Oct 01, 2020
प्रेम

विभक्त भाग ४९

Read Later
विभक्त भाग ४९

विभक्त भाग ४९

क्रमश: भाग ४८

दुसऱ्या दिवशी सायली सकाळी उठली .. आज पण तिने आणि लता ने मिळून छान मोठी रांगोळी काढली . मग सकाळ सकाळी नाश्ता झाल्यावरच लीला बाई आणि सायलीने मिळून शंकरपाळ्या केल्या . सायलीने शंकरपाळ्या इतक्या छान कापल्या होत्या ..सगळ्या एकसमान पट्टीने मोजून अंतर घेऊन कापल्या सारख्या . सायलीचे एक वैशिष्ट असे होते कमीच करेल पण जे काम करेल ते उत्तम .. त्याला कोणी नावं ठेवणार नाही .. लीला बाई पण तिच्या कामावर खुश होत्या आणि जे करील ते मनापासून करायची एकदम परफेक्ट .

शंकरपाळ्या झाल्यावर लीलाबाई म्हणाल्या सायली आज तू आणि मी बाजारात जाऊ .. लता तोपर्यत घरात जेवणाचे बघेल . मग  दोघी मिळून चालत बाजारात गेल्या .

मिहीर ने त्या कॉन्ट्रॅक्टर ला फोन केला तुम्ही कधी पासून काम करणार आहेत .. मला हे काम पाडव्या  पर्यंत पूर्ण झालेलं पाहिजे .

दोघी घरी येई पर्यंत मिहीर ला शेतावर जावे लागले कारण ते काम करणारे लोक आले होते .. तो आला तेव्हा संध्याकाळ झाली होती तर घर लक्ख दिव्यांच्या प्रकाशाने चमकत होते पण घरातील तिन्ही गृह लक्ष्मी वसुबारस म्हणून गाईची पूजा करायला गेल्या होत्या .  तिघी आल्यावर सर्व जण एकत्र जेवायला बसले. अशा पद्धतीने आज दिवस भरात एका घरात राहून सायली आणि मिहीर ची भेटच झाली नाही . रात्री सायली जेव्हा रुम मध्ये  आली तर तेवढ्यात मिहीर ला तात्यांनी हाक मारून बोलावून घेतले आणि तो तात्यांशी बोलून येई पर्यंत सायली झोपून गेली होती .

 

दुसऱ्या दिवशी सकाळी नवऱ्यांना अभ्यंग स्नान होते . पहाटे ५ वाजता मागच्या अंगणात ३पाट ठेवले .. लता ने पाटा भोवती रांगोळी  काढली .. आणि तिघींनि आपापल्या नवऱ्यांना तेल लावून अभ्यंग स्नान घातले . मग स्त्रियांनी अंघोळ करून करून घेतली  तोपर्यंत तात्यांनी देवाची पूजा केली .. मग तिघींनी छान नवीन साडया नेसल्या .. गजरे , दागिने आणि हातावर रंगलेली मेहंदी,  गृहलक्ष्मी बनून आपाप्प्ल्या नवऱ्यांना ओवाळले . त्यांच्या पाया  पडल्या मग सर्वांनी मिळून दिवाळीचा  फराळ केला .

 

फराळ झाल्यावर सगळे मिळून गाव देवी च्या दर्शनाला गेले . गावदेवीचा आशीर्वाद घेऊन मग घरी आल्या .

 

सावनी आणि सागर पण नवीन  कपड्यात छान दिसत होती .. आणि आता अंगणात बसून फटाके वाजवत होते .

