुळेच असेल. गोळी आहे माझ्याकडे .. मी खाते आणि आज  झोपते लवकर "

दुसऱ्या दिवशी सकाळी सायली आणि मिहीर दोघे ऑफिस ला जायला तयार होत होते . सायली ने  मिहीर ला एक घट्ट मिठी मारली

सायली " सॉरी , मी तुला काल  खूप त्रास दिला ना "

 मिहीर " हम...पण तू मला खरं काय ते सांगितलं नाहीयेस असेच मला वाटतंय  "

सायली " नाही .. असे काही नाही .. कदाचित आई ची आठवण येत होती ना म्हणून असेल "

मिहीर " तुला नसेल सांगायचं तर नको सांगुस .. "

सायली " खरच  काही नाही लपवत आहे .. "

मिहीर " ठीक आहे मग मला असे वाटले असेल . एक सांगू का . तुला जर आई कडेच आवडत असेल तर मी घर जावई पण बनायला तयार आहे "

काही पण असो सायलीच्या चेहऱ्यावर हसू आणतोच तो.

सायली " सॉरी .. "

मिहीर " आत काय ? सॉरी कशाला ?"

सायली " आधीच बोलून ठेवते तसेही मी तुला त्रास देतच असते ना .."

मिहीर " नको ग नको .. सॉरी नको बोलूस .. कशाला जातेस आई कडे  मला सोडून "

सायली " अरे .. दोन दिवसात तर येणार आहे ना "

मिहीर " ठीक आहे .."

सायली च्या डोक्यात काही तरी वेगळाच प्लॅन तयार झाला होता .

सायलीने मनातून ठरवले होते कि आज ती  पुन्हा डॉक्टर कडे जाईल स्वतःवर ट्रीटमेंट करून घेईल आणि रात्री झोपायला आई कडे जाईल . दोन दिवस आई कडे गेली आणि पूर्ण बरी झाली कि इकडे येईल म्हणजे मिहीरला यातलं काही कळणार पण नाही .. 

मिहीर " हॅलो ... काय करतेस ? कसला विचार करतेस ? काय कळत नाही बाबा तुझे ?"

सायली " नाही .. काही नाही .. "

शेवटी मिहीर ने तिला बेड वर बसवले आणि तो खाली बसून तिच्याकडे बघून म्हणाला

मिहीर " सायली .. काय प्रॉब्लेम झालाय . तुझे डोळे आणि तुझे ओठ एक बोलत  नाहीयेत . आणि एक मिनिट तुला मला नसेल सांगायचे तर नको सांगुस . तू स्वतः तुझे निर्णय घ्यायला सक्षम आहेस . "

सायली " डू यु रिअलि थिंक लाईक दयाट "

मिहीर " आय एम शुअर . तर टेन्शन घेऊ नकोस .. जे तुला योग्य वाटेल ते कर तुझा निर्णय नक्कीच योग्य असेल "

बिचारा मिहीर त्याच्या ध्यानी मनी पण नहिये कि हा तिला कोणत्या गोष्टीसाठी एक प्रकारे सपोर्ट करतोय . त्याला वाटले ऑफिस मधले काही तरी आहे म्हणून हि अशी वागतेय .

दोघे ऑफिस ला गेले . सायली ने दुपारची ३ ची अपॉइंटमेंट घेतली होती. ४ तासात तिचे काम होईल आणि रात्री झोपायला ती घरी पण जाऊ शकते . जर सगळे व्यवस्थित झाले तर नाहीतर मग एक रात्र हॉस्पिटल ला काढावी लागेल . सायलीने  सगळी चौकशी करून ठेवली .

तिने गीता ला सांगितले कि आज ती पोस्ट लंच ऑफिस ला नसेल .

तरी पण सायली ला  काही तरी गुन्हा करतोय अशीच भावना येत होती . या विचाराने  ती सारखी शून्यात नजर लावून बसत होती . गीता च्या लक्षात आले कि आज मॅडम चे काही तरी तारतम्य बिघडलय .

गीता " मॅडम काही टेन्शन आहे का ?"

सायली " नाही .. काहीच नाही .. कुठे काय .. "

बिचारी सायली खूप एकटी पडली होती , असा प्रॉब्लेम झालाय कि कोणाला सांगू पण शकत नाही . हक्काने हॉस्पिटल ला कोणाला बरोबर घेऊन पण जाऊ शकत नाही .

