विभक्त भाग ५१

in this part mihir is behaving like a child and now he is happy that he has got aal the answers from sayli

 विभक्त भाग ५१

क्रमश: भाग ५०

सायली " होती तर होती .. आता नाहीये ना .. हे माझ्या साठी महत्वाचे आहे .. आणि आता पण असेल तर तुझा मार्ग मोकळा आहे .. माझी मी समर्थ आहे .. मला मुळात हे प्रेम बीम सगळे खोटेच वाटायचे .. नुसता दुसऱ्याचा आपल्या फायद्या साठी उपयोग करून घ्यायचा. प्रेमाच्या नावा  खाली उपभोग घ्यायचा असेच माझे म्हणणे होते .. पण आता जेव्हा मी प्रेमात पडले तेव्हा कळतेय कि  जगात जसा दिसत नाही पण देव आहे तसेच खरं प्रेम आहेच .. उदाहरण आपलाच बघ ना गेल्या दहा महिन्यात आपल्यात उपभोग नव्हता तरीही प्रेम आहेच ना .. जरी भांडलो तरी प्रेम आहेच ना .. तुझ्या साठी जे मी फील करते ते मी अजून दुसऱ्यासाठी कधीच करत नाही ना .. म्हणजे वासना हि शरीराची असते प्रेमाची नसते .. जर प्रेमात वासना येत असेल तर ते प्रेम नाही दुसरेच काही तरी आहे .. केवळ शरीर सुखसाठी लग्न करणा रे पण असतीलच ना ..मी असे म्हणत नाहीत ते चूक करतात .. मला त्यात पडायचेच   नाहीये  कोण चूक कोण बरोबर .. उद्या मी पण त्या गोष्टीला तयार होईलच ना .. पण फक्त त्याच गोष्टी साठी प्रेमाच्या आणाभाका घेऊ नये .. बाकी दुनियाच पापाची आहे जो तो ज्याला जमेल तसे वागायला मोकळा आहे .. अगदी तू सुद्धा ..फक्त एक सांगेन मला फसवायची  तुला गरज नाही .. मला एकदा सांग मी एकही प्रश्न तुला विचारणार नाही ? तुला लगेच मोकळा करेन " नेक्स्ट

मिहीर "म्हणजे मला तू सोडून देणार ?"

सायली " चुकीचा प्रश्न विचारू नकोस .. मी काय म्हणाले जर तुला पाहिजे तर .. असे मी म्हणाले "

मिहीर " म्हणजे  तुला मी दुसरी बरोबर असलो तर काहीच फरक पडणार नाही ?"

सायली " वेडाच झाला आहेस तू आज ? जर तुला माझ्या ऐवजी कोण दुसरी मुलगी आवडायला लागली .. तुला माझा कंटाळा आला तर .. तुला जायचेच असले तिच्या बरोबर तर  माझे तुझ्या वर इतके प्रेम आहे कि तुला आनंदी बघण्यासाठी मी तुला सोडून पण देईन .. तू खुश तर मी खुश .. "

मिहीर " जर तुला मी म्हटले कि आपण कायमचं इकडेच राहू तर तू काय करशील ?"

सायली " मी विचार नाही केला तो ?.. माझी माझी काही स्वप्न आहेत जी मी तुला भेटायच्या आधी पासून पहिली होती ती जर पूर्ण झाली असली तरच मी येईन नाहीतर मी कदाचित नाही येणार ...कारण जर मी स्वतःशीच प्रामाणिक असेल तर दुसर्याशी काय प्रामाणिक राहीन  तशी तू मला एक प्रॉमिस केलेस कि तू मला कोणत्याही परिस्थितीत जॉब सोड असे म्हणणार नाहीस ..  थिंक यु रिमेम्बर इट "

मिहीर " तुला काय वाटतंय कि मी आज जे प्रश्न तुला विचारले ते बरोबर आहेत का चूक ? किंवा उगाच टाईम पास करतोय?