 

मग कोण कोण तात्यांना दिवाळी म्हणून भेटायला  येत होते आणि पुरुष मंडळी बाहेर फराळाला बसायचे आणि त्यांच्या बायका आतमध्ये फराळ करायला बसायचे . सायली आणि लता यांची चांगलीच गडबड होती . येणारी प्रत्येक पाहुणीला फराळ द्यायचा ..चहा पाणी दयायचे मग हळदी कुंकू लावायचे मोठ्यांना नमस्कार .. लहानाना आशीर्वाद असे चालू होते . मिहीर ने अंगणातून असा अँगल पकडला होता कि त्याला तिथून किचन दिसायचे , मधेच पाठमोरी सायली त्याला दिसायची . कधी कधी हा मुद्दामून पाणी, चहा मागायला आत जायचा .. तेव्हा सायली ला बघून घ्यायचा .

 

असे दिवस मागून दिवस जात होते .. लक्ष्मी पूजन झाले .. खूप सारे फटाके वाजवले .. खूप सारी पाहुणे येऊन गेले .

 

आज पाडवा होता .. तर आज गावातले  पाहुणे तर येऊन झाले होते .. आज मिहीर आणि सायलीचा पहिला पाडवा म्हणून तात्यांनी शोभा आणि शरद ला पण बोलावून घेतले होते . आज शेत घरात प्रोग्रॅम होणार होता . शेतात काम करणाऱया सर्व मजुरांना जेवण , त्यांना कपडे आणि मिठाई चा बॉक्स  देण्यात येणार होता . यावर्षी मिहीर कडून मजुंरांन एक सरप्राईझ मिळणार होते ते म्हणजे आंब्याच्या झाडाखाली प्ले  ग्राऊंड . मिहीर ने त्या झाडाच्या सावली चा उपयोग  करून मस्त शहरात  सोसायटी मध्ये कसे प्ले ग्राउंड असतो तसे करून घेतले होते .. त्यात घसर गुंडी , झोपाळे , सी सॉ , वगैरे अशी खेळणी आणि खाली रबर मॅट म्हणजे कोणाच्या पायाला खडे , माती टोचू नये . आज ते प्ले ग्राउंड पण तयार होणार होते . त्यामुळे आज एकंदरीत घरातील सर्वच मंडळी खूपच बिझी होती .

 

मिहीर तात्या आणि शिशिर सकाळ पासूनच शेत घरात होते ..

 

सर्व बायका संध्याकाळच्या कार्यक्रमाच्या तयारीत होत्या .. आज त्यांना छान तयार  होऊन शेतावर जायचे होते . सायली ला तर नऊवारी साडीच नेसायला सांगितली होती . पण यावेळी सायलीने चांगलीच तयारी केली होती .. रेडिमेड नऊवारी ३ साड्या घेऊन आली होती . सासू बाई , जाऊ बाई आणि एक तिला . तर लीला आणि लता दोघीही नाही म्हणाल्या पण तिला मात्र नेसायला सांगत होत्या.

 

तेवढ्यात संध्याकाळी शोभा आणि शरद आले . आणि त्यांच्या बरोबर येताना मिताली पण होती .. सायली तिघांना बघून खूप खुश झाली . आई बाबांना आणि मोठया बहिणीला भेटून सायली ला  खूप आनंद झाला होता .

 

सायली " ताई बरं झाले आलीस ? पण तू एकटी ? राज , रिया आणि जीजू का नाही आले ?"

 

मिताली " अग , विनय मुलांना घेऊन सासरी गेलाय दिवाळीला . मी नाही गेले म्हंटल मला जोपर्यंत सासूबाई बोलवत नाहीत तोपर्यंत मी काही यायची नाही . मग शेवटी असे ठरले कि विनय ला त्याच्या आई  ला भेटायचे होते आणि त्याच्या मुलांना पण भेटावयाचे होते .. तर मी म्हटले मग तू जा मुलांना घेऊन मी आई कडे जाते . मी आले मग आई कडे निघून दोन दिवसांसाठी . तर बाबा म्हणाले आम्ही सायलीकडे जातोय .. म्हणून मग मी इथे अशी आले "

 

सायली " बरं झाले आलीस ? चल आता आपण दोघी तयार होऊ .. तू पण नऊवारी साडी घाल .. म्हणजे माझ्या  बरोबर कोणी तरी नऊवारी मध्ये होईल "

 

मिताली ला पण नटायला भारी आवडायचे .. आणि आता आलोच आहे तर एन्जॉय पण करायचे .. म्हणून ती पण सायलीच्या म्हणण्या नुसार नऊवारी साडी नेसायला तयार झाली .

