विभक्त भाग ४४

mihir and sayli are fighting

विभक्त भाग ४४

क्रमश: भाग ४३ 

साडीत झालेला आमूलाग्र बदल लीला बाईंच्या नजरेतून चुकला नाही .

लीला बाई " काय ग .. झाले का काम ?"

सायली " हो .. ते त्यांना एक डॉक्युमेंट  पाहिजे होते मी त्यांना फॉरवर्ड करून आले . "

झाले बोल बोलता त्यांनी सायली कडून चकल्या पाडून घेतल्या ..आणि तिला म्हणाल्या जा आता तुला पाहिजे तर थोडा अराम कर .

उद्या  पण करंज्या आणि शंकरपाळ्या करू "

लता वाहिनी " अहो आई .. तिला झेपेल का ? एवढे सगळे .. ? नाही तर थकून जाईल "

सायली " हो .. ना .. तशी खरच असल्या कामाची सवय नाहीये .. पण सध्या थोडे थोडे आहे आणि मुख्य म्हणजे तुम्ही दोघी बाजूला आहेत तर मी करू शकते . एकटीनं वगैरे तर सोडूनच द्या .. "

लीला बाई " हे बघ आता तुला साधारण कल्पना देते .. उद्या पासून छान साड्या घालून बसायचे .. छान दागिने वगैरे घालून बसायचे घरात पण .. "

सायली " अजून दागिने घालू ?"

लीला बाई " हो .. ते मोठे मंगळसूत्र तरी घालच .. लता .. त्या सारिका ला बोलवून तुमच्या दोघींच्या आणि सावनीच्या हातावर मेहंदी काढून घ्या . "

लता " ठीक आहे "

लीला बाई नि तिला काय काय करायचेय ..  नवऱ्यांना अभ्यंग स्नान , मग देवळात .. मग लक्ष्मी  पूजना ची माहिती .. मग शेत घरात जायचे .. तिकडे पण पूजा जेवण बनवायचे असे सगळे सांगितले .

रोज  अंगण  साफ करून छान  मोठ्या रांगोळ्या काढायच्या .. लाईट्स , कंदील , फटाके असे थोडक्यात सगळे सांगितले . 

लीला बाई " जा मग आता थोडा वेळ दोघींनी अराम करा मग रात्रीच्या जेवणाचे बघु "

लता गेली तिची पोरं कुठे खेळतात ते बघायला . आणि सायली आली त्याच्या रूम मध्ये .

खरं तर मिहीर ने तिचा पहिल्याच दिवशी मूड  घालवला होता . ती काय  करतेय ते न बघत तो तिच्याकडून काय चुकतेय यांच्याकडे बघत होता ना म्हणून असे झाले  .

मिहीर आणि शिशिर दोघे घराला लाइटिंग चे बघत होते . बाहेर अंगणात आकाश कंदील लागला . सागर मीहीर ने आणलेल्या बंदुकीतून टेपा वाजवत बसला होता . एक रोल वाजवून झाला कि तो " काका , मला रोल लावून देना " असे म्हणून मिहीर कडून रोल भरून घ्यायचा . सावनी मात्र तिचे तिचे रोल वाजवत होती . तात्या बाहेर गेलेले .

सायली बेड वर आडवी पडली होती पण बाहेर काय काय चाललंय हे तिला सर्व ऐकू येत होते . ऐकता ऐकता सायली ची ब्राह्मानंदीं टाळी लागली (झोप लागली )

थोड्या वेळाने मिहीर त्याचे बाहेरचे काम उरकून हात पाय धुवून आला त्यांच्या रूम मध्ये . तरी पण तसेच हि बया जागी असताना साडी नाही सांभाळू शकत तर झोपल्यावर तर काय बघायलाच नको .. आणि हे बघून याचे मस्तक फिरायचे . त्याने सरळ एक चादर घेतली आणि तिच्या अंगावर टाकली आणि लॅपटॉप ओपन करून डेस्क वर बसला

मग एक एक बॅग ओपन करून .. जी गिफ्ट्स द्यायचीत ती बाजूला काढली . बराच वेळ झाला हि काय उठलीच नाही . मग ह्याचा काय मनात  आले हा पट्ट्या बाहेर मित्रांना भेटायला निघून गेला .