सायली " मला असे वाटतंय कि तुझा हार्मोनल इम्बॅलन्स झालाय .. तुला तू माझ्यावर जी उगाच  चीड चीड केलीस त्याचे गिल्ट आलेय . तुला असे वाटतंय कि तू माझ्यावर अन्याय करतोयस .. किंवा माझ्या चांगुल पणाचा म्हणा किंवा माझ्या प्युअर हार्ट चा फायदा घेऊन मला इकडे राबवतोयस आणि बेसिकली मला त्रास झालेला तुला बघवत नाहीये .. त्यामुळे तुला मनातून स्ट्रेस आलाय .. तुला असे वाटतय  कि मी हिला आनंद तर नाही पण दुःखच दिले .. हो ना .. बरोबर ना .. इकडे आल्यास कितीदा रडवलेस मला .. होय कि नाही .. "

मिहीर " अरे .. हो ना .. असेच होतंय काहीतरी .. आज पण किती तुला बोललो .. आणि मला बोलून जाताना काही वाटत नाही पण नंतर माझा जीव तळमळतो ग .. तुला मी म्हटले ना कि तझे मार्किंग बरोबर असते .. मला अजिबातच कळत नव्हते कि आज नक्की मला इनर पीस का मिळत नाहीये .. मला आज तुझ्या कडे बघायची पण हिम्मत होत नव्हती .. असे वाटे कि मिताली प्रकरण मुळे तू काहीतरी गैरसमज करून घेशील .. म्हणशील " तुला मी कशी ओळखले नाही ..वगैरे .. वगैरे "

सायली “जशी तू एक चिप माझ्या बॉडीत बसवलीस ना तशीच मी पण एक चिप तुझ्या बॉडीत टाकलीय .. त्यामुळेच तर मला कळते तुझी मनस्थिती . नाहीतर मला मूर्ख .. बावळट म्हणणारा अजून जन्माला यायचंय .. असो

सायली " तुने अभी तक मुझे पहचाना नहीं .. तुला म्हटले ना मला सॉलिड इंट्युशन येतात .. मगाशी मला पण किती झोप येत होती पण तरीही मी खाली आले कारण मला आज वाटतच होते कि तुझ्या मनात वादळ चालू आहे .."

सायली "मिहीर, तुझ्याशी लग्न ठरले तेव्हाच मला माहिती होते ना कि इकडे गावात कसे राहतात . किंवा एका सुनेकडे बघण्याचा लोकांचा , घरातल्यांचा कसा दृष्टीकोन आहे .. तरी पण आई आणि तात्या खूप पुढारलेले विचारांचे आहेत .. स्पेशली आई त्याचे विचार आणि पेशन्स कायच्या काय आहेत .. कसे आहे ना मिहीर राहणीमान माणसाचे मोठेपण सिद्ध नाही करत . त्याचे विचार आणि आचरण त्याचे मोठेपण सिद्ध करते .. मी जे हे करतेय ते नाटक आहे .. साडी नेसणे हा बाह्य बदल आहे .. आंतरिक बदल हा आहे कि एका स्त्रीला घरातले काम पण आले पाहिजे आणि तुला माहितेय आय ह्याव ट्राईड माय बेस्ट लेव्हल . आता नसेल तुला आवडले तर मी काही करू शकत नाही .. आणि त्या बद्दल मी तुला सॉरी पण  बोलणार नाही .. कारण मी प्रयत्न केलेत हे मला माहितेय .. सो नो रिग्रेटस .. ह्या वेळी नाही जमलं पुढल्या वेळी अजून चांगले जमेल .. "ह्या पलीकडे तुला खुश करायला मी काहीच करू शकत नाही .. "

मिहीर " पण मी तुला पर्वा काय म्हणते लक्षात आहे का ? मी म्हटले जशी आहेस तशी राहा .. जशी आहेस तशीच मला आवडतेस "

सायली " मग प्रॉब्लेम काय आहे ? एवढा कसला विचार करतोस ? तुला स्पष्टच विचारते .. तुला असे वाटते का कि आपल्यातले विभक्तपण मला संपवायचे नाहीये माझे करिअर आहे म्हणून ? आता या पेक्षा मी स्पष्ट नाही बोलू शकत बाबा ?

