विभक्त ८

In this part sayali,s family visits Mihir,s house for the supari ceremony

                                                   विभक्त ८

क्रमश : भाग ७

साधारण अर्ध्या एक तास नंतर मिहीरने सायली ला मसेज केला . 

" हॅलो .. पोहचल्यात का घरी ?आज काही बोलायलाच नाही मिळाले . "

सायली  नुकतीच घरी आली होती त्यामुले तिने मोबाइल बघितलाच  नाही .

" वेळ मिळाला कि अकाउंट्स डिटेल्स पाठव "

इकडे घरात मितालीची  मुले आल्यामुळे घरात आनंदी आनंद होता. शोभा आणि  शरद अगदी लहाल मुलांसारखे त्यांच्याशी  खेळत होते . त्यांचे फोटो काढ , शूटिंग कर असे चालू होते . राज पण आजोबांचे पेन घे , कागद घे असे चालले होते .

शरद ने मितालीची चौकशी केली . जावयाची चौकशी केली . काय चाललंय सध्या . बरेच दिवसात आले नाहीत . आज येणार आहेत का जेवायला ?

मिताली म्हणाली तो हल्ली खूप बिझी असतो. ऑफिस च्या कामाचा लोड असतो खूप. रात्री पण उशिरा येतो . मी आता फोन करून विचारते " आज इकडे यायला जमणार आहे का ते . नसेल येत तर जेवल्यावर रात्री मिताली सोडेल मला घरी . "

शरद " अग  आलीच आहेस  तर रहा दोन दिवस .. तसेही शनिवारी सकाळी आपल्याला निघायचंय . मग तिकडून आल्यावरच जा "

मिताली " नको इतके दिवस ..  विनय चे हाल होतील .. बाहेर जेवायला लागेल त्याला "

शरद " थांब मी च कॉल करतो त्याला आणि इकडे बोलावून घेतो . म्हणजे बोलता येईल . बरेच दिवसात मला कॉल केला नाही त्याने . पूर्वी दोन चार दिवसातून कॉल करायचा "

मिताली " बघा उच लांन तर ठीक आहे . हल्ली क्लाएन्ट तरी समोर असतो नाहीतर बॉस तरी . फोन करायला साहेबांना वेळच नसतो "

शरद " चालायचंच .. संसार म्हंटला कि असे होतेच "

शरद ने विनय ला कॉल केला " हॅलो , जावईबापू   काय म्हणता ? बरीच दिवसात फिरकला नाहीत इकडे "

विनय (मितालीचा नवरा )" हो बाबा , ते आता मी टीम लीडर झालोय ना मला टार्गेट्स वैगरे कंप्लिट करायचे असतात . त्यामुळे वेळच नसतो . "

शरद " बरं ... सांगायचे म्हणजे आपल्या सायलीचे लग्न ठरवलंय आम्ही . पर्वा शनिवारी मुलाच्या घरी जायचंय . तर तयार राहा . लगेच सुपारी फोडायचा प्रोग्रॅम पण करायचाय   "

विनय " मी बघतो .. जमले तर नक्की येईन .. पण काही गॅरेंटी नाही देत "

शरद " नाही येऊन कसे चालेल ? तुम्हाला यावेच लागेल . अहो तुमचा मान आहे आता "

विनय " बघतो , जमले तर नक्की येईन "

शरद " आज मिताली इकडे आलीय .. तर तुम्ही पण रात्री जेवायला या .. मग बोलू निवांत "

विनय " हो बोलली मिताली मला , तुम्ही लोक जेवून घ्या .. मी रात्री येतो तिला घ्यायला "

शरद " ठीक आहे .. पण आल्यावर जेवा .. कितीही उशीर झाला तरी चालेल .

शरद आणि विनय चे सगळे बोलणे मिताली कान देऊन ऐकत होती . तिला सारखी भीती वाटे हा बाबांना काही उलट नाही बोलला म्हणजे झाले . पण झाले उलट दोघे जावई सासरे छान बोलले आणि आत तो रात्री येणार पण होता .

मिताली आणि सायली ने जे दृश्य बघितले त्यात काही तथ्य आहे का यांचा दोघींचा काही गैर समज झालाय काय माहित .

कदाचित ती मुलगी विनय ची टीम मेंबर असेल आणि ते दोघे प्रेमाच्या नाही तर कामाच्या , टार्गेट च्या गप्पा मारत असतील .

