विभक्त-भाग ३

In this part .. mihir and sayalis marriage is about to fix .. sayali wants to cancel this marriage .

                                                        विभक्त - भाग ३

क्रमश: भाग २

सायली ने फेसबुक वर मिहीर चे प्रोफाइल चेक केले .. त्याला मेसेंजर वर एक मेसेज पाठवला ..

" शनिवारी  मला बघायला तू येणार आहेस का ?"

मिहीर ला लगेच नोटिफिकेशन आला .. मिहीर एका मिटिंग मध्ये होता .. त्यामुळे त्याने लगेच रिप्लाय नाही दिला

सायली त्याच्या रिप्लाय ची डेस्परेटली वाट बघत होती .. शेवटी वाट बघून तिने  अजून एक मेसेज पाठवला .

" हॅलो .. उद्या यायचं आणि मला रिजेक्ट करायचे आणि घरी पळायचे . कळले का ?"

तिचा हा धमकी वजा मेसेज पाहून मिहीर उडालाच ... मीटिंग रूम मधून बाहेर आला

आणि  पुन्हा पुन्हा वाचू लागला आणि जोर जोरात हसू लागला .. या मिहीर ला धमकी .. काय डेअरिंग आहे ..  

मिहीर ने पण फटाफट तिचे फेसबुक चे प्रोफाइल चेक केले .. .. ओह गॉड हे मी आधी कसे नाही चेक केले .

कसली भारी आहे दिसायला .. शी  इज  जस्ट अमेझिंग .. नाहीतर माझे फोटोस बघून कोणी फ्लॅट झाले नाही असे झाले नाही .. हि माझे फोटोस बघून सुद्धा मला असा मेसेज करते .. एस शी कॅन .. शी इस ब्युटीफुल.. मिहीर तिचे फोटोस झूम करत बघत असतो तेवढ्यात मागून रवी येतो

रवी " अरे  हे मी काय बघतोय . तू  चक्क कोणत्या तरी हेरॉईन चे फोटोस बघत आहेस "

मिहीर " हेरॉईन नाही रे .. जस्ट एक जण ओळखीची आहे .. " आणि फेसबुक फ्रेंड

मिहीर मनात तिचा विचार करतोय ' हिचा  नक्की काय प्रोब्लेम आहे .. ती मला असे  का सांगत असेल ? सहाजिकच एवढी सुंदर आणि हुशार आणि सक्सेस फुल नक्कीच आधीच एन्गेज असणार .

मिहीर  तिला मेसेज टाकतो " कॉफी ?.. माय मोबाईल नंबर ०००००००० यु कॅन कॉल मी "

सायली "   ???? 

त्यानंतर ना सायली ने कॉल केला ना मिहीर ने मेसेज केला . सायली ला वाटले कि ह्याला मला मेसेज मिळालाय म्हणजे तो आता काही आपल्याला होकार देणार नाही

शनिवारी सकाळ पासून शरद आणि शोभा ची नुसती धांदल .. तात्या त्याचा मित्र पण होताच पण आता गावाचा सरपंच होता तो नक्कीच एका शान मध्ये येणार ..त्याच्या खातिरदारी मध्ये काही  कमी नको पडायला त्यासाठी दोघे झटत होते इकडे सायली  रिलॅक्स होती कारण तिला  कॉन्फिडन्स होता कि मुलगा आपल्याला रिजेक्ट करेलच . शोभा म्हणजे सायलीची आई ने सायली ला छान तयार केले . आणि सगळे पाहुण्यांची वाट बघत बसले .

थोड्याच वेळात तात्या , त्याची बायको , मोठा मुलगा शिशिर , शिशिर चा छोटा मुलगा आणि मिहीर असे सगळे आले .. शरद आणि शोभा यांनी त्यांचे छान स्वागत केले . छान मस्त जेवण केले.. गावाच्या . लहानपणीच्या  गप्पा झाल्या .. आता तात्याची बायको म्हणाली आता मुलीला दाखवा.. आम्हाला पुन्हा गावी जायचे आहे .. सुनबाई आणि नात दोघीच  आहेत घरी ..

 शोभा पण म्हणाली हो बोलावते सायलीला आणि  आत गेली .

