विभक्त भाग ९
क्रमश: भाग ८
सायली रुम मध्ये गेल्यावर सर्वात पहिल्यांदा तिथल्या बेड वर जरा आडवी झाली ..
सायली "पाठ लावल्यावर बरे वाटले"
मिताली "अग झोपतेस काय ? उठ आवरायला घे . साडी घालायला वेळ जाईल . " आणि मिताली रियाला झोपवू लागली . रिया थोडावेळ झोपली तर प्रोग्रॅम पर्यंत फ्रेश होईल म्हणून .
शोभा "काय ग मिताली , तुला कसे वाटतंय घर ? जमेल ना आपल्या सायलीला "
मिताली " अग , हिला इथे कुठे राहायचं ? ती राहणार तिकडे नवऱ्या बरोबर "
शोभा "नाही , तरी पण ग , सण वार , रीती रिवाज सांभाळले पाहिजेत ह्या ठमीने "
मिताली आई तुला जशी लग्न फिक्स करण्याची वेळ आली ना तशी भीती वाटायला लागलीय .. काही नाही .. बाबांनी खूप छान स्थळ शोधलय सायलीला .
शोभा "ह्या कार्टी ला काही आहे का बघ ? झोपते बघ कशी ?"
सायली 'अग झोपत नाहीये ग, पाठ लावतेय "
मिताली "सायली उठ हा आता .. तू फ्रेश होऊन ये आणि लवकर साडी घालायला घे . "
शोभा आणि सायली फ्रेश होऊन आल्या आणि तयार होऊ लागल्या . छोटी सावनी तर होतीच बरोबर त्यांना घर दाखवायला . तीचे सगळे लक्ष सायली वर केंद्रित होते . ती काय करते , कशी चालते , कशी बोलते . लहान मुलांना घरात येणाऱ्या नवीन मेंबर चे खूप कौतुक असते . पटकन त्यांच्याशी त्यांची मैत्री होऊन जाते .सायलीने सावनीला एक कॅडबरी काढून दिल्या मु ळे साव नी ची ती फेव्हरेट काकी होणार अशी चिन्ह दिसायला लागली होती . कॅडबरी देऊन सुद्धा तिने ती अजून खाल्ली नव्हती . हातात ध रु न ठेवली होती
सायली " का ग ? तू ला हि कॅडबरी आवडत नाही का ? अजून खाल्ली नाहीस ?
सावनी " नाही ओ , माझा लहान भाऊ आणि मी दोघे खाऊ नंतर "
सावनी पण काही तशी मोठी नव्हती पण समंजस पणा बघा किती . अश्याच असतात ह्या मुली लहान पणा पासून त्याग करायचा त्यांना सांगावे लागत नाही .शेअरिंग करून खाण्यात जी मजा आहे ती एकटीने खाण्यात नाही हे बहुदा तिला कळले असावे . मग ते सुख असो वा दुःख शेअरिंग करण्यात मजा असते .
सायली ने जशी बनारसी साडी नेसायला काढली मिताली आणि सायली चे पुन्हा साडीवरून डिसक्शन सुरु झाले .
मिताली " कसली भारी साडी आहे ना .. खूप छान .. "
सायली " हो ना .. आणि ती साऊथ इंडियन साडी पण किती छान होती ना "
मिताली " हो ना .. नेक्स्ट टाइम आपण दोघी ती साडी पण घेऊन येऊ तुझ्यासाठी .. "
सायली " हो चालेल . नक्की घेऊ "
शोभा " अ ग पोरींनो आवरा लवकर ,नंतर गप्पा मारा .. मिताली जा तू उठ आधी तू पण तयार होयला घे .. रिया झोप ली य तर तू तयार हो पटकन "
मिताली पण उठली पटकन सावनी ला घेऊन फ्रेश होयला गेली
सायली पण पटकन तयार झाली . फार काही मेक अप करायचा नव्हताच तरी पण थोडा टच अप केलाच , मस्त खूप गजरे घातले , घेतलेला सेट , हातात , छोटीशी टिकली आणि सायली एकदम रेडी .
शोभा आणि मिताली पण तयार झाल्या आणि सावनी ला पण थोडा मेक अप केला आणि सर्व जण बोलवण्याची वाट बघत बसले .