मुख्य प्रॉब्लेम असा होता कि मिताली आणि विनय यांच्यात हल्ली मुक्त पणे  संवाद होत नव्हता . शिवाय त्याचा गेल्या वर्षी जॉब चा थोडा प्रॉब्लेम झाला होता . त्याला अचानक सेल्स टीम चा लीडर बनवला होता . आणि सेल्स चा जॉब हा खरोखर टफ जॉब असतो . त्याने आता आपल्याला दोन मुले झाली म्हटल्यावर कदाचित स्वतःला कामात झोकून दिले होते . मिताली आणि मुलांना तसे काही कमी पडून देत नव्हता .

राहता राहिला नवरा बायकोच्या प्रेमाचा प्रश्न . लग्न नंतर सगळ्याच नात्यात व्यवहार येतो आणि एकदा व्यवहाराचे ओझे आले कि प्रेमाची धार थोडी बोथट होऊ लागते. कारण दोघे एकमेकांना ग्राह्य धरू लागतात .

जसे कि पूर्वी जर कोणी नवरा रोज एक गुलाब आणि कॅडबरी बायकोसाठी आणत  असेल आणि ती कॅडबरी दोघे मिळून खात असतील आता मुले झाल्यावर तो बायकोला न आणता मुलांना च आणणार ना ... या चा अर्थ त्याचे बायको वरचे प्रेम कमी झाले असे नसते . तरी पण प्रेम एक्सप्रेस करणे गरजेच आहे मग ते कोणत्याही मार्गाने पण एक्सप्रेस करा . कुंडीतली झाडाला सुद्धा  खत पाणी घालावेच लागते तरच ते बहरते . तसेच संसारात दोघां नवरा बायको ने एकमेकां बद्दल वाटणारे प्रेम वेळोवेळो एक्सप्रेस करणे गरजेचे आहे .तरच संसार रुपी झाड फळा फुलांनी बहरते .

विनय आणि मिताली यांची गाडी नक्की कुठे चुकली काय माहित . लव्ह मॅरेज करून सुद्धा दोघे एकमेकांपासून मनाने दूर कसे गेले . आणि टाळी हि एका हाताने कधीच वाजत नाही ..

सायली अजून तशी वयाने लहान होती . तिला यातळे गांभीर्य कळत नव्हते . नुसता विनय दुसऱ्या मुली बरोबर दिसला म्हणजे तो नवरा म्हणून नालायक कसा असू शकेल . आणि मिताली ने पण कदाचित पटकन त्याच्या वरचा विश्वास असा कमी करून कसे चालेल . उद्या जर ती म्हणते तसे काहीच नसले तर उगाचच आपल्या संसाराचे नुकसान तिनेच केले असे होईल .

प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात . कोणत्याही निर्णयावर येण्या आधी त्या दोन्ही बाजू नीट तपासून पहिल्या   पाहिजेत ना .

थोड्या वेळाने सायलीने मिहीर चे मेसेज पाहिले

" हाय, सॉरी मी जरा बिझी होते "

मिहीर " ओ के "

सायली " वेळेत पोहचलो आम्ही घरी "

मिहीर " ओके . अग  तू असे नको होतेस करायला . मी बिल पे करणार होतो ना "

सायली " इट्स ओके  रे .. डोन्ट वरी "

मिहीर " बाकी साडी खूप छान आहे .. आणि तिने जेव्हा नेसवली होती  ना तूला खूपच छान दिसत होती . गुड चॉईस "

सायली " थँक यु .. मी अशी साडी खरेदीलाच मुळात पहिल्यांदा गेले होते "

मिहीर " बरं ऐक ना तो तुझ्या बहिणीच्या मोबाईल मधला तो साडीवरचा फोटो मला पाठवशील का ? इफ यु डोन्ट माईंड  "

सायली " हूं ... बघते .. "

मिहीर " आणि प्लिज  मला अकॉउंट नंबर दे .. "

सायली " नाही .. राहू दे .. "

मिहीर " राहू दे काय ? देना प्लिज .. अग  तात्यानां कळले ना तर मला झापतील .. "

सायली " काय सारखा तात्यांची भीती सांगतोस मला ?"

मिहीर " भीती .. मी उभाच राहत नाही त्यांच्या समोर .. तुला माहित नाही ते डेंजर डॉन आहेत "

मिहीर " बरं ते जाऊ दे .. मला अजून एकदा भेट ना .. आज काही बोलायला पण नाही मिळाले .. तुझी ताई बरोबर असल्याने काही वेगळा विषय पण काढता आला नाही ..