सायली " काय ग आई , मी किती अवघडले .. सकाळ पासून हि साडी नेसून  बसलेय .. "

शोभा " अग हो  चिडतेस काय ? बघतेस ना मी पण सकाळ पासून किती गडबडीत आहे .. ते नुसतेच  तुझ्या बाबांचे मित्र नाहीयेत .. मित्र असते तर खूप रिलॅक्स असते मी पण आता तसे नाहीये कारण तुला  माहितेय .. बोल बोलता शोभा ने तिची साडी नीट केली .. आणि सायली ला सांगितले कि चहा चा ट्रे घेऊन तू ये बाहेर ..

सायली बाहेर आली  आणि मगाच पासून गप्पा जोरात चाललेल्या होत्या ते सर्व च गप्प झाले .. त्या खोलीत एकदम पिनड्रॉप सायलेन्स .

सगळ्यांनी चहा चे कप हातात घेतले .. सायली मोठ्यांना नमस्कार करून आई च्या शेजारी बसली .

मिहीर पण होताच तिथे .. चहा देताना मिहीर ने तिला खूप जवळून पहिले .. पण सायली ने त्याच्याकडे पहिले सुद्धा नाही ..

तात्यांनी आणि त्याच्या बायकोने एक दोन प्रश्न विचारले .. सायलीने त्यांची उत्तरे  दिली

आणि मग सर्व निघाले .. तात्या  ने सांगितले मला तर मुलगी त्याच दिवशी आवडली होती . तरी पण तू  तिला विचार  , आमच्या घरात मिहीर सोडला तर एवढं शिकलेले कोणी  नाहीये  ,आम्ही मातीतली माणसे तिला चालेल का ? तसेही मिहीर पण याच शहरात राहतो .. त्याची नोकरी इकडेच आहे .. म्हणजे लग्नानंतर ती इकडेच राहील . तरी पण आमच्या घराण्यातल्या ज्या काही  रीती रिवाज असतील त्या तिला संभाळाव्याच लागतील . तर या सगळ्याची तिची तयारी आहे का ? ते विचार.  मी पण मिहीर ला एकदा नीट विचारतो आणि कळवतो आज उद्या कडे ..

पण एक गोष्ट आधीच सांगतो लग्न हे आमच्या गावालाच होणार .. तेवढ्यात शिशिर चा लहान मुलगा “आबा हि काकी मला पसंत आहे ..” असा मोठ्याने म्हणाला  आणि घरात सगळे जोर जोरात हसायला लागतात .. मिहीर मात्र जरा ओशाळला  ..

सायली मात्र रिलॅक्स होती .. तिला माहितेय कि हे गणित काही जमणार नाहीये . त्यांच्या कडून नकारच  येणार आहे .. हो म्हणजे तशी धमकीच दिली होती तिने.

पण सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या तश्या होत नाहीत .. देवाचा  काहीतरी वेगळा प्लॅन असतो नाही का ? त्याचे झाले असे कि दोन दिवसांनी तात्या चा फोन शरद ला आला  आणि त्याने सांगितले " आम्हांला मुलगी पसंत आहे " पुढील बोलणी साठी लवकरच भेटू .

शरद अन शोभा एकदम खुश झाले . त्यांच्या मनासारख झाले होते .

सायली ऑफिस मधून घरी आल्यावर शोभा ने तिला तिच्या आवडीचा गुलाबजामून भरवला ..

सायली " अरे वाह आई ,आज काय  आहे ? गुलाबजामून खूप मस्त झालाय .. बोल बोलता सायली ने अजून एक गुलाब जमून तोंडात टाकला .

शोभा च्या डोळ्यातून पाणी आले . आणि तिने सायली  च्या डोक्यावरून हात फिरवला . आणि तिला म्हणाली " कधी ना कधी मुली ला सासरी जायचंच असते ग .. तुझी पण वेळ आली आता .. तात्यांकडून होकार आलाय .

सायली च्या तोंडातला गोड गुलाबजाम एकदम कडू झाला . सायली तिच्या रूम मध्ये गेली

सायली ला मिहीर चा खूप राग आला . एवढं सांगून सुद्धा ह्या मुलाने मला होकार दिलाच कसा ?

मिहीर ला होकार आणि नकार देण्याचा अधिकारच नव्हता . म्हणून तर  मिहीर तिला कॉफी ला बोलावून हे सगळे सांगणार होता . पण सायलीने मिहीर ला कॉन्टॅक्ट न केल्या मुळेच हे लग्न ठरलं होते .

