विभक्त भाग २०

In this part sharad , shobhha also make arrange cake for mihir .

विभक्त भाग २०

क्रमश: भाग १९

हसत हसत दोघे सायलीच्या घरा  जवळ पोहचले. मिहीर ने गाडी थांबवली

मिहीर " मग मॅडम, आले तुमचे घर "

सायली " हो.. ना .. जरा लवकरच आले . "

मिहीर " लवकर काय ? वेळेत आलोय . घड्याळ बघ आई ने दहाच्या आत घरी यायला सांगितले होते आपण  ९.३० वाजताच पोहोचलोय .

सायली " काल पासून आपण काय काय करतोय ना .. किती मज्जा करतोय . माझ्या माझ्यावरच विश्वास बसत नाहीये कि हि मीच आहे . मी चक्क रात्री नाईट ड्रेस वर  अख्या सिटीत फिरले एरवी मी हॉल मध्ये येत नाही नाईट ड्रेस वर . मग टेकडीवर चांदणी रात्र  , तुझ्या फ्लॅट वर गेलो , आज मी चक्क ऑफिस बुडवले  अँड आय डोन्ट हॅव एनी रिग्रेट्स फॉर दयाट . मी बाईक काय शिकले आणि चालवली पण .. ओह माय गॉड .. मी किती बदलेय .. आणि मी किती खुश आहे .."

मिहीर तिचे बोलतानाचे डोळ्यातले हावभाव बघतोय .. आज सायली खरोखरच खुश होती तिच्या डोळ्यात ते क्लिअर दिसत होते . मिहीर का जादू उसपर चल गया था .

मिहीर " मग आता मला पुन्हा हा प्रश्न विचारावा लागणार आहे  कि हनिमून ची टिक्ट्स बुक करू का ?"

सायली " हमम... थांब थोडा विचार करून सांगते "

मिहीर  कपाळावर हात मारतो ." देवा रे देवा .. हिला ना सिमला लाच न्यावे लागणार मला बहुतेक ."

सायली " चल , आत मध्ये जाऊ ."

मिहीर " नको आता जातो इथूनच . सकाळी १० वाजता तुमच्याकडे आलोय ते अजून गेलोच नाही घरी . तुझे आई बाबा म्हणतील ह्याला काय घरी जायचंय कि नाही ?"

सायली " हो तू जा .. पण बाबांना बाय करून जा .. "

मिहीर " ठीक आहे येतो पण दोन मिनिटांचं निघेन काय ?"

सायली " ठीक आहे "

दोघे घरात जातात तर घरात शोभा, शरद, मिताली तिची दोन मुले  सर्व  जण त्यांची वाट बघत असतात . मिहीर पण सरप्राईझ होतो ते होतोच पण सायली पण होते .

घरात छोटेसे बर्थ डे डेकोरेशन आणि केक रेडी होता .

दोघे घरात आल्यावर सर्वांनी टाळ्या वाजवल्या आणि मोठं मोठयाने मिहीर ला " हैप्पी बर्थ डे चे विश केले . मिहीर ने आज तिसऱ्यांदा केक कापला होता .

सायली ला आज आपल्या  घरातल्यांचा अभिमान वाटत होता .

केक कापून झाल्यावर मिहीर , शोभा आणि शरद  गप्पा मारत बसले  .

मिताली आणि सायली दोघी किचन मध्ये गेलया .

मिताली “चल आपण सर्वांना कॉफी करू . “

सायली " ठीक आहे "

शरद " मग झाली का तात्यांची तयारी ?"

मिहीर " हो .. ते आणि दादा खूप मेहनत घेत आहेत . अल्मोस्ट सगळी तयार झालीय "

शरद " तात्या आणि मी एका बेंच वर शाळेत बसायचो ."

मिहीर " हो .. ना .. "

शरद " तुझे आजोबा जसे होते ना तसाच आहे अगदी तात्या . तुझ्या आजोबांमुळे त्या गावात शाळा आणि दवाखाना सुरु झालाय . शाळेतल्या मुलांना तुझे आजोबा स्वतःच्या खिशातल्या पैशानी वह्या पुस्तके घेऊन द्यायचे . "

मिहीर " मी आजोबांना पाहिलेच नाही . दादा  २ वर्षांचा होता ना तेव्हाच ते गेले ."

