विभक्त भाग ३४

In this sayli is thinking how mihir will be back to normal life

विभक्त भाग ३४

क्रमश : भाग ३३

मिहीर दार ठोकवून " दार उघड सायली .. सायली मी दार तोडून टाकेन हा .. दार उघड आधी "

सायली " तू झोप तुझ्या रूम मध्ये .. मी झोपेन माझ्या रूम मध्ये "

मिहीर " ठीक आहे .. थँक यु .. ऍकसेप्ट केल्या बद्दल " फक्त दार उघडे ठेव ... तुझा काही भरवसा नाही .. झोपलीस कि झोपलीस .. मागचे आठवतंय का ? तुझ्या बाबांना शिडी लावून खिडकीतून यावे लागले होते तुला उठवायला "

सायली " माझे माझं मी बघून घेऊन तुला रूममेट ची काळजी करायची गरज नाही.. मी मरेन नाहीतर जगेन "

मिहीर " मी आत आलो ना तर तुझी आता काय खैर नाही ... वाटेल ते बोलू नकोस ?"

सायली ने उठून दार उघडले आणि " काय करणार आहेस मला .. कर .. कर .. एकदाची तुला मुक्ती मिळेल माझ्या पासून "

मिहीर " थांब आता तुला गावालाच नेतो .. तिकडे रोज तू  नऊवारी साडी नेस आणि माझ्या बरोबर शेतावर चल .. नाही अक्खी क्रिकेट टीम ची आई बनवली तर माझे नाव मिहीर लावणार नाही .नाहीतर असे करतो तात्यांना सांगतो जमीन विका आणि एक कंपनी टाका त्याचा डायरेक्टर ,सीईओ , व्हीपी सगळी असतील नसतील त्या पोस्ट तुझ्या आणि मी तुझा पियुन बनतो "

सायली रडता रडता हसायला लागते .. पियुन कशाला होतोस .. दुसरे कोण नाही का ?"

मिहीर " अग पियुन झालो तर तुझ्या मागे मागे राहता येईल ना मला .. यस मॅम .. यस मॅम करत”

आणि दोघे हसायला लागतात . इतके हसतात ... हसत हसत सोफ्यावर जाऊन बसले  . एकेमेकांना टाळ्या देऊन हसतात .. हसता हसता डोळ्यातून पाणी यायला लागते .  सायलीने मिहीर च्या खांद्यावर डोके ठेवले ... दोघे हि शांत, स्तब्ध झाले .

दोघे हि एकमेकांचे मौनाने सांत्वन करत होते . बराच  वेळ तसेच बसून राहिले ....

पण आता दोघांच्याही मनातला  राग निघून गेला होता . भरून आलेला आभाळ पाऊस कोसळल्यावर कसे स्वच्छ आकाश होते तसे त्याचे मन पण स्वच्छ झाले ..शांत झाले .. 

सायलीला तेवढ्यात फोन येतो मितालीचा

मिताली " सायली , अग मी अमुक अमुक दुकान पर्यंत आलेय .. तिकडून कुणीकडे यायचे .. "

सायली "तिकडून राईट टूर्न घे .. त्याच्या मागेच आहे "

सायली " मिहीर , उठ ताई येतेय आपल्याकडे पहिल्यांदा .. "

मिहीर  पण उठून आत जातो आणि जरा फ्रेश होतो .. सायली पण जरा ड्रेस , केस नीट करते .. रडले असे नको वाटायला म्हणून आरशात बघून एक दोनदा हसून बघते .

तेवढ्यात मिताली आणि राज आणि रिया दोघांना घेऊन येते .

राज रिया .. मावशी .. मावशी करत सायली कडे धावत जातात .. आणि हाय फाय करतात .

मिताली पण सायली ला कडकडून मिठी मारते ..

मिताली " कशी आहेस? तब्बेत कशी आहे ? बरे वाटतंय का आता ? हात बघ किती सुजलाय तो "

सायली " बस ग .. मी बरी आहे आता ..  दोन दिवस आराम केला कि होईल ठीक "

तेवढ्यात मिहीर बाहेर येतो रूम मधून

मिहीर " हॅलो .. मिताली ताई ,, हॅलो राज .. हॅलो रिया "

मिताली " प्लिज मिहीर तू नको मला ताई म्हणूस "

मिहीर पण जरा कॉन्फ्युजच होता हिला नक्की काय हाक मारावी ते .. तिनेच सांगितले  ते बरे झाले .

मिताली " काय सायली ? अग आई बाबांना नाही सांगायचं मी समजू शकते जरा ऑकवर्ड होते पण मला नाही का सांगायचेस .. मी आले असते हॉस्पिटल ला  तुझ्या बरोबर "

मिहीर ला असे वाटले या दोघी बहिणींना काही खास गप्पा मारायच्या  असतील तर मी उगाच मध्ये आलोय . त्याने आयडिया केली .. त्याने राज आणि रिया ला टेरेस वर नेले . आणि त्यांच्याशी काहीतरी खेळू लागला .