 

मग  शोभा शरद आणि लीला बाई आणि लता म्हणाल्या कि तुम्ही दोघी तयार व्हा आम्ही पुढे होतो .. तिकडे पण खूप कामं आहेत आणि मग सगळे जण निघून गेले .

 

लीला बाई " सायली ,, दार आतून लावून घे आणि तयार झालीस कि मिहीर ला बोलावून घे "

 

सायली " हो .. चालेल आई "

 

शोभा आणि शरद यांच्या लगेच लक्षात आले कि सायलीने कसे छान आपले वजन सासरी ठेवलेय ते .. त्यांना हे सगळे बघून मनोमन आनंद होत होता .. दोघांचाही उर अभिमानाने भरून येत होता .

सायलीने मितालीला तिने आणलेल्या तिन्ही साड्या  दाखवल्या  " तुला कोणती नेसायचीय ती नेस मग मी माझी चॉईस करेन"

मितालीने पर्वा जी सायलीने नेसली होती ती साडी फायनल केली .

 

मग दोघी मिळून तयार  झाल्या .. मितालीन काहीच  बरोबर आणले नव्हते त्यामुळे आज ती बऱ्याच गोष्टी सायलीच्या घालत होती .. बांगड्या , कानातले , हेअर स्टाईल च अंबाडा .. आणि सायलीने बरेच मटेरियल आणले होते .. जाऊ बाई आणि सासू बाई पण आहेत म्हणून .

 

दोघी तयार झाल्या वर सायलीने मिहीर ला मेसेज केला " मी तयार आहे मला घ्यायला ये "

 

आज दोघी खूप खुश होत्या .. दोघी जुळ्या वाटाव्या इतक्या सेम दिसत होत्या ..

 

मिहीर सायलीला घ्यायला आला . त्याच्याकडे लॅच ची चावी होतीच . तो त्यांच्या रूम आला तर मिताली पाठमोरी उभी होती .आणि मिहीर ला वाटले कि हि सायली आहे .सायली नेमकी किचन मध्ये बाटलीत पाणी भरायला गेली होती .

 

मिहीर दबक्या पायाने आत आला आणि त्याने मितालीला सायली समजून मागून मिठीत पकडले .

 

मिहीर " आई शपथ .. माऊ कसली ....... "

 

मिताली " एक मिनिट .. एक मिनिट .. मी सायली नाही .... आणि ती त्याचा हातातून सोडवत होती .. "

 

मिहीर ला मिताली आलीय हे कोणीच सांगितले नाही .. त्याला माहीतच नव्हते कि घरात अजून कोणी आहे आणि मिताली मागून ९९.% सायलीच दिसत होती .

 

एकाच मिनिटाचा तो सगळा  खेळ होता..

 

मिहीर " सॉरी .. अरे .. तू आमच्या बेडरूम मध्ये काय करतेस ?"सायली ... सायली .. काय यार बावळट .. मला आधी नाही का सांगायचे .. मूर्ख कुठली "

 

मिहीर असा भडकला सायलीवर .. तिला काही कळेच ना ह्याला काय झालयं तणतणायला

 

सायली " मिहीर , अरे काय झाले ?"

 

मिहीर " काही नाही .. चला आता.. सगळे वाट बघत आहेत ."

 

मिताली ला पण इतके ऑकवर्ड होत होते .. हे काय होऊन बसले .. ?