सायली " आता शनिवारी भेटायचेच आहे ना "

मिहीर " हो पण मला खूप बोलायचय "

सायली " तू आत्ताही बोलू शकतोस .. "

अश्या  पद्धतीने त्यांचे दोघांचं चॅटिंग सुरु झाले .. दोघांना एक मेकांना खूप आवडू लागले होते . हळू हळू एक नवीन नातं फुलत होते.

मिहीर च्या लक्षात आले कि हि बया मला काही तिचा अकॉउंट नंबर देणार नाही . तिच्या बाबांशी ती बोलू नको म्हणून तिनेच सांगितलं आता करायचं काय ? तात्यांची ऑर्डर साडी आपल्याकडून पाहिजे ती जर पूर्ण नाही झाली तर मीच त्यांच्या पुढे जाऊ शकणार नाही . त्यावर मिहीर ने  एक सोल्युशन काढले .

दुसऱ्या दिवशी तो पुन्हा सिटी सेंटर ला गेला . ती दुसरी साऊथ इंडियन साडी जी सायलीला आवडली  होती  ती त्याने खरेदी केली आणि ती घेऊन ठेवली . त्याच्यावर मॅचिंग सेट घेतला . तिचे बुटीक असल्यामुळे तिच्याकडे सगळेच  होते .

बोल बोलता शनिवार उजाडला . शरद ने पण मिहीर साठी कपडे घेतेलच  होते सकाळी ७ वाजता सगळे घरातून मिहीर च्या घरी निघाले . विनय आणि मिताली दोघे हि होते बरोबर . आज शरद आणि शोभा दोघेही खूप खुश होते . अजून काय हवे असते . मुलगी जावई नातवंडे सर्व मिळून होणाऱ्या जावयाकडे जात होते

त्याची अशी मनाची अवस्था होती " मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असते "

तात्यांनी तर जोरदार तयारी केली होती . गावात पण सरपंचाच्या मुलाचा प्रोग्रॅम म्हणजे वेगळीच ऐट होती .शोभाने दोघी मुलींना आज मुद्दामून साडी नेसायला लावली होती . मिताली आणि सायली दोघीही खूप सुरेख दिसत होत्या . सायली ची कुरकुर चालली होती जरा पण आज काही शोभा ऐकणार नव्हती ..

बोल बोलता त्यांची गाडी तात्यांच्या घरा समोर आली . आजू बाजू ची लोक नवीन सुनबाई कोण आह ते बघायला आली होती .. लीला बाईंनी आणि मोठ्या सून बाईं लता  ने सायली ची आरती ओवाळून तिला घरात घेतली . तात्याने त्यांच्या स्वागतात काही कमी पडू दिले नाही . आल्या आल्या पाहुण्यांना सरबत दिले . सगळ्या बायका आतल्या खोलीत बसल्या होत्या . सायलीला त्यांच्या मध्ये बसवली होती . सायली ला इतके ऑकवर्ड होत होते अख्खे घर येता जाता तिला पाहून पाहून जात होते .

तिला पण कोणीतरी सरबत दिले . हातात सरबताचा ग्लास घेऊन बसली होती .

शोभा मागे बसलीच होती सारख्या सूचना देताच होती . "ताठ बस "पोक काढू नकोस ",दोन खांद्यावर पदर घे "

थोड्याच वेळात सर्वांना नाश्ता आला . सर्वांनी पोट  भरून नाश्ता केला . आणि मग मोठ्या सून  लता आणि तिची मुलगी सावनी जी ८ वर्षांची असेल आली आणि लता म्हणाली

"चला , मी तुम्हाला एका खोलीत नेते . तिथे तुम्ही तयार व्हा "

मिताली , शोभा आणि सायली उठल्या .. तिच्या मागे मागे चालू लागल्या . घर तर इतके मोठे होते . सायली ला वाटे मी घरातल्या घरात हरवून जाईन . मोठ्या सुनबाईनी बेसिक घर जाता जाता दाखवले , वॉशरूम दाखवले आणि मग त्यांना एक रूम दिली तयार  होयला.

आणि सांगितले कि अर्ध्या तासात तयार व्हा आणि काही लागले तर सावनी ला सांगा ती सांगेल तुम्हाला किंवा मला बोलवायला येईल .

🎭 Series Post

View all