थोड्या वेळाने सायली उठलीं.. तिच्या लक्षात आले कि आपल्या अंगावर चादर होती म्हणजे आपण पुन्हा माती खाल्लेली आहे . तिला हसावे का रडावे हेच कळेना .. हा असा काय वागतोय ? काय डोके सणक लय त्याचे काय माहित .

पुन्हा साडी नीट करून आरशात मागून पुढून बघून आली बाहेर ..

सगळीकडे एक नजर टाकल्यावर कळले कि साहेब घरात नाहीए. मिहीर घरात नाही म्हटल्यावर तिला जी अस्वस्थता आली होती . तिने हातात फोन घेतला त्याला लावायला .. नंतर म्हणाली " जाऊ दे .. बोलू नको म्हणालाय ना तर जाऊदे ,, आता नाहीच बोलणार  त्याच्याशी  " आणि गेली किचन मध्ये .

लता वहिनींनी तिला चहा दिला ..

लता " झाली का झोप "

सायली " हो .. ना मला चांगलीच झोप लागली ... "

लता " भाऊजी कुणीकडे गेलेत ? चहा प्यायला आले नाहीत ? बाहेर गेलेत का ?"

सायली " हो .. तो त्याच्या मित्राला भेटायला गेलाय … सायलीने पुढच्या पुढे काहीतरी सांगितले आणि वेळ मारून नेली . "

सायली " मग आता काय करायचेय ?"

लता " काही नाही फक्त भाकऱ्या करायच्यात .. बाकी सगळे तयार  आहे  .. तुला आवडते का भाकरी ?

सायली " हो .. पण मला करता येत नाही "

लता " काही नाही ग एवढ्या मोठ्या ऑफिस मध्ये तू काम करतेस हे कसले काम ?भाकऱ्या थापायला काही अक्कल नाही लागत ."

सायली " नाही हो वाहिनी .. ते पण एक स्किलच आहे .. मला शिकवाल का भाकरी ?"

लता " हो .. त्यात काय आज आपण दोघी मिळून करू "

बारका  सागर मध्ये मध्ये किचन मध्ये यायचा पाणी प्यायचा आणि पुन्हा खेळायला पळायचा ? आणि मूड असला तर सायली वर मागून रेलायचा आणि तिला एक पप्पी देऊन जायचा . काकी त्याची खास झाली होती कारण त्याला न ओरडणारी तीच एकमेव होती .

मिहीर पण बाहेर रा गा ने गेला होता पण मित्रांच्यात गेल्यावर कसा वेळ गेला त्याला कळलेच नाही . बऱयाच वर्षांनी तो मित्रां बरोबर गप्पा  गोष्टी करत होता . मित्र पण कोणाला एक मूल  कोणाला दोन मुलं कोणाची डिलिव्हरी एक्सपेक्टड असेच होते . लग्न करून आहे त्या गावात आपले सर्व ऐकणारी , आपल्याला भरपूर मान देणारी बायको करून सेट झालेले होते .

लता आणि सायली किचन मध्ये आहेत म्हटल्यावर आज लीला बाई किचन कडे फिरकलेच नाहीत .. त्या सावनीच्या वेण्या बांधून दे .. सागर चे हातपाय धुव असली बाहेरची काम करत बसल्या

लताणे भाकऱ्या करायला घेतल्या .. सायलीचे डोळे गरगर फिरताच राहिले .. इतक्या पटपट गोल गरगरीत मोठ्या भाकऱ्या लता तिच्याशी गप्पा मारता मारता आर्मीत करत होती . सायली चे लक्ष लाटांच्या हाताकडे होते .. किती मळायचे , कशी थापायची , कशी उलटण्याची सगळे बघत होती . आणि बघून तिच्या लक्षात आले कि ये अपने बस कि बात नहीं हैं ।माळ शिकवा म्हणून मी तोंडावर पडणार आहे . मग मला हे सगळे हसतील.   आणि मिहीर माझ्यावर अजून चिडेल . 