शंभर वेळा हातात फोन घेत होती एकदा आई ला फोन लावायला जायची , एकदा मितालीला फोन लावायला गेली .. नको आता हा माझा आणि मिहर चा पर्सनल प्रॉब्लेम  आहे त्यापेक्षा मिहीर लाच सांगते .. त्याचा माझ्या वर खूप विश्वास आहे .. तो मला खूप सपोर्ट करतो , समजून घेतो . त्यालाच सांगते .. सांगू का ? घेऊ का हि रिस्क ? तो नक्की मला समजून घेईल ..

मोठे मोठे ऑफिस मधले करोडोचे  अचूक  निर्णय घेणारी सायली तिच्या स्वतःच्या लाईफ चा हा निर्णय घेताना मात्र घाबरत होती .. इनफॅक्ट तिला तो घेताच येत नव्हता .

तिने इंटरनेट वर चेक केले .. याचे फ्युचर मध्ये काही साईड इफेक्ट्स होतील का ? मला जेव्हा भविष्यात आई होयचंय तेव्हा तर या गोष्टीमुळे प्रॉब्लेम तर नाही होणार ना .. सगळ्या बाजूने विचार करत होती .

एवढे प्लॅनिंग करून सुद्धा जर मिहीर ला हे सगळे कळले तर तो .. तो.. कसा रिऍक्ट होईल या विचाराने मात्र तिचा थरकाप होत होता . मिहीर ला खूप वाईट वाटेल . त्याचा मी विश्वासघात केला असे त्याला वाटेल .

जसे जसे घड्याळात ३ वाजत होते तिची मनस्थिती खूप बिघडत चालली होती . वॉशरूम मध्ये जाऊन स्वतःच्या पोटावर हात ठेवून आत मध्ये असलेल्या पोटातल्या गोळ्याला  सॉरी बोलत होती . त्याच्याशी संवाद करत होती . " बाळा मला  माफ कर .. आता मी तुला या जगात आणू  नाही शकत.. मला माफ कर .. आणि सायली रडत होती . "

तिच्या मनातले वादळ डोळ्यातून अश्रू रूपाने बाहेर पडत होते .

दुपारी डबा  पण नाही खाल्ला .. मिहीर जेवायला जायच्या आधी तिला एक फोन करायचा तसा  त्याने फोन केला 

मिहीर " हॅलो .. कशी आहेस ?"

सायली " ठीक आहे ?

मिहीर " झाला का प्रॉब्लेम सॉल्व ऑफिस मधला ?"

सायली " हो.. नाही .. ते "

मिहीर " मी येऊ का तिकडे .. मला असे वाटतय मी हाफ डे घेतो .. जरा मस्त बाईक वर एक छान लॉन्ग ड्राईव्ह ला जाऊ .. तुला पाहिजे तर तू गाडी चालव.. तुला बरं वाटेल .

सायली " नको .. आज नको .. मग नंतर जाऊ कधी तरी .. आज माझी मिटिंग आहे ३ ते ५ महत्वाची "

मिहीर " ठीक आहे .. जेवलिस का ? "

सायली " नाही .. आता जेवते .. बरं झालं फोन केलास .. तुझ्या शी बोलून जरा बरं वाटले . सॉरी तुला जरा जास्तच त्रास देते मी "

मिहीर ला काय कळेना हि सकाळ पासून सारखी सॉरी सॉरी का बोलतेय ..

मिहीर " हॅलो .. काय झालय? माझे काही चुकलंय का ? तू जरा काल पासून वेगळी वागतेस ? काही मनात नको ठेवूस प्लिज .. बोल "

सायली " नाही .. काहीच नाही .. चल बाय मला मीटिंग ची तयारी करायचीय .

सायली ने घड्याळात बघितले २ वाजले .. तिने डबा  खाल्ला आणि अर्ध्या तासात हॉस्पिटल ला पोहचली .

पुन्हा एकदा डॉक्टर कडे गेली " नक्की ना फ्युचर मध्ये या गोष्टी मुळे काही प्रॉब्लेम होणार नाही .. नक्की ना मी जास्तीत जास्त एका दिवसात बरी होईन . नक्की ना मला जास्त त्रास नाही होणार .. नक्की ना मला झेपेल ना हे सगळे ."

