विभक्त भाग ३८

in this part mihir give surprise to sayli

विभक्त भाग ३८

क्रमश: भाग ३७

सायली " मिहीर , मला आश्यर्य वाटतंय या वेळी संध्याकाळ चे ४ वाजले तरी मला घरून एकही फोन आला नाही रे .. बर्थ डे चा "

मिहीर " बघ तुला विसरले सगळे "

सायली " हो .. रे .. ताई पण .. तिने पण नाही केला .. आई आणि बाबा  पण .विसरले . तिने पण नाही केला .. "

मिहीर " नको टेन्शन घेऊस .. करतील .. "

मिहीर "सायली, संध्याकाळी ६ वाजता आपण पुन्हा बाहेर जाणार आहोत तर तुला पाहिजे तर थोडा वेळ अराम कर "

सायली " आता अजून .. उलट मी म्हणते आता आपण आज इकडेच जेवण मागवू "

मिहीर " ए गप ए.. हे घे आणि त्याने तिला एक गिफ्ट दिले "

सायली " अरे माझी मज्जाच मज्जा आहे .. काल पासून गिफ्ट  वर गिफ्ट मिळतायत.

मिहीर " ओपन इट  प्रिन्सेस “

सायली ने ओपन केले बघते तर आतमध्ये .. एक लॉन्ग प्रिन्सेस  ड्रेस .. " ओह माय गॉड .. मिहीर .. धिस इस जस्ट अमेझिंग .. कसला भारी ड्रेस आहे "

मिहीर " मग , माझ्या प्रिन्सेस चा बर्थ डे आहे .. आणि तिचे गाल हाताने ओढू लागला ..

सायली " किती छान .. प्लांनिंग करतोस रे ..  या कानाची त्या कानाला खबर होत नाही .. "

मिहीर " एक ना . माझे थोडे अर्ध्या तासाचे काम आहे .. तू तेवढा वेळ प्लिज एकटी थांबशील का ? मी बाहेरून लॉक लावून जातो .

मिहीर " त्या ड्रेस च्या  वर मॅचिंग ज्वेलरी सेट पण आहे आणि एक फोटो पण आहे .. मी जाऊन येई पर्यंत अगदी तशी तू मला दिसली पाहिजे "

सायली ने तो फोटो पहिला .. "अरे वाह .. पण हि मुलगी कोण आहे रे ?"

मिहीर '" बघ , ९९ परसेंट तुझ्या सारखी दिसते .. फक्त तिचे केस तुझ्या सारखे नाहीयेत आणि नाकात फसली .. "

सायली " एवढे निरीक्षण कशाला केलेस तिचे "

मिहीर " अग , तिचे नाही ग .. तुझं निरीक्षण केलय म्हणू तर लगेच फरक कळला ना "

सायली " बरं .. " ऐक ना .. जास्त वेळ नको काढूस बाहेर .. आपण नवीन लोकेशन ला आहे तर एकटं जरा मला टेन्शन येईल .. बाय द वे , इकडे कसले काम आहे रे "

मिहीर " माझी गिर्ल्फ्रेइन्ड आलीय तिला भेटून आलो " आणि हसायला लागला .

सायली " ठीक आहे .. येताना माझ्या बॉयफ्रेंड ला पण घेऊन ये काय ?"

मिहीर " त्याला घेऊन नाही फटकवून येतो .. "

आणि दोघे हसू लागले . आणि मिहीर बाहेरून लॉक लावून निघून गेला .

सायली त्या फोटोतल्या मुली सारखी तयार  कसे होयची तयारी करू लागली .

सायली छान तयार झाली .. अगदी फोटोतली तशी नाही पण तिच्या पेक्षाही सुंदर  दिसत होती . प्रॉब्लेम हा झाला होता कि हेअर स्टाईल चे गणित जमत नव्हते . तिला साधारण येतात त्या तिने सगळ्या  करून बघितल्या पण काही ह्या ड्रेस वर सूट होईना . मग तिने आपले एका क्लचर मध्ये थोडे बांधून थोडे मोकळे सोडले .

थोड्याच वेळात मिहीर त्याचे काम करून आला .