लता आणि सायली किचन मध्ये आहेत म्हटल्यावर आज लीला बाई किचन कडे फिरकलेच नाहीत .. त्या सावनीच्या वेण्या बांधून दे .. सागर चे हातपाय धुव असली बाहेरची काम करत बसल्या

लता भाकऱ्या करायला घेतल्या .. सायलीचे डोळे गरगर फिरतच राहिले .. इतक्या पटपट गोल गरगरीत मोठ्या भाकऱ्या लता तिच्याशी गप्पा मारता मारता आरामात करत होती . सायली चे लक्ष लता हाताकडे होते .. किती मळायचे , कशी थापायची , कशी उलटण्याची सगळे बघत होती . आणि बघून तिच्या लक्षात आले कि ये अपने बस कि बात नहीं हैं ।म ला शिकवा म्हणून मी तोंडावर पडणार आहे . मग मला हे सगळे हसतील.   आणि मिहीर माझ्यावर अजून चिडेल . 

लता तशी हुशार होती आणि सायली ला सांभाळून घेणारी होती . तिने सगळ्या भाकरी केल्या आणि एका भाकरीचे पीठ तिच्यासाठी ठेवले . तिला सांगितले कि आता तूला येते का बघ .. सायली पण करायचा प्रयत्न करू लागली . बरच वेळा मोडली .. कधी उचलताना मोडायची , कधी थापतानाचा फाटायची असे सगळे प्रकार चालू होते . लता तेवढ्या वेळा तिला असे कर .. अशी थाप ,, अशी वाढवायची , असा हाताचा तळवा वापर , अशी बोटे वापर असे सांगत होती . अनेकदा चुकल्यानंतर सायलीची भाकरी थापली गेली आणि तिने ती हाताने उचलून तव्यावर टाकली . लताने लगेच पाणी लावून दिले आणि मग तिलाच भाजायला पण शिकवली . आणि सा यलीची भाकरी टम्म फुगली तशी सायली जी खुश झाली .. कोणाला सांगू ..का नाचू का काय करू असे तिला झाले होते .. आता मिहीर पाहिजे होता .. त्याने माझी भाकरी बघायला पाहिजे होती असेच तिला वाटत होते .

मग स्वयंपाकाचे काम झाले सायली सागर आणि सावनी बरोबर खेळत बसली .

जेवणाची वेळ झाली तरी मिहीर घरी अ ला च नाही . त्याला त्याचे मित्र सोडेनात . अरे चल माझ्या घरी आई तुझी आठवण काढते असे करून एक दोघांच्या घरी गेला .

सायलीचे डोळे त्याच्याकडे लागले होते .. इतका वेळ कशाला बाहेर थांबायचे .. ह्याला कळत पण नाही बायकोला किती वे एकटे ठेवून जायचे .. जाऊ दे आता आला कि बोलणारच नाही .. हिच्या मनात वेगळीच काहूर माजलेला ..आणि तेवढ्यात आली बुलेट .. मिहीर आला ..

 पहिली आधी तिने आरशात उभं राहून आपली साडी नीट चेक केली .. आता आणखीन निमित्त नको

तात्या " मिहीर अरे कुठे होतास ? सगळे जेवायचे थांबलेत तुझ्यासाठी ?  "

लीला बाई " चला रे सागर चाल हात धुवा सगळ्यांनी  .. जेवायला चला .. आणि त्या जेवण वाढायला पुढे गेल्या "

सगळे एकत्र बसून जेवायला बसले . गप्पा मारत सगळे एकत्र जेवले .

लता " मिहीर भाऊजी , आज भाकऱ्या सायली ने केल्यात " लता ने बरोबर सायलीने केलेली भाकरी मिहीरला वाढली .

मिहीर " अरे .. वाह .. तिला आता तुमच्या हाताखालीच ठेवा सुट्टीत आणि सगळे शिकवा तिला .. काय येत नाही तिला "

सायली काहीच बोलली नाही .