शरद " मोठा देव माणूस होते ते "

तेवढ्यात सायली सर्वांना ट्रे मध्ये कॉफी घेऊन आली . आणि सर्वांना दिली . मितालीची मुले .. मावशी , मावशी करून तिला चिकटली मितालीने लगेच त्यांना "गिव मी हाय फाय "असे केले आणि दोघे राज आणि रिया  वन बाय वन तिला टाळी देत होते.

मिहीर ने कॉफी घेतली आणि मग लगेच निघाला .

सायली त्याला बाहेर पर्यंत सोडायला गेली

मिहीर " राज आणि  रिया तुझ्याशी चांगलेच attach आहेत ना .. किती छान आहेत दोघे "

सायली " एस .. मावशी त्यांची फेव्हरेट आहे "

मिहीर " मावशी माझी पण फेव्हरेट आहे ."

सायली " हो का .. "

मिहीर " अच्छा चल निघतो मी .. ऐक ना .. मी जे १५ ला गावाला जाणार होतो ते मी उद्याच चाललोय . आता आपण डायरेक्ट गावालाच भेटू . तुम्ही कधी १९ ला दुपारी याल  ना  ?"

सायली " का रे ? तू उद्याच का जातोस ? आपण एकत्र गेलो असतो ना "?

मिहीर " अरे तात्या आणि दादा दोघे लग्ना साठी खूप काम करत आहेत मी थोडा लवकर गेलो तर माझी पण थोडी फार मदत होईल त्यांना . "

सायली "मग आता डायरेक्ट लग्नाच्या मंडपातच भेटणार "

मिहीर " अग असे दिवस निघून जातील . आता पर्वा तुमच्या कडे पण ग्रहमग आहे असे काका म्हणत होते .एकदा हे लग्नाचे कार्यक्रम झाले कि तुला वेळ कमी पडेल . आणि हो .. तुझे जे काही महत्वाचे सामान बरोबर आण . आयत्या वेळेला जर काही राहिलेच तर तिकडे काहीही मिळणार नाही "

सायली" हम..

मिहीर " येशील ना लग्नाला ?कसला विचार करतेस काय माहित "

सायली " तुला विश्वास नाही होत आहे का अजून ? चल आत्ताच येते .. आपण दोघे पुढे होऊ .. "

मिहीर " चला म्हणजे तू येशील हे तरी नक्कीच .

मिहीर " अजून एक .. तिकडे लग्नानंतर तुझे नाव बदलायचे का जे आहे तेच ठेवायचे ?तुझे काय म्हणणे आहे ? "

सायली " ते आता तूच ठरव .. मला आता विचार करायला वेळ नाही .. आता मी तुझाच विचार करत घालवणार आहे ना "

मिहीर " चल बाय, आय विल मिस यु "

सायली च्या डोळ्यात चक्क पाणी येत होते ..

मिहीर " रडू नको ना माऊ ". आता कधी तरी हि वेळ येणारच आहे .. बोलता बोलता त्याने तिच्या कपाळावर किस केले .

सायली " ठीक आहे . सावकाश जा .. आणि पोहचलास कि मला  कळव . "

मिहीर लगेच निघून गेला .. सायली मात्र तो पूर्ण दिसे नासा होई पर्यंत त्याच्या गाडीकडे बघत राहिली .

मिहीर रूम वर गेला पण त्याचे पण आज चित्त थाऱ्यावर नव्हते . उद्या पासून सायली लग्नच्या दिवसा पर्यंत भेटणार नाही या विचाराने तो अस्वस्थ होत होता .

विचार करता करताच तो त्याचे जायचे सामान भरत होता .