मिहीर " सुपर .. एकदम प्रिन्सेस दिसत आहेस . पण केसांचे जरा गडबड वाटतंय .. हे ह्या ड्रेस वर सूट नाही होत आहे .. आणि मी जे पॅकेट  दिलय त्यात सेम फोटो सारखी हेअर ऍक्सेसरी पण आहे.. ती राहुल जाईल ना मग "

सायली " हो पण .. आता काय करू ? कोणतीच हेअर स्टाईल सूट होत नाहीये या ड्रेस वर . "

मिहीर " थांब मी सांगतो . आणि तो सांगू लागला .. आधी इथे पुढे असा थोडे वरती बांध . (म्हणजे पफ ). मग मागे तू जसा घरात वरती  बांधतेस ना तसे बांध म्हणजे (मेस्सी बन) आणि इकडून एक बट आणि तिकडून एक बट बाहेर काढ आणि त्याला कर्र्ल कर .. आणि त्या मेसी बन च्या वर हि फ्लावर ची ऍक्सेसरी जी त्या ड्रेस बरोबर आहे ती लाव .. "

जसे जसे मिहीर सांगत होता तसे तसे सायली करत होती आणि इतकी परफेक्ट हेअर स्टाईल झाली होती ..

सायली एकदम खुश झाली ..

सायली " वॉव .. परफेक्ट .. मगाच पासून ट्राय करत होते पण जमतच नव्हती .. थँक्यू "

मिहीर " नुसते थँक यु..  माझी फीज मला मिळाली पाहिजे मॅडम .. आणि तिला मागून मिठीत घेतो .. किती सुंदर दिसतेय माझी माऊ .. "

सायली " थँक यु .. मिहीर .. ट्रिटिन्ग मी as स्पेशल . यु नो व्हॉट आय एम द मोस्ट लकीएस्ट पर्सन इन द वर्ल्ड . बिकॉज यु आर इन माय लाईफ . "

मिहीर " काय यार.. असे काही नसते .. आय जस्ट लव्ह यु सो मच "

सायली " आय लव्ह यु टू "

शेवटी त्याची फिझ घेऊनच तिला सोडलेन

सायली " एक ना ,, आता तर ६ वाजायला आलेत .. अजून हि एकही कॉल नाही आला रे .. काही प्रॉब्लेम नसेल ना झाला .. एक फोन करून विचारू का ?"

मिहीर " अग ,आपण एवढे स्टेटस ला फोटो ठेवतोय त्यांना वाटतं असेल कशाला यांना डिस्टरब म्हणून करत नसतील .. रात्री करतील ते .. नाहीच केला तर आपण करू मग .. "

सायली " शिशिर दादा मला म्हणाले होते कि ते कॉल करणार आहेत वाढदिवसाचा .. त्यांनी पण नाही केला "

मिहीर " हो रे .. सायली .. तुला सगळेच कसे विसरले "

सायली " काय कळत नाही .. बरं आता आपला  काय प्रोग्रॅम आहे ?

मिहीर " काही नाही .. असेच काल सारखे कॅण्डल लाईट डिनर करू .. फिरू "

बोलता बोलता मिहीर तयार झाला .. त्याने आपला जीन्स .. मस्त त शर्ट आणि त्यावर एक ब्लेझर .. टकाटक  .. रेडी .

मग दोघे रुम वरून निघाले आणि कार ने कुणीकडे तरी गेले . मिहीर ने एका ठिकाणी कार थांबवली आणि मग एका रेशमी रुमालाने  सायलीचे डोळे बांधले

सायली " हे काय आता नवीन "..

मिहीर " जस्ट फॉर फन .. बी  विथ मी बेबी "

मिहीर ने सायलीला हात धरून कुणीकडे तरी नेले .. आणि एका ठिकाणी आणून थांबवले .

सायली " काढ  ना पट्टी .. कुणीकडे आहोत आपण .. काढ  लवकर "

मिहीर " होय .. बी रेडी फॉर द  सरप्राईझ   "

आणि त्याने तिच्या डोळ्यावरची पट्टी काढली ..

एक मिनिटातच तिला जे दिसले ते इतके भारी होते कि मिहीर ची माऊ मुसुमुसु रडूच लागली .

