विभक्त भाग ४

In this part Mihir indirectly help sayali ti cancel the marriage

                                              विभक्त भाग ४

क्रमश: भाग ३

सायलीने घरात सगळे डावपेज करून बघितले पण शेवटी आई वडिलांच्या ख़ुशी पुढे तिला काही वेगळे करावेसे वाटे ना .. हे प्रकरण मिहीर ने सपोर्ट केला असता तर बाहेरच्या बाहेर मिटले असते हा एकाच पर्याय होता म्हणून तर तिने त्याला मेसेज पाठवला होता . पण तिला हे कुठे माहिते कि मिहीर च्या हातात या बाबतीत तरी काहीच नाहीये . आणि खरंतर दोघांचे हि लग्नाचे वय झाले होते . म्हणजे आत्ता  जर लग्न झाले ना तर परफेक्ट वयात आणि परफेक्ट कपल होऊ शकते पण हे कपल तर झाले पण परफेक्टली इम्परफेक्ट कपल झालेत .

 सायलीच्या डोक्यात विचार येऊ लागला कि मी ऑफिस मधून ट्रान्सफर घेऊ का ? किंवा एक वर्ष साठी ऑन साईट बाहेरच्या देशात वगैरे असा काही ऑप्शन निघेल का ? जास्त विचार केला कि वाटायचे बाहेरच्या देशात मला एकटीला आई बाबा पाठवणारच  नाहीत . शिवाय इंडिया मध्ये ट्रान्सफर घेतली तर मला एकटीला कुठेतरी दिवस काढावे लागतील . इथे निदान आई बाबा तरी आहेत .. त्यामुळे सायली पुढे कोणताच मार्ग सापडत नव्हता .

तेवढयात सायलीच्या बाबांना मिहीर चा फोन आला

मिहीर " नमस्कार काका मी मिहीर बोलतोय "

शरद " हा बोल बेटा "

मिहीर " एक विचारायचे होते म्हणजे सायली ला आमच्या गावात राहायला आवडेल ना ?"तसे सण समारंभ खूप असतात . शिवाय माझी वाहिनी आणि आई थोड्या गावातल्या विचार सरणीच्या आहेत .. म्हणजे मला ती खूप आवडलीय . पण तिच्या चेहऱ्याकडे बघून मला तसे वाटले नाही .. तर तुम्ही अजून वेळ गेलेली नाही .. तिच्या मनाचा पण एकदा विचार करावा असे मला वाटतेय ..

काका राग मनू नका .. मला वाटले ते मी तुम्हला बोललो .. कदाचित तसे काही नसेल पण .. मी माझ्याकडून फिक्सच आहे .. "

शरद" मिहीर .. बेटा मला वाटत नाही तसे पण तरी सुद्धा मी तिच्याशी एकदा बोलून  बघतो , काही वेळा मुलींना लग्न म्हटले कि जरा वेगळे टेन्शन असतात . शेवटी आई बापाचे घर सोडून यायचे असते  .

मिहीर " हो तेही आहेच .. मी म्हणून तर म्हटले कि मला वाटतंय ते कदाचित चुकीचे पण असू शकते . "

शरद " ओके बेटा , यावरून तू सायलीची किती काळजी घेशील याचा मला अंदाज आलाय . कारण नुसत्या चेहऱ्याकडे बघून तुला तिच्या मनात काहीतरी चालू आहे हे कळले .

मिहीर " ठीक आहे . ठेवतो आता "

शरद " हो चालेल ".

मिहीर ने फोन करून सायली ला एक प्रकारे मदतच केली होती . आता शरद तिच्या जवळ हा विषय काढेल आणि तिला विचारेल कि तुला मनापासून हे स्थळ आवडले आहे का ?"

म्हणजे असा मिहीर चा आपला समज

प्रत्यक्षात मिहीर च फोन ठेवल्या ठेवल्या शरद च्या डोक्यात अशी तिडीक गेली होती .. त्याने सायली ला बोलावून चांगली झापायची ठरवली होती .

त्याने राग- रागात  मोठ्याने हाक मारल्या " सायली .. ए सायली "

सायली आणि शोभा दोघी बाहेर आल्या ..

शोभा " अहो .. केवढ्यांदा ओरडताय .. काय झालेय "

नंतर दुसरे मन शरद ला असे सांगू लागले कोण कुठचा मुलगा अजून त्याने तिला नीट पहिले पण नाही तो तिच्या मनाचा विचार करतोय आणि मी माझ्या मुलीचे मन ओळखत नाहीये का ?मी तिचे नुकसान तर करत नाहीये ना .. असे त्याला मनात वाटू लागले .

शरद चा स्वर बदलला

शरद " सायली तू खुश आहेस ना बाळा ? कसे आहे तुझी लग्न चांगली ठिकाणी लावून देयायचे हेच एक ध्येय आहे आता आमच्या  दोघांच्या आयुष्यचं . "

शोभा " हो ना तुझ्या ताई ने आम्हाला न विचारताच तिचा नवरा सिलेक्ट केला त्यामुळे हा असला प्रकार झालाच नाही "

शरद " हो ना ..शेवटी काय तिने तिचा नवरा सिलेक्ट केला पण आता ती तिच्या आयुष्यात सुखी आहे ना हे महत्वाचे .. उद्या तू असे नको म्हणायला कि बाबांनी मला हि संधी दिली नाही .

