Login

वेळ दे तिला

वेळ दे तिला ..सावरेल ती तुझ्या घराला

  
वेळ दे तिला..........सावरेल ती तुझ्या घराला

एक  मुलगी लग्न होऊन नवऱ्याच्या घरात आली की तिच्याबद्दलच्या सगळ्या अपेक्षा सर्वांनी आधीच ठरवून ठेवलेल्या असतात.....आणि तिने त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण कराव्यात हा जणू अलिखित नियमच असतो......

प्रत्येकाने स्वतःच्या मनात  ठरवलेला असतो  तिच्यासाठी एक साचा....... एक बायको म्हणून, सून म्हणून, वहिनी  म्हणून, किंवा काकू, मामी म्हणून.......पण ती आधी एक माणूस आहे हे मात्र नक्कीच विसरलेला असतो.......

आणि मग सुरू होते नात्यांची गफलत....अपेक्षांची भरिमाड......तिची तारेवरची कसरत......नात्यांसोबत सांगड घालण्याचा प्रयत्न......सगळी तशी नवीनच नाती...कधी न अनुभवलेली.......तरी सुद्धा तिला हवीहवीशी........

स्वतः ला विसरून लागते ती सगळ्यांच्या अपेक्षांना सावरायला , आणि चुकून कधी चुकली तर वाच लागते तिच्या संस्कारांना......डोळ्यात येते पाणी आणि ठेस लागते काळजाला.........आणि मग त्रासलेली बदलेली ती.....तिचेच दोष दिसती सगळ्यांना........

ती होती आधी एका घरची मुलगी....आईबापाची जीवापाड जपलेली एक मुलगी.....आजियाजोबंच्या लाडाकोडात वाढलेली एक मुलगी.........ना कुठल्याच अपेक्षा होत्या नात्यात.....होती फक्त प्रेमाची आस.....येती एक जरी अश्रू डोळ्यात....डोळे पुसायला धावती घरातले सगळे हाथ....

24- 25 या घरात वाढलेली जगलेली मुलगी......2- 4 महिन्यात लगेच तुमची कशी होईल....आई बाबा ..आजी आजोबा लगेच ती विसरून कशी जाईल.....
आपली आवड, आपली पद्धत, आपली हुशारी आपलं शिक्षण, आपलं घर.. सगळ मागे सोडून ती येते.....कधी न आवडलेली दुनियेची ही रीत निराळी, आणि फक्त आडनाव बदलले म्हणून ती तुमच्या घरची होते

नवीन घर, नवीन लोक,  नवीन सगळे संबंध....
नवीन शब्दं, नवीन विषय.  नव्हती सवय ऐकायची कधी........कुणी विचार का करत नाही कधी कधी गुदमरतो जीव या थट्टा मस्करित आणि तुटतात सगळी स्वप्नं

आल्या आल्या  सण वार, देव धर्म कुळाचार...... आपल्या प्रथा आपल्या पद्धती ,चालीरीती आचारविचार. ... अपेक्षा करावे  हे सर्व सांभाळून तिने करावे  तिची नोकरी...लावावे घराला हातभार

हे सगळं सांभाळताना होत असते तिची मानसिक आणि शारीरिक ओढतान, या सगळ्यात नवऱ्याने साथ दिली तर उत्तम नाही तर सगळे कोरडे पाषाण....आणि मग कायमची निर्माण होते मनात सासर बद्दलची अढी, जी निघता निघत नाही

नात्यांचा उतावळेपणा , अपेक्षांची गर्दी ... प्रेम , कौतुक तुमच्याकडून भेटले नाही आणि मग ती ओढली जाते तिच्या माहेरा कडे, तिला प्रेम देणाऱ्या लोकांकडे...हे तुम्हाला का कळत नाही....समजादरी चा सगळ्या अपेक्षा का तिच्याकडून ...जेव्हा तुम्ही म्हणता चार उन्हाळे पावसाळे तुम्ही जास्ती पाहिलेत म्हणून,तेव्हा तुमची समजादरी का तुम्ही दाखवत नाही...

वेळ द्या तिला सोबत तुमच्या आपुलकी आणि विश्वासाचं योग्य खतपाणी, ठेवा तिचा मान नका करू अपेक्षांची गर्दी, बहरेल हे नातं , फुलेल ती तुमच्या घरात.....

हाच सुखाचा आहे मंत्र, ध्या नवीन सूने ला सुरुवातीची 4-5 वर्ष , घराचं होईल स्वर्ग ,  आणि आनंदाने जगा पुढल आयुष्य .....

********