विभक्त भाग १५

In thi part Sayli tells mihir that she will marry as Married Batchlar

विभक्त भाग १५

क्रमश : भाग १४

आज मिहीर खूप खुश झाला होता . फायनली सायली च्या तोंडून त्याला स्वतःचे कौतुक ऐकायला मिळाले होते . लग्नाच्या दृष्टीने एक एक पाऊल पुढे जात होते . सायली पण मनापासून लग्नाला तयार होत होती .

घरी गेल्यावर बघते तर मिताली आली होती . मितालीला शोभने थोडी मदतीला बोलावले होते . आता नाही म्हटले तरी पापड , सांडगे , करायचे , या शिवाय शॉपिंग , मग स्टिचिंग , रुखवत ची तयारी गेस्ट लिस्ट , आधी  कोण येईल ,अशी एक ना अनेक कामे होती . मिताली पण आपल्या लहान बहिणीचं लग्न म्हणजे हौशीने आली होती .

शरद ने कॅश काढून शोभा कडे दिली .. लिस्ट करा आणि शॉपिंग करा आणि टिक मार्क करा म्हणजे कामे उरकतील . आणि दोघी लिस्ट बनवायच्या तयारीला लागल्या .

शोभा ने मिताली ला सांगितले कि तू लग्न होते पर्यंत इकडेच राहा पण ती म्हणाली नको मग विनय ला तिकडे कंटाळा येईल त्यापेक्षा मी मुले शाळेतून आली कि दुपारी येईल आणि संध्याकाळी जात जाईन .

सायलीला  घरी आली ती हसत हसतच आली. आज ती खूप टेन्शन फ्री होती . मिहीर ने तिचे सगळे टेन्शन घालवून टाकले होते .

बोल बोलता लग्न २० दिवसांवर आले आणि दोन्ही कडचे घरातली मंडळी खूप कामात गर्क असायची . पण खुद्द सायली आणि मिहीर मात्र रोज ऑफस ला जायचे आणि रोज संध्याकाळी भेटायचे . खूप गप्पा मारायचे . दोघांना एकमेकांची कंपनी आवडायला लागली होती . सायली पण त्याच्या गुंतत जात होती . सुरुवातीला दोघे दोन केक ऑर्डर करायचे आता दोघे मिळून एक केक ऑर्डर करू लागले . दोघात एक केक खाण्यातली मजा पण औरच असायची . मग मिहीर तिला कधी स्पेशल पिझ्झा खायला न्यायाचा , कधी स्पेश्शल मिसळ खायला न्यायाचा . सायली ने काही तिखट खाल्ले ना कि तिचा चेहरा लाल बुंद होयचा . मिहीर तिचे सगळे हावभाव , नखरे , बघून खुश होयचा . एकदा तिला मिसळ खाताना असा जोरात ठसका लागला तेव्हा तिला हॉटेल मधला मॅनेजर स्वतः त्याच्या इथे आला आणि " मॅडम ला पाणी द्या " असे करूंन त्यांच्यात बोलायला आला . मिहीर ला त्याचा असा राग आला .मनात म्हणाला "मी आहे ना तुला काळजी कशाला हवीय .. " खरंतर सायली इतकी सुंदर होती कि जिथे जाईल तिकडे लोक तिच्याकडेच बघायची . याचा मिहीर मनातून खूप राग यायचा . कसे असते हळू हळू आपल्या माणसावर फक्त आपलाच अधिकार आहे हे मनाला आपोआप कळत .

इकडे दागिने , सायलीच्या साड्या घेऊन झाल्या , रुखवताची तयारी झाली . पार्लर वाली , मेहंदी वाली फिक्स झाली . पार्लर वालीला तर दोन दिवस ती तिकडे घेऊन जाणार होती कारण नऊवारी नेसायची होती .

मिहीर ची शॉपिंग पण अल्मोस्ट झाली . तात्यान्नि शाळेच्या ग्राउंड वर मोठा मंडप घालायला सांगितलं . मोठं मोठ्या लोकांना आमंत्रण गेले . आचार्याला ऑर्डर्स झाल्या आणि अशा प्रकारे लग्नाची जय्यत तयारी झाली होती .

मिताली आणि शोभाने दोघींना सेम साड्या फक्त रंग वेगळा अश्या घेतल्या . विनय , मुले , शरद सगळ्यांचे २ दिवसांचे कपडे फिक्स झाले .

आता लग्नाला १० दिवस राहिले होते अजून सायलीने मिहीर ला सांगितले नव्हते कि ती कोणत्या प्रकारचे लग्न करणार आहे " नॉर्मल " कि "मॅरीड बॅचलर "

मिहीर तिच्या उत्तराची वाट बघत होता कारण इतके दिवस झाले सायलीला त्याला कधी " आय लव्ह यु टू असे म्हणावे असे वाटले नाही . शेवटी मिहीर ने तिला सांगितले " सायली आज आपण माझ्या फ्लॅट वर भेटू . तुला माहित पाहिजे ना कि लग्न नंतर तू कुणीकडे राहणार आहेस आणि  राहत्या घरात पर्टिक्युलर काही बदल करायचे असतील तर मला आधीच सांगशील म्हणजे मी गावी जायच्या आधी करून घेईन ."