मिहीर " हो .. मला असे वाटते कि तुला हे विभक्तपण असेच चालू रहावे असे वाटते ? मग मला वाटते  कि तू हर्ट होशील का ? "

सायली " ओके मग पर्वा शेतावर यायचा प्लॅन कोणी बनवला ? मीच ना ? मग तुझ्यासाठी नटून आले होते का तू मला सांगितले होतेस ? तू मला मजेत म्हणाला होतास कि मी शेतावर काम करेन आणि तू मला डबा घेऊन ये असे मला आवडेल .. हे पूर्ण करण्यासाठी मी हा प्लॅन बनवला .. ते मला हे विभक्तपण संपायचे होते म्हणून का चालू ठेवायचे होते म्हणून . मला तर आता वाटतंय त्या दिवशी तू मुद्दामून गेलास ना .. मुद्दामून त्याच दिवशी काम बरी आठवली तुला "

मिहीर " तसे काही नाहीये ?"

सायली " मी सांगते ना .. तुला नंतर असे वाटले कि कशाला उगाच .. मागच्या वेळेस झाले तसे काही झाले तर पुन्हा सगळा गोंधळ "

मिहीर "  ते तर आहेच ना कारण ?म्हणून तर आपण विभक्तपण केलाय .. आणि बाजारात काय मार्ग नाहीयेत का ? मला ते नकोच आहेत .. मी बघतोय त्याचे साईड इफेक्टस किती होतात ते .. मला कोणत्याही प्रकारे तुला त्रास झालेला चालणार नाहीए.. हे तर मी तेव्हाच ठरवले होते ..

सायली " ठीक आहे .. तो हि निर्णय तुझाच होता आणि विभक्तपण तोडायचा हि निर्णय तुझाच असेल .. मी यापुढे या विषयावर तुझ्याशी बोलणार नाही "

मिहीर " बघ हा .. "

सायली " पुन्हा तेच .. बघ हा काय .. यु आर स्केअरिंग मी ऑर यु आर स्केअरइड. ?

मिहीर " आय एम नॉट स्केअरइड आय एम वरिड "

सायली उठली आणि त्याच्या केसांना हात फिरवून त्याला थोडा हेड मसाज देते ..

मिहीर " wow ... खूप रिलॅक्स होतंय .. अजून थोडा हेड मसाज कर ना .. "

सायली "चल मग वरती करते म्हणजे झोप आली तर झोपशील लगेच "दोघे झोपायला गेले .. सायलीने त्याला खोबरेल तेल लावून मस्त अर्धा तास मसाज दिला .. आणि मिहीर निद्राधिन झाला .

सकाळी उठला तर सकाळचे ११ वाजले होते .. सगळे उठून तिकडच्या घरात गेले होते .. सागर .. सावनी आणि मिहीर तिघेच होते .. बाहेर अंगणात घरगडी खुर्चीवर बसला होता .

मिहीर ने दोघा मुलांना उठवले आणि कार मधून तो पण आला इकडच्या घरी .

अंघोळ वगैरे करून आला तसा लता वहिनींनी चहा नाश्ता दिला .. सायली मस्त साडी घालून पोळ्यांचे नकाशे बनवत होती .. पण  पोळी छान फुगत होती .. आज लता वहिनींनी तिला चौघडी ची पोळी कशी बनवायची ते शिकवले होते .. मुद्दामून मिहीर कडे बघत पण नव्हती .

मिहीर " सायली जरा इकडे येतेस का ?"