डॉक्टर मॅडम " अग बाई किती  हायपर होतेस .. "

हे वाक्य ऐकून तिला पटकन मिहीर ची आठवण झाली . मिहीर नेहमी तिला हेच बोलतो .

डॉक्टर मॅडम " अग काय म्हणतेय मी .. हे बघ काल मी तुला सगळे नीट समजवून सांगितलेय . आणि अजूनही मी हेच सांगेन तसेही तुझे वय पेरफक्ट आहे आई होण्यासाठी सुद्धा . जर अगदीच काही प्रॉब्लेम नसेल तर या निर्णयावर तू जाऊच नयेस .. बघ थोडा वेळ बस बाहेर .. आणि बाकी मी या फिल्ड मध्ये १२ वर्षे काम करत आहे त्यामुळे तसे काही प्रोब्लेमॅटिक असते तर मी तुला आधीच सांगितले असते . "

सायली " पुन्हा बाहेर गेली ..   तिला मिहीर पाहिजे होता बरोबर .. एकदा त्याच्या कडून होकार मिळाला असता ना तर तिचे अर्धे टेन्शन गेले असते . पण त्याला सांगायची हिम्मत च तिला होत नव्हती . त्याच्या भावना दुखावून तर ती हे नक्कीच करू शकली नसती .

डॉक्टर मॅडम " सायली . तुझ्या बरोबर कोणी नाहीये का ? जरा कोणी असते ना तर तुला  आधार आला असता . तुझ्या भावना मी समजू शकते . "

सायली " नाही ना .. माझा नवरा आता इथे येऊ शकत "

डॉक्टर मॅडम " ठीक आहे .. तू थोडा वेळ शांत पड इथे .. मी थोड्या वेळाने येते ऍनेस्थेशिया द्यायला . तोपर्यंत तुझे bp पण नॉर्मल होईल होप सो .. अँड डोन्ट वरी यु आर इन सेफ हॅन्ड्स "

मिहीर ला आता मनातून खूप अस्वस्थ पणा आला होता . सायली काही तरी प्रोब्लेम  मध्ये आहे आणि ती मला सांगत नाहीये किंवा तीला मला सांगता येत नाहीये . तो पण मनातून विचार करत होता कि असे काय असेल कि हिला मला बोलायला  ऑकवर्ड होत असेल ? तिला ऑफिस मध्ये कोणी मुलगा वगैरे तर त्रास देत नसेल ना ? हल्ली काय कोणाचा   भरवसा  नाही . आणि तशी ती दिसायला पण सुंदर आहे . लग्न केले म्हणून कोणी त्रास देतं असेल का ?

घरी एक फोन करू का ? मिताली चा काही मोठं प्रोब्लेम तर नसेल ना झाला ?

काय शीट .. हि मुलगी अशी का वागतेय ? मिहीर त्या गोष्टी पर्यंत पोहचतच नव्हता .

तो एकटाच खाली कॅन्टीन मध्ये कॉफी घेऊन बसला होता . तेवढ्यात समोरून रवी आला .

रवी " हाय .. मिहीर यार एक गुड न्युज आहे .. यार माझे सगळे टेंशन गेले "

मिहीर ला आता याच्या कोणत्याही गुड न्यूज मध्ये इंटरेस्ट नव्हता ..

मिहीर : काय झाले रे "

रवी " अरे .. संगीता चे यावेळी रिपोर्ट्स नॉर्मल आले .. म्हणजे आता ती प्रेग्नेंट होऊ शकते "

मिहीर " वाह ..  ग्रेट ..  "

मिहीर ला प्रेग्नेंट हा शब्द ऐकला आणि मग त्याच्या लक्षात आले मागे हा विषय काढल्यावर सायली भडकली होती  सायली  कारण नसताना सॉरी का म्हणत असेल .. याचा अर्थ ती असे काही तरी करणार आहे त्यामुळे ती आधीच सॉरी बोलतेय .

काल  ती घरी पण उशिरा आली . कदाचित मला  न सांगता डॉक्टर कडे जाऊन आली का ? बहुतेक .. एस .. त्यामुळेच ती डिस्टर्ब होती .. आणि मला कळायला नको म्हणून  कडे  आई कडे चाललीय

मिहीर ला घाम फुटला . हे जे मी विचार करतोय ते जर खरं  असेल तर ..

🎭 Series Post

View all