 

बिचारी सायली पुन्हा त्या  नऊवारी साडीत छान तयार झाली तर मिहीर आता भडकलाय तर त्याचे तिच्या सौदर्याकडे लक्षच नाही

 

मग तिघे शेत घरात आले .. तिकडे खूप गर्दी होती .. बसलेल्या लोकांना पण एक मिनिट मिहीर  नक्की बायको कोण असाच विचार पडला ..

 

शेवटी शोभाने मितालीला तिच्या जवळ बसायला बोलावले आणि मग सायली आणि मिहीर दोघे पुढे बसले . नेमका सणा च्या दिवशी असा प्रकार घडल्याने मिहीर जाम वैतागला होता .. तो मनात म्हणत होता यार हि मिताली आज इथे कशाला आहे ? सायलीला पण कळत नाही कोण बेडरूम पर्यंत नेत का कोणी आपल्या बहिणीला ..

 

सायली " मिहीर , काय झालंय ? काही प्रॉब्लेम आहे का ?"तू आता माझे पेशन्स try करतोस का ?" आता आज आपल्या घरचा कार्यक्रम आहे तर तू काय तोंडावर बारा वाजवून बसला आहेस ?"

 

मिहीर " अग , मूर्ख मुली आपल्या बेडरूम मध्ये तुझी बहीण काय करत होती ? शिवाय तिने तुझी साडी घातलेली  मागून बघ .. मागून काय पुढून पण बघ ती तुझ्या सारखी किती दिसतेय .. मला वाटले तूच आहेस बेडरूम मध्ये ती पुढे बघत होती .. मी तिला मागून जाऊन तुला समजून पकडली .. बावळट तुझ्या मुळे झालय हे . माझी जाम चिडचिड होतेय आता "

 

सायली  हे ऐकून सायली जी हसायला लागली " असा कसा रे तू वेंधळा "

 

मिहीर " मग तू मेसेज मध्ये तरी टाकायचे होतेस ना कि मी आणि मिताली तयार आहोत .. मला कसे कळणार कि तुझ्याबरोबर घरात ती आहे .. माझ्या डोक्यात तू एकटीच आहेस घरात .. "

 

सायली " मला एकटीला आई कसे काय मागे ठेवतील ?"

 

मिहीर " अरे .. यार चल .. जाऊदे मी तिकडेच जातो बसायला ..

 

तात्या आणि शिशिर दोघांचेही लक्ष या दोघांकडे गेले .. आता आज या दोघांचे काय झाले ?

 

शिशिर ने दोघांना एक साईडला बोलावून घेतले .

 

शिशिर " सायली .. एकदम मस्त दिसत आहेस .. एकदम मिहीर ची बायको आणि आमच्या घराण्याची धाकटी सून म्हणून शोभून दिसत आहेस .. छान तयार झालीस "

 

शिशिर " अरे .. काय झाले ? तुम्ही दोघे भांडताय कि काय ?  आता तुमच्या कडे सगळ्यांचे लक्ष आहे .. जरा नीट वागा .. तात्यांनी पण बघितले .. मिहीर विषय थांबवा जो काय आहे तो "

 

सायली " बघितलंस मिहीर , शिशिर दादांनी पण माझी तारीफ केली तुला एक वाक्य मला बोलावेसे वाटले नाही .. कसला आहेस रे तू ? "

 

मिहीर " अग .. तू भेटायच्या आधीच तुझी बहीण भेटली ना मला .. आणि हा सगळं प्रकार झाला ना .. माझा ना तीळ पापड होतोय .. "

 

सायली " बर .. जाऊ दे .. तू काय मुद्दामून केले नाहीयेस .. सो एवढे मनाला लावून घेऊ नकोस .. आणि तिने साडी पण माझीच नेसलीय तर असे गफलत होऊ शकते .. मी मान्य करते .. चल सोडून दे तो विषय .. तुला पाहिजे तर ताई ला बोलवू का एकदा बोलून घे तिच्या जवळ म्हणजे मनातली शंका निघून जाईल . "

 

मिहीर " नको आता .. मला तिचं तोंड पण बघायचं नाहीये "

 

सायली " अरे .. तू प्लिज माझ्या बहिणीला काहीपण बोलू नकोस .. ह्यात तिची काहीही चूक नाहीये .. "

 

मिहीर : मग काय माझी आहे ?"

