विभक्त भाग १०

In this part MIhir and sayali went together in the temple with their families

विभक्त भाग १०

क्रमश: भाग ९

मिहीर ला पण खूप छान ड्रेस घेतला होता . तरी पण मुलांचे काय त्यांना कपड्यांमध्ये फार व्हरायटी नाहीत . शेरवानी ती शेरवानीच कितीही रंग वेगळा असला तरी पॅटर्न कमी असतात . शिवाय एरवी शर्ट आणि पॅन्ट चे पण तेच .. लेडीज ला ह्या बाबतीत एक अनोखा खजिना मिळालाय . साडी , नऊवारी , गुजराथी , बेंगॉली , बनारसी , जेवढें राज्ये तेवढ्या वेगळी प्रकारे साडी नेसता येते . शिवाय पंजाबी ड्रेस मध्ये . नॉर्मल पंजाबी , पट या ला, चुणीदार , अनारकली अजून किती तरी असतील . घागरा , चनिया चोली , लाचा , आणि मग वेस्टर्न येते त्यात सुद्धा स्कर्ट टॉप , जीन्स शर्ट ,वन पीस , त्यात लॉन्ग ,शॉर्ट , किती सांगू तेवढे कमीच आहेत . म्हणजे फॅशन च्य बाबतीत स्त्रियांची चंगळ आहे आणि म्हणूनच च स्त्रियांचे शॉपिंग कधी पूर्ण होत नाही .

मिहीर त्याचा शेरवानी बदलीं करून  केव्हाचा  बाहेर येऊन बसला होता . विनय आणि मिहीर गप्पा मारत बसले होते . तुमचे काम कुठे आहे ? काय प्रकारचे आहे वगैरे 'बॉईज टॉक ' . हो असते बर का .. बॉइज टॉक पण असते. खरं तर दोघेही भुकेलेले होते . दोघे हि दोघांच्या बायकांची वाट बघत होते. तोपर्यंत दोन्ही नातवंडांचे जेवण आजी आबा उरकत होते .

आणि तेवढ्यात सायली मॅडम ची  ग्रँड एन्ट्री झाली . सायली या साडीत नवरी दिसत होती . आणि तेवढ्यात डीजे वाल्याने गाणे लावले " नवरी नटली बाय  माझी सुपारी फुटली ... आणि जो हशा फुटला ..... मिहीर आज स्वतःचीच पाठ थोपटून घेत होता . एक तर हि समोर असलेली सुंदरा माझी बायको होणार आहे आणि त्या सुंदरीने जी साडी नेसलीय ती मी आणलीय ..

बायको सुंदर मिळाली कि काय रुबाब असतो ना .. एक वेळ हुशार नसली तरी चालेल पण सुंदर हवी .

मिहीर नंतर सगळ्यात खुश होते ते तात्या .. मोठा मुलगा जरा त्यांच्यावर गेला होता .दिसायला स्मार्ट होता पण राकट होता .त्याची शान वेगळी होती . प्रश्न मिहीरचाच होता तो जसा राजबिंडा होता तशी त्याला बायको शोधणे हे काम कठीण होते . पण योगायोगाने शरद आणि तात्याची भेट झाली आणि लग्न जमले .

सगळे जेवायला बसले . मिहीर आणि सायलीला शेजारी बसवले . त्यांच्या शेजारी विनय आणि मिताली बसले . त्याच्या शेजारी शरद शोभा बसले , त्याच्या शेजारी तात्या आणि लीलाबाई बसल्या , शिशिर आणि लता बसली .. हि अशी जोडपी जेवायला बसली . जेवण पण उत्तम .. जिलेबी आणि मठ्ठा च्या मेनू भुकेच्या तडाख्याला सर्वांनी हाणला .

मिहीर च्या डोक्यात वेगळेच प्लॅन चालू होते . त्याला सायली ला त्याची रूम दाखवायची होती , तिला गाव दाखवायचं होते . पण तात्यांची परमिशन काढणार कशी ? याचाच विचार तो करत होता .

सायली पण हळू हळू हे विसरून जात होती कि तिला कधी लग्न करायचे नव्हते . मिहीर चा इम्पॅक्ट इतका पडला होता कि हळू हळू ती पण त्याच्यात गुंतत होती . जे काही चाललंय ते खूप छान आहे .

 जेवणे झाल्यावर बाकीचे पाहुणे मंडळी गेली आणि आता घरातलीच मंडळी राहिली हळू हळू मंडप रिकामा झाला . तात्या आणि  शरद गप्पा मारत  बसले . मिहीर एका बाजूला , सायली एका बाजूला , विनय आणि मिताली दोघे जवळ जवळ बसलेली त्यांची पोर खेळून दमली ती त्यांच्या अंगावर झोपलेली .