सायली ने तडकाफडकी मिहीर ला कॉल केला " हॅलो , मी सांगितलेले कळत नाही का ? मला तुमच्याशी लग्न करण्यात इंटरेस्ट नाहीये .. तरी सुद्धा मला होकार का दिलास ?"

मिहीर " अच्छा म्हणजे कॉल आला वाटतं तुम्हाला ? congartulation. "

सायली " काय काँग्रॅतुलाशन्स .. आता हे लग्न थांबव आधी "

मिहीर " तू थांबव .. तुला करायचं नाहीये .. मला करायचंय ."

सायली " यु ... "

मिहीर " माझ्या हातात असते तर मी खरच  काहीतरी केले असते .. पण सॉरी .. तसे माझ्या बरोबर लग्न केल्यावर तुला पश्चाताप नक्कीच होणार नाही हे एवढे मी नक्कीच करू शकतो . चला मग नऊवारी साडी नेसायची प्रॅक्टिस  करा .. कारण तात्या आता गावात लग्न म्हणजे तुला नऊवारी साडी नेसायला लावतीलच

सायली " मी हे लग्न होऊ देणार नाही .. जास्त  स्वप्न बघू नकोस "

मिहीर " तुझ्या हातात काही असते तर तू मला सांगितले नसतेस . तरी पण गो अहेड .. इफ यु कॅन देन  डू इट "

सायली " नक्कीच ..मी अजूनही हार मानलेली नाही

आणि सायली फोन ठेवते .

काय करू ? काय करू ? कसे हे लग्न कॅन्सल करु? यासाठी सायली विचार करु लागली . कॅन्सल नाही तर नाही पण पुढे तरी ढकलता येते का ते बघू ?या सगळ्या तिच्या लढाईत ती एकटी होती .. हे लग्न झाले कि आपण पण बहिणी सारखेच फसणार .. माझे ध्येय वेगळे आहे .. मला स्वतःच्या बळावर या कंपनीच्या सी ई ओ .. पदापर्यंत पोहचायचं .. हे लग्न वगैरे करण्या पेक्षा करिअर घडवायचं . ह्या कडे तिचे लक्ष होते .

थोड्या वेळाने तिचे बाबा घरी आले .. शरद पण खूप खुश होता .. त्याच्या मनासारखे च झाले होते . त्यांच्या आनंदापुढे सायलीला काही बोलताच येई ना . शिवाय नकार द्यायला काही कारण पण मिळे ना तरी पण तिने डेअरिंग करून बाबांना म्हणाली

" बाबा तशी हि फॅमिली चांगली आहे .. पण गावातली लोक जरा मागासलेले असतात . त्यात मी शहरात लहानाची मोठी झालेली .. काही ना काही तरी त्यांना खटकेलच .. नाही म्हणजे बाबा तुम्ही बरोबर विचार केलाय ना .कारण हे गावातली लोक सगळे सण , देवाण घेवाण  ह्या सगळ्या गोष्टी खूप मानतात . तुम्हाला पण कटाक्षाने या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील "

शरद " अग तू अजिबात काळजी करू नकोस. मी सगळ्या गोष्टी तात्या बरोबर आधीच बोललोय . त्याला ह्या सगळ्याची आधीच कल्पना दिलीय मी.. शिवाय तू जॉब चालूच ठेवणार आहेस .. आणि तुला तुझा जॉब किती महत्वाचा आहे हे हि मी त्याला बोललोय .आणि देवाण घेवाणाचे तू म्हणतेस ना तर तर तो मला म्हणाला फक्त एक नारळ आणि मुलगी घेऊन ये .. दोन्ही कडचा खर्च आम्हीच करणार पण लग्न आमच्या पद्धतीने होणार असे तो आज बोलत होता . .. पोरी कोणत पुण्य केले होतेस गेल्या जन्मात तुला असे सासर मिळतंय . त्याची काहीच मागणी नाहीये .. हल्ली गावातली लोक असे काही राहिलेले नाहीये .. फक्त तुम्ही जेव्हा गावाला जाल तेव्हा जरा त्यांचे जे काही नियम असतील ते पाळा म्हणजे झाले . तेवढं तर तू नक्कीच करशील याची मला खात्री आहे . "

हे सगळे ऐकल्यावर सायली ला काही बोलायला चान्स च नव्हता .

🎭 Series Post

View all