शिशिर " सायली ..  काही गरज नाही शिकायची .. तुला जर वाटले तरच कर .. तुझ्यावर कोणाची जबरदस्ती नाहीये "

सायली तरीही काहीच बोलली नाही .

तात्या " अरे .. तुम्ही लोक कशाला या विषय वर बोलताय .. बायकांचे बायका बघून घेतील "

झाली सगळी बाकीची काम उरकून जरा उशिराच सायली झोपायला निघाली .. आज मुद्दामून ती  लता च्या मागे मागे च थांबली .. ती किचन मधून बाहेर पडे  पर्यंत थांबली .

लता " काय ग ? तुमचं काही बिनसलंय का ?"

सायली " छे हो .. मला खरच जेवणातले काहीच करता येत नाही .. मिहीर ने बरोबर सांगितल तुम्हाला . त्याचे काय झाले १२ वि झाली नाहीतर मी ४ वर्षे हॉस्टेल ला होते आणि लगेच मला नोकरी लागली . अस आयते ताट आणि आयता डबा आई द्यायची . आणि खरं सांगू का मला कधी असे वाटले पण नाही कि किचन मध्ये जाऊन जेवण शिकावे  आणि मला वेळा पण नाही मिळाला. आता आमच्या विमल ताईच तिकडे सगळे बघतात . चहा किंवा कॉफी व्यतिरिक्त मी काहीच करत नाही "

लता " अग  हो पण एखाद्या पुरुष माणसाने जसे ऑफिस मध्ये काम करावे तसे ते काम तर करतेसच  ना "

सायली " हो तेही आहेच पण शेवटी एक मुलगी म्हणून मला हे आता शिकावे लागणार नाहीतर अशे टोमणे ऐकावे लागणार "

लता " टोमणा नाही हो .. मिहीर भाऊजींचा आज जरा मूड खराब असेल नाहीतर असे कधीच बोलत नाहीत ते "

तू जे काम करतेस ना ते काम मी कधीच करू नाही शकत पण आज तुला भाकरी आली कि नाही .. त्यामुळे तू नाराज नको होऊस . हे म्हणाले तसे तुझ्यावर कोणाची जबरदस्ती नाहीये .. तुला जर वाटलं तरच शिक .

सायली " हमम.. "

लता " मी एक सांगू का ? म्हणजे तू जर मला मोठ्या बहिणी सारखी समजत असशील तर सांगते .. जाऊ बाई म्हणून बघशील तर तुला कदाचित राग येऊ शकतो "

सायली " मी सांगू का ? या सगळ्या च्या पलीकडे मी तुम्हाला एक मैत्रीण समजते .. "

लता " हे बघा , इकडे गावात कसे आहे .. नवऱ्याचे नाव कोणी घेत नाही .. तु सारखे त्यांना मिहीर मिहीर आणि एकेरी नावेने बोलतेस हे त्यान्ना इकडे आवडत नसावे असे मला वाटतंय . कसे आहे इकडे त्यांचे मित्र आहेत त्याच्या सगळ्यांच्या बायका त्यांना अहो.. म्हणून बोलतात आणि त्यांना सकाळी तु त्यांच्या मित्र समोर एकेरी नावाने बोललीस .. शिवाय त्यांच्या बायका परका कोण आला तर तिथे अश्या गप्पा पण मारत नाहीत आणि तू तिथे गप्पा मारत  बसलीस . त्यामुळे त्यांना थोडा तुझा राग आला असेल . मगाशी पण तू आईंसमोर त्यान्ना .. एकेरी नावाने बोललीस .. मग त्यांना ते कसेतरी होतंय .

शेवटी गावात मिहीर भाऊजींची पण एक वेगळी ओळख आहे . मग कमीत कमी  मित्रांसमोर तरी आपल्याला मान मिळावा असे त्यांना वाटते . कारण इकडे सगळ्यांच्या बायका नवऱ्यांना नावाने हाका मारत नाहीत "

सायली " हमम... बहुदा म्हणूनच तो उचकला असेल "

लता " बघ , आता तू जरा सवय कर .. बघ तुला बदल जाणवेल "

सायली " ठीक आहे "

🎭 Series Post

View all