मिहीर " अरे .. रडू नकोस .. तुझा मेक अप जाईल "

सायली एका  छोट्याश्या हॉल मध्ये होती . हॉल मध्ये सर्व पिंक आणि व्हाईट रंगाचे बलून चे डेकोरेशन होते आणि ती जिथे उभी होती ते स्टेज होते आणि ती एक रेड हार्ट शेप च्या फ्रेम मध्ये होती . तिच्या समोर एक टेबल होते आणि त्यावर ३ लेयर्स चा जशी ती तयार झालीय तसा प्रिन्सेस केक होता . आणि अजून सरप्राईझ संपले नव्हते . समोर तिचे आई बाबा , मिताली ,विनय , राज , रिया , तात्या , लीला बाई , लता वाहिनी , शिशिर दादा , सागर आणि सावनि  .. आणि तिच्या बाजूला तिचा प्रिन्स मिहीर .

सगळ्यांना तिकडे बघून सायलीला इतका आनंद झाला कि डोळ्यातून घळा घळा पाणी येऊ लागले . कशाचा विचार न करता तीने  मिहीर ला कडकडून मिठी मारली आणि त्याला गालावर किस करू लागली

मिहीर " अग , समोर तात्या आहेत .. जरा सांभाळ".

सायली  ने केक कापला .. केक कट करताना सगळे बच्चे कंपनी वरती स्टेज  वर आले.. सायलीला सगळ्यांनी केक भरवला .. तिने सर्वांना भरवला .. सर्वांनी मोठं मोठयांनीं तिला हैप्पी बर्थडे टू यु  गाणे म्हणून  विश  केले .

सायली सगळ्यांच्यात गेली मोठ्याना नमस्कार करून आशीर्वाद केला . मिताली ला कडकडून मिठी मारून भेटली .

एखाद्या परी सारखी वावरत होती त्या हॉल मध्ये .. शोभा , शरद , तात्या सगळेच एकदम खुश होते .

मग इव्हेंट  मॅनेजर वाला आला त्याने माईक वर काही तरी गेम्स घ्यायला सुरुवात केली .. आधी लहान मुलांन साठी मग मोठ्यासाठी असे गेम्स चालू होते .

इव्हेंट मॅनेजर ला कळले होते कि सगळेच नवरा बायको आहेत. मग त्याने गेम काढला कि नवऱ्याने बायको साठी गाणे म्हणायचे आणि बायको ने नवऱ्यासाठी गाणे म्हणायचे .

तात्या आणि शरद बाजूला गप्पा मारत  बसले होते. तात्यांच्या मनात काय आले ते लगेच स्टेज  वर गेले. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या .. तात्यांकडून हि ऍक्शन अपेक्षित नव्हती .. पण आपण पुढे गेलो कि बाकीचे पण जातील म्हणून तात्याचं पहिला पुढे आला . तात्या पुढे आल्यावर लीला बाईंना इव्हेंट मॅनेजर ने बोलावले . त्या आधी येत च नव्हत्या . पण नवऱ्या पुढे चालतय  का त्यांचे .

तात्या लीला बाईन कडे बघून     

तात्या " सौ साल पहले ...  हमें .. तुमसे प्यार था .. आज भी है और कल भी राहेगा ... "

लीला बाई स्वतःच्या लग्नात जेवढ्या लाजल्या नसतील तेवढ्या आज लाजल्या होत्या .. मनात म्हणत होत्या .. " काय माणूस आहे हा .. पोरांच्या सुनांच्या पुढे काय पण थेरं करतोय .

 सगळ्यांनी तात्यांच्या गाण्यावर कडकडून टाळ्या वाजवल्या . सायली मिहीर ला म्हणाली " अच्छा तुझ्या कडे रोमॅंटिकपणा कुठून आलाय त्याचा स्रोत मला आज कळला .

मिहीर " मलाहि  बहुदा आजच कळालय "

लीला बाईंची वेळ त्या म्हणाल्या गाणे तर येत नाही मी एक उखाणा घेते आणि खणखणीत आवाजात त्यांनी एक मस्त उखाणा घेतला ..

