वेळेचे महत्त्व (लघुकथा - दोन)

ही कथा पुन्हा एकदा इथे टाकतीये


सौरभ एक हुशार मुलगा होता. त्याला नवीन गोष्टी शिकायची समजून घ्यायची खूप आवड होती तसेच त्याला अभ्यासाची सुद्धा प्रचंड आवड होती.
तो नेहमी आपल्या मित्रांना काही अडलं तर मदत करत असे समजून सांगत असे. त्यामुळेच की काय मुलांबरोबरच तो शिक्षकांचा देखील लाडका होता आणि म्हणूनच त्याच्या वर्ग शिक्षकांनी त्याच निबंध स्पर्धेत नाव दिल होत सौरभला लिखाणाची देखील खूप आवड होती.
कथा असो किंवा कविता तो खूप सुंदर लिहायचा. म्हणून शाळेकडून त्याच निबंध स्पर्धेसाठी नाव दिल गेलं होत. आणि विषय होता "वेळेचे महत्व"
सौरभला हे कळताच त्याला खूप आनंद झाला आणि या आनंदाच्या भरात त्याच्यातला एक छोटा लेखक जागा झाला व तो आपण निबंधात काय लिहायच याचा विचार करू लागला.
काही वेळा नंतर...
त्याची एक मोठी मावस बहीण श्वेता घरी आली. श्वेता एक मोटिव्हेशनल स्पीकर होती तीला सौरभच्या आईकडून त्याच्या निबंध स्पर्धेबद्दल समजल आणि तीने सौरभला मदत करायच ठरवल.
ती सौरभच्या खोलीत गेली. सौरभ अभ्यासालाच बसला होता ते बघून श्वेता त्याला विचारते.
श्वेता :- "सौरभ मी आत येऊ का मी तुला डिस्टर्ब तर केलं नाही न."
सौरभ निबंधाची तयारी करत असतो तेवढ्यात त्याच श्वेताकडे लक्ष जात श्वेताला बघून त्याला खूप आनंद होतो. तो लगेच म्हणतो.
सौरभ :- "अरे, दी तु कधी आलीस ये न."
श्वेता :- "बर, काय लिहील आहेस तू दाखव बघू."
सौरभ :- "अरे, दी काय लिहिणार मला तर आज काही सुचतच नाही आहे. तु मला काही मदत कर न कस ही मला निबंध लिहून द्यायचाच आहे. पण मुद्दे काय घेऊ तेच कळत नाही."
श्वेता :- "एवढच न. मी तुला काही मुद्दे देते तु त्याचा उपयोग करून निबंध लिही चल पॉईंट्स नोट करून घे."
सौरभ :- "हो दी सांग."
श्वेता :- "1) सकाळी काय करायचं आहे याचा टाईम टेबल बनवा. आणि सकाळी उठल्यापासून या वेळा पत्रकाप्रमाणे कामाला लागा.
2) दररोज आपला वेळ कुठे कुठे वाया जातो याची एक यादी बनवा या यादीतील कोण कोणत्या बाबींवरील वेळ कमी करता येईल याचा विचार करा.
3) प्रत्येक काम दिलेल्या किंवा नियोजित वेळेवर करा. काम जर वेळेवर नाही झाले तर अतिरिक्त ताण येऊ शकतो आणि ताण तणावाने देखील वेळ वाया जातो.
4) वेळेच्या व्यवस्थापनाची साधने: घड्याळ, कॅलेंडर, वेळापत्रक.
5) कोणत्याही गोष्टींची वाट बघण्यात वेळ घालवू नका.
6) रिकाम्या वेळेचा सदुपयोग करा.
7) एका वेळेस एकच काम करा.
8) दिवसभरातील कामाचा आढावा घ्या. आपल्या वेळेचे नियोजन व्यवस्थीत झाले की नाही याचे विश्लेषण करा.
बघ तुला इतके पॉईंट दिले आता यावरून छान निबंध लिही आणि तुझ्या आयुष्यात पण ह्या पॉईंट्स चा वापर कर खूप छान निबंध लिही. ऑल द बेस्ट"
सौरभ पॉईंट चा वापर करून सुंदर निबंध लिहितो. त्याचा निबंध वाचून शिक्षकांना त्याच खूप कौतुक वाटत आणि त्याचा स्पर्धेत पहिला नंबर येतो