मधेच तात्यांच्या  मनात काय आले काय माहित ते सायली कडे बघून  म्हणाले

" काय म , आवडलं का घर ? आणि मुख्य म्हणजे आवडला का आमचा  मिहीर ?

सायली ला हा प्रश्न इतक्या सगळ्यांसमोर अनपेक्षित होता . सायली तर घाबरलीच पण मिहीर पण घाबरला . मिहीर सायलीला म्हणाला होता मी त्यांच्या समोर उभाच राहत नाही ... तो हे का म्हणाला हे तिला आत्ता कळले होते .

तात्याच्या मनात काही नसायचे पण असे डायरेक्ट प्रश्नाची उत्तरे देणे फार कठीण असते आणि समोरच्याची गोची केलीय हे त्यांना कळत नाही .

शोभा आणि शरद पण टेन्शन मध्ये सायली आता काय उत्तर देते काय माहित ?

मिताली आणि आणि विनय पण दोघे अश्यर्यचकित होऊन दोघे एकमेकांकडे बघू  लागले .

सायली चा तर हृदयाचा ठोकाच चुकला होता . काय उत्तर देऊ काहीच कळत नव्हते .

तेवढ्यात मिहीर " तात्या .. ते .... "

तात्या " थांब रे तू नंतर बोल ."

मिहीर ने सायलीला ह्या सिचवेशन मधून वाचवायचा प्रयत्न केला पण तो असफल झाला .

शेवटी सायली ने नीट विचार करून उत्तर दिले

" ज्या घरात माझे मोठ्या सुनेने आरती ओवाळून स्वागत केले , ज्या घरात एक आई ने दुसऱ्या आई ला मी तिची आईच आहे असा विश्वास दिला आणि ज्या घरात मुलगा वडिलांच्या शब्द बाहेर नाही ज्या घरात तू मुलगी आणि नारळ घेऊन आलास तरी चालेल असे म्हणणारे वडील आहेत त्यांच्या घरा  पेक्षा त्यांचे मन किती मोठे आहे ती माणसे आवडणारच ना .. "

एक मिनिटा करता  सगळीकडे शांतता ..

सायलीने लास्ट बॉल ला सिक्स मारून मॅच जिंकली होती . शरद आणि शोभा पण आस्चर्यचकित झाले .. हे एव्हडं हिला बोलायला सुचलं तरी कसे .

तात्या मात्र गप्प झाले होते त्यांना सायलीने बोललेलं इतके आवडले कि त्यांच्या डोळ्या च्या कडा ओल्या झालेल्या मिहीर ने पहिल्या .

तात्या " शरद राव ,, शेवटी एका वकिलाची मुलगी आहे ती .. खूप छान उत्तर दिलें आमच्या  सुनबाईने "

मिहीर मात्र तिच्या उत्तराने तिच्या हुशारीवर पुरता खलास झाला होता . ब्युटी विथ ब्रेन हे रेअर कॉम्बिनेशन असते आणि हे कॉम्बिनेशन असलेली आपली बायको होणार आहे त्याचा त्याला अभिमान वाटू लागला .

शरद " चला मग आता आम्ही निघतो .. म्हणजे वेळेत घरी पोहचू "

शोभा " हो ना आता निघायला पाहिजे "

तात्या " मिहीर , तू काही तरी म्हणत होतास ना ?"

मिहीर " हो  ते मी म्हणत होतो .. इथल्या गाव देवीला गेलो असतो आता सर्व जण "

तात्या ला जरा वेगळेच वाटले ह्याला मंदिरात कधी पासून आवडायला लागले .. तेवढ्यात शिशिर तात्यांच्या कानात काहीतरी कुजबुजला ..

तात्या " ठीक आहे , मग शरद असे करू आपण मंदिरात जाऊन येऊ आणि तोपर्यंत घरातील मंडळी चहा करून ठेवतील . आल्यावर चहा झाल्यावर तुम्ही निघा .. आता ३ वाजलेत ४ वाजता निघालेत तरी पोचाल वेळेत .. चालेल का ?"

शरद " हो चालेल ."

आणि सगळे मंदिरात जायला निघाले .

मिहीर ला सायलीला त्याच्या गाडीत किंवा जर टू  व्हिलर ने गेलो तर त्याच्या बरोबर पाहिजे होती . पण तात्यांना कोण विचारणार ? सगळ्यांनसमोर  गाढव म्हणून टाकतील . काय करू करू ? असे त्याला झाले होते .. सगळे फोर व्हिलर कडे चालले होते .

तात्या  " शरद राव ह्या दोघांना येऊ दे मागून टू  व्हिलर ने .. चालेल का ?"

शरद सायली कडे बघून .. काय ग बसशील का टू व्हिलर वर .. तिला सवयच नाही .. आमच्या कडे नाहीये टू व्हिलर ."