सायली " हो .. ग चुकलंच .. सगळ्यांची मने दुखावलीत "

मिताली " तसे नाही ग , मनाचं  काय घेऊन बसलीस . तुझ्या तब्बेती पुढे काही महत्वाचे आहे का ? सांग बरं "

सायली बोलता बोलता पाणी देत होती आणि कॉफी टाकत होती

सायली " काय आता सांगू .. मला जे योग्य वाटले ते मी केले .. आणि अजूनही मला तेच योग्य वाटतं "

मिताली हळूच म्हणाली  " दोन दोन वेळा हनिमून ला गेल्यावर काय हेच होणार  आणि दोघी हसायला लागल्या . अर्धा एक तास खूप गप्पा मारल्या दोघींनी . लग्नाच्या , लग्नां नंतर च्या बरेच टॉपिक बहिणी मध्ये गप्पा मारायचे राहिले होते . तोपर्यँत मिहीर ने  मुलांना गाडी मधून एक राउंड  मारून आणले त्यांना पाहिजे तो खाऊ घेऊन आला .. खेळणी घेऊन आला . त्यामुळे दोघं मुलांची आणि मिहीर ची चांगलीच गट्टी जमली होती .

दोघींना चॉकलेट केक आवडतो म्हणून केक घेऊन आला .. सर्वांनी एकत्र बसून खाल्ला .

मिताली मग घरी निघाली .. जाता जाता  मिताली म्हणाली "मग , मिहीर .. जमतंय का प्रकरण .. सायली बाईंचे प्रकरण दिसते तेवढे सोप्पे नाही "

मिहीर " मला कठीणच प्रकरणे आवडतात " असे म्हणाला आणि सगळे हसायला लागले "

राज रिया  जाताना सायली मावशीला पण किशी दिली ती दिली पण या वेळी मिहीर काका ला किशी देऊन गेले . दोघेही खाल पर्यंत मितालीला सोडायला गेले ..

चला  मिताली आल्यामुळे थोडे जरा वातावरण नॉर्मल झाले . तेवढ्यात विमल ताई आल्या जेवण बनवायला .. हे दोघे त्यांच्या त्यांच्या लॅपटॉप काहीतरी करत बसले .

सायली  पण मिताली ला भेटल्यावर जरा खुश झाली शेवटी मोठी बहीण ती मोठी बहीण .. आई नंतर बहीण च असते प्रिय .

विमल ताई त्यांचे त्यांचे काम करून गेल्या . मग हे दोघे बसून जेवले .. सायलीचा आजच्याच गोळ्यांचा डोस बाकी होता .. उदया  पासून फक्त व्हिटॅमिनस आणि आयर्न च्या गोळ्या .

जेवण झाल्यावर सायलीने गोळ्या खाल्ल्या आणि खरंच मिहीर झोपायला म्हणू त्या रूम मध्ये गेला .. आणि दार लावून झोपला.. त्याला गावातले कधी ना कधी हि सुरवात करायचीच आहे तर आज पासूनच करू ..

सायली ने थोडा वेळ दार वाजवले ..

मिहीर " सायली .. यार झोप आलीय मला .. मी काल  फुल नाईट जागा होतो .. तू पण झोप आता "

सायली " अरे पण तू दार का लावलेस ?

मिहीर " आतून काहीच रिप्लाय नाही .. "

सायली शेवटी सोफ्यावर बसली ... आता काल  ह्याने रात्र जागवली आता हि रात्र जागवणार.. सायलीची विचार सत्र सुरु झाली .. मरूदे ते जॉब .. हे सगळे सोडून देते .. सगळीकडून नुसता वैताग आलाय .. यार मला कोण समजूनच घेत नाहीये .. मिताली , आई , बाबा आणि आता मिहीर पण .. दाखवतो कि माझ्या बाजूने विचार केतोय पण हे असे वागून मला किती त्रास देतोय ..

आता मी कशी झोपणार ? मिहीर च्या   जवळ झोपायची मला सवय लागलीय . आणि रूम मेट्स काय ? हा असं काय करतोय ? दोन वर्षे .. बापरे .. हे कुठून खूळ आले ह्याच्या मनात काय माहित ..

हे खूळ त्याच्या डोक्यातून काढले पाहिजे .. काय करू म्हणजे तो नॉर्मल होईल .

माझे खरच चुकले का ? हा विषय इतका वाढवायची काय गरज आहे ? ती रुपाली नाही का सांगत होती तिच्या नवऱ्याला  सेटल होई पर्यंत बाळ नको तर तिला जबरदस्तीने त्याने हेच करायला लावले होते ..

बहुदा लग्न झालेल्या प्रत्येकच्या बाबतीत असे घडत असेल .. कधी नवरीला नकोय , कधी नवर्याला नकोय पण म्हणून काय लगेच ते असे विभक्त होतात का ?