सायली  फ्लॅट वर जायचे म्हटल्यावर सायली ला काय करावे कळे ना . असे त्याच्या फ्लॅट वर जायचे बरोबर वाटेल का ? असा विचार तिच्या मनात येऊ लागला आता लवकरच लग्न होणार आहे त्यामुळे असे त्याच्या फ्लॅट वर एकटीने जावे कि न जावे . बरे कोणाला घेऊन जावे तर मिहीर ला लगेच कळेल कि हिने मुद्दामून आज कोणाला तरी आणले . तिचा मिहीर वर विश्वास तर खुप  होता पण मुलींना हे असे प्रश्न पडतातच आणि पडलेले चांगले .

मिहीर " काय ग ? काय विचार करतेस ? तुला अजून माझ्या बरोबर सेफ वाटत नाही का ?" मिहीर ने तिला विचारलेच .

सायली " तसे नाही रे .. बाबांना आवडणार नाही "

मिहीर " बाबांना सांगुच नकोस ना "

सायली " मला खोटे बोलायला आवडत नाही "

मिहीर " ठीक आहे मग खरं  सांगून ये . "

सायली " तेच तर ना , सांगितले  तर ते नाही पाठवणार "

मिहीर " मला सांग ती रोज मला भेटतेस ते तुझ्या बाबांची परमिशन घेऊन भेटतेस का ?"

सायली " तसेच काहि नाही . त्यांनी मला विचारले नाही मी त्यांना सांगतले नाही "

मिहीर " मग आज विचारलय का त्यांनी कि तू कुणीकडे जाणार आहेस "

सायली " तसे नसते रे मिहीर , मी काय केल्याने माझ्या घरातल्यांना त्रास होणार नाही हे मला माहितेय .त्यामुळे अशा गोष्टी करताना मला त्यांची परवानगी घेण्याची गरज नसते . "

मिहीर ला आता जरा रागच येत होता

मिहीर " ओके  म्हणजे मला माझ्या फ्लॅट वर भेटायला तुला ऑकवर्ड होतंय बरोबर ना .. कसली आहेस ग तू ? माणूस म्हणून सुद्धा मला ओळखली नाहीस . मी कशा साठी बोलावतोय . तुला माहितेय ना . घरात काही आणायचेय किंवा काही बदल करायचेत का हे विचारण्यासाठी कारण लग्न नंतर तुझी कोणतीच अडचण होयला नको म्हणून "

सायली " अरे हो रे बाबा , मला माहितेय कि तू माझी काळजी किती घेतोस ते . "

मिहीर " तू अजून मला एका प्रश्नाचे उत्तर पण नाही  दिलेस "

सायली " हो माहितेय मला . मी त्याचे उत्तर तुला योग्य वेळी देईन "

मिहीर " अरे यार थोडा तरी माझा विचार कर ?"

सायली " माझा अजून निर्णय नाही झालाय "

मिहीर " कपाळ माझे . आग माझे राणी ... मला काल तात्या विचारत होते तुम्ही हनिमून ला कुणीकडे जाणार आहात ? काय उत्तर देऊ मी त्यांना ?"

सायली " धन्य आहेत तात्या "

मिहीर " मी तुला अजून  विचारले नाही असे सांगितले तर शिव्यांची लाखोली वाहतील ते मला .. आणि तू अजून मी तुझा नवरा होणार आहे कि रूममेट हे ठरवले नाहीस .. उद्या अचानक मी कुठून टिकेट्स बुक करणार ? त्या रवी ची बायको त्याला लग्न होऊन ८ महिने झाली तरी शिव्या घालते मला स्वत्झरलँड ला जायचे होते तर तुम्ही मला शिमला ला का आणलेत ?"

सायली " खूप जोरात हसायला लागते "

मिहीर " हसा खूप हसा ,, आमच्या गरिबांवर हसा "

सायली " ओके .. हनिमून चा विषय सध्या नको कारण मी अजून थोडा  विचार करतेय . कदाचित मला तेवढ्या रजा पण मिळणार नाहीत  "

मिहीर " मग मी तात्त्यांना  काय सांगू ?"

सायली " ते तू ठरव"

मिहीर " मी सांगतो , आम्ही सिंगापूर ला जाणार आहोत .. बुकिंग झालीय म्हणून "

सायली " खोटारडा आहेस एक नंबर चा "

मिहीर " खर सांगतो मग , ते सायली आणि मी जरा वेगळ्या प्रकारचे लग्न करतोय ..तात्या बंदूक घेऊन येतील इकडे .. सगळं किस्साच खल्लास "

सायली " गप  रे .. असे काहीही होणार नाही .. तुला जायचंय का हनिमून ला ?