मग आता सगळे शरद च्या मागे लागले . मग शरद आणि शोभा स्टेज  वर आले 

शरद " मैं शायर तो नहीं .. मगर ऐ हंसी .. जब से देखा मैने तुझको मुझको शायरी.. आ गयी "

मिताली , सायली .. शरद ला गाणे म्हणताना बघून खूप खुश झाल्या  .दोघींचे डोळे पाणावले .. आणि शोभा चे तेच लाजून लाजून बेजार

आता शोभा चा  टर्न

शोभा " दृष्ट लागण्या  जोगे  सारे .. गाल  बोटही कुठे नसे

जग दोघांचे असे रचू कि स्वर्ग त्या पुढे फिका पडे. ..

स्वप्नाहून सुंदर घरटे

मनातून असेल मोठे

दोघांनाही जे जे हवे ते

होईल साकार येथे

आनंदाची अन तृप्तीची शांत सावली इथे मिळे

सायली मिहीर आणि मिताली विनय ला स्टेज वर बोलावून त्याच्या कडे बघून पुढील कडवे म्हणाली .

जुळले रे नाते  अतूट

घडे जन्मा जन्मीची भेट

घेऊनिया प्रीतीची आण

एकरूप होतील प्राण

सहवासाचा सुगंध येते आणि सुगंधा रुप दिसे

तात्यांसकट  सगळ्यांचे डोळे पाणावले .. प्रेमाने सगळ्याचे हृदय जणू ओथम्बुन वाहत होते .

शोभा , सायली आणि मिताली तिघींची एकमेकींची गळा भेट घेतली.

थोड्या वेळाने सगळे खाली आले . मिहीर सायली ला म्हणाला " तुम्ही तिघी पण सेम दिसता आणि तिघी पण रडू बाई आहेत ना .. क्षणो क्षणी डोळे भरून येतात .

सायली " हो रे .. आज खूप इमोशनल झालेय मी .. तू हे जे काय केलंस ना त्याची कशाचीच बरोबरी नाही होऊ शकत .. हॅट्स ऑफ टू  यु .. "

मिहीर " हो .. पण हे अश्रू मला त्रास देतात ना .. त्याचे काय "

सायली " अरे .. हे काय दुःखाचे अश्रू नाहीयेत.  हे  आनंदाचे , प्रेमाचे आहेत .. "

मिहीर " हमम.. "

आता शिशिर दादा आणि लता वाहिनी चा टर्न  . आढे वेढे घेत दोघे स्टेज वर गेले ..

शिशिर " ना गजरे कि धार .. ना मोतियोंकी हार .. तुम कितनी सुंदर हो .. तुम कितनी सुन्दर हो .. "

लता स्टेज वरून खाली धावत आली आणि सासू च्या शेजारी बसली .. ती पुन्हा स्टेज  वर जायलाच तयार नाही .. शेवटी  सासू बाई नि च पाठवले तेव्हा आली ..

शिशिर च्या गाण्यावर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या .. दादाला हे गाणे म्हणताना बघून मिहीर जाम हसत होता .. तोंडावर हात ठेवून ..

लता" तुम्ही मेरी मंजिल .. तुम्ही मेरी पुजा .. तुम्ही आसरा हो .. तुम्ही देवता हो ... "

लता पण गाणे बोलताना थोडी तरी रडलीच आणि पुन्हा पळत खाली आली .

विनय काही केल्या स्टेज वर यायला तयार नाही .. सगळे दोघांना खूप फोर्स करू लागले .. विनय ला काही गाणे येत नाही .. असेच म्हणत होता ..

शेवटी मिताली पुढे गेली " तुम .. बिन जिया जाये कैसे ... कैसे जिया जाये तुम बिन .. सदियोंसे लांबी है राते .. सदियोंसे लंबे हुए दिन .. आजाओ लौट कर तुम .. ये दिल कह .. रहा है "

आणि त्याला अचानक काय वाटले काय माहित हे मिताली चे गाणे ऐकून तो स्टेज वर गेला .. आणि मितालीच्या बाजूला उभा राहिला .. तो स्टेज वर गेला म्हणून सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या ..