हा कुठला न्याय .. आहे ..

बिचाऱ्याची माझ्या मुळे खूप फरपट होतेय का ?  तो मला म्हणाला मी काही नंदी बैल नाहीये म्हणजे त्याचा कुठे तरी मेल इगो दुखावला गेलाय का ? कारण मी त्याला सांगितले नाही  .. म्हणून .. पण तसा नाहीये तो .. मुख्य म्हणजे माझ्यावर जीव पाड   प्रेम आहे त्याचे .. त्याला मी दुखी बघवतच  नाही . अरे हो हे त्याला विचारायचेच राहिले कि तो हॉस्पिटल पर्यंत पोहचला कसा ?

एक महिन्यात प्रेग्नंट म्हणजे जरा अतीच झाले होते यार .. लोकं मागून हसली असती आम्हाला . एक वर्षाच्या आत मूल झाले असते तर .. कोण कोण तर म्हंटले असते कि ह्यांची गडबड बहुदा आधीच झाली असणार म्हणून तर लगेच लग्न केले .. असे महिन्यात नंबर लागतो का ?

शी .. काय विचार करतेय मी .. काय करू मिहीर ला मनवायाला .. 

नाही नाही हे आत्ताच थांबवायला पाहिजे नाहीतर एकदा का तो आज रात्री एकटा झोपला कि सुरुवातच करेल.. सायली तिच्या स्वभाव नुसार हायपर झाली .

आणि त्याचे दार ठोकवायला  लागली " मिहीर ... मिहीर ... बाहेर ये .. मला भीती वाटतेय प्लिज .. बाहेर ये .. मी एकटी नाही बाहेर थांबू  शकत "

मिहीर " सायली , तू रुम मध्ये जाऊन झोप .. .. झोप येईल बघ .."

मिहीर पण कुठला झोपलाय .. नुसता या कुशीवरून त्या कुशीवर .. दोघांना एकमेकांची सवय झालेली  

सायली " बघ .. असा रडवतोस तू मला .. आणि मला म्हणतोस कि रडते म्हणून "

शेवटी  मिहीर ने दार उघडून आला  बाहेर.

सायली "मिहीर त्या दिवशी तू हॉस्पिटल ला कसा आलास रे .. तुला विचारायचेच राहिले "

मिहीर " आलो बरोबर .. "

सायली " सांग ना "

मिहीर " मी ना तुझ्या बॉडीत एक इन्व्हिझिबल चिप टाकलीय .. तुला माहित नाहीये पण तू कुठे जातेस , काय करतेस ते सगळे मला दिसते मोबाईल वर "

सायली " गप रे .. सांगतोस   का भाव खातोस आता "

मिहीर " सांगेन तुला नंतर कधी तरी .. बहुत लंबी स्टोरी है । आणि बसला सोफयावर

सायली " चल , चिल मारू "

मिहीर " फटके हवेत .. झोप जा .. आपली तब्बेत काय ? बोलतंय काय ?"

सायली "तुला खरंच गावाला जायचंय का ? म्हणजे अंतरिक ईच्छा आहे का ?"

मिहीर " हो .. तुला घेऊन शेती करायचीय .. मी शेतात काम करेन मग तू मला बुलेट वर बसून मस्त डबा घेऊन ये .. आणि तुला सरपंच बाईचं बनवतो गावची " आणि हसायला लागतो.

सायली " सपना अच्छा है । पण स्वप्नं म्हणूनच ठेव बाबा .. त्या नऊ वारी साडीत असली वाट लागते "

मिहीर " अरे .. तू तर पाखरू दिसतेस त्यात .. तशी सगळ्याच ड्रेस मध्ये छान दिसतेस पण नऊवारी मध्ये जरा वेगळीच दिसतेस .. "

मिहीर " अरे .. अजून एक आयडिया आहे माझ्या कडे मला गेल्या वर्षी कंपनीकडून २ वर्षांसाठी USA ला पाठवत होते तर तेव्हा मी ते रिजेक्ट केले . मी ती ऑफर पण मागून घेऊन शकतो परत "

सायली " अरे वाह .. पण तू रिजेक्ट का केलीस तेव्हा ? एवढी चांगली ऑफर "

मिहीर " अरे .. त्या USA ला एकट्यानेच काय जायचे .. कोण तरी बरोबर असले तर मज्जा येईल ना ..म्हणून म्हटले कि जाऊ नंतर बायकोला घेऊन . पण आता तर तू काय माझ्या बरोबर USA ला पण येणार नाहीस .. तुला तुझा जॉब सोडावा लागेल .. त्यासाठी "

सायली " हमम..पण आपण जाऊ एकदा .. २nd हनिमून ला

मिहीर " सायली .. तुझं नक्की काय म्हणणं आहे एकदा सांगशील का मला ?"

🎭 Series Post

View all