विभक्त भाग ३९

In this part love is in the air

विभक्त भाग ३९

क्रमश : भाग ३८

उद्या सकाळी चेक आऊट आहे तर सकाळी सगळ्यांनी एकत्र नाश्ता करायचा नि आपापल्या गाड्यांनी आपापल्या दिशेला जायचे .. म्हणजे तात्यांची गाडी गावाला आणि शरद आणि मिहीर ची गाडी शहरात जाईल . असा प्लॅन ठरवून सगळे झोपायला गेले .. आज गाण्याच्या निमित्ताने का होईना पण प्रेत्येकाने आपल्या जोडीदाराला आपल्या मनात त्याच्या बद्दल काय आहे हे सांगून टाकले होते . सगळ्यांच्या मनात प्रेम संध्या आली होती .

कधी कधी असा पद्धतीने भावनांना मोकळे केलेले बरे असते . घरात नाही का कितीही झाडले तरी जळमटे येतातच . त्या जळमटांना काढ ण्या स थोडा तरी प्रयत्न करावा लागतोच . आज मिहीर ने मनातली जळमटे काढून टाकण्याची संधी सर्वांना दिली होती .

मिताली आणि विनय च बोलायचे झाले तर ते पण एक प्रकारे विभक्तच झाले होते .किती फरक आहे ना .. नात्या नात्या मध्ये . सायलीचे विभक्तपण वेगळे होते आणि मिताली चे विभक्तपण वेगळे होते .

 इट्स अ  स्टेट ऑफ माईंड !!

मिताली आणि विनय मध्ये समज , गैरसमज , ईच्छा , अपेक्षा आणि आकांक्षा या सगळ्यांची जळमटे साचली आहेत . हि काढण्यासाठी दोघं पैकी कोणचं पुढाकार घेत नाहीये .

आज मिताली मनात विचार करतेय

सायली किती भाग्यवान आहे ना .. तिच्या वर जीव ओवाळून टाकणारा नवरा तिला मिळालाय . तिच्यावर प्रेम करणारे सासू सासरे तिला मिळालेत . मिहीर किती तिला समजून घेतो .. तिला एखाद्या परी सारखी वागवतो .. तशी दिसायला तर सायली पेक्षा मी उजळ आहे तरी पण माझ्या वाट्याला हे असले दुःख आलेय .

काय करू ? मी पण अनावधानाने विनय ला दुखावले तर नाही ? अजून वेळ गेलेली नाही एकदा त्याच्याशी बोलून बघू का ? त्याने आज गाण्यातून पण सांगितले कि त्याचे माझ्यावर प्रेम आहे .. पण तो बोलायला कचरतोय ?

आज विनय असा विचार करतोय .. मिहीर ला काय त्याला पैशाची चणचण नाही .. बायकांचे असे बढे वाढदिवस करायला मला आवडणार नाहीत का ? आपल्या खिशाला काय परवडतंय हे हि बघायला पाहिजे .

नाही म्हटले तरी ते दोघे कमवतात . आमच्या कडे काय आहे कमवणारा मी एकटा आणि खायला ४ माणसे आहेत . त्यात माझ्या नोकरीचे सध्या प्रॉब्लेम झालेत  सेल्स च्या जॉब मध्ये बेसिक पगार कमी असतो .. आणि कंमिशन कधी मिळते कधी नाही मिळत . लग्न करायच्या  आधी आम्ही किती खुश  होतो . दोघांनी काय काय ठरवले होते . दोघांनी आपले शिक्षण पूर्ण करायचे . दोघांनी  नोकरी करायची .. आपले स्वतःचे घर घ्यायचे .. यातले काहीही मितालीने केले नाही .. फक्त आई होऊन  घरात बसलीय.

मागे काय तर म्हणे कि तू हल्ली दुसऱ्या पोरीनं बरोबर फिरतोस .. अरे याला काय अर्थ आहे .. माझ्या वर काही तरी विश्वास असला पाहिजे कि नाही . जसे तिच्या आई वडिलांचा विरोध झाला होता आमच्या लग्नाला तसा माझ्या घरातल्यांनी पण केला तर ते कायमचे दुरावले . गेले 5 वर्षात मी माझ्या आईला एकदा पण भेटलो नाही .. हि मात्र उठ सुठ तिच्या आईकडे जाऊन बसते . मी पण म्हणतो जाऊदे तिला आई ला भेटल्यावर आनंद  मिळतोय ना म्हणून सोडून दिले .

