वेगळ्या जगातले नातेवाईक ( भाग दुसरा )

दुधाच ऋण खूप मोठं असतं हे फक्त प्राणीच जाणतात.


वेगळ्या जगातले नातेवाईक (  भाग दुसरा )

विषय: नातीगोती

जरी तो आमच्या आधी गाडी पकडण्यासाठी प्लॅटफॉर्मवर आलेला असला  तरी आणि गाडी उभी असली तरी देखील तो आत बसायला बसायला जात नसे. अगदी गाडीखाली असली तरी. जणू बाकावर बसण त्याला शिक्षा वाटत असे.

सकाळी, सगळ्यांच्या आधी तो प्लॅटफॉर्म वर हजर असे. रोज एकदम फ्रेश असायचा. अंगावर मस्त हळुवार स्प्रे शिंपडलेला असे. पायात ऊंची शूज घातलेले असतं. शर्ट नेहमी केलेला असे. त्याची आवड देखील अतिशय उच्च अभिरुची दर्शवणारी होती.  जेव्हा गाडी प्लॅटफॉर्मला लागलेली असे आणि तो गाडीच्या दरवाजा जवळ उभा असे. त्यावेळी  त्याचे आणि माझे थोडेफार बोलणे होई. त्या थोड्याफार धावत पळत बोलण्यात तो एका आयटी कंपनीत कामाला आहे. त्याचा वाचनाची खूप आवड आहे. एव्हढ्या गोष्टी मला समजल्या. कारण माझ्या हातात असलेलं एक पुस्तक त्याने सहज चाळायला मागितलं. आणि ईतर काही वाचनीय पुस्तकांबद्दल माहिती सांगीतली. त्या वरून तो अतिशय संभाषण चतुर आहे हे मला समजल.

या व्यतिरिक्त त्याला एक विचित्र सवय होती. म्हणजे तशी फार विचित्र नाही म्हणा. कारण अशी माणसं आपण आपल्या आजूबाजूला बघतच असतो. हा माणूस अर्थात अजूनही मला त्याचं नावं माहित नाही.

सकाळी तो प्लॅटफॉर्म वर आला की पार्ले बिस्किटांचे आठ दहा पुडे घेऊन येतं असे आणि प्लॅटफॉर्म वरील बेवारशी कुत्र्यांना खायला देत असे. त्याचं हे देणं देखील इतक्या प्रेमाने असायचं की तो दिसल्या बरोबर अनेक भटकी कुत्री आमंत्रण दिल्यासारखी त्याच्या कडे धावत यायची. गाडी सुटे पर्यंत त्याच्या आसपास रेंगाळत राहायची. त्या वेळी तो खूप तृप्त दिसायचा.

बरं, आमच्या ईथल्या प्लॅटफॉर्म वरच्या कुत्र्यांना खावू घालणं समजू शकतो. पणं येणाऱ्या प्रत्येक स्टेशन वरच्या प्रत्येक कुत्र्यांना रोज बिस्कीट खावू घालणं म्हणजे अजबच वाटतं. पण त्याच्या दृष्टीने ती नैसर्गिक गोष्ट होती.

त्याच्यामते कुत्रा हा अतिशय प्रामाणिक प्राणी आहे. पण फक्त पाळीव आणि चांगल्या ब्रिडचेच कुत्रे  चांगले असतात अस अजिबात नाही. यावर तर तो ठाम होता. कोणाला काहीही वाटो. तो त्याचा हा नित्यक्रम कधीच मोडत नसे. तो कुत्रे देखील आमची गाडी प्लॅटफॉर्म वर जेव्हा येत असे. तेव्हा मोठ्या प्रमाणावर असतील तेथून बरोबर आमच्या डब्यात समोर जमा होत. त्या दोन-तीन मिनिटात तो खाली उतरायचा आणि सगळ्यां कुत्र्यांना बिस्किट खाऊ घालायचा.

त्या कुत्र्यांचं त्याच्यावर इतकं प्रेम होतं की त्या दोन मिनिटात ते त्याच्या अंगावर उड्या मारून , शेपूट हलवून जसं जमेल तसं त्यांचं प्रेम व्यक्त करीत. आमची गाडी सुटली की कितीतरी अंतरापर्यंत आमच्या गाडीच्या मागे धावत येत असत. तो देखील हात हलवत त्यांना टाटा करायचा.

आम्हाला खिडकीतून हा खेळ रोज पाहायला मिळायचा. तो नसला की कुत्री नाराज होवून बसायची. त्याची अनुपस्थिती आमच्या पेक्षा त्यांनाच जास्त जाणवायची.

एक दिवस कल्याण स्टेशन वर कोणीतरी त्याला धक्का बुक्की करून त्याचं पाकीट चोरल. वरतून त्यालाच खाली ओढून मारहाण करायला सुरूवात केली. क्षणभर आम्हाला काय झाले तेच कळलं नाही. लगेच गाडी देखील सुरू झाली. आम्ही लगेच चैन ओढून गाडी थांबवली.

तोपर्यंत बाहेर कल्पना करवणार नाही एव्हढा गोंधळ सुरू झाला होता.

( क्रमशः)
लेखक: दत्ता जोशी

🎭 Series Post

View all