मिहीर " का तुला नाही जायचंय का ?"

सायली " आज काय वैतागलास का ? "

मिहीर " अग तुझं कॉन्फयुजन घालवता घालवता मीच कॉन्फ़्युज झालोय . मी नक्की नवरा होणार आहे कि रूममेट कि बकरा बनणार आहे ?

सायली  पुन्हा जोर जोरात हसायला लागते . एवढी जोरात हसते कि आजू बाजूची लोक बघायला लागतात

सायली " सॉरी सॉरी .. असे म्हणते आणि नकळत मिहीर च्या केसांना तिच्या हातांनी विस्ककते "

मिहीर " हे काय ? केसांना नको ग विस्कटू .. आधीच जेल शिवाय सेट होत नाहीत माझे केस "

प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यामधला हा सुवर्ण काळ असतो . लग्नाच्या आधी एकत्र वेळ घालवणे . हि वेळ अशीच पॉझ करून ठेवावी असे वाटते .

बोल बोलता आजचा दिवस पण संपतो . आता मिहीर जरा सिरिअस होऊन

मिहीर " आज १२ तारीख आहे ,मी १५ तारखे पासूनची सुट्टी घेतलीय . मी १५ तारखेला ऑफिस झाल्यावर गावी जाणार आहे . ते मी येणार पुढल्या महिन्यात १२ तारखेला . त्यावेळेस आपले लग्न झालेले असेल . मी हे जे विषय आज बोलतोय हे सगळे फार महत्वाचे आहेत तू हसून घालवू नकोस ."

सायली " हमम ... "

मिहीर " एक विचारू ? तू लग्नाला तयार आहेस ना ?"

सायली " शांत .. काहीच बोलत नाही .. "

मिहीर " सायली , तुझ्या शांत राहण्याचा मी काय अर्थ घेऊ . "

सायली  एकदम टेन्शन मध्ये आली .. आणि पटकन उठली " चल , घरी जाऊ ?"

मिहीर " का ? विषय अर्धवट सोडून निघालीस . तू का घाबरतेस ?. कधी तू या सगळ्या ला फेस करणार ?"

सायली " आय डोन्ट नो .. "

मिहीर " अरे असे बोलून कसे चालेल .? बरं एक मिनिट थांब मी काय सांगतो ते ऐक . डोन्ट गेट स्ट्रेसड . लग्नात माझी बायको छान दिसली पाहिजे . तू स्ट्रेस घेतलास तर डार्क सर्कलस येतील "

सायली ला मिहीर च्या प्रत्येक वाक्यात जाणवायचं कि तो तिची किती काळजी घेतोय . त्याचे तिच्यावर जीवपार  प्रेम आहे . हिला मनातून सारखे वाटायचे कि लग्ना  नंतर विनय जसा  मिताली शी वागतो तस हा पण बदलला तर . ???आणि माझ्याकडून  ऑफिस च्या नादात त्याचे मन दुखावले गेले तर ??? या सगळ्या विचारांनी ती कोणतंही फायनल उत्तर मिहीर ला देत नव्हती . किंवा द्यायला घाबरत होती .

मिहीर ने किती पेशन्स ठेवले तरी पण आता त्याला तिच्या मनात नक्की काय आहे हे कळलेच पाहिजे कारण आता लग्न 10  दिवसांवर आलेय . शेवटी हा काही भातुकलीचा खेळ नाही . कंटाळा आला कि मोडून टाकला .

मिहीर " मी काय सांगतो ते ऐक . तू आता घरी जा . आपण उद्या बोलू .. अजून ३ दिवस आहेत आपल्याकडे "

सायली " सॉरी मिहीर .. मी तुला आता खूप त्रास देतेय हे कळतेय मला . तुला डिसिजन च जर हवा असेल तर सध्या पण मॅरीड बॅचलर लग्न करणार आहोत असे ठरवून टाकू ."

मिहीर " ओके , ठीक आहे ... "

सायली " सॉरी .. "

मिहीर "सॉरी कशाला , मीच तुला हा ऑप्शन दिलाय त्यामुळे इट्स ओके .. चल तुला गाडी पर्यंत सोडतो "

सायली आणि मिहीर चालायला लागतात . आता मात्र दोघेही शांत , कोणचं कोणाशी बोलत नव्हतं . म्हणतात ना जास्त हसले कि रडायला येत तसेच काहीसे झाले होते . सायली ने तिचा निर्णय तर दिला होता तरी पण तीच मनातून अस्वस्थ होती . तिला मोठ मोठयाने रडावे असे वाटत होते .

🎭 Series Post

View all