मागच्या दिवाळीत तिला म्हटलो कि आपण माझ्या घरी एकदा जाऊन येऊ तर मला म्हणाली " मी नाही येणार .. माझ्या बाळंतपणाला कोण आले होते तुमच्या कडचे ? अरे काय संबंध .. आपण त्यांना हि संधी दिलीच नाही तर त्यांना दोष देऊन काय करणार ?"

तरी पण आज सायली आणि मिहीर ला बघितल्यावर असेच वाटतंय कि मी पण कुठेत री चुकलो असेन .. जवाबदारीच्या ओझ्या खाली मी मिताली वर प्रेम करायचे विसरून गेलो का ?

 आज किती तरी दिवसन्नी दोघे एकमेकांकडे बाकीच्यांचे डोळे चुकवून बघत होते .. दोघांना एक मेकांशी  बोलून व्यक्त  व्हावे असे वाटत होते .

शिशिर आणि लता त्यांची तर काय वेगळीच कहाणी .. आई बाबांनी लग्न लावून दिले ते दोघांनी निभावले . शिशिर ला लता मी माझी खासगी मालमत्ता आहे या व्यतिरिक्त काहीच डोक्यात नाही .असे आपण बायकोला पॅम्परिंग करावे वगैरे असे त्याच्या गावीच नाही आणि लताची पण काही तशी अपेक्षा नाही त्यामुळे त्याचे कधी अडले नाही आणि ना कधी बिघडले . पण आज सायली आणि मिहीर ला असे एकत्र बघून शिशिर ला पण असे वाटू लागले कि अरे मी तर नुसता गाढवा  सारखा संसार केला . अगदी तसेच नाही पण थोडे फ़ार तर मी नक्कीच लता साठी करू शकतो .. बिचारी कधीच कसला हट्ट करत नाही .

तात्या शिशिर ला म्हणाले "शिशिर , मिहीर तुझ्यापेक्षा लहान आहे तरी पण तू त्याच्या कडून काहीतरी शिक .. सगळ्या गोष्टी काय मी सांगत बसू का ?"

सगळ्यांच्या प्रेमाच्या वाख्या बदलू लागल्या ..

शोभा आणि शरद आपल्या दोघी मुलींना खुश बघून समाधानी होते .

शरद " मिहीर खरच सायली वर जीव ओवाळून टाकतो .. नाही का ?"

शोभा " हो.. सायलीने एवढा मोठा मूर्ख पणा केला तरीही त्याच्या प्रेमात काही बदल नाही झाला ."

शरद " हो .. ना .. आज दोघांना खुश बघून खूप समाधान  वाटले.

शोभा " हो .. ना .. मिताली आणि विनय ची घडी अजून म्हणावी तशी बसली  नाहीये पण "

शरद " मला तसे वाटतंय ..  मला वाटते कि आपण मितालीला एक फ्लॅट घेऊन द्यावा का ? तुला काय वाटतं ?

शोभा " विनय ला काय वाटेल ?"

शरद " अग  तसेही मी मितालीच्या लग्नासाठी पण पैसे  ठेवलेच होते पण तिने अशा पद्धतीने लग्न केले .. त्यांनतर आपण दोन वर्षे तिला घरात घेतले नाही आणि आली तेव्हा प्रेग्नन्ट च होती .. "

शोभा " हो .. ना .. विनय तसा  चांगला मुलगा आहे . त्याला बिचार्याला कोणाचा सपोर्ट नाहीये . त्यांचे पण एकदा सेट झाले ना कि ते दोघे पण असेच आनंदी होतील "

शरद " म्हणून तर म्हटले सरळ तिच्या नावाचे जे पैसे ठेवले होते त्याच्यात तिला फ्लॅट घेऊन देतो .. नंतर तुमचा हप्ता तुम्ही भरा असे सांगतो .. विनय ला तेवढीच मदत होईल "

शोभा " थांबा .. मी मितालीशी एकटी असल्यावर बोलेन उगाच नको तो प्रॉब्लेम नको होयला "

शरद " ठीक आहे .

सायली आणि मिहीर एका वेगळ्याच धुंदीत त्यांच्या रुम वर आले.मनातल्या  आनंदाची चमक चेहऱ्यावर झळकत होती आणि तिचे रूप अजूनही खुलले होते .. मिहीर पण खूप खुश होता .. त्याचा प्लॅन एकदम परफेक्टली एक्सिक्युट झाला होता . आणि त्याला जे जे काही सायली साठी करायचे होते ते सर्व झाले  होते .