विनय " मेरा दिल भी कीतना पागल .. ये प्यार  तो तुमसे करता है .. पर सामने जब तुम आते हो .. पर सामने जब तुम आते हो .. कुछ भी कहानी डरता  है .. ओ मेरे साजन .. साजन .. साजन "

सायली ने पुन्हा एक हुंदका भरला ..

झाली आता सगळ्यांची गाणी म्हणून झाली . पण अजून आपले हिरो हेरॉईन राहिलेत ना ..

मिहीर तर जाम एक्ससिटेड होता .. दोघे मस्त हातात हात घेऊन स्टेज वर आले .. तिला ड्रेस मुळे चढायला मदत करत होता .. सगळे दोघांचे नखरे बघत होते .

खालून सगळे " मिहीर .. मिहीर ... असे ओरडू लागले "

मिहीर ने सायलीच्या कमरेत हात घातला  

तिने पण त्याच्या तालात ताल धरला ..

“मेरे रंग में  रंगने वाली

परी या हो परियोंकी रानी

या हो मेरी प्रेम कहानी

मेरे सवलोका जवाब दो ... दो ना ..

बोलो न क्यू ये चाँद  सितारे

तखते है यू  मुखडे को तुम्हारे

छुके बदन को हवा क्यू महकी

रात  भी है क्यू बहेकि बहेकि ..

मेरे सवलोका जवाब दो ... दो ना ..

क्यों हो तुम शरमाई हुई सी ,

 लगती  हो कुछ  घबराई हुई सी

ढलका हुआ सा  आँचल क्यू है ,

 ये मेरे दिल में हलचल क्यू है ..

मेरे सवलोका जवाब दो ... दो ना ..

सायली आणि मिहीर एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून एकमेकडे बघत होते ... सायलीच्या डोळ्यातला  एक अश्रू जणू मिहीर च्या परवानगी ची वाट बघत तिच्या पांपण्यावर येऊन थांबलेला होता .. दोघे हरवून गेले होते ..

शेवटी सगळ्याच्या टाळ्यांचा आ वाज ऐकला तेव्हा त्यांनी एकमेकांना सोडले .

मिहीर च्या रोमँटिक सॉंग ला कडकडून टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला .

आता सायली मॅडम ची बारी .. सायली अजून मिहीर च्या ओरातून पूर्ण बाहेर पडली नव्हती ..

खालून सगळे पुन्हा सायली...  सायली ..   ओरडू लागले .

सायली ने एक मिनिट विचार केला आणि तिला एकच गाणे आठवले ते म्हणजे

सायली "

तुमसे मिलके..  ऐसा लगा  तुमसे मिलके  

अरमान हुए पुरे दिल के

ऐ  मेरी जाने  वफा

'तेरी मेरी ' मेरी 'तेरी  एक जान है ..

साथ तेरे रहेंगे सदा ..

तुमसे ना होंगे जुदा .

मेरे सनम ..  'तेरी कसम..  छोडेंगे अब ना ये हात

ये जिंदगी..  गुजरे गीं अब..   हम दम  तुम्हारे हि साथ

अपना  ये वादा  रहा...  तुमसे ना होंगे जुदा .. तुमसे मिलके

मैने किया है रात  दिन

बस तेरा हि इंतजार 

तेरे बिना  आता नही

एक पल  मुझे अब करार

हम दम मेरा मिल गया

हम  तुम ना होंगे  जुदा

हम दम मेरा मिल गया

अब हम  ना होंगे जुदा

मिहीर पण  तिच्या बरोबर गाणे म्हणू लागला . 

तुमसे मिलके..  ऐसा लग तुमसे मिलके  

अरमान हुए पुरे दिल के ...

सगळ्यांनी कडकडून टाळ्या वाजवल्या .. या दोघांना आता आपल्याला एकांत मिळावा असे वाटू लागले होते . दोघे एकमेकांत विरघळत चालले होते .. यावेळी मिहीर चे डोळे पण भरून आले होते ..

मग सगळ्यांनी एकत्र डिनर केले . फोटोज काढून आठवणींना कैद करून टाकले ..मग  प्रत्येक जण आपापल्या रूम मध्ये झोपायला गेले ..

🎭 Series Post

View all