 

सायली  " नाही " तुझी पण नाही . त्यामुळे ऍक्सीडेन्ट म्हणायचं आणि सोडून द्यायचा .. आता प्लिज चेंज युअर मूड "

मिहीर " ठीक आहे तू जाऊन बस तिकडे मी जरा फ्रेश होऊन येतो .. "

 

सायली " नको मी इकडेच थांबते .. तू आल्यावर दोघे मस्त आनंदात जाऊ नेहमी प्रमाणे "

 

मिहीर वॉशरूम मध्ये गेला .. जरा तोंडावर पाणी मारून .. मस्त केस वगैरे विंचरून आला .. परफ्युम मारून आला "

 

सायली आला ग आला माझा हिरो आला .. कसा क्युट दिसतोय या ड्रेस मध्ये .. " वाह .. आता मस्त दिसतोयस .. "

 

मग दोघे छान मूड मध्ये बसले ..

 

तात्यांनी भाषण केले .आणि मग थोड्या  मजुरांना मिहीर आणि सायलीच्या हस्ते सगळ्यांना कपडे , मिठाई वाटली . थोड्या मजुरांना शिशिर आणि लता च्या हस्ते कपडे आणि मिठाई वाटली .

 

मग सर्व जण त्या आंब्याच्या झाडा  जवळ गेले . शिशिर दादांनी भाषण केले .. त्यात त्यांनी सांगितले कि हे प्ले ग्राउंड मिहीर मुळे उभे राहिले आहे . आता तुमची मुले जी वणवण उन्हात फिरत असतात ती मुले इकडे खेळू शकतात .. इथे अनेक खेळणी आहेत .. खाली रबर मॅट  आहे म्हणजे पडली तरी लागणार नाही त्यांना . शिवाय वरती झाडाची सावली आहेच ..

 

हे ऐकताच सर्व लोकांनी कडकडून टाळ्या वाजवल्या  . शिशिर दादा म्हणले या प्ले ग्राउंड चे उदघाटन तात्या आणि आई च्या हस्ते करणार आहोत . मग तात्या आणि लीला बाई पुढे आल्या त्यांनी तात्यांना सांगितले कि ह्याचे उदघाटन मिहीर आणि सायलीच्या हस्ते करूया .. सायलीच्या पायगुणानेच हे पाऊल उचलायची मिहीर ची ईच्छा झालीय . तात्यांना पण ते पटले  . त्यांनी मिहीर आणि सायलीला पुढे बोलावले आणि त्यांना रिबीन कापायला लावली ..

 

शोभा शरद आणि मिताली .. सायली कडे बघून बघून आनंदाश्रूंत झाले होते .. शरद ला असे वाटत होते माझी एवढीशी सायली आज बघा किती मोठी झालीय .

 

सायली ला आत्ता कळले होते कि मिहीर त्या दिवशी कुणीकडे आणि कशासाठी गेला होता .. तिच्या मनात मिहीर विषयी चा आदर अजून वाढला होता .. एवढे मोठे काम करून ह्या माणसाने एका शब्दाने बोलून पण  दाखवला नाही .. गर्व नाही का अभिमान नाही .. किती डाउन टू अर्थ आहे तो .. असेच तिला वाटत होते .

मग सगळ्यांची जेवण झाली  आणि हळू हळू सर्वच जण निघून गेले .. आता फक्त राहिले ते घरातलीच माणसे .. सायलीचे आई बाबांना राहण्याचा खूप आग्रह केला पण ते हि तिघे आशीर्वाद देऊन गेले .