शोभा " हो खरच ग ? तू खुश आहेस ना .."

सायली पूरती  गोधळून गेली आज आत्ता या दोघांना काय झाले ? मी आत्ता काय बोलावे .. माझ्या मनात काय आहे लगेच सांगू का ? "

सायली " काय बोलू कळतच नाहीये "

शरद " बोल आज तुला मी शेवटचा चान्स देतोय .. पुन्हा कदाचित मी या मोड वर येईन कि नाही .मलाच माहित नाही "

सायली " बाबा मला इतक्यात लग्न करायचे नाहीये .. मला माझे करिअर जास्त महत्वाचे आहे .. सध्या माझ्या पुढे प्रगतीचे अनेक मार्ग खुले आहेत . कदाचित लग्न झाल्यावर मला एवढ्या मोकळे पणाने करिअर सांभाळता येईल का ? याचेच मला टेन्शन आहे "

शरद " म्हनजे काहीतरी टेन्शन आहे हे नक्कीच .म्हणजे मिहीर म्हणत होता हे खर आहे "

शोभा " काय बोलताय ते नीट बोलाल का ?मला काही कळले नाही .यात मिहीर चा काय संबंध? "

शरद " अ ग आता मला मिहीर चा फोन आला होता .. तो मला म्हणाला कि सायली नक्की खुश आहे ना ? ते एकदा बघा ?"

शोभा " बापरे ! सायली तुला कळतंय का काही ? तुला नुसता एकदा पहिल तर तो तुझ्या मनातले ओळखले "

सायली ने तेव्हढ्यात मोबाइल चेक केले तर तीला मेसेज आला होता " तुला एक चान्स मी दिलाय आज जर तू तुझा प्रॉब्लेम जो काही आहे तो तुझ्या वडिलांना सांगितलास तर हे लग्न ते कॅन्सल करू शकतात .. माझ्या वडिलांची तू काळजी करू नकोस त्यांना मी समजवेन .

सायली आता तर खूप गोंधळून गेली तिला आता कळले कि मला मदत कारण्यासाठी त्याने हा कॉल केला होता .. या सगळ्यात त्याला थँक यु चा मेसेज पण तिने टाकला नाही "

बाबांना काय सांगू .. हीच ती वेळ आहे .. आज नाही बोलू शकले तर पुन्हा कदाचित कधीच चान्स नाही मिळणार "

सायली " आई बघ ना मला पुढल्या महिन्यात प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे आणि आताच नेमके हे लग्नाचे निघतय. खूप घाई होतेय

शोभा " सोफयावर बसली आणि रडायलाच लागली "

सायली " आई रडू नको ना .. माझे म्हणणे काय आहे ते तर ऐक ना "

शोभा " काय ऐकू .. काय डोक्यात आहे तुझ्या ? माझ्या डोक्यावर हात ठेवून सांग "तुझं बाहेर काही आहे का ? घे माझी शपथ ?कारण मिताली पण तिच्या लग्नाचा विषय काढला कि असेच काहीतरी कारण द्यायची . "

सायली " नाही आई .. असे काही नाहीये "

शरद " नाही असेल तर आताच सांग .. मी तात्याला आताच फोन करून त्याची माफी मागतो आणि विषय संपवतो एकदाचा . "

सायली " मला फक्त माझ्या करिअर चा विचार करतेय .. शिवाय लग्न करून अडकण्यापेक्षा न लग्न करता मला तुमच्या बरोबर आयुष्य घालवायला आवडेल . उद्या अचानक उठून परक्या लोकांच्या घरात जाऊन त्यांच्या घराण्याच्या आब राखण्या पेक्षा तुम्ही मला तुमचा मुलगी न मानता मुलगा माना .. "

शोभा " आग काय बोलतेस काय ? लोक शेण घालतील आमच्या तोंडात "

शरद " आम्हाला मुलगा नाही याची कधी जाणीव आम्ही करून दिलीय का आम्ही ? आम्हाला नकोच आहे मुलगा .. तू मुलगी आहेस आणि तिचे रीतसर लग्न लावून देणे हेच आमचे आद्य कर्तव्य आहे ."

सायलीने तिच्या  मनातले सगळे बोलून दाखवले पण सायली ची  मागणी हि मान्य करण्या सारखी नव्हतीच .. कोणतेही आई बाबा हे करणार नाहीत .

शोभा " हे बघ बाळा , तू का असे म्हणतेस  हे मला माहित नाही पण हे स्थळ हातचे सोडू नकोस  . आम्ही तुझे आई बाबा आहोत .. तुझं वाईट तर नक्कीच करणार नाही .. "

शरद " मी एकदा फायनल तुला विचारतो ह्या लग्नाला तू तयार आहेस कि नाही ?"

शोभा " अहो तिला काय विचारताय ? तिला काय कळतंय ?"

शरद " तू थांब ग.. सायली मी काय विचारतोय तुला ?"

सायली " हो"

सायली पुढे हो बोलण्या शिवाय  काहीच पर्याय नव्हता .

🎭 Series Post

View all