सायली ला टेक्स्ट करून सांगितले कि "मी पोहचलो घरी .. गुड नाईट "

मिहीर " ऐक ना  , तुझे पासपोर्ट डिटेल्स पाठवून ठेव मला "

सायली " हमम .. उद्या  सकाळी पाठवते  "

मिहीर " नको आत्ता पाठव .. आधीच उशीर झालाय  . उद्या घरी गेलो कि तात्या ओरडतील मला . तिकडे कधी कधी रेंज पण नसते . "

सायली " कुठली टिकेट्स बुक करतोयस "

मिहीर " शिमला "

सायली " मग कशाला हवाय पासपोर्ट  डिटेल्स"

मिहीर " दे ग माऊ "

सायली " मिहीर , मला तू माऊ म्हणलेले आवडलं. मला ना कसंतरी होतं तुझ्या तोंडून माऊ ऐकलं कि "

मिहीर " तू माझी मनी  माउचं आहेस . आता लग्न झाले कि तुझे नाव माउचं ठेवतो "

सायली " हाऊ स्वीट "

मिहीर " माऊ मिहीर "

सायली " उद्या मी ऑफिस मध्ये व्हीपी झालेच समजा तर कसे वाटेल "व्ही पी  माऊ मिहीर मॅडम  "

आणि दोघे हसायला लागतात .

सायली " मेल पाठवलय  तुला . चेक कर "

मिहीर " काय करतेयस "

सायली " काही नाही .. ऑफिस चे मेल चेक करायला बसले .. आज चा सगळा  बॅकलॉक उद्या ला भरून काढायच्या . दोन तीन  मेल्स ची रिप्लाय करायची आहेत .

मिहीर " ओके .. ठीक आहे .. बाय बोलू उद्या. काम करून घे आधीच आज सुट्टी झालीय  "

सायली " त्याचे काही नाही .. पण काल  रात्री पासून ते आज रात्री पर्यंत चा हा दिवस मी माझ्या आयुष्यात कधीच विसणार नाही ." थँक यु .. फॉर मेकिंग इट स्पेशल . अँड ट्रिटिन्ग मी ऍज स्पेशल ".

मिहीर " थँक यु  .. कि तू मला ऍज  लाईफ पार्टनर म्हणून सिलेक्ट केलेस "

दोघे फेव्हिकल ने जोडल्या सारखे मनाने एक मेकांना चिपकले होते .. त्यांचे बोलणे संपंतच नव्हते . चॅटिंग करायला लागले तर चॅटिंग दोन तास करत बसायचे.

एक गोष्ट मिहीर च्या लक्षात येत होती कि ती हळू हळू तिच्या कामाकडे दुर्लक्ष करत आहे . सायली मिहीरमय झालीय हि चांगलीच गोष्ट आहे पण उद्या तिच्या करिअर च्या आड तो आला असे नको होयला याची त्याला चुणूक लागू लागली . आता ती एक वेगळ्या विश्वात होती त्या विश्वात अर्थात मिहीरनेच तिला ओढलय पण पुढे जाऊन हीच गोष्ट त्यांच्या प्रेमाच्या आड नको यायला .

काही वेळेला असे म्हणतात कि आपल्याच प्रेमाला आपलीच नजर लागते . जेव्हा सगळी कडून सगळे चांगले होत असते तेव्हा माणसाचे पाय जमिनीवर नसले तर वादळात निभाव लागत नाही .

लग्ना आधीचे प्रेम आणि लग्ना नंतर चे त्यांचेच प्रेम यात फरक का पडतो ? . हे दोघे जसे लग्नाला आतुर झालेत अशी किती तरी कपल्स  असतील आणि अपवाद वगळता सर्वच कपल्स लग्नानंतर कचाकचा भांडतात . ? का ? हे असे का होते ? सोना ,माऊ , चे नंतर चक्क डुचकी , नालायक , यांच्यात रूपांतर होते याचे कारण काय ? अर्थात त्यांच्या भांडणात पण प्रेम असतेच मी कुठे नाही म्हणतेय पण हा पॅटर्न का बदलतो आणि कशामुळे बदलतो ?

सांगा बघू कंमेंट्स मध्ये ..

🎭 Series Post

View all