सायली " नाहि .. आता थोडे काम आहे मला .. ते झाल्यावर मी मोकळीच आहे "

मिहीर " अरे .. माझे एक मिनिटाचंच काम आहे "

सायली " नाही .. हो .. माझ्या पोळ्या चालू आहेत .. थोडा वेळ थांबावे लागेल .. आता कुठे जमायला लागलीय "

मिहीर " सायली .. यार एक मिनिट .. बघत पण नाहीयेस तू "

सायली " कसे बघू .. एक वेळी एकच जमतं  जमते मला"

लीला बाई " थांब  रे मिहीर तुला पण .. काय आत्ताच .. "

मिहीर " अग , आई माझे खरचं काम आहे "

लीला बई " जा ग सायली .. तो ऐकणार नाही .. काय पाहिजे त्याला देऊन ये "

सायली "नाही नको हो आई , त्यांना थांबायला सांगा "

मिहीर " बघ , आई आता तुझे पण ऐकत नाही ती .. "

लीलाबाई " तू जा .. नंतर येईल ती .. "

मिहीर डायरेक्ट किचन मध्ये आला आणि लता वाहिनी आणि आई समोर तिला उचलून नेऊ लागला .

सायली " काय चाललंय .. फालतूपणा .. उगाच मोठ्या माणसां समोर चावट पण करतोयस .. तुला काम नाहीये का .. सोड मला "

लीला बाई " नालायक .. सोड तिला ... आणि पाठीत एक रट्टा घातला त्याच्या " आणि लीला बाई आणि लता वाहिनी हसू लागल्या .

मिहीर " आई ग .. केवढ्या जोरात मारतेस .. लागलं ना .. "

लीलाबाई " नशीब आज तात्या घरात नाहीयेत .. ह्यांनी बघितले असते ना तर चांगलीच चंपी होती त्याची "

मिहीर ने तिला उचलून  त्याच्या रूम मध्ये नेले .. तोपर्यंत त्याच्या हाताला सालीची नखे लागली होती .

मिहीर " काय हे .. किती नखे लागली आहेत बघ मला .. "

सायली " तुना .. चल आताच्या आता जाऊ आपण तिकडे .. तू इकडे येऊन वेडा झाला आहेस "

मिहीर " तेच तर तुझ्याशी बोलायलाच म्हणून घेऊन आलोय तुला .. "

सायली " हि पद्धत आहे का ? मग बोलत आणि बघत का नव्हतीस माझ्याशी ?"

मिहीर " कुठे .. मी काम करत होते ना .. मला एका वेळी एकच काम जमतं .. "

सायली " शी.. इतकी लाज आणतोस ना .. आता आई आणि लता वाहिनी काय विचार करतील .. ते दार उघड आधी .. "

मिहीर " अरे .. ऐक तर .. सॉरी काल साठी  आणि थँक यु फॉर मसाज .. काल मला मसाज केल्यामुळे खूप छान झोप लागली .. आज खूप फ्रेश वाटतंय ..

सायली " हो ... दिसतोय फ्रेशनेस .. बघितल आता .. "

मिहीर " चल कुठे तरी फिरून येऊ .. जरा चेंज मिळेल . "

सायली " नको .. आता पण सामान पॅक करू .. आणि पण तिकडे निघू .. जेवण झाल्यावर .. जाता जाता मला आई कडे सोड .. दोन दिवसांनी मला घ्यायला ये "

मिहीर " हे काय ? आता कुठे ? कशाला आई कडे जातेस ?"

सायली " अरे .. मला पण माझ्या आई जवळ राहायचं .. मला पण रिलॅक्स होयचंय .. मग दोन दिवसन्नी ऑफिस सुरु होईल "

मिहीर " ठीक आहे .. आता तू ठरवले आहेच तर मी काय करणार ? मग मी पण तिकडेच राहतो ना .. "

सायली " नको .. तुला पण थोडा माझ्या पासून ब्रेक मिळेल .. आणि मला  पण "

मिहीर " मला तर वाटतंय या खोलीच्या वास्तूत काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय .. एकदा तू आणि एकदा मी दोघामंध्ये काहीतरी घुसते .. " आणि हसायला लागतो

सायली " हसतोस काय ? काल काय काय प्रश्न विचारत होतास आठवतंय का ? "

मिहीर " हो .. नक्कीच आठवतंय ? मला जे पाहिजे होते ते मी माहित करून घेतले .. मी काय बेशुद्ध नव्हतो "

सायली " ठीक आहे .. अजून काही असले तरी काढून ठेव प्रश्न .. आय एम रेडी टू अन्सर "

🎭 Series Post

View all