तात्या " त्यात काय ? येतील पोरं पोरं तेवढाच त्यांना पण एकांत "

शरद ला हे मनातून नको वाटत होत पण तात्या एवढा स्पष्ट बोलत होता कि नाही म्हणताच येत नव्हत

मिहीर “चालू “असे एक्सप्रेशन जसे कि त्याला हे नकोय पण तात्यांपुढे माझे काय चालत नाही .

शिशिर मागून बघा कशी कळी खुलली एका मुलाची ..” ए शहाण्या तात्यांना हि आयडिया मी दिली कळले काय?”

मिहीर एकदम गोड हसला . आणि बाईक काढून हिरो सायली ला मागे बसायला सांगितले .

शोभा गाडीत बसली खरी पण तिचे सगळे लक्ष मागे होते ..

सायली बाइक वर पहिल्यांदाच बसणार होती .त्यात ती साडीत . कसे बसावे काही कळत  नव्हते आणि मिहीर च्या इतक्या जवळ पहिल्यांदाच उभी राहिली होती . त्यामुळे तिचे हातपाय थंडच पडले होते .

मिहीर " अग  बस कि "

सायली " कशी बसू ? मी कधीच बसले नाही बाइक वर . त्यात साडी नेसलीय .  मी कशी बसू .? शेवटी मिहीर सांगू लागला . इथे पाय ठेवयाचा आणि मग चढायचं आणि मग बसायचं .

शेवटी मिहीर ने दिला हाताला धरून बसवले .. इतके ऑकवर्ड वाटत होते तिला .

मिहीर मात्र मस्त " तीला हे बघ हि माझी दहावी पर्यंत ची शाळा .. हि आमच्या इथली बाग , हे एक पुरातन मंदिर आहे असे सांगत होता "

सायली " काहीच बोलत नव्हती .. नुसते .. हू .. हू.. असे करत होती

मिहीर " कसली भारी आहे ग तू ? तात्याच्या प्रश्नाला एक नंबर उत्तर दिलेस . मी तर फिदा झालो ..

सायली " हू.. हू,,"

मिहीर " अग  घाबरू नकोस .. मी तुला पाडणार नाही "

सायली " हू,,"

आणि बोल बोलता मंदिराजवळ आले . पूर्ण प्रवासात सायली हू.. हू,, व्यतिरिक्त काहीच बोलली नव्हती . मिहीर ने दोन्ही  फोर व्हिलर गाड्या पुढे जाऊन दिल्या आणि एका ठिकाणी गाडी मंदिराच्या आधी गाडी साईडला घेतली .

मिहीर " मग मॅडम , कशी वाटली बाइक राईड "

सायली " येताना मी नाही येणार तुझ्या बरोबर . मी बाबांच्या गाडीतून जाईन काय "

मिहीर " नको ना यार .. परत  इतक्यात चान्स नाही मिळणार .. आणि हे काय तु काहीच बोलली नाहीस . मीच बोलत होतो ."

सायली " मला खूप ऑकवर्ड आणि भीती पण वाटत होती . "

मिहीर " ऑकवर्ड का ? "

सायली " तुला नाही कळणार "

मिहीर " तरी पण माझ्या साठी येताना पण ये "

सायली " बघु  नंतर .. चला आता देवळात "

मिहीर " सायली .. एक मिनिट .. येताना तू माझ्या बरोबर असशील कि नाही मला माहित नाही .. मला काहीतरी बोलायचं "

सायली " बोल मग पटकन सगळे म्हणतील कुठे मागे राहिले ?"

मिहीर " सायली .. तुला आमच्या बद्दल सगळी माहिती मिळालीय ना ?"

सायली " हो .. म्हणजे बाबांनी मला सांगितलंय सगळं "

मिहीर " तेच मला विचारायचं होते .

सायली " का पण असे का विचारलेस ?

मिहीर " माझ्या दृष्टीने तुला  सगळे माहित असलेले चांगले आहे ना "

सायली ला हा नक्की काय आणि कशा बद्दल बोलतोय कळे ना .. पण तिला तिथे रस्त्यात त्याच्या बरोबर थांबायला ऑकवर्ड वाटत होते .

सायली " हो नक्कीच .. मला सगळं तुझ्या बद्दल बाबांनी सांगितलंय . ठीक आहे .. चल आता जाऊ मंदिरात .. "

मिहीर " अजून एक .. "

सायली " आता काय? " सायली जरा वैतागून

मिहीर " आय लव्ह यु "

सायली  एक मिनिट स्तब्ध .. तिला काय बोलावे हे क्षणभर कळेलच नाही .. तीने दोन्ही हाताने तिचा चेहरा झाकून घेतला "

मिहीर " हॅलो .. मी म्हटले .. आय लव्ह  यु "

सायली " काहीच बोलली नाही ..

मिहीर " ओके टेक युअर टाईम "

आणि दोघे मंदिरात आले

🎭 Series Post

View all