दोघांचे नाते घट्ट आणि अजून मजबूत झाले होते . सायलीला च्या आयुष्यातले हे दोन दिवस सायली कधीच विसरणार नाही आणि ..काहीवेळेला धन्यवाद देण्यासाठी शब्द नसतात .. समोरच्या बद्दल चा आदर आणि प्रेम इतके काठोकाठ भरून येते कि ओसंडून वाहू लागते . आणि मग असे अश्रू परवानगी शिवाय बाहेर येतात .

याच्या साठी मी काय पण करू शकते याची ग्वाही मन देत असते . सायली आज मनातून आणि मनापासून मिहीर च्या पुढे सरेंडर झाली होती . म्हणतात ना ब्लाइंड फेथ तसे .

दोघे रुम वर आले

मिहीर " काय म मॅडम .. आवडली का सरप्राईझ पार्टी ?

सायली "खूप .. खूप म्हणजे खूप ... "

मिहीर " मीच त्यांना सांगितले होते कि आज तुम्ही संध्याकाळ पर्यंत कोणी तिला कॉल नका करू ?"

सायली " हो .. का .. पण त्याना  असे अचानक बघून मी भारावून गेले .. "

मिहीर " हो ते मला कळलेच .. बघितल्या बघितल्या जे मुसुमुसु अश्रू बाहेर आले. तुझ्या अश्रूंना ना टँक्स लावला पाहिजे . इतका आज किती वेळा रडलीस . रडून रडून नाक बघ लाल झालय  "

सायली " अरे .. तुला सांगितले ना .. कि ते आनंदाश्रू होते .. "

मिहीर " हो ना .. पण तुझे नाक लाल झाले कि मला अस्वथ होत त्याचे काय ?

सायली " मिहीर .. कधी कधी मला असे वाटते कि .. आणि थांबली

मिहीर " बोल कि .. "

सायली " इकडे असा एक मिनिट तू उभा रहा . "

मिहीर उभा राहिला आणि सायलीने असे काही केले कि त्याला पण अपेक्षित नव्हते .

सायली मिहीर च्या पाया पडली ..

मिहीर " अरे .. हे काय .. आणि पटकन मागे झाला .. वेडू बाई आहेस ? हे काय करतेस ?"

सायली " ऐक ना तुला जरा असे जरा जास्त वाटेल  पण  मला खरोखऱ असेच करावेसे वाटतंय .. तू ना खूप वेगळा आहेस .तुझ्या उंची पेक्षा उंच आहेस आणि त्याच्या कपाळावर आज तिने किस केले . .. अँड आय एम हैप्पी कि तू माझा आहेस .. देवाने तुला माझ्या पारड्यात टाकले त्यासाठी मी देवाची ऋणी राहीन "

मिहीर " अरे .. वाह सगळे क्रेडिट देवाला .. . मला नमस्कार कशाला केलास .. पुन्हा असे करू नकोस .. तुझी जागा माझ्या हृदयात आहे . गाणे म्हणू लागला " दिल चीर के देख तेरा हि नाम होगा .. "

 आणि दोघे हसू लागले .

सायली " तुझ्या इतके तू जसे करतोस तसे प्रेम कोणच नाही करू शकत तेही निरपेक्ष "

मिहीर “ इतकी चांगली बायको पण कोणाला नाही मिळत. “फक्त रडू बाई आहे

मिहीर " बरं चल .. पॅकिंग करून ठेव कारण सकाळी १० ला चेक आऊट आहे .. "

बोल बोलता सायली पण आवरत होती .. तो हि आवरत होता ... आणि दोघे एकमेकांच्या कुशीत शांतपणे झोपले .

दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे रेस्टोरंट ला भेटले .. एकत्र सगळ्यांनी नाश्ता ऑर्डर केला .. खाल्ला

तात्या " मिहीर २ महिन्यांनी दिवाळी आहे तर दोघांनाही सुट्ट्या असतील ना .. नसतील घेऊन ठेवा .. तुमचा दोघांचा पहिला दिवाळसण आहे ना "

मिहीर सायली कडे बघतो .. " माझ्या १०० एक लिव्ह पेंडिंग आहेत "

सायली " हो .. मी बघते माझे काय आहे सुट्टीचे शेड्युल "

लीला बाईंनी सायली च्या डोक्या वरून मायेने हात फिरवला आणि तिच्या हातात एक वस्तू दिली आणि तिला म्हणाल्या घरी गेलीस कि हे घाल .

सायली " पुन्हा सासू च्या पाया पडली .  "

 सगळे एकमेकांना भेटून .. निरोप घेऊन तिथून निघाले .. आणि आपापल्या घरी आले .

🎭 Series Post

View all