शरद , विनय आणि राज तिघे दुसऱ्या खोलीत होते . ते पण मस्त ट्रॅडिशनल ड्रेस घालून तयार झाले .. कोणीतरी आले आणि तिघांना फेटे बांधले . आणि हे पठ्ठे पण तयार झाले
शरद " विनय तूम्ही नारळ घेऊन सायली च्या सासर्यांना नारळ टोपी द्या . आणि नंतर हि दुसरी ड्रेस आणि नारळ मुलाला द्या "
विनय " बाबा .. मी कशाला .. तुम्ही द्या ना "
शरद " जावई म्हणजे मुलगाच असतो .. आता माझा मुलगा असता तर त्यानेच केले असते ना हे सगळे "
विनय " तुम्ही मागे थांबा , म्हणजे काही चुकायला नको "
शरद " हो .. नंतर सुपारी फोडायचा आधी एक मीटिंग होईल त्यात लग्नाचे , देण्या घेण्याचे सर्व गोष्टी ठरवल्या जातात आणि त्याची लिखापडी होते . ते पण लिहायचे आणि सर्वांना वाचून दाखवायचे .
आज विनय पण देखणा दिसत होता .
तेवढ्यात तात्या स्वतः शरद ला बोलवायला आला .
तात्या " चला , शरद राव कार्यक्रम सुरु करू .. झाली का तयारी ?"
शरद " हो नक्कीच ,, आम्ही तयार आहोत "
आणि तिघे बाहेर अंगणात एक मंडप घातला होता तिथे बसायला निघाले .
मंडपात एका साईडला सगळे पुरुष बसले होते आणि एक साइडला बायका बसल्या होत्या .
तात्या शरद ची आणि विनय ची ओळख गावातील मंडळींना करून देत होते .
तेवढ्यात मिहीर बाहेर आला .. आहा .. राजबिंडा .. नाजूक शेरवानी त्यावर एक फेटा आणि पायात चप्पल .. मिहीर मंडपात आल्यावर वातावरण बदलले .
विनय ने मिहीर ला पहिल्यांदाच पहिले होते . शरद ने दोघांची ओळख करून दिली . थोडा वेळ बोलून झाल्यावर मिहीर एक खुर्चीत जाऊन बसला .
विनय " बाबा .. मुलगा छान आहे हो .. सायली ला शोभून दिसेल "
शरद " हो ना .. "
तेवढयात शोभा , सायली आणि मिताली तिघी खाली आल्या .. लीला बाईंनी सायली ला पुन्हा सगळ्यांच्या मध्ये बसवली . शोभा आणि मिताली होत्याच मागे .
त्या बनारसी साडीत सायली चे रूप खुलले होते .. साडी मध्ये मुली स्त्री रूपात दिसू लागतात . सौदर्यला चार चांद लागतात .. आणि सायली जात्याच सुदर होती त्यात साडीत तर जस्ट अमेझिंग ..
मिहीर चे गावातले मित्र .. " आयला मिहीर .. वाहिनी सुंदर आहे .. "
मिहीर आहे मित्रांमध्ये पण नजर सायलीवर जाऊन स्थिर झालीय . अजून सायली ची आणि त्याची नज रा नजर पण झाली नाही . सायली इकडे तिकडे बघत पण नव्हती . मुलगी पहिल्यांदा सासरी जाते ना तेव्हाचे ते टेन्शन काही वेगळेच असते .
थोड्या वेळाने कार्यक्रम सुरु झाला . पुरुष मंडळी मीटिंग ला बसल्या सारखे बसले . आमची माणसे किती येतील , तुमची माणसे किती येतील , जेवणाचं खर्च कोणी करायचा , मुलाच्या काय मागण्या आहेत , मानपान कोणी करायचा व गैरे या सगळी गोष्टी बोलून ठरव ल्या आणि त्यावर एक मत झाले तेव्हा कोणी तरी एक माण साने ठरलेलया सगळ्या गोष्टी वाचून दाखव ल्या.
तात्या सरपंच असल्याने त्याचा सगळंच खाक्या जरा मोठा होता . शरद ने सांगून टाकले कि आमच्या कडून ५०० माणसे येतील. मुलीचे नाक, कान , हात आणि गळा आम्ही देऊ .. शिवाय घरातील सर्वांचे व्यवस्थित मानपान करू . तात्यांची माणसे जवळ जवळ ५००० आहेत तर मी जेवणासाठी म्हणून सेपरेट १००००० रुपये देईन .
जमलेल्या सगळ्या लोकां ना आणि तात्यांना पटले आणि मिहीर आणि सायली यांच्या विवाहाची सुपारी फुटली .
आणि विवाहाची तारीख आणि जागा फिक्स झाली . पुढल्या महिन्यात २० तारखेचा मुहूर्त ठरला .
शुभ शकुन म्हणून नारळ टोपी एकमेकांना देण्यात आले . मुलाकडच्यांनी मुलीला ओवाळून पेढ्यांचा बॉक्स , साडी दिली .. पाच सवाशिणींनी ओवाळले .
लगेच शोभा आणि शरद ने मिहीर ला ओवाळले आणि त्याला नारळ आणि आणलेला ड्रेस दिला .
सायली आणि मिहीर ला शेजारी शेजारी उभे केले आणि एकमेकांना पेढे भरवायला सांगितले . बाकीच्या लोकांनी टाळ्या वाजवल्या .
पेढा भरवताना सायली आणि मिहीर ने एकमेकांना पहिले . दोघे डोळ्यांनीच एकमेकांना कॉम्प्लिमेंट देत होते .. मन जुळली ना कि शब्दांच्या भाषेशी गरजच पडत नाही .
दोघांनी घरातल्या मोठ्यांना वाकून नमस्कार केला . लीला बाई आणि शोभा दोघीनी एकमेकींना पेढा भरवला . पेढा भरवताना शोभा च्या डोळ्यात अश्रू आले होते .
लीलाबाई " काय रडू नकोस बाई .. देवाने मला मुलगी दिली नाही .. तुझ्या लेकीचा सून म्हणून नाही लेक म्हणून स्वीकार केलाय मी "
हे ऐकून शोभ ने लीला बाईंना घट्ट मिठी मारली . आई च्या डोळ्यात पाणी आलेले बघितल्यावर मितालीने पण डोळे पाणावले .
सायली ला मात्र मिहीर त्यांचा मित्रांची ओळख करून दे . त्याच्या आत्याला ओळख करून दे ,असे चालू होते .
शरद आणि तात्या दोघांनी एकमेकांना मिठी मारली ..
तात्या " शरद राव तुम्ही आमचे व्याही झाले आता .
“चला आता जेवणाची ताट घेऊ “ असे कोणीतरी म्हटले
तेवढ्या कोणीतरी म्हटले नाही .. "नवरीला शगुनाची साडी नेसवून आणा जेवायला ."
थोड्या वेळाने विनय आणि मिताली एकत्र आले .
मिताली " अरे वाह .. फेट्यामध्ये छान दिसतोस "
विनय " थँक यु.. आज तू पण खूप गोड दिसत आहेस .. हि साडी छानच आहे .. हि साडी तुला आपण आपल्या पहिल्या अंनिव्हर्सरी ला घेतली होती ना ग "
मिताली " अरे वाह .. लक्षात आहे वाटत तुझ्या ?"
विनय आणि मिताली ने सेल्फी काढले .. त्यांच्या परिवार पण आज खूप देखणा दिसत होता .. नवरा बायको , मुलगा आणि मुलगी .." द कंप्लिट फॅमिली " .
तेवढ्यात शोभा आली
शोभा " मिताली जा जरा सायली ला ती साडी नेसवून आण . त्या बायका म्हणतात कि शगु ना ची साडी नेसवा "
मिताली " अ ग .. हीच साडी आहे ना ती शगुनाची "
शोभा " नाही ग .. ती आत्ता तिला जी दिली ना ती नेसायचीय " आणि शोभने रियाला तिच्याकडे घेतले ..
मितालीने सायलीला बोलावून घेतले आणि साडी घालायला नेले . मिहीरला पण शगुणाचा ड्रेस घालायला पाठवला .
दोघी सावनी ला घेऊन पुन्हा त्या रुम मध्ये आल्या .. आणि साडी ओपन करून बघतात तर तीच साडी जी कि दोघींना आवडली होती .
मिताली " वाह ! मिहीर ने तुला आवडलेली हि साडी कधी घेतली ?
सायली " मला काय माहित ? मी पण आत्ताच बघितली ?"सही आहे ना साडी ..
सायली इतकी खुश झाली हि साडी बघून .. शिवाय नुसती साडी नाही त्यावर मॅचिंग ब्लाउज , सेट , सगळेच होते ..
मितालीने सायलीला मस्त साडी नेसवली आणि तिच्या कानामागे काळी टीट लावली .. या साडीमध्ये सायली नवरीच दिसत होती.
सावनी पण " हि साडी जास्त छान आहे "
सायली " थँक यु बेटा "
सायली खरोखर खुश झाली होती . जे पाहिजे ते आपल्या जीवन साथीदाराने न मागता दिले ना तर त्याचा आनंद काही औरच असतो . आणि खरा आनंद त्या मिळालेल्या वस्तूचा नसतो तो आनंद आपल्याला समजून आपल्याला हवी असलेली वस्तू , न मागता मिळाल्